हृदयविकार आणि सूर्योपासना

अलिकडे ह्रुदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रगत विज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसे दुष्परिणामही आहेत. नैसर्गिक शारीरिक व्यायम कमी झाला आणि निकृष्ट प्रतीचा, अभक्ष्य आहार वाढला, तसेच युद्ध, प्रदुषण, मानसिक ताण, भिती, अस्थिरता वाढून परिणामत: ह्रुदयविकार फोफावू लागला आहे. अमेरिकेत १०० पैकी ५४ मृत्यु ह्रुदयविकाराचे असतात. तर भारतात मृत्युला कारणीभूत होणाऱ्या रोगांमध्ये सांसर्गिक व क्षय यानंतर ह्रुदयविकाराचा तिसरा क्रमांक आहे. यावर आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष कोणालाही करता येण्यासारखा सोपा उपाय म्हणजे सूर्योपासना होय. एकदा हा झटका आल्यानंतर तो सौम्य असो वा जोराचा असॊ त्यातून बरे वाटल्यानंतर त्यांना नेहमीच फार जपून रहावे लागते. सतत काहीतरी औषध घ्यावे लागते. इतके करुनही पुन: केंव्हा झटका येईल ते सांगता येत नाही व त्यामुळे सतत भीतीत आयुष्य कंठावे लागते. म्हणून मुळात झटका येऊ नये अथवा पुन: पुन: येऊन त्रास देऊ नये म्हणून दैवी उपाय केला जातो.

सूर्यापासूनच माणसाचा जन्म असल्याने सूर्याचा व माणसाचा त्यातही सूर्याचा व ह्रुदयाचा निकट संबंध असल्याने यावर सूर्योपासनेचा चांगला उपयोग होतो असा काही जणांचा अनुभव आहे. सूर्य हा जगताचा आत्मा आहे हे सर्व प्रसिद्ध आहे. सूर्यावर वादळ झाले म्हणजे पृथ्वीवर त्याचा परिणाम म्हणून काही जणांना ह्रुदयविकाराचा झटका येतो असे अधुनिक वैज्ञानिकांचे प्रतिपादन आहे. सूर्याचा व आपल्या ह्रुदयाचा निकटचा संबंध आहे हे जाणून वेदांपासून सर्व ऋषीमुनींनी सूर्योपासना श्रेष्ठ म्हणून सांगितली आहे. पूर्वी लहानपणापासून लोक नित्य सूर्यनमस्कार घालीत असत, गायत्री उपासना करीत असत. त्यामुळे ह्रुदयरोगाचेही प्रमाण कमी होते. प्रसिद्ध ह्रुदयरोग तज्ञ कै. डॉ. दाते आणि कै. डॉ. घरोटे यांनी “योग आणि तुमचे ह्रुदय” (Yog And Your Heart) या पुस्तकात अनेक उपाय सांगितले असून सूर्यनमस्काराला प्राधान्य दिले आहे. पुरोगामित्वाच्या नांवाखाली अश्रद्धेने हे सर्व बंद झाले आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत.  सुदैवाने तो अश्रेद्धेचा काळ संपूण आता लोकांमध्ये पुन:श्रद्धा निर्माण होत आहे. लोकांची धर्माकडे प्रवृत्ती होऊ लागली आहे. पूर्वाचार्यानी व गीतेनी श्रद्धेला अतिशय महत्व दिले आहे. या विकारवर पुढे दिलेले उपाय श्रद्धेने केल्यास त्याचे फल निश्चित दिसेल असा विश्वास आहे.

 

१)ऋग्वेदातील सौर सूक्तमंत्रानी पाणी अभिमंत्रित करुन ते प्राशन करावे. पाण्याऐवजी दूध अभिमंत्रित करणे अधिक चांगले. आपल्या हातामधील भांड्यात पाणी वा दूध घेऊन मंत्र म्हटले की ते पाणी वा दूध अभिमंत्रित होते. हा सर्वात उत्तम उपाय आहे पण तो सर्वानाच शक्य होईल असे नाही. कारण सौरसूक्त येणारी मंडळी फारच थोडी आहेत. वेदमंत्र असल्याने सहज कोणीही म्हणू शकेल असे नाही. वैदिक ब्राह्मणाकडुन त्या सूक्तानी अभिमंत्रित केलेले पाणी वा दुध रोज मिळवता आल्यास उत्तम.

 

२) सूर्यस्तोत्र, आदित्य ह्रुदय स्तोत्र, आदित्य कवच, सूर्यमण्डल स्तोत्र, सूर्यस्तुती यापैकी एक रोज म्हणावे. यासाठी संस्कृत उच्चार चांगले करता आले पाहीजे. संस्कृत भाषेचा अभ्यास कमी झालेला असल्याने तेहि कठीण झाले आहे. पण प्रयत्न साध्य आहे.

 

३) हा विकार असलेला मनुष्य सूर्यनमस्कार घालू शकत नाही म्हणून बसून सूर्याचे ध्यान – ध्येय: सदा सवितृ मण्डल…. (खाली संपूर्ण दिला आहे.) हा श्लोक म्हणून  मित्राय नम: इ. सूर्याची १३ नांवे (खाली दिलेली आहेत.) घेऊन प्रत्येक वेळी हात जोडून नमस्कार करावा. व अकाल मृत्यु हरणं….(खाली संपूर्ण दिला आहे.) हा श्लोक म्हणून तीर्थ घ्यावे. हे करणे सहज शक्य आहे.

 

४) जे सदृढ आहेत व ज्यांना अजून ह्रुदय विकाराचा झटका आला नाही व भविष्यात येऊ नये असे वाटते त्यांनी वरील प्रकार बसून करण्याऐवजी सूर्यनस्कार घालून करावा.

सूर्याची नांवे (१३) –

१) ॐ मित्राय नम:                 २) ॐ रवये नम:             ३)ॐ सूर्याय नम:

४) ॐ भानवे नम:                  ५) ॐ खगाय नम:           ६)ॐ पूष्णे नम:

७) ॐ हिरण्यगर्भाय नम:      ८) ॐ मरीचये नम:           ९)ॐ आदित्याय नम:

१०) ॐ सवित्रे नम:               ११) ॐ अर्काय नम:          १२)ॐ भास्कराय नम:

१३)ॐ श्रीसवितृसूर्यनारायणाय नम:

 

सूर्याच्या ध्यानाचा श्लोक –

ध्येय: सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायण: सरसिजासनसन्निविष्ट:।

केयूरवान्‌ मकरकुण्डलवान्‌ किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशंखचक्र:॥

तीर्थाचा श्लोक –

आदित्यस्य नमस्कारान्‌ ये कुर्वन्ति दिने दिने ।

जन्मांतर सहत्रेषु दारिद्र्यंनोपजायते॥

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनमं । सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्‌ ॥

 

हा विकार असलेल्या लोकांनी वरील उपाय करून आपले अनुभव कळवावेत म्हणजे पुढील वर्षी अधिक विश्वासाने व खात्रीपूर्वक लिहिता येईल.


साभार दाते पंचांग इ.स. १९८७-८८ शके – १९०९

 

 

हे लेखही वाचा ……..

 

श्री विष्णूच्या २४ प्रतिमा (मूर्ती)

अपराध – सेवापराध

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

What the cards say……

Hello friends, now we are familiar with the words like Tarot, cards, Deck, intuition, etc.

What’s the exact role of these cards?

What we mean by the Tarot card reading?

Answer to all such questions will be revealed soon.

So let’s first see what the cards are and what role they play. Tarot cards are very special cards which are designed by the experts. Each card in the deck holds its own special significance. If we have a close look at these cards, we find each cards have some special lines, figures, symbols, sings and colours on it. Each carries the hidden meaning with it. (This will be explained in the coming articles)

These cards are not just the cards but it carries a special type of energy in it. The cards are energised time to time by the readers.

What exactly happens…..?

Many times in life we come across critical turns. We come across some unanswered questions.

For example, we get the job offer of two good jobs at a time and the confusion starts playing its game in our mind.

We are happy in our present job, suddenly from some other source one more offers hits our door.

Sometimes, after a long struggle we land nowhere and we don’t know how far the path to go still is.

We have few plans to work out, but something within us pulls us back.

So my dear friends here exactly our Tarot Cards guides us. Yes, the cards GUIDE us.

hermit tarot jyotish jagat

hermit tarot jyotish jagat

When we go the reader to seek the solution for our queries, the readers, with the help of cards gives you the suggestions according to what he finds in the cards drawn by you.

Reading of the Tarot cards is not the final decision. When you are lost in the complete darkness, Tarot comes with the light to guide your path. When you are lost in the vast ocean, Tarot serves as a light house which helps you to move further to reach your destiny. When you feel down and are about to give up your battle, Tarot comes with the new hope and inspires you to fight for your victory. Tarot guides us to all the ingredients; next role is ours to bake our own bread.

In short Tarot serves as Guide on the critical turns of our life.

 

Thanks to the Divine.

Thank you Thank you Thank you.


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)

ही सृष्टी, या सृष्टीतील प्रत्येक वस्तु ही पंचतत्वांपासून बनलेली आहे. आपले शरीर सुध्दा याच पंचतत्वांपासून बनले आहे. हाच सिध्दांत आपल्या वास्तुलाही लागू होतो. पंचतत्वे म्हणजे अग्नि, पृथ्वी, वायु, जल व आकाश यांनाच पंचमहाभूते असेही म्हणतात. या पंचतत्वांचे प्रमाणबध्द संतुलन म्हणजेच ’वास्तुशास्त्र’. मूळात आयुर्वेद, योग व वास्तुशास्त्र यांचा मूळ उद्देश अनुक्रमे शरीर, मन व वास्तु (राहण्याची जागा) यांना संतुलीत करणे हाच आहे. पंचतत्वांचे हे संतुलनच वास्तुत राहणाऱ्यांना प्रसन्नता, शांती, आरोग्य, धन, समृध्दी व योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रधान करते व याच पंचतत्वांचे असंतुलन वास्तुतील शक्तीना अतिप्रभावी किंवा निष्प्रभावी करुन वास्तुत राहणाऱ्या लोकांसाठी प्रतिकुल परिस्थिती निर्माण करते.

 

ज्यावेळी आपण म्हणतो की, घर वास्तुशास्त्रानुसार आहे म्हणजेच त्या घरात पंचतत्वांचे संतुलन असते व जेंव्हा आपण म्हणतो की, घरात वास्तुदोष आहे तेंव्हा त्याघरात पंचतत्वांचे संतुलन बिघडलेले असते. या पंचत्वांचे एकमेकांशी असलेले संबंध महत्वाचे आहेत. कोणत्या तत्वातून कोणत्या तत्वची निर्मिती (उत्त्पत्ती) होते व कोणते तत्व कोणत्या तत्वाला नियंत्रीत (नाश) करते हे ज्याला समजले त्यालाच वास्तुशास्त्र समजले असे म्हणू शकतो.

 

पंचतत्वांच्या असंतुलनाचे परिणाम –

 

१) अग्नी तत्व – वास्तुमध्ये अग्नी तत्व असंतुलीत झाले असेल तर विनाकारण प्रत्येक कार्यात अपयश येते, स्वताची ओळख निर्माण करण्यात अडचणी येतात, अशा वास्तुत राहणाऱ्या लोकांत असुरक्षितेची भावना असते. अग्नी तत्वाचे असंतुलन हे आत्मविश्वास, जोश, उत्साह यांची कमी निर्माण करते.

 

२) पृथ्वी तत्व – वास्तुमध्ये पृथ्वी तत्व असंतुलीत झाले असेल तर जीवनात स्थिरता येणे कठीण होते, प्रत्येक बाबतीत या व्यक्तींना अस्थिरतेचा सामना करावा लागतो. अशा वास्तुतील व्यक्ती आळशी व स्फुर्तीहीन जीवन जगताना दिसतात. जीवनाचे ध्येय ठरविता येत नाही.

 

३) वायु तत्व – वास्तुमध्ये वायु तत्व असंतुलीत झाले असेल तर अशा वास्तुतील लोक अधिक रागिष्ट, छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणाऱ्या असतात, घरातील सदस्यांमध्ये नेहमी नोकझोक चालू असते. नातेवाईक व शेजाऱ्यांशी संबंध चांगले नसतात. अगदी शुल्लक गोष्टींवर सुद्धा टोकाची प्रतिक्रिया देतात. समाजापासून दूर असतात.

 

४) जल तत्व – वास्तुमध्ये जल तत्व असंतुलीत झाले असेल तर अशा व्यक्तींच्या जीवनात नविन संधी येत नाहीत. धनाची सतत कमतरता जाणवते. प्रगति थांबते. नोकरी व्यवसायात प्रचंड मेहनत करुनही फारशी प्रगती होत नाही. घरच्या सदस्यांमध्ये एकवाक्यता नसते, एकमत कधीच होत नाही. अशा वास्तूतील लोक नेहमी एका दडपणाखाली वावरताना दिसतात.

 

५) आकाश तत्व – वास्तुमध्ये आकाश तत्व असंतुलीत झाले असेल तर व्यक्तींचे मन भ्रमित व अस्थिर असते, नेहमी वैचारीक गोंधळ माजलेला असतो, विचारांची दिशा पक्की नसते. सकारात्मक विचार मनात येत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी व बंधनाची सतत जाणीव होत असते.

प्रतिक, आकार आणि रंग यांच्या माध्यमातून असंतुलित पंचतत्वांना बऱ्याच प्रमाणात संतुलित करता येते.


हे लेखही वाचा ……..

 

वास्तु पुरुष जन्मकथा

प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र

शिल्पसंहिता – भाग १

शिल्पसंहिता – भाग २

 


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्यो. विशारद, वास्तु विशारद

 9901287974, 8722745745


BACK TO HOME

BACK TO VASTUSHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमा

अश्विन पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. ही पौर्णिमा शरद पौर्णिमा अथवा कुमुदी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अधिकाधिक (३ लाख ८५ हजार कि.मी.) जवळ असतो. या रात्री वर्षभरापेक्षा सर्वात जास्त चांदणे पडलेले असते. पावसाळ्यानंतरची ही पहिलीच पौर्णिमा, या रात्री निरभ्र आकाशातून पडणाऱ्या स्वच्छ, शितल व प्रसन्न अशा चंद्र प्रकाशात अंगणात, बागेत अथवा गच्चीवर रात्रभर जागरण करीत चंद्राच्या प्रकाशात आटवलेल्या दुधाचे प्राशन केल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. दूध, खोबरे, पोहे (चिरमुरे) शहाळे, साखर अशा पांढऱ्या शुभ्र पदार्थांना या रात्री अतिशय महत्व असते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

पौराणिक महत्व –

 

निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी !

जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी !

तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले !!

 

पौराणिक कथेनुसार या रात्री इंद्रदेव व श्रीलक्ष्मी चंद्रमंडळातून भूतलावर येऊन (को जागर्ति) कोण जागे आहे हे पाहतात व त्यांच्या घरी निवास करुन त्यांचे कल्याण करतात. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या रात्री जागरण करुन ऐरावत हत्तीवर स्वार इंद्रदेव व श्री महालक्ष्मी देवीची पुजा करुन दूध, तूप व साखरमिश्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा असे सांगितले आहे. स्कंद पुराणात या पौर्णिमेस दारिद्र्यनाशक “कोजागर व्रत” करावयास सांगितले आहे. या व्रताने सर्व दारिद्र्य दूर होऊन संपत्ती, वैभव व आरोग्याचा लाभ होतो.

 

पूजन विधी- या व्रतामध्ये ऐरावत हत्तीवर बसलेल्या इंद्र व महालक्ष्मीचे पूजन करून दिवसभर उपवास ठेवावा, रात्री चंद्रपुजा करुन आटीव दुधाचे सेवन करावे. रात्री देवघर, घर, तुळस, अंगन, बाग व आसपासच्या परीसरात १०१ (किंवा यथाशक्ती) दिवे लावून रोशनाई करावी. श्रीसूक्त अथवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करत जागरण करावी. दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. सकाळी स्नान करून इंद्रदेवाचे पुजन करुन तूप व साखर मिश्रित खिरीचा प्रसाद सेवन करावा. यथाशक्ती दान द्यावे. अशा प्रकारे हे व्रत केल्यास महालक्ष्मीदेवी व इंद्रदेव प्रसन्न होतात व ऐश्वर्य प्रदान करतात. वलित नावाच्या संस्कारी पण दरिद्री ब्राम्हणाने हे व्रत केल्याने त्याचे दारिद्र्य दूर होऊन त्याचे कल्याण झाल्याची कथा सांगण्यात आली आहे.

 

आयुर्वेदिक महत्व –

आपल्या धर्मातील सण, व्रत वैकल्ये, उपवास इ. विशिष्ट काळात, विशिष्ठ ऋतूत तसेच विशिष्ठ पद्धतीनेच करवयास सांगितले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतांश सण, व्रत इत्यादींचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध येतो. म्हणून या गोष्टी अशाच का? व या वेळीच का? याचे कारण शोधायचे झाल्यास आपल्याला ते संदर्भ आयुर्वेदातून नीट समजावून घेता येतात.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

निसर्गात होणाऱ्या बदलांचा मानुष्याच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. शरद ऋतू हा प्रकोप पित्ताचा काळ म्हणून ओळखला जातो. या ऋतूत शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे आरोग्य बिघडण्याचा संभव अधिक असतो. अशा शरदात आरोग्य संभाळणे आवश्यक असते म्हणून शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चंद्र-चांदण्यांच्या शितल व प्रसन्न प्रकाशात अधिकाधिक वेळ राहून त्याचा लाभ घेणे हा या सर्वामगचा उद्येश आहे. दूध हे नैसर्गिक थंड प्रकृतिचे असल्याने ते चंद्राच्या सानिध्यात आटवून पिणे हि संकल्पना तयार करण्यात आली आहे. चंद्र-चांदण्यांची शितलता आणि दुधाचा थंडावा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर चंद्रप्रकाशात दूध आटवून पिणे हा कोजागिरी पौर्णिमेमागिल मूळ उद्येश. असो.

 

तर अशा या आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमेच्या आपणास खूप खूप शुभेच्छा !

 

हा लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 


 

 

Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्यो. विशारद, वास्तु विशारद

 9901287974, 8722745745

 

राहुचा अतिरेकीपणा शोध व बोध

ग्रहांचे मंत्रीमंडळात ‘राहु’ हा ग्रह अतिरेकी समजला जातो. त्याचा परिणाम ग्रहण कालात व त्यापासून सुरु होतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास दंगे, धोपे, तणाव, मोर्चा व नंतर त्या नेत्याची महत्त्वाचे स्थानावर नियुक्ती असा प्रकार सध्या लोकशाहीत चालू आहे. त्याचप्रमाणे थोड्याफार फरकाने राहू केतूची नियुक्ती ग्रहांचे मंत्रीमंडळात झाली आहे. विंशोत्तरी महादशेत राहूची १८ वर्षे व केतूची ७ वर्षे हा मोठा कालखंड आहे. प्रत्येक कालांत काही शब्दांना महत्व प्राप्त होते. हल्ली कुंडली समोर आली की, इतर महत्वाचे योग व सुक्ष्म निरिक्षण न करता कालसर्पाची कुंडली आहे असे सांगितले जाते. माझ्या माहीतीनुसार कालसर्प हा शब्दप्रयोग ‘मानवयुग’ ह्या पुस्तकांत श्रीमती इंदुमती पंडीत ह्यांनी मांडला, पण ह्याचा उपयोग सुर्यग्रहण व राष्ट्रीय भविष्यांत (फलादेशात) जास्त होतो, व त्याचे फलीत आणि परिणाम पहावयास मिळतात.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

प्राचीन भारतीय ज्योतिष्य शास्त्राचे एक वैशिष्ट्ये असे की, त्यांत थोडक्यात व संक्षिप्त स्वरुपांत ग्रहांच्या समुहाला विशेष नांवे देऊन त्यांचे शुभाशुभ परिणाम सुचीत केले आहेत. उदाहरणार्थ राजयोग, लक्ष्मीयोग, गजकेसरी योग, सुनफा, अनफा वगैरे ‘कालसर्प’ योग ह्याचा धसका लोकांनी ’मंगळ’ कुंडली सारखा घेताला आहे, सुर्यमालात रविचंद्रादी ग्रहांना राहू केतू निस्तेज करतात म्हणुन ते इतरांपेक्षा प्रबळ असावेत असे सर्वसामान्यांना वाटते. परंतु पूर्वाचार्यांनी त्याला समतोल महत्व दिले आहे.

राहू विषयक आपल्या पुराणात एक कथा सांगितली जाते. सुर आणि असुर यांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने निघाली होती. शेवटी अमृत निघाले. देव आणि दैत्य यांच्यात अमृताचे प्राप्तीसाठी युध्द सुरु होण्याची चिन्हे दिसू लागताच श्री विष्णूंनी मोहीनीचे रुप घेऊन देव व दैत्य यांना ओळीने बसवून अमृतांचा कुंभ घेऊन वाटण्यास सुरवात केली. एका हातात ‘अमृताचा कुंभ’ व दुसऱ्या हातात ’मद्य’ याप्रमाणें वाटतांना अमृत फक्त देवांनाच मिळावे अशी योजना केली आहे. ही क्लुप्ती राहुचे लक्षांत आली व त्याने मायवी रुप घेऊन सुर्य, चंद्र यांचेमध्ये बसून श्री विष्णूकडून थोडेफार अमृत मिळताच तोंडात टाकले. मध्ये बसलेला दैत्य आहे हे रविचंद्रंनी श्रीविष्णूस खुणेने कळविले. श्रीविष्णूंनी त्वरीत सुदर्श्न चक्रने राहूचा शिरच्छेद केला; पण तो पर्यंत ‘अमृत’ राहूचे शरीरांत प्रविष्ठ झाले होते. सुदर्शन चक्राचे आघाताने राहूचे शीर व धड हे वेगळे झाले. ‘अमृताचे’ प्राभावामुळे ते दोन्ही शरीराचे भाग चिरंजीव झाले. तेव्हपासून राहू हा रवि व चंद्र या ग्रहांना गिळायचे प्रयत्न करतो. तो क्रम ग्रहण रुपाने दिसतो. ही कथा सांगावयाचा हेतू एवढाच की त्यावेळेच्या समस्येचा तो भाग आहे.

कुंडलीत राहू ‘वाईटच’ फले निर्माण करतो असे म्हणता येणार नाही. ज्या स्थानी तो असतो त्या स्थानांतील फलामध्ये कमतरता, विलंब, त्रास निर्माण करतो. राहूचे ‘गुणदोष’ आपणांस माहिती आहेतच. हा ग्रह आजोबांचा कारक आहे. म्हणून वाडवडीलांनी वाईट कृत्ये केली की पुढच्या ‘तीन पिढ्यांना’ त्रास होतो. “त्रिपीढी” या शब्दाचा अपभ्रंश “त्रिपींडी” असा आहे. हल्ली अशी फॅशन झाली आहे की जीवनांत थोडाफर त्रास झाला की, नागबली. त्रिपींडी या प्रकारचे विधी करावयास सांगितले जातात. यात असे दिसून येते की या तात्कालीक बाह्य विधीमुळे केवळ मनालाच समाधान प्राप्त होते कारण ‘सकाम’ उपासना (फलाच्या आशेने केलेल्या) पंचवीस टक्केच फलद्रूप होतात.

कुंडलीत धनस्थान व सप्तमस्थान ह्यांस पूर्वापार मारक स्थान म्हटलेले आहे. कनक आणि कांता यांचा ’मोह’ सर्वांना असतो. ह्यांच्य प्राप्तसाठी प्रयत्न लागतो. स्वत:चे कर्तुत्वावर व श्रमावर पैसा मिळवावा व भौतीक सुखे उपभोगावी ही अपेक्षा असते तसेच दुसऱ्याची तळमळ, तळतळाट होऊ नये. पण प्रत्यक्ष व्यवहारांत या गोष्टी मिळाल्या म्हणून काही लोक अवैध, नींद्य कर्मे करतात. ‘चोऱ्या, फसवाफसवी, विश्वासघात पैशासाठी खून, हुंडाबळी’ इत्यादि उदाहरणे देता येतील. ‘स्त्री मोह’ हा देखील अशाच स्वरुपाचा आहे. दररोजच्या वर्तमानपत्रांवरुन ह्याचा अनुभव घेता येईल. ही सर्व अवैध कृत्ये करीत आसतांना आपल्या मनाला, संततीला, यामुळे त्रास होणार आहे. याची खंत वाटत नाही. वाडवडीलांनी काही दुष्कृत्ये केलेली असतील तर इतरांच्या आत्म्याला झालेल्या त्रासामुळे शाप देतात त्यांचे परिणाम होतात.

हल्ली ‘श्रमावर’ भर न देता विनाश्रम, सहज पैसा व सुखसाधने कशी उपलब्ध होतील यावर तरुण पिढी ‘विचार’ करते. आशापूर्ति झाली नाही म्हणजे ‘अवैध’ मार्गाचा अवलंब करतात. सारासार विचार, विवेक, संयम ह्यांच विचार सुटलेला आहे. विवेक सुटल की मानवाचा तोल सुटतो. अशाप्रकारे पूर्वजांनी केलेल्या घोर कृत्यांची : घराणे शापग्रस्त, असल्याची ‘वंशात वेडेपणा’ असण्याची बीजे जातकाच्या कुंडलीत ज्योतिषशास्त्र दृष्ट्या असावयास पाहिजेत. कारणाशिवाय कार्य नसते या सिध्दान्तानुसार कदाचित ती बीजे चालू परिस्थितीत सापडली नाहीत म्हणून ती पूर्वजन्म काली नसतीलच असे म्हणता येत नाही. झाडाचे मूळ/ बुंध्यात जर किड असले तर ते पाने, फुले व फळे येथपर्यंत पोहोचते. एखाद्या घराण्याची वर्तमान पिढी जन्मभर अपयशी, दु:खी, दारिद्र्य भोगणरी पण शीलवान असते. काही घराण्यांत अत्यंत बुध्दीमान व भौतीक दृष्ट्यां संपन्न अशा प्रकारची मुले असतात पण शारिरीक वैगुण्य अपंगत्व, वेडेपणा, बुध्दीमंदता कोठेतरी सापडतो. मानसिक अशांतता दिसते. अशी सुसंस्कृत, शीलवान घरणी पाहण्यांत आलेली आहेत. या सर्वांचा परीणाम त्या व्यक्ति अतित्रासामुळे आत्महत्येसारख्या टोकावरच्या भूमिकेपर्यंत सुध्दा पोहोचतात.

या दृष्टीने कुंडल्या पाहत असतांन राहू विषयक काही योग दृष्टीस पडले त्यांत खालीप्रमाणे ग्रहस्थिती आढळली. १) लग्राच्या चतुर्थात राहू, २) चंद्राच्या चतुर्थात राहू, ३) चतुर्थेश राहू युक्त, ४) कुंडलीत कोणतेही स्थानी शनी राहूची अंशात्मक युती, ५) धनस्थानी राहू, ६) धनेश राहू युक्त याशिवाय ६, ८, १२ स्थानी राहू असता राहूचे दशेत जास्त त्रास होतो. या स्थिती व्यतिरीक्त होणारा त्रास हा इतर ग्रहमानामुळे होतो हे लक्षांत घेऊन जाणकार ज्योतिषांनी राहूचे आयुष्यांत राहुची दशा येऊन गेली असेल व चालू काळांत ती नसेल तर नुसता कालसर्प योग व दुषित राहू म्हणून हे महागडे विधी सांगावयाचे का? घराण्यांत आसुरी संपत्ती आलीच नसेल तर राहू ग्रहाला दोष द्यावयाचा कां माता, पिता हयात असतांना मुलाने हे विधी केले तर चालते का? उठसूट सांगण्याचे ‘हे’ विधी नाहीत. शेवटचा व टोकाचा उपाय म्हणून करावयाच्या ह्या बाबी आहेत.

वाचकांनी हे लक्षांत घ्यावे की, लेखकाचा या विधींना विरोध मुळीच नाही पण सांगण्याच्या पद्धतीबद्यल मतभेद आहे. सांप्रतचे विज्ञान युगांत मानवाने चिकीत्सक बुद्धी जागृत करुन निर्णय घेतले पाहिजेत. जाणकर ज्योतिषी या शास्त्राद्वारे समाजसेवेचे/समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतो. जातकाच्या अज्ञानाचा, विश्वसाचा स्वस्वार्थासाठी गैरफायदा घेणे ही गोष्ट केव्हाही उचीत नाही.

ह्यासांठी राहूचे ग्रहावरुन होणारे भ्रमण विचारांत घ्यावे. तसेच जन्मनक्षत्रांपासून ३,५,७,१२,१४,१६,२१,२३,२५ ह्या नक्षत्रांतून राहूचे भ्रमण नाही ना; ह्याचही विचार करावा. मंदगतीमुळे दिर्घकाल राहणाऱ्या ग्रहांचा परिणाम जास्त होतो. हे आपणांस विदीत आहेच.

राहूचे ग्रहांवरुन होणारे भ्रमण :

१) राहू वरुन राहूचे भ्रमण असता गोष्टी आकस्मिक होतात. संकटे अचानक येतात.

२) रविवरुन राहूचे भ्रमण असता तीन महिनेपर्यंत अनिष्ट फले मिळतात. शारिरीक कष्ट, मनस्ताप, अधिकार भंग होतो.

३) चंद्रावरुन राहू जात असता उद्विग्नता प्राप्त होते. मानसीक समाधान नष्ट होते. पारतंत्र्य येते. दिवाळे निघते. ही फले पांच महीने मागे/पुढे मिळतात.

४) मंगळावरुन राहूचे भ्रमण असता द्रव्यनाश होतो; कोर्ट कचेऱ्यांचे शुक्लकष्ठ पाठीमागे लागते. वाईट कामाकडे मनाची वृती जाते. स्थावराचा होतो.

५) बुधावरुन राहूचे भ्रमण असता समतोल वृती बिघडते. सारासार विचार शक्ती/ स्मरणशक्ती धोके देते. खोट्या साक्षी देणे, खोट्या सह्या करणे यामुळे प्रकरण अंगावर शेकते.

६) गुरु वरुन राहूचे भ्रमण असता आकस्मिक लग्न जमते. अधिकार प्राप्त होतो. पैसा भरपूर मिळतो. सर्व गोष्टी शुभ घडतात.

७) शुक्रांवरुन राहूचे भ्रमण असता स्त्री आजारी पडते. द्रव्यहानी होते. घरातील स्त्री व्यक्तिंना पिशाच्यबाधा होते.

८) शनीवरुन राहूचे भ्रमण असता अकल्पित व आकस्मिक संकटे येतात. एखादी मोठी व्याधी, रोग होतात.

 

आपल्या पूर्वजांनी केलेल्या भयंकर दुष्कृत्यांचा परिणाम म्हणून जे दोष असतात व त्यामुळे पुढील पिढीतील जातकांना जर त्रास होत असेल तर त्यावर उपाय कोणता असा प्रश्न निर्माण होतो. माझ्या माहितीप्रमाणे कालसर्प शांतीचा उल्लेख कोठे सापडत नाही. मात्र सर्पशांतीचा उल्लेख सापडतो. खाली दिलेले दोष राहूमुळे घराण्यात पिढ्यान पिढ्या त्रास देत असतात. कालमानाने त्यांची नांवे बदलली तरी तत्त्व मात्र बदलत नाही.

दोष १ ला नष्टांश धन (नष्ट झालेल्या घराण्याची मिळालेली संपत्ती)

दोश २ रा= खून, आत्महत्या, विषप्रयोग

दोष ३ रा= दुसऱ्याचा चांगला चाललेला संसार वैयक्तिक कामेच्छा पूर्ति करता अनिष्ट व हीन दर्जाचे उपायाने पतिपत्नींचा प्रेमसंबंध तोडून टाकण्याचा प्रकार.

दोष ४ था= घरातील निरपराध, आश्रीत व्यक्तिंचा अमानूष प्रकरे छळ करणे.

दोष ५ वा= परधनाचा अपहार पैसे प्रचंड व्याजाने देणे व त्याच्या वसूलीसाठी त्या व्यक्तिच्या आत्म्याला तळमळायला लावणे.

वरील प्रकारचे दोष असता त्यांचा परिहार करण्यासाठी खालील प्रमाणे कृत्यें केली असता मानसिक स्वास्थ्य प्राप्त होऊन परिस्थिती  सुधारण्यास मदत होते.

परिहार १ = नष्टांश धन घरी आले असता ते कोणत्यातरी धार्मिक समाजोपयोगी संस्थेला दान करणे. ते धन हातानू गेल्याशिवाय सुख लाभत नाही.

परिहार २ = ज्या व्यक्तिचे घरात खुन, आत्महत्या, व्यंग, वेडेपणा इत्यादि दोष असतील त्यांनी मृत व्यक्तिंचे तिथिनुसार श्राध्दादि विधी करणे. भगवान शंकराची आराधना, उपासना करणे.

परिहार ३ = गरीब, अज्ञनी जनांचे संसार जोडणे.

परिहर ४ = ज्या व्यक्तिचा छळ होऊन ती मृत झाली असेल, त्या व्यक्तिच्या नावाने देव्हाऱ्यात एक टाक करुन अश्विन शुध्द अष्टमीस त्याच्या नावाने मृत स्त्री विधवा असेल तर विधवा व मृत स्त्री सवाष्ण असेल तर सुवासीनींना बोलावून भोजन द्यावे व वस्त्रें नेसवावी.

परिहार ५ = सुर्याची उपासना करणे.

 

वरील दोषावर हे परिहार सुचविले आहेत; बुध्दीवाद्यांसाठी संत वाडमयाचे, स्वराशीप्रमाणे परिशिलन करावे.

१-५-९ राशी – समर्थ रामदासांचे वाङमय वाचावे.

२-६-१० राशी – संत ज्ञानेश्वरांचे वाङमय वाचावे.

३-७-११ राशी – संत तुकारामांचे वाङमय वाचावे.

४-८-१२ राशी – संत एकनाथांचे वाङमय वाचावे.


संदर्भ – ज्योतिर्विद्या नवनीत (त्रैमासिक) – अं १ डिसेंबर २०००

हे लेखही वाचा –

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रेभाग आयुर्दाय

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रेभाग पितापुत्र संबंध

संतान दीपिका अर्थात संतती योग

राहूच अतिरेकीपणाशोध आणि बोध

कुंडलीतील चंद्राचे महत्व

कारक ग्रहांचे महत्व

अमावस्येचे गोचर भ्रमण


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

वास्तु पुरुष जन्मकथा

वास्तु पुरुषाच्या जन्माच्या (उत्पत्तीच्या) अनेक वेगवेगळ्या कथा पुराण व वास्तु ग्रंथातून अढळतात. विश्वकर्मप्रकाश या वास्तुशास्त्राच्या प्रमाण ग्रन्थातही एक कथा अढळते, या कथेनुसार प्राचिन काळी त्रेता युगात ब्रह्मदेवाने एक महाभूत (विशालकाय प्राणी) निर्माण केला. त्याने आपले संपूर्ण शरिर भूमंडलावर पसरवून दिले. त्याला पाहून देवता व दानव दोघेही आश्चर्यचकीत व भयभीत झाले व ब्रह्म देवाच्या शरण गेले. त्यावेळी ब्रह्मदेवानी त्या देवता व दानवाना असा सल्ला दिला की, याला अधोमुख पालथा पाडून त्यावर स्वार व्हा व त्यांनी तसे केले. मग त्या महाकाय पुरुषाने शरणांगती पत्करुन देवाकडे याचना केली त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला आपला मानसपुत्र मानून असा वरदान दिला की,…….

याशिवायही अनेक पुराणांतून व वास्तू ग्रन्थांतून अनेक वेगवेगळ्या कथा अढळतात. पण त्यापैकी सर्वात प्रचलित कथा ही मत्स्य पुराणातील आहे. ती अशी की, एकदा भगवान शिव व अंधकासुराचे द्वन्द (युध्द) होत असते त्यावेळी त्या दोघांच्या घामाचे काही थेंब भूमीवर पडले व त्या घर्मबिंदूतून एक विशालकाय, विराट व अत्यंत बलवान पुरुषाची उत्पत्ती झाली. देव व असुर दोघांनाही त्याला पाहुन आश्चर्य वाटले. मग ते त्याला घेऊन ब्रम्हदेवाकडे गेले ब्रम्हदेवांने त्या विशालकाय पुरुषाला आपला मानसपुत्र माणून वास्तुपुरुषाचे नांव दिले व त्याला एका विशीष्ट प्रकारे (ईशान्येला शिर व नैऋत्येला पाय करुन) जमिनीवर अधोमुख झोपवले. (दुसऱ्या कथेनुसार देव व असुरांनी मिळून त्याला अधोमुख जमिनीवर पाडले) त्याच्या काही भागावर देवानी तर काही भागांवर असुरांनी वास केला. याचबरोबर ब्रम्हदेवाने त्या वास्तु पुरुषाला असा वरदान दिला की,………

 

पुराणातील कथा वर्णन करताना यात दिलेली अनेक पात्रे ही प्रतिकात्मक (symbolic) असतात. त्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. इथे अंधकासूर , (नांवातच सर्व काही आहे) अंधार म्हणजे अज्ञानाचे प्रतिक तर शिव म्हणजे परम ज्ञानाचे प्रतिक आहे. या दोघांचे द्वंद (युद्ध) म्हणजेच संघर्ष, इथे हेच सांगायचे आहे की, मानसाच्या मनातील ज्ञान व अज्ञान यांचा हा संघर्ष आहे. तो ही इतका की, घर्म (घाम) येईल, घाम तेंव्हाच येतो जेंव्हा प्रचंड मेहनत घेतली जाते. शेवटी शिवाचा विजय म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा विजय. त्यात आलेल्या घामाचा थेंब म्हणजेच विचारांच्या संघर्षातून आलेला निष्कर्ष म्हणजेच वास्तु पुरुष. ज्याला ब्रह्माने (ज्ञानाची प्राप्ती झालेला व्यक्ती) आपला मानस पुत्र मानला. आणि असा वरदान दिला की,……..

जो कोणी घर, नगर, तलाव, मंदिर, प्रासाद, दुर्ग (किल्ला), शहर, पत्तन (व्यावसायीक नगर) बस्ती इ. चे निर्माण करते वेळी वास्तुपुरुषाला “ध्यानात” ठेऊन कार्य करेल, देवता त्याला सहाय्य करतील व जो कोणी वास्तु पुरुषाचा विचार न करता कार्य करेल, असूर (अ सूर म्हणजेच सूरात नसलेले, लयबद्ध नसलेले) ते कार्य नष्ट करतील, त्या कार्यात विघ्न आणतील. म्हणून वास्तु बनविताना वास्तु पुरुषाच्या अंगांचा, त्याच्या मर्म स्थानांचा विचार वास्तु तयार करण्यापूर्वीच करावा. तुझा विचार (पुजा) केल्याशिवाय वास्तुसंबंधीत कार्य पुर्ण मानले जाणार नाही. इथे हेच सांगितले आहे की, घर बनवण्यास सुरवात करण्यापूर्वीच त्याचे योग्य नियोजन केले पाहीजे.

 


संदर्भ – श्री मत्स्य पुराण

विश्वकर्मप्रकाश:

हे लेखही वाचा ……..

 

वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)

प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र

शिल्पसंहिता – भाग १

शिल्पसंहिता – भाग २

 

Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद , वास्तू विशारद

9901287974 , 8722745745


BACK TO HOME

BACK TO VASTUSHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

How about the tarot cards

So dear friends we have already started our fascinating journey towards the world of Tarot. Our intuitions have brought us on this path. The divine power has chosen us as a part of this world of Tarot.

When we talk about the Tarot, the first thing appears before us is TAROT CARDS. Pack of Tarot cards is called as ‘Tarot Deck’.

Tarot Deck is a pack of 78 cards, among which 22 are Major (Major Arcana) and 56 are Minor (Minor Arcana). (This will be explained in the coming articles)

There’s a vast range and variety of Tarot Decks available for Readers. Each Deck has its own special significance. Some of them have very bright colours, while some have pleasing pictures. On the contrary some are also with minimum colours and light shades.

Decks vary in the size of cards, pictures, colours and price too. So for the beginners it’s quite confusing that which Deck should be selected in the beginning.  I suggest going for the basic Deck with simple pictures and which is easy to handle. I myself prefer Rider-Waite Deck for the beginners.

Once we are quite familiar with the cards we can go ahead for other decks.

Again the same question arises….which deck will help us on our way??If we go out for suggestions, we come across many different solutions. In one of the book I came across, it explained that deck should not be purchased but should be gifted to us by someone. Now, this means we will have to wait till someone gift us the Tarot Deck and later will have to compromise with whichever Deck comes in our hand.

Better to keep all this suggestions aside.

Here our best guide is our own “INTUITUION”. Go to the shop and ask the keeper to show some loose sample cards if available. Spend few minutes with those cards. Go around and look at the pack of Decks. Keep your mind cool and you will find that your intuitions guiding you to select the Deck. The Deck which suits you will attract your attention. Just go ahead, pick it up and start your journey.

Never forget to express your gratitude to the divine power on each and every step of your journey.

 

Thank you Thank you Thank you.

Vrushali N.

Tarot Reader

9663454836