वास्तु पुरुषाच्या जन्माच्या (उत्पत्तीच्या) अनेक वेगवेगळ्या कथा पुराण व वास्तु ग्रंथातून अढळतात. विश्वकर्मप्रकाश या वास्तुशास्त्राच्या प्रमाण ग्रन्थातही एक कथा अढळते, या कथेनुसार प्राचिन काळी त्रेता युगात ब्रह्मदेवाने एक महाभूत (विशालकाय प्राणी) निर्माण केला. त्याने आपले संपूर्ण शरिर भूमंडलावर पसरवून दिले. त्याला पाहून देवता व दानव दोघेही आश्चर्यचकीत व भयभीत झाले व ब्रह्म देवाच्या शरण गेले. त्यावेळी ब्रह्मदेवानी त्या देवता व दानवाना असा सल्ला दिला की, याला अधोमुख पालथा पाडून त्यावर स्वार व्हा व त्यांनी तसे केले. मग त्या महाकाय पुरुषाने शरणांगती पत्करुन देवाकडे याचना केली त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला आपला मानसपुत्र मानून असा वरदान दिला की,…….
याशिवायही अनेक पुराणांतून व वास्तू ग्रन्थांतून अनेक वेगवेगळ्या कथा अढळतात. पण त्यापैकी सर्वात प्रचलित कथा ही मत्स्य पुराणातील आहे. ती अशी की, एकदा भगवान शिव व अंधकासुराचे द्वन्द (युध्द) होत असते त्यावेळी त्या दोघांच्या घामाचे काही थेंब भूमीवर पडले व त्या घर्मबिंदूतून एक विशालकाय, विराट व अत्यंत बलवान पुरुषाची उत्पत्ती झाली. देव व असुर दोघांनाही त्याला पाहुन आश्चर्य वाटले. मग ते त्याला घेऊन ब्रम्हदेवाकडे गेले ब्रम्हदेवांने त्या विशालकाय पुरुषाला आपला मानसपुत्र माणून वास्तुपुरुषाचे नांव दिले व त्याला एका विशीष्ट प्रकारे (ईशान्येला शिर व नैऋत्येला पाय करुन) जमिनीवर अधोमुख झोपवले. (दुसऱ्या कथेनुसार देव व असुरांनी मिळून त्याला अधोमुख जमिनीवर पाडले) त्याच्या काही भागावर देवानी तर काही भागांवर असुरांनी वास केला. याचबरोबर ब्रम्हदेवाने त्या वास्तु पुरुषाला असा वरदान दिला की,………
पुराणातील कथा वर्णन करताना यात दिलेली अनेक पात्रे ही प्रतिकात्मक (symbolic) असतात. त्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. इथे अंधकासूर , (नांवातच सर्व काही आहे) अंधार म्हणजे अज्ञानाचे प्रतिक तर शिव म्हणजे परम ज्ञानाचे प्रतिक आहे. या दोघांचे द्वंद (युद्ध) म्हणजेच संघर्ष, इथे हेच सांगायचे आहे की, मानसाच्या मनातील ज्ञान व अज्ञान यांचा हा संघर्ष आहे. तो ही इतका की, घर्म (घाम) येईल, घाम तेंव्हाच येतो जेंव्हा प्रचंड मेहनत घेतली जाते. शेवटी शिवाचा विजय म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा विजय. त्यात आलेल्या घामाचा थेंब म्हणजेच विचारांच्या संघर्षातून आलेला निष्कर्ष म्हणजेच वास्तु पुरुष. ज्याला ब्रह्माने (ज्ञानाची प्राप्ती झालेला व्यक्ती) आपला मानस पुत्र मानला. आणि असा वरदान दिला की,……..
जो कोणी घर, नगर, तलाव, मंदिर, प्रासाद, दुर्ग (किल्ला), शहर, पत्तन (व्यावसायीक नगर) बस्ती इ. चे निर्माण करते वेळी वास्तुपुरुषाला “ध्यानात” ठेऊन कार्य करेल, देवता त्याला सहाय्य करतील व जो कोणी वास्तु पुरुषाचा विचार न करता कार्य करेल, असूर (अ सूर म्हणजेच सूरात नसलेले, लयबद्ध नसलेले) ते कार्य नष्ट करतील, त्या कार्यात विघ्न आणतील. म्हणून वास्तु बनविताना वास्तु पुरुषाच्या अंगांचा, त्याच्या मर्म स्थानांचा विचार वास्तु तयार करण्यापूर्वीच करावा. तुझा विचार (पुजा) केल्याशिवाय वास्तुसंबंधीत कार्य पुर्ण मानले जाणार नाही. इथे हेच सांगितले आहे की, घर बनवण्यास सुरवात करण्यापूर्वीच त्याचे योग्य नियोजन केले पाहीजे.
संदर्भ – श्री मत्स्य पुराण
विश्वकर्मप्रकाश:
हे लेखही वाचा ……..
वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)


श्री उत्तम गावडे
ज्योतिष विशारद , वास्तू विशारद
9901287974 , 8722745745

2 Comments