साप्ताहिक राशिभविष्य 8 ते 14 एप्रिल 2018

[रविवार ०८ एप्रिल ते शनिवार १४ एप्रिल २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात सूर्य १४ एप्रिल रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करील याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु -बुध वक्री, बुधाचा ८ एप्रिल रोजी उदय होत आहेत. ]

 

मेष –  व्यावसायिक स्थिती संमिश्रता दर्शविते. नौकरीमध्ये वातावरणात तणाव राहील. संततीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. प्रवासामधून कामे अर्धवट राहतील. वयस्कर लोकांची काळजी घ्यावी लागेल. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ९, १०, ११, १२, १३.

 

वृषभ –  नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. व्यावसायिक स्थितित सुधारणा होईल. सासुरवाडीला सहकार्याचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. दगदगीमुळे शारिरिक त्रास होतील. वाहने जपून चालवावीत. संततीविषयक समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मित्रांमुळे लाभ मिळतील. शुभ ता. १२, १३, १४.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये बढतीचे योग दर्शवितात. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. ओटीपोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासात अडचणी. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ८, १४.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आर्थिक चढ-उतार. नौकर वर्गामुळे नुकसानीचे प्रसंग. नौकरीमध्ये सहकाऱ्यांमुळे त्रास. संततीच्या आर्थिक कामात अडचणी. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश. वडिलधाऱ्यांमुळे मानसिक त्रास होतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास आनंद देतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९, १०, ११.

 

सिंह – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात व्यत्यय येतील. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ९, १०, ११, १२, १३.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये रोजचे व्यवहार सुरळीत चालतील. जागेच्या कामात अडचणी येतील. शेजाऱ्यांबरोबर वाद-विवादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीविषयक कामातून दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबात तणाव राहतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ११, १२, १३, १४.

 

तुला – व्यवसायात आवक कमी राहील. व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांशी वाद टाळावेत. प्रवासात अनपेक्षित अडचणी येतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. ८, १४.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात तणाव राहतील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. सरकारी कामात संमिश्र सफलता मिळेल. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे सफल होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. संततीविषयक समस्येतून मार्ग काढता येतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. शुभ ता. ९, १०, ११.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी हटवादी वागणे नुकसानकारक ठरेल. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आई-वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ८, १२, १३.

 

मकर – नौकरीमध्ये ईच्छित कार्यात यश मिळेल. व्यावसायिक प्राप्तीत चढ-उतार राहतील. संततीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. काका लोकांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर आर्थिक व्यवहार टाळावेत. शुभ ता. ९, १०, ११, १४.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. व्यावसायिक गुंतवणुक टाळावी. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात यश मिळेल. वयस्कर लोकांसाठी वेळ द्यावा लागेल. मोठ्या भावंडांना अनपेक्षित समस्या. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. शुभ ता. ८, १२, १३.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. परंतु अनपेक्षित अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी विनाकारण तणाव जाणवेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वडिलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना निराशा जाणवेल. भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. मित्र-मंडळींची संमिश्र साथ मिळेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. ८, ९, १०, १४.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 1 ते 7 एप्रिल 2018

[रविवार ०१ एप्रिल ते शनिवार ०७ एप्रिल २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु वक्री, बुध अस्त आहेत. ]

 

मेष –  व्यवसायात अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. नौकरीत मनाविरुद्ध घटना घडतील. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. संततीला शैक्षणिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना तणाव जाणवतील. मनाविरुद्ध प्रवासाचे प्रसंग येतील. कुटुंबात अवाजवी खर्च वाढत जाईल. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. वाहनांच्या बाबतीत काळजी घ्यावी. शुभ ता. १, २, ३.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत कटकटी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता लाभेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. वाहने जपून चालवावीत. प्रवासात अडथळे येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

मिथुन – नौकरीमध्ये समाधानकारक घटना. भागीदारी व्यवसायात वादाचे प्रसंग उद्भवतील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. जोडीदारामुळे मनस्ताप होतील. जोडीदाराला तब्येतीचे त्रास. मूत्र विकारांपासून काळजी घ्यावी. मित्र-मंडळींबरोबर देण्या घेण्याचे व्यवहार टाळावेत. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

कर्क –  संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना कठीण काळ राहील. व्यावसायिक अडचणी वाढतील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. नौकरवर्गामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. मित्र-मंडळींना सहकार्याचे प्रसंग येतील. शुभ ता. १, ६, ७.

 

सिंह – व्यावसायिक फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जागेसंबंधी अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुबिक वादाचे प्रसंग उद्भवतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २, ३.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति ठीक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. संततीविषयक प्रश्नांमधून त्रास होतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जागेच्या कामात अडचणी येतील. प्रवासातून अपेक्षित सफलता मिळणार नाही. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ४, ५, ६.

 

तुला – व्यावसायिक स्थिति अपेक्षेप्रमाणे राहणार नाही. नौकरीमध्ये मनाविरुद्ध बदलीचे योग येतील. संततीच्या कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासात अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ७.

 

वृश्चिक – व्यावसायिक प्राप्तीत घट होईल. नौकरीच्या ठिकाणी अविचारी कृती करणे टाळावे. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. सरकारी कामात वेळेचा व्यय होईल. संततीच्या नौकरीविषयक कामात अडथळे येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ४, ५, ६.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीची भूमिका ठेवावी. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अति उतावळेपणा नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रागाच्या भरात कुठलीही कृती करणे टाळावे. प्रवासामधून कामात व्यत्यय येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १, २, ३, ७.

 

मकर – व्यावसायिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. कायदेशीर नियमांचे उल्लंघन टाळावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायामधून प्राप्ती कमी राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या कामात कायदेशीर अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींच्या भानगडीत लक्ष घालू नये. प्रवास शक्यतो टाळलेले जास्त चांगले. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु कायदेशीर अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या नौकरीविषयक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकूलता नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ७.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 25 ते 31 मार्च 2018

[रविवार २५  मार्च ते शनिवार ३१ मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात २५ मार्च रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करीत आहे याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु वक्री, बुध २७ मार्च रोजी मीन राशीत अस्त होत आहे. ]

 

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अनपेक्षित अडचणी येतील. नोकरीमध्ये अविचारी निर्णय टाळावेत. संततीच्या बाबतीत समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास नियोजनामध्ये अडथळे येतील. मित्रांची साथ मिळेल. जोडीदाराचा सल्ला हितावह. शुभ ता:- 25, 26, 31.

 

वृषभ – उद्योग व्यवसायात जैसे थे परिस्थिती राहील. नोकरदारांना नित्य व्यवहारात बाधा येणार नाहीत. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सासुरवाडीमध्ये समस्या उद्भवतील. वाहनांच्या वेगांवर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता:- 27, 28.

 

मिथुन – नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात अडचणींचे प्रसंग येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. ओटीपोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासात अडचणी. मित्रमंडळीपासून शक्यतो दूर राहावे. शुभ ता:- 25, 26, 29, 30.

 

कर्क – व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण घटेल. नोकरीमध्ये मनासारखे स्थिती राहणार नाही. संततीच्या बाबतीत कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 27, 28, 31.

 

सिंह – नोकरीमध्ये फारशी चांगली स्थिती राहणार नाही. व्यवसायामध्ये आवक चांगली राहील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्राची साथ चांगली मिळेल. शुभ ता:- 25, 26, 29, 30.

 

कन्या –  उद्योग व्यवसायात आवक चांगली राहिली. नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील. स्थावराच्या कामात अडचणी निर्माण होतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित समस्या. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होणार नाहीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुभ ता:- 25, 26, 27, 28, 31.

 

तुला – व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नौकरीत समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या अडचणीतून प्रयत्नाने मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. भावंडाच्या बाबतीत अनपेक्षित समस्या येतील. पोटाचे विकारापासून काळजी घ्यावी. प्रवासामधून अडचणींचा सामना करावा लागेल. शुभ ता:- 27, 28, 29, 30.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नोकरीच्या ठिकाणी मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. कुटुंबात अशांतता राहील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून संमिश्र सफलता मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता:- 29, 30, 31.

 

धनु –  व्यावसायिक स्थिती बेताची राहील. नोकरीमध्ये सतत तडजोडीचे प्रसंग येतील. संततीच्या कामात अडचणी उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. काहींना अकारण निराशा जाणवेल. सरकारी कामात फारशी साध्यता राहणार नाही. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्रमंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता:- 25, 26, 31.

 

मकर – उद्योग व्यवसायात आवक चांगली राहिल. नोकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत अडचणी उद्भवतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींबरोबर आवश्यक तेवढे संबंध ठेवावेत. शुभ ता:- 25, 26, 27, 28.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहिल. नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात अडचणी उद्भवतील. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा थोडे कमी यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मोठ्या भावंडांशी वाद होतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता:- 27, 28, 29, 30.

 

मीन – व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये कामाचा तणाव वाढता राहील. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. व्यावसायिक जागेविषयी अडचणी निर्माण होतील. प्रवासामधून अडचणी येतील. मित्रमंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता:- 29, 30, 31.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 मार्च 2018

[रविवार १८  मार्च ते शनिवार २४ मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु वक्री, बुध २३ मार्च रोजी वक्री होत आहे. ]

गुढी पाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

येणारे नवीन वर्ष आपणास अनेक नवीन संधी, सुख समृद्धी व आनंद घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

ज्योतिष जगत परिवार .

 

मेष –  व्यवसायात अपेक्षित स्थिती राहणार नाही. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. वैयक्तिक फायदा देणार्या् घटना घडतील. संततीच्या दृष्टीने संमिश्र सप्ताह राहील. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता:- 20, 21, 24.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फायदा देणार्याा घटना घडतील. संततीच्या विवाहासंबंधी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. शारीरिक त्रासाकडे कानाडोळा करू नये. सासुरवाडीमुळे त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता:- 18, 19, 22, 23.

 

मिथुन – व्यावसायिक आवक कमी राहिली. आर्थिक चिंता जाणवतील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. जोडीदाराच्या वागण्यामुळे मनस्तापाचे त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 18, 19, 20, 21.

 

कर्क – उद्योग व्यवसायात अडचणी येतील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटनांचा काळ राहील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होतील. विद्यार्थ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 20, 21, 22, 23.

 

सिंह – नोकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडी कराव्या लागतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीच्या कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीमुळे फायदा देणार्याप घटना घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 22, 23, 24.

 

कन्या –  संतती विषयक समस्या चिंता निर्माण करतील. विद्यार्थ्यांना अकारण निराशा जाणवेल. व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये कामाचा वाढता तणाव राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावरासंबंधी कटकटी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभले. शुभ ता:- 18, 19, 24.

 

तुला – व्यवसायात संमिश्र स्थिती राहील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. संतती विषयक कामे रेंगाळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. भावंडांच्या वागण्यामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. प्रवासामधून अडचणी वाढतील. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता:- 18, 19, 20, 21.

 

वृश्चिक –  उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या नोकरीविषयक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र परिणाम मिळतील. कुटुंबात अकारण तणावाचे वातावरण राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 20, 21, 22, 23.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये वादाचे प्रसंग येतील. शांत राहावे. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. स्थावराच्या कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता:- 22, 23, 24.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली, गुंतवणूकीतून लाभ होतील. नोकरीमध्ये इच्छित कामात यश मिळेल. संततीच्या दृष्टीने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. डोळ्यांच्या विकारांकडे पूर्ण लक्ष द्यावे. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींशी व्यवहार शक्यतो टाळावेत. शुभ ता:- 18, 19, 24.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. मोठ्या भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे रेंगाळतील. मित्रमंडळींकडून संमिश्र साथ लाभेल शुभ ता:- 20 21.

 

मीन – उद्योग व्यवसायात आवक कमी राहील. नोकरीत नको ती जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता:- 18, 19, 22, 23.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME PAGE

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 11 ते 17 मार्च 2018

[रविवार ११  मार्च ते शनिवार १७ मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात १४ मार्च रोजी रवी कुंभ राशीतून मीन राशीत जाईल. याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु वक्री ]

 

मेष –  याबाबतीत अडचणी येतील. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढत जाईल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास पूर्वार्ध चांगला राहील. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींचे चांगले सहकार्य मिळेल. शुभ तारीख – 13, 14, 15, 16, 17.

 

वृषभ – उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरी मध्ये चांगले परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश लाभेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. सासुरवाडी मुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ तारीख – 15, 16, 17.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे साथ चांगली मिळेल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात उत्तरार्धात यश मिळेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता:- 11, 12.

 

कर्क – उद्योग व्यवसायात आवक चांगली राहिली नोकरीमध्ये कामाचा तणाव वाढता राहील संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात उत्तरार्धात यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष राहतील प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 11, 12, 13, 14.

 

सिंह – उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये पूर्वार्ध चांगला राहील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये शुभ ता:- 13, 14, 15, 16.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहिली. नोकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. संततीविषयक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. कौटुंबिक वादाचे प्रसंग उद्भवतील. प्रवासात बाधा निर्माण होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 15, 16, 17.

 

तुला – व्यावसायिक प्राप्ती ठीक राहील परंतु आर्थिक पेच उद्भवतील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी उत्तरार्ध चांगला राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता:- 11, 12.

 

वृश्चिक –  उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कुटुंबात अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 13, 14.

 

धनु –  संततीच्या कामात अडचणी निर्माण होतील. वैयक्तिक कामात दिरंगाई निर्माण होईल. व्यावसायिक कामात अडचणी येतील पण प्राप्ती चांगली. नोकरी मध्ये रोजचे कामकाज सुरळीत चालेल. सरकारी कामासाठी पूर्वार्ध चांगला राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून फार सहकार्याची अपेक्षा ठेवू नये. तब्येतीची काळजी घ्यावी. शुभ ता:- 11, 12, 15, 16.

 

मकर – व्यावसायिक स्थिती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शुभ ता:- 13, 14.

 

कुंभ – सरकारी कामात सफलता मिळेल. व्यवसायिक प्राप्ती समाधान कारक राहील. संततीच्या नोकरीविषयक कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळीपासून अलिप्त रहावे. शुभ ता:- 11, 12, 15, 16, 17.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहिल. नोकरदारांना उत्तरार्ध समाधानकारक राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. संततीविषयक कामात संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. स्थावरासंबंधित अनपेक्षित अडचणी उद्भवतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता:- 11, 12, 13, 14.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

साप्ताहिक राशिभविष्य 04 ते 10 मार्च 2018

[रविवार ०४  मार्च ते शनिवार १० मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ७ मार्च रोजी मंगळ वृश्चिक राशीतून धनु राशीत जाईल. याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु ९ मार्च रोजी वक्री होईल. ]

 

मेष – व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये बढती-बदलीचे योग येतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनासारखी सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वैयक्तिक दृष्टीने फायद्याच्या गोष्टी घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 4, 5, 6, 7.

 

वृषभ – व्यवसायात संमिश्र परिणाम मिळतील. नोकरीत वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या विवाहाचे योग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येतील. प्रवास लाभ देतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 5, 6, 7, 8, 9.

 

मिथुन – उद्योग व्यवसायात आर्थिक चढउतार राहतील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या उद्भवतील विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वडिलधार्यां्ची वादाचे प्रसंग उद्भवतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ मिळेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. शुभ ता:- 8, 9, 10.

 

कर्क – व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटनांमुळे मानसिक त्रास. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होइल. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवासामधून कामे सफल होतील. मित्रमंडळींच्या सहकार्यामुळे आर्थिक फायदे मिळतील. शुभ ता:- 4, 10.

 

सिंह – संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी खटके उडतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील प्रवासामधून कामात अडचणी येतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 5, 6, 7.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नोकरी मनासारख्या घटना घडतील संततीच्या महत्वाच्या पत्रव्यवहारासाठी अनुकूलता राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र अवलंबून राहू नये. शुभ ता:- 4, 8, 9.

 

तुला – व्यवसायात अपेक्षेप्रमाणे प्राप्ती राहणार नाही. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाणात वाढ होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 5, 6, 7, 10.

 

वृश्चिक –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये सामंजस्याची भूमिका ठेवावी. संततीच्या विवाहाची बोलणी यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र परिणाम मिळतील. अविचारी निर्णय नुकसानकारक ठरतील. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी प्रवास फायदा देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता:- 6, 8, 9.

 

धनु –  उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीत नियोजित कामात यश मिळेल. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना अतिविश्वास घातक ठरेल. सरकारी कामे पूर्णत्वास जातील. अनावश्यक खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 4, 5, 6, 10.

 

मकर – नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने कार्यपूर्ती लाभेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळीशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता:- 5, 6, 7, 8, 9.

 

 

कुंभ – संततीविषयक आर्थिक समस्या त्रास देतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये नवीन संधी चालून येतील. जोडीदारा संदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून अडचणी निर्माण होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 8, 9, 10.

 

मीन – उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीविषयक शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणे कठीण आहे. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. वैयक्तिक दृष्टीने शुभ घटना घडतील. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 4, 10.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 25 फेब्रुवारी ते 03 मार्च 2018

[रविवार २५  फेब्रुवारी ते शनिवार ०३ मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध ०३ मार्च रोजी कुंभ राशीतून मिन राशीत जात आहे., याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ]

 

मेष – अनामिक दडपण जाणवेल. सर्व कृतींवर योग्य नियंत्रण ठेवावे. पोटाचे विकार त्रास देतील. वाहने सांभाळून चालवावीत. मेंदूचे विकार असणा-यांनी काळजी घ्यावी. सरकारी कामात अनुकूलता. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये चांगल्या घटना घडतील. संततीविषयक संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. शुभ ता. 25/26/03.

 

वृषभ – व्यवसायात आर्थिक नियोजनात बिघाड होईल. नोकरीमध्ये समाधानकारक घटना. संततीच्या वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग. सरकारी कामात अनुकूलता राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 27/28.

 

मिथुन – व्यावसायिक फारसे चढ-उतार होणार नाहीत. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना आततायीपणा नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधा-यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. 25/26/01/02.

 

कर्क – उद्योग-व्यवसायात आर्थिक गोष्टींमुळे तणाव राहतील. नोकरीमध्ये तणाव जाणवेल. सतंतीच्या बाबतीत समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीमुळे लाभदायक घटना घडतील. प्रवासात अनपेक्षित समस्या येतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. 27/28.

 

सिंह –  व्यवसायात आर्थिक समस्या त्रास देतील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी येईल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून लाभ मिळतील. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. 25/26/01/02.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति फारशी चांगली राहणार नाही. नोकरीमध्ये सहका-यांची साथ लाभेल. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अनुकूलता राहील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 25/26/27/28/03.

 

तुला – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. 27/28/01/02.

 

वृश्चिक –  महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. रागाच्या भरात कृती करणे टाळावे. स्थावराच्या संधी चालून येतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील. जवळच्या नातलगांपासून त्रास होतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 1/2/3.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. नोकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग. शुभ ता. 25/26/3.

 

मकर –  संततीच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात संमिश्रता राहील. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. पण वाद टाळावेत. शुभ ता. 25/26/27/28.

 

कुंभ – नोकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. संततीच्या विचित्र वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून व्यत्यय येण्याची शक्यता आहे. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. पचनाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. शुभ ता. 27/28/1/2.

 

मीन – संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहील. व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. जोडीदाराच्या वागण्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासामधून आर्थिक कामात अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 1/2/3.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 फेब्रुवारी 2018

[रविवार १८  फेब्रुवारी ते शनिवार २४ फेब्रुवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ]

 

मेष – व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग संभवतात. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. जोडीदाराच्या बाबतीत गोंधळात्मक स्थिति निर्माण होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. प्रवास लाभदायी ठरतील. मित्रांच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. 21/22.

 

वृषभ – व्यवसायात आर्थिक नियोजन बिघडेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरवर्गावर लक्ष ठेवावे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रवासात तब्येतीची काळजी घ्यावी. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. 18/19/23/24.

 

मिथुन – संततीच्या सर्व गोष्टींवर नीट लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांनी इत्तरांचे ऐकून कृती करु नये. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. वडिलधा-यांचा सल्ला हितावह ठरेल. झटपट पैसे मिळवण्याच्या मार्गाचा अवलंब करु नये. सरकारी कामात दिरंगाई होईल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. शुभ ता. 18/19/20/21/22.

 

कर्क – नोकरदारांना मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागेल. व्यावसायिक आर्थिक गणिते चुकतील. संततीच्या निर्णयांमुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 21/22/23/24.

 

सिंह –  उद्योग-व्यवसायात आर्थिक घोटाळे संभवतात. नोकरीच्या ठिकाणी बेफिकीर राहू नये. संततीला प्रवासात नुकसानीचे योग. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावरासंबंधी संधी चालून येतील. आर्थिक गोष्टींवरुन जोडीदाराशी वाद. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. 23/24.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति चांगली राहणार नाही. नोकरवर्गावर आर्थिक भरवसा ठेवू नये. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 18/19/20.

 

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. नोकरीमध्ये पारदर्शी राहणे फायद्याचे ठरेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 18/19/20/21/22.

 

वृश्चिक –  सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीमुळे आर्थिक नियोजन बिघडेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा वाढेल. नोकरीमध्ये सामंजस्याची भूमिका ठेवावी. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. जोडीदाराच्या बाबतीत अनपेक्षित गोंधळ निर्माण होतील. प्रवास संमिश्र राहतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 21/22/23/24.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता मिळेल. संततीला आर्थिक संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत काही चिंता निर्माण होतील. प्रवासामधून मौल्यवान गोष्टींची काळजी घ्यावी. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. 23/24.

 

मकर –  संततीच्या आर्थिक बाबी नीट तपासून घ्याव्यात. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामांत संमिश्रता राहील. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून आनंद मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. 18/19/20.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई होईल. स्वतः कुणावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. कुटुंबात गोंधळात्मक स्थिति राहील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 21/22.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये प्रलोभनांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत आर्थिक फायदे मिळतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. काही जणांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 18/19/23/24.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 11 ते 17 फेब्रुवारी 2018

[रविवार ११  फेब्रुवारी ते शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १२ फेब्रुवारी रोजी रवी  तर १४  फेब्रुवारी  रोजी बुद्ध मकर राशीतून कुंभ राशीत जात आहे, याव्यतिरिक्त  इतर  कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * बुध अस्त. ]

 

मेष – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या विवाह कामात दिरंगाई होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामे यशस्वी होतील. प्रवासामधून नियोजित कामे होतील. मित्र-मंडळींमुळे फायदा देणा-या घटना घडतील. शुभ ता. 13/14/15/16/17.

 

वृषभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु आर्थिक नियोजन चुकेल. नोकरीमध्ये समाधान देणा-या घटना घडतील. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात असफलता मिळेल. प्रवासामधून कामात अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 16/17.

 

मिथुन – संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. वडिलधा-यांचा विरोध सहन करावा लागेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. 11/12.

 

कर्क – व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये कामाचा भार वाढण्याची शक्यता आहे. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अतिविश्वास नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासामधून ठरवलेली कामे होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. 11/12/13/14/15.

 

सिंह –  उद्योग-व्यवसायात आर्थिक चढ-उतार राहतील. नोकरीमध्ये तडजोडीची भूमिका ठेवावी. स्थावराच्या संधी चालून येतील. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. संततीला पत्रव्यवहारातून लाभ होतील. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. प्रवासामधून सफलता मिळेल. मित्र-मंडळींची साथ लाभेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. शुभ. ता. 13/14/15/16/17.

 

कन्या –  संततीच्या आर्थिक समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. व्यावसायिकांनी आर्थिक जोखीम पकरु नये. नोकरीमध्ये गैरमार्गाचा अवलंब करु नये. रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 16/17.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या दृष्टीने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. 11/12.

 

वृश्चिक –  सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. वैयक्तिक कार्यात सफलता मिळेल. अविवाहितांचे विवाह जुळतील. संततीमुळे खर्च वाढतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नोकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. पित्ताचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 13/14/15.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. नोकरीमध्ये मनाला समाधान देणा-या घटना घडतील. सरकारी कामातून लाभ मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना परंतु शारीरिक त्रास. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासातून आर्थिक फायदे होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 11/12/16/17.

 

मकर –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या येतील. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मोठ्या भावंडांच्या ओळखीतून लाभ होतील. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 13/14/15.

 

कुंभ – संततीच्या बाबतीत आनंद देणा-या घटना. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वैयक्तिक कामातून लाभ मिळतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. व्यावसायिक धाडसी निर्णयातून लाभ. प्रवासातून कामे होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 11/12/16/17.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात अपेक्षित यश मिळणार नाही. वैयक्तिक चैनीसाठी खर्च केला जाईल. संततीला विवाहासंबंधी कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासातून गाठी-भेटी यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. 11/12/13/14/15.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 04 ते 10 फेब्रुवारी 2018

[रविवार ०४  फेब्रुवारी ते शनिवार १० फेब्रुवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ६ फेब्रुवारी रोजी शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत जात आहे, याव्यतिरिक्त  इतर  कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * बुध अस्त. ]

मेष – व्यावसायिक आर्थिक स्थिति सुधारेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीविषयक प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. उष्णतेचे विकार त्रास देतील. प्रवासात काळजी घ्यावी. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुभ ता. 4/5/6/7.

 

वृषभ – जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्तीत चढ-उतार राहतील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 6/7/8/9/10.

 

मिथुन – विनाकारण मानसिक अशांतता जाणवेल. महत्वाच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीच्या ठिकाणी वाढता तणाव राहील. सरकारी कामात अडचणी येतील. कुटुंबात समजुतीचे वातावरण राहील. संततीच्या दृष्टीने चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. शुभ. ता. 8/9/10.

 

कर्क – संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अतिउतावळेपणा नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात अनपेक्षित अडचणी येतील. महत्वाच्या वस्तू नीट सांभाळाव्यात. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. जोडीदाराच्या वागण्यामुळे मानसिक क्लेश होतील. मित्रांकडून सहकार्य. प्रवासात अडचणी. शुभ ता. 4/5.

 

सिंह –  कुटुंबात विनाकारण कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. सरकारी कामात सफलता लाभेल. पोटाचे विकार त्रास देतील. नोकरवर्गामुळे मनस्ताप होतील. व्यवसायात आर्थिक अडचणी येतील. नोकरीमध्ये सहका-यांमुळे लाभ. प्रवासामधून मानसिक आनंद मिळेल. शुभ ता. 6/7.

 

कन्या –  व्यावसायिक अनपेक्षित समस्या उद्भवतील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. महत्वाच्या कामात भावंडांची उपयोग होईल. महत्वाच्या कागदपत्रात घोळ होतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. 4/5/8/9/10.

 

तुला – किरकोळ गोष्टींतून मानसिक तणाव जाणवतील. सरकारी कामात अडचणी येतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या विवाहासंबंधी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासातून नियोजन यशस्वी होईल. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 6/7.

 

वृश्चिक –  संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांनी आतताईपणा करणे टाळावे. व्यवसायात आर्थिक प्रगती चांगली राहील. नोकरीमध्ये ईप्सित कामे यशस्वी होतील. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. रागाच्या भरात निर्णय घेऊ नयेत. मित्रांपासून अलिप्त रहावे. प्रवास लाभदायक ठरतील. शुभ ता. 4/5/8/9/10.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग आहेत. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. डोळ्याच्या विकारांची काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 4/5/6/7.

 

मकर –  सरकारी कामात अडचणी येतील. संततीला आर्थिक अडचणी जाणवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग येतील. पचनाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 6/7/8/9/10.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये मानसिक त्रास होतील. सतंतीच्या वर्तणुकीवर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांची गोंधळात्मक स्थिति राहील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होतील. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 6/7/8/9/10.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. सरकारी कामात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदारामुळे मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास लाभदायक होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. 4/5.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)