[रविवार १३ जानेवारी २०१९ ते शनिवार १९ जानेवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.
ग्रहांचा राशीपालट- या आठवड्यात १४ जानेवारी रोजी रवी धनु राशीतून मकर राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.
* बुध अस्त आहे.
* शनि १६ जानेवारी रोजी मार्गी होत आहे.]
ज्योतिष जगतच्या सर्व वाचकांना नवीन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला !

Belgaum Maratha Matrimony
मेष – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी गैरसमजाचे वातावरण राहील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. वडिलांशी वादाचे प्रसंग. प्रवासामधून कामात बाधा येतील. मित्र-मंडळींवर अवलंबून राहू नये. शुभ ता. १५, १६, १९.
वृषभ – व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. शेजाऱ्यांशी गैरसमजातून वाद होतील. ऐनवेळी वाहनांपासून त्रास होईल. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मौल्यवान वस्तू जपाव्यात. शुभ ता. १३, १४, १७, १८.
मिथुन – नौकरीमध्ये पारदर्शी रहावे अन्यथा त्रास होतील. व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. संततीच्या कामात सफलता मिळेल. कुटुंबात अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामध्ये अडचणी येतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५, १६, १९.
कर्क – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांच्या जोडीदारामुळे त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६, १७, १८.
सिंह – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्याचे धोरण ठेवावे. कुठल्याही प्रलोभनात्मक गोष्टींपासून दूर रहावे. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामे कुणावर विश्वास ठेऊन करु नयेत. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १७, १८, १९.
कन्या – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १९.

Belgaum Maratha Matrimony Ad2
तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये स्वतःविषयी गैरसमज होईल अशी वर्तणुक टाळावी. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जवळच्या नातेवाईकांमुळे मनस्ताप होतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. शुभ ता. १३, १४, १५, १६.
वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १५, १६, १७, १८.
धनु – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये विनाकारण मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक वातावरण ताण-तणावाचे राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९.
मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अस्थिर वातावरण राहील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १३, १४, १९.
कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरी करणाऱ्यांना सप्ताह अडचणीचा राहील. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६.
मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अविचारी निर्णय घेऊ नयेत. मोठ्या भावंडांमुळे त्रास होतील. मित्र-वर्गावर अवलंबून राहू नये. प्रवासामधून मानसिक आनंद मिळेल. शुभ ता. १३, १४, १७, १८.
सौजन्य – दाते पंचांग
हे लेख हि वाचा ………
मकर संक्रांति – २०१९.
२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य.
BACK TO HOME
BACK TO JYOTISH
DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)