साप्ताहिक राशिभविष्य 02 ते 08 सप्टेंबर 2018

[रविवार ०२ सप्टेंबर ते शनिवार ०८ सप्टेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात रविवार ०२ सप्टेंबर रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत तर शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल, याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * ०६ सप्टेंबर रोजी शनी मार्गी होईल, तर *  हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

मेष –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहणार नाही. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. प्रवास लाभ देतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. शुभ ता. ४, ५.

 

वृषभ –  नौकरीमध्ये वरिष्ठांचे दडपण राहील. व्यवसायात आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. नातेवाईकांबरोबर आर्थिक व्यवहार टाळावेत. भावंडांशी वाद होतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासात वस्तू जपाव्यात. शुभ ता. २, ३, ६, ७.

 

मिथुन – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरदारांना समाधान देणाऱ्या गोष्टी समजतील. संततीच्या विवाहासंबंधी कामे गती घेतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात संमिश्र सफलता मिळेल. उष्णतेचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ८.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कर्क –  जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळणार नाही. ओटीपोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २, ३, ६, ७.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहतील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारीचे योग येतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून चर्चा यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ८.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीमुळे अनावश्यक खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळेल. स्थावराचे व्यवहार शक्यतो टाळावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

वृश्चिक – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रम खूप घ्यावे लागतील. सरकारी कामात साध्यता होईल. वडिलांचा सल्ला हितावह ठरेल. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासात बाधा येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ८.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा निर्माण होतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कांही गोष्टीमध्ये वडिलधाऱ्यांचा विरोध घ्यावा लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्याचे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीच्या माध्यमातून फायदे मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

मीन – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २, ३, ८.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

साप्ताहिक राशिभविष्य 26 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर 2018

[रविवार २६ ऑगस्ट ते शनिवार ०१ सप्टेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * २७ ऑगस्ट रोजी मंगळ मार्गी होईल, तर * शनी- हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

मेष –  व्यवसायात आर्थिक बाजु कमकुवत राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीला अनपेक्षित लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. अविचारी कृती टाळावी. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून साथ मिळेल. शुभ ता. २६, २७, ३१, ०१.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये कामाचा ताण वाढता राहील. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. आई-वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल. सरकारी कामात सफलता लाभेल. मनाविरुद्ध प्रवासाचे योगाची शक्यता. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २६, २७, २८, २९ ३०.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कामे पूर्ण समजतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात यश प्राप्ती राहील. कफाचे विकारापासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. २८, २९, ३०, ३१, १.

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या अडलेल्या कामात गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. ३१, १.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मानासह जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शभ ता. २६, २७.

 

कन्या –  संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांचे उतावळेपणामुळे नुकसान होईल. व्यावसायिक आवक चांगली राहील. वैयक्तिक दृष्टीकोनातून लाभदायक घटना घडतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. नौकरदारांना अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २६, २७, २८, २९, ३०.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली लाभेल. संततीच्या बाबतीत आर्थिक संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. स्थावरासंबंधी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या ओळखीतून लाभ मिळतील. शुभ ता. २८, २९, ३०, ३१, १

 

वृश्चिक – व्यावसायिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीत समाधानकारक घटना घडतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. रेंगाळलेल्या कामात गती आणता येईल. वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रवासात वाद टाळावेत. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ३१, १.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली मिळेल. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या नव्या नौकरीच्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग दर्शवितात. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७.

 

मकर – व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. संततीच्या बाबतीत नव्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. धार्मिक गोष्टीतून आनंद मिळेल. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २८, २९, ३०.

 

कुंभ – नौकरदारांना अतिरिक्त भार सांभाळावा लागेल. व्यावसायिक प्राप्ती पेक्षा खर्च वाढेल. संततीच्या बाबतीत वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रलोभनांपासून दूर रहावे. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेदाचे प्रसंग येतील. प्रवासात खर्च वाढेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७, ३१, १.

 

मीन – व्यावसायिक आवक अपेक्षेपेक्षा कमी राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली लाभेल. संततीच्या बाबतीत प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात अपेक्षित सफलता लाभेल. आर्थिक नियोजनामध्ये बिघाड होईल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींबरोबर अकारण वाद होतील. शुभ ता. २८, २९, ३०.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 19 ते 25 ऑगस्ट 2018

[रविवार १९ ऑगस्ट ते शनिवार २५ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * १९ ऑगस्ट रोजी बुध मार्गी होईल, तर * शनी- मंगळ – हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

मेष –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. परंतु आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीने राहणे फायद्याचे ठरेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश प्राप्ती राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायामधून आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता लाभेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामातून सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. नव्या ओळखीतून फायदे मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०. २१, २२.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायामधून प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत रेंगाळलेल्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास अनुकुलता राहील. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३, २४, २५.

 

सिंह – व्यवसायापासून आर्थिक लाभ मिळतील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. उष्णतेचे विकार त्रासदायक होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरदारांना कामाचा वाढता ताण राहील. संततीच्या बाबतीत कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १९, २०.

 

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. परंतु आर्थिक नियोजनात बाधा येतील. नौकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. अंगीकृत कार्यात सफलता मिळेल. संततीच्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. स्थावराची कामे मार्गी लागतील. प्रवास संमिश्रता दर्शवितात. शुभ ता. २१, २२.

 

वृश्चिक – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. गुंतवणुकीच्या संधी येतील. नौकरदारांना समाधान देणाऱ्या बातम्या समजतील. संततीला नव्या नौकरीच्या संधी येतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामध्ये अडथळे येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २३, २४, २५.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक मंदावेल. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत नव्या नौकरीच्या संधी येतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावे लागतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. रागांच्या भरात कुठलीही कृती करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २३, २४, २५.

 

कुंभ – व्यावसायिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नौकरीत इतरांच्या कामात लक्ष घालू नये. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. डोळ्यांच्या आजारापासून काळजी घ्यावी. जोडीदाराच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २१, २२.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक कमी राहील. नौकरदारांना शुभ परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३, २४, २५.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑगस्ट 2018

[रविवार १२ ऑगस्ट ते शनिवार १८ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी रवी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल, याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * बुध १५ ऑगस्ट रोजी उदय होत आहे. तर * बुध, शनी- मंगळ – हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

मेष –  व्यवसायात आर्थिक अडचणी जाणवतील. नौकरीमध्ये त्रास देणाऱ्या घटना घडतील. संततीविषयक कामात अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. वाहनांच्या वेगांवर नियंत्रण आवश्यक. पोटाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून सफलता लाभेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५, १६, १७.

 

वृषभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे य़शस्वी होतील. संततीच्या बाबतीत शुभ समाचार येतील. विद्यार्थ्यांना कष्टाने सफलता मिळेल. सरकारी कामे पुर्णत्वास जातील. भावंडांच्या जोडीदाराच्या बाबतीत अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, १८.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जुन्या आजारांपासून त्रास होईल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. प्रवासामधून कामे होणार नाहीत. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १२, १३, १८.

 

कर्क –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरदारांनी वादाचे प्रसंग टाळावेत. संततीच्या रेंगाळलेल्या कामातून यश मिळेल. अधून-मधून मानसिक चंचलता जाणवेल. सरकारी कामात दिरंगाईने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १४, १५.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना मनाविरुद्ध तडजोडींचे प्रसंग येतील पण आर्थिक लाभ मिळतील. संततीच्या आर्थिक कामात दिरंगाई होईल. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामासाठी फारशी अनुकुलता नाही. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासातून फायदा मिळेल. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १२, १३, १६, १७.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नव्या संधी चालून येतील. वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामात सफलता मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १४, १५, १८.

 

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या दृष्टीने आर्थिक लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. स्थावराच्या कामात अडचणी निर्माण होतील. प्रवासामधून फायदे होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १२, १३, १६, १७.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायामधून आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित समस्या येतील. प्रवासामधून कामात व्यत्यय येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १२, १३, १४, १५, १८.

 

धनु –  संततीच्या कामात कायदेशीर अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. बोलण्यामुळे हितसंबंधात बाधा येणार नाही ह्याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराला तब्येतीचे त्रास होतील. सरकारी कामात फारशी साध्यता होणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. नौकरीत संमिश्रता. व्यवसायात आर्थिक चढ-उतार. शुभ ता. १४, १५, १६, १७.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांनी अविचारी निर्णय घेऊ नयेत. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अति घाई त्रास देईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रागांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी अकारण वाद टाळावेत. शुभ ता. १६, १७, १८.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. अति साहस टाळावे. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास अनुकुलता राहील. पचनाचे विकार त्रास देतील. प्रवासात व्यत्यय. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १२, १३ १८.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती कमी राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. मोठ्या भावंडांच्या बाबतीत समस्या उद्भवतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. सरकारी कामे पुढे ढकलावीत प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या वागण्यामुळे त्रास होतील. शुभ ता. १२, १३, १४, १५.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 05 ते 11 ऑगस्ट 2018

[रविवार ०५ ऑगस्ट   ते शनिवार ११ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * हर्षल ०७ ऑगस्ट रोजी वक्री होत आहे. तर * बुध, शनी- मंगळ – हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

मेष –  व्यावसायिक बाबतीत सतत चढ-उतार राहतील. नौकरदारांना विनाकारण अस्थिरता जाणवेल. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना सफलता चांगली मिळेल. खाण्या-पिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे. उत्तरार्ध कौटुंबिक त्रासाचा राहील. प्रवास संमिश्र फळे देतील. भावंडांना प्रतिकूलता. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ५, ८, ९.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात यश. संततीच्या विवाहाचे योग जुळुन येतील. विद्यार्थ्याचा कल मनोरंजनाकडे जास्त राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांच्या जोडीदारामुळे त्रास होतील. प्रवासामध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. धार्मिक कार्यातून आनंद. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ६, ७, १०, ११.

 

मिथुन – व्यावसायिक स्थिति फारशी मनासारखी राहणार नाही. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. तब्येत जपावी. शुभ ता. ५, ८, ९.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आर्थिक बाजु कमकुवत राहील. नौकरीत मानसिक दडपण जाणवेल. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना मानसिक चंचलता जाणवेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. जोडीदारांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ५, ६, ७, १०, ११.

 

सिंह – व्यावसायिक स्थितित संमिश्रता राहील. नौकरीमध्ये मानसिक स्वस्थता लाभणार नाही. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात विलंब निर्माण होतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८, ९.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना उतावळेपणा नुकसानकारक ठरेल. कौटुंबिक अडचणीतून मार्ग निघतील. वैयक्तिक चांगल्या संधी चालून येतील. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९, १०, ११.

 

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ऐच्छिक कार्यात यश मिळेल. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. आई-वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ तात. ५, १०, ११

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजनात व्यत्यय येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. घरातील वडिलधाऱ्यांचा विरोध सहन करावा लागेल. प्रवासामधून अति उतावळेपणा टाळावा. मित्र-मंडळींकडून सहकार्य लाभेल. शुभ ता. १, ६, ७.

 

धनु –  व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. संततीला नव्या नौकरीच्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कौटुंबिक अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. बोलण्यावर ताबा ठेवावा. डोळ्यांची काळजी घ्यावी. शुभ ता. ६, ७, ८, ९.

 

मकर – उद्योग-व्यवसायात चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये रागांवर नियंत्रण ठेवावे लागेल. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना परिश्रम जास्त घ्यावे लागतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. जोडीदाराच्या हटवादी भूमिकेचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९, १०, ११.

 

कुंभ – संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील, परंतु तब्येत जपावी. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. संसर्गजन्य बाधा होतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सर्वांची साथ चांगली मिळेल. जोडीदाराच्या उष्णतेचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ५, १०, ११.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आर्थिक समस्या उद्भवतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल, पण वाद टाळावेत. शुभ ता. ६, ७.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 29 जुलै ते 04 ऑगस्ट 2018

[रविवार २९ जुलै  ते शनिवार ०४ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात शुक्र १ ऑगस्ट रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल, याव्यतिरिक्त इतर कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. २७ रोजी खग्रास चंद्र ग्रहण होत आहे.  * बुध ३० जुलै रोजी अस्त होत आहे. तर *शनी- मंगळ – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायामध्ये आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये समज-गैरसमजाचे वातावरण राहील. संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. सरकारी कामात अडचणी येतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वडिलांबरोबर वाद होतील. प्रवास संमिश्रता दर्शवितात. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २९, ३०, ३१, ०४.

 

वृषभ –  व्यवसायात अपेक्षित स्थिति राहणार नाही. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. कुटुंबात गैरसमजातून वाद होतील. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. प्रवास टाळावेत. मित्रांची संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. ३०, ३१, १, २, ३.

 

मिथुन – नौकरदारांनी पारदर्शी राहीलेले चांगले. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. कुटुंबात आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक खर्चाचा मेळ बसणार नाही. सरकारी कामात व्यत्यय. प्रवास संमिश्र राहतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. १, २, ३, ४.

 

कर्क –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी गैरसमजातून मानसिक अस्वस्थता जाणवेल. संततीविषयक कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. मानापनातून मानसिक त्रास होतील. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. तब्येतीच्या तक्रारी राहतील. प्रवास आनंद देतील. मित्र-मंडळींकडून सहकार्य मिळेल. शुभ ता. २९, ४.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. संततीला आर्थिक समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २९, ३०, ३१.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात फसवणुकीपासून काळजी घ्यावी. आई-वडिलांची तब्येत सांभाळावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून सहकार्य फारसे मिळणार नाही. शुभ ता. ३०, ३१, १, २, ३.

 

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती कमी राहील. नौकरीत गैरसमजामुळे त्रासाचे प्रसंग येतील. कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करु नये. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. संततीला नव्या आर्थिक संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी किरकोळ कारणावरुन वाद होतील. शुभ ता. १, २, ३, ४.

 

वृश्चिक – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीत मनाविरुद्ध घटनांतून मानसिक त्रास होतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम द्यावे लागतील. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. भावंडांशी वाद टाळावेत. प्रवासामध्ये वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २९, ४.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये विनाकारण तणाव जाणवतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी प्रतिकूलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ३०, ३१.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रतिकूलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २९, १, २, ३.

 

कुंभ – व्यावसायिक स्थिति संमिश्रता दर्शविते. नौकरीमध्ये अस्थिर वातावरण राहील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात तांत्रिक अडचणी राहतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ३०, ३१.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये आपले कामात फक्त लक्ष द्यावे. संततीच्या वर्तणुकीवर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देण्याची शक्यता आहे. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास फायद्याचे ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. शुभ ता. २९, १, २, ३.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE) 

साप्ताहिक राशिभविष्य 22 ते 28 जुलै 2018

[रविवार २२ जुलै  ते शनिवार २८ जुलै २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. २७ रोजी खग्रास चंद्र ग्रहण होत आहे.  * बुध २६ जुलै रोजी वक्री  होत आहे. तर *शनी- मंगळ – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक जोखीम विचारपूर्वक घ्यावी. नौकरीच्या ठिकाणी अतिविश्वास घातक ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. संततीचे विवाह जुळुन येतील. विद्यार्थ्यांनी भ्रमात राहू नये. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. सर्वांशी मिळते-जुळते घ्यावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २७, २८.

 

वृषभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग उद्भवतील. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या जोडीदाराशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २२, २३, २४.

 

मिथुन – नौकरीमध्ये जबाबदारीमुळे कामाचा ताण जाणवेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. सासुरवाडीत अनपेक्षित अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २३, २४, २५, २६.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक निराशा जाणवेल. तब्येतीच्या तक्रारी राहतील. सरकारी कामात अडचणी येतील. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत कामे रेंगाळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचा सल्ला फायदेशीर ठरेल. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. सरकारी कामात अडचणी येतील. विनाकारण शारिरिक थकवा जाणवेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे होतील. उष्णतेचे विकार त्रास देतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २७, २८.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २२, २३, २४.

 

तुला – व्यवसायात जोखमीचे निर्णय घेऊ नयेत. नौकरीमध्ये आपले काम व आपण धोरण ठेवावे. संततीच्या दृष्टिने खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराच्या कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २५, २६.

 

वृश्चिक – व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमद्ये आर्थिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे रेंगाळतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २२, २३, २४.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी राहतील. कौटुंबिक अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित साथ मिळेल. शुभ ता. २५, २६.

 

मकर – नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामामध्ये सहज सफलता लाभणार नाही. रागांच्या भरात कुठलीही कृती करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळत जाईल. शुभ ता. २३, २४, २७, २८.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती कमी खर्च जास्त अशी स्थिति राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत तब्येतीचे त्रास दर्शवितात. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. पोटाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५, २६.

 

मीन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या वागण्यामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. शुभ ता. २५, २६, २७, २८.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 15 ते 21 जुलै 2018

[रविवार १५ जुलै  ते शनिवार २१ जुलै २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १६ जुलै रोजी  रवी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर  कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.   *शनी- मंगळ – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत अडचणी उद्भवतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. कुटुंबात धार्मिक कार्याचे नियोजन यशस्वी होईल. सरकारी कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश प्राप्ती राहील. प्रवासामधून कामे सफलता दर्शवितात. मित्र-मंडळींकडून मनासारखे सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, २०, २१.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या दृष्टिने लाभाच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कफाचे विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १६, १७.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या येतील. विद्यार्थ्यांना मानसिक निराशा जाणवेल. सरकारी कामात फारशी साध्यता लाभणार नाही. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १५, १८, १९.

 

सिंह – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत सहकाऱ्यांच्या वागण्यामुळे त्रास होतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळविता येईल. रक्ताचे विकारांपासून काळजी घ्यावी. विनाकारण निराशा जाणवेल. सरकारी कामात व्यत्यय. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, २०, २१.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना चांगले परिणाम मिळतील. वैयक्तिक चैनीसाठी खर्च होईल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १५, १८, १९.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्थावरासंबंधी कामे यशस्वी होतील. आर्थिक गुंतवणुक लाभ देईल. प्रवास फायदा देतील. मित्रांमुळे लाभाच्या संधी चालून येतील. शुभ ता. १५, १६, १७, २०, २१.

 

वृश्चिक – व्यावसायिक आवक कमी राहील. आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश. वडिलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग. प्रवासामध्ये अति घाई टाळावी. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचा ताण वाढता राहील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

मकर – नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, २०, २१.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सर्वाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. संततीविषयक पत्रव्यवहार यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. पचनाचे विकार त्रासदायक ठरतील. प्रवासामधून चर्चा यशस्वी ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६, १७.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत संमिश्रता राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. मानसिक स्वस्थता मिळणार नाही. प्रवासामधून आनंद मिळेल. कौटुंबिक खर्च वाढेल. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १६, १७, १८, १९.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 02 JULY 2018

2ND JULY TO 8TH JULY

TWO OF SWORDS

 

 

Hello readers, our each tarot card conveys deep hidden messages. Our week’s card too explains the situation we face quite often in our life.

 

Many times we come across a very difficult situation, like

To be or not to be…

Yes or no…

This way or that way….

 

We feel trapped sometimes and find no way to get out.

Most of us select the option to be blindfolded. Intentionally we ignore the moment of decision making.

We feel escaping is the best solution.

But in this blindfolded situation we fail to notice that ignoring or escaping is not the right solution. This may make the situation more difficult in future by addition of more complications in course of time.

 

The card suggests opening the blindfold. Look out for the solutions. If you have more than 1 option, analyse each option using your intelligence.

Go for the solution with least painful consequences.

 

Above all this card conveys one more message that while you are on the way of your decision making,, take care of relationships. Take care that in all this no relationship is hurt.

 

******************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N.

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 1 ते 7 जुलै 2018

[रविवार १ जुलै  ते शनिवार ७ जुलै २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ४ जुलै रोजी  शुक्र  कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर  कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.   *गुरु-शनी- मंगळ – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अविचारी निर्णय घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्य फायद्याचे ठरेल. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. भावंडांना अनपेक्षित समस्या येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवास फायदा देतील. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. १, २, ३, ४, ७.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. संततीला आर्थिक संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. भावंडांच्या जोडीदाराशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात सफलता लाभेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून संमिश्र स्वरुपाची साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. विनाकारण तणाव जाणवेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी वाढतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. प्रवास लाभ देतील. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ५, ६, ७.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. परंतु जोखीम घेऊ नये. नौकरीच्या ठिकाणी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. जोडीदारांमुळे मानसिक त्रास होतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १, ७.

 

सिंह – नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. संतती बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासात व्यत्यय येतील. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १, २, ३, ४.

 

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. संततीच्या वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना अति उत्साहीपणा त्रासदायक ठरेल. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. सरकारी कामात सफलता मिळेल. पचनाचे विकार त्रास देतील. प्रवास फलदायी राहतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसणार नाही. नौकरीमध्ये पारदर्शी राहिलेले चांगले. संततीविषयक आर्थिक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराचे निर्णय घाईने घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ५, ६, ७.

 

वृश्चिक – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीत वरिष्ठांमुळे त्रास होतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेमधून सफलता मिळेल. कलेशी निगडीत लोकांना लाभ मिळतील. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीच्या तक्रारी राहतील. प्रवासात वाद होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १, ७.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी येईल. संततीच्या बाबतीत कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळेल. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. शुभ ता. २, ३, ४.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ लाभेल. अनपेक्षित आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. संततीला पत्रव्यवहारातून लाभ. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. जोडीदाराशी आर्थिक कारणांवरुन वाद. सरकारी कामात यश. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींकडून सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ५, ६.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी इतरांवर विसंबून राहू नये. आर्थिक नियोजनात व्यत्यय येतील. संततीच्यचा बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. खाण्या-पिण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक. सरकारी कामात संमिश्र यश लाभेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २, ३, ४, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना अतिविश्वास घातक ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आईच्या किरकोळ दुखापतीतून त्रास संभवतो. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. १, ५, ६.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)