[रविवार १० फेब्रुवारी २०१९ ते शनिवार १६ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.
ग्रहांचा राशीपालट– या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी रवी मकर राशीतून कुंभ राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुध उदय होत आहे. ]
मेष – व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरदारांना समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्वतःच्या रागांवर नियंत्रण आवश्यक आहे. वाहने जपून चालवावीत. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ११, १२, १५, १६.
वृषभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. अचानक खर्चामुळे नियोजनात बिघाड होईल. संततीला वाहनांपासून धोका संभवतो. विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा विरोध सहन करावा लागेल. जोडीदाराला प्रतिकुलता. मित्रांशी साथ मिळेल. शुभ ता. १०, १३, १४.
मिथुन – व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. फुफ्फुसाचे विकार त्रास देतील. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवासामधून सफलता मिळेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १०, ११, १२, १५, १६.
कर्क – उद्योग-व्यवसायात खळबळजनक घटना. आर्थिक नियोजनात बाधा. नौकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग. संततीच्या बाबतीत दुर्घटना शक्य. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. भावंडांच्या बाबतीत विचित्र समस्या. प्रवासामधून अनपेक्षित अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ११, १२, १३, १४.
सिंह – नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीला अधून-मधून निराशा जाणवेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. भावंडांच्या जोडीदारामुळे अडचणी येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.
कन्या – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये रोजचे कामकाज सुरळीत चालेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सासुरवाडीमध्ये अनपेक्षित घटना घडतील. स्वतःच्या वाहनाने शक्यतो प्रवास टाळावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, १५, १६.
तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींमुळे चांगले फायदे मिळतील. शुभ ता. १०, ११, १२.
वृश्चिक – उद्योग-व्यवायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १२, १३, १४.
धनु – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत शुभाशुभ घटना अनपेक्षितरित्या घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.
मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. स्थावराच्या संधी चालून येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या जोडीदाराबाबतीत अडचणी. संततीच्या अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १०, १५, १६.
कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना कष्टाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ मनासारखी मिळेल. शुभ ता. ११, १२.
मीन – व्यावसायिक प्राप्ती अपेक्षेपेक्षा कमी राहील. नौकरीमध्ये इच्छित कामात यश मिळेल. संततीच्या कामात अडचणी येतील. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराला अपघात भय. विद्यार्थ्यांना यश देणारा काळ राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून अपेक्षित यश मिळेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, १३, १४.
सौजन्य – दाते पंचांग
हे लेख हि वाचा ………
कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम
२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य