[रविवार २६ नोव्हेंबर २०१७ ते शनिवार ०२ डिसेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .
ग्रहांचा राशीपालट- शुक्र २५ नोव्हेंबर रोजी राशीतून तुला वृश्चिक राशीत तर मंगळ – २९ नोव्हेंबर रोजी कन्या राशीतून तुला राशीत जात आहे. या आठवड्यात मंगळ व शुक्र ग्रहा व्यतिरिक्त (चंद्र सोडून ) इतर कोणताही ग्रह राशीपालट करीत नाही आहे.]
मेष – व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास थोडा कमी राहील. जोडीदाराबरोबर किरकोळ वाद होतील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७.
वृषभ – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या नित्य कामात बाधा येणार नाहीत. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होतील. जोडीदाराच्या हटवादी वागण्याचा त्रास होईल. कफाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. २६, २७, २८, २९.
मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील, परंतु आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामास अनुकूलता राहील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. प्रवास संमिश्र फळे देतील. शुभ ता. २८, २९, ३०, १, २.
कर्क – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना कष्टाने सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १, २.
सिंह – संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कष्टसाध्य यश मिळेल. कौटुंबिक अडचणीतून मार्ग निघतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७.
कन्या – व्यवसायात आर्थिक निर्णय लाभ देतील. नौकरीमध्ये नियोजित कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. शुभ ता. २६, २७, २८, २९.
तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला लाभ देईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीच्या नौकरीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींच्या ओळखीचा फायदा होईल. शुभ ता. २८, २९, ३०, १, २.
वृश्चिक – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. अचूक आर्थिक अंदाजामुळे फायदा होईल. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. रागांवर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १, २.
धनु – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल. संततीच्या कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २६, २७.
मकर – व्यावसायिक आवक वाढेल. नौकरदारांना समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २८, २९, ३०.
कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामातून यश मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७.
मीन – संततीच्या बाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वाहनांच्या वेगांवर योग्य नियंत्रण ठेवावे. शुभ ता. २८, २९, ३०.
सौजन्य – दाते पंचांग