साप्ताहिक राशिभविष्य 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2018

[रविवार २८ जानेवारी ते शनिवार ०३ फेब्रुवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध धनु राशीतून मकर राशीत जात आहे इतर  कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्राचा  -१ फेब्रुवारी रोजी पश्चिमेस उदय  ]

 

मेष – व्यवसायात आर्थिक समस्या जाणवतील. जोखीम पत्करू नये. नोकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून दूर रहावे. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर समज गैरसमजातून वाद होतील. सरकारी कामे यशस्वी होतील. प्रवासामधून नियोजित कामे सफल होतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 29, 30.

 

वृषभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्येस गैरसमज होतील अशी वर्तणूक टाळावी. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. आई-वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. सरकारी कामांत विलंब निर्माण होईल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. शुभ ता. 28, 31, 01.

 

मिथुन – व्यवसायात आर्थिक नुकसानीचे योग. नोकरदारांनी कुठल्याही गैरमार्गांचा अवलंब करु नये. संततीचे कामात पूर्ण सावध रहावे. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात खूप अडचणी येतील. सासुरवाडीबरोबर देणे- घेणे टाळावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. 29, 30, 02, 03.

 

कर्क – संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. जोडीदाराला अनोळखी लोकांकडून फसवणुकीचा धोका. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावी. व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये मानसिक दडपण सतत वाढते राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत. शुभ ताः- 28, 31, 01.

 

सिंह –  व्यावसायिक स्थिती फारशी मनासारखी राहणार नाही. नोकरीमध्ये हितशत्रूंच्या कारवाया त्रास देतील. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. नोकरवर्गाकडून फसवणूक संभवते. संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. प्रवासात महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 28, 29, 30, 02, 03.

 

कन्या –  व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदारांनी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या दृष्टीने आर्थिक फसवणुकीचे योग. विद्यार्थ्याची मानसिक स्थिती गोंधळात्मक राहील. सरकारी कामासाठी फारशी अनुकूलता नाही. महत्वाच्या कामात भावंडांमुळे फायदा होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. 29, 30, 31, 01.

 

तुला – व्यवसायात आर्थिक अंदाज चुकतील. नोकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्याबाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांना आर्थिक सहकार्याचे प्रसंग येतील. शुभ ता. 31, 01, 02, 03.

 

वृश्चिक –  संततीविषयक कामे प्रयत्नाने होतील. विद्यार्थ्यांना बेफिकिरपणा नुकसानकारक ठरेल. व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नोकरीमध्ये गैरमार्गासाठी कुणाला सहकार्य करु नये. सरकारी कामात यश मिळेल. रक्तदाब असणा-यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वाद होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 28, 02, 03.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. डोळ्यांच्या विकारांची काळजी घ्यावी. सरकारी कामात तांत्रिक व्यत्ययामुळे विलंब होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर समज-गैरसमज टाळावेत. शुभ ता. 28, 29, 30.

 

मकर –  संततीच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून दूर रहावे. व्यावसायिक अंदाज चुकून नुकसानीचे योग. नोकरीच्या ठिकाणी पारदर्शी वागणूक ठेवावी. सरकारी कामात अडचणी येतील. महत्वाच्या गाठी-भेटी टाळाव्यात. मोठ्या भावंडांचा सल्ला हितकारक ठरेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. प्रवासातून आनंद मिळेल. शुभ ता. 29, 30, 31, 01.

 

कुंभ –  व्यावसायिक धाडसी निर्णय यशस्वी होतील. परंतु आर्थिक जोखीम पत्करु नये. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज होतील अशी वर्तणूक टाळावी. संततीच्याबाबतीत शूभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्याचा अनावश्यक गोष्टींसाठी वेळ वाया जाईल. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 31, 01, 02, 03.

 

मीन – संततीच्याबाबतीत फसवणुकीचे योग. विद्यार्थ्यांना खडतर काळ राहील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. मोठे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. सरकारी कामात अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून फसवणुकीचे योग घडतील. नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. शुभ ता. 28, 02, 03.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME 

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 21 ते 27 जानेवारी 2018

[रविवार २१ ते शनिवार २७ जानेवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र -अस्त ]

 

मेष – व्यवसायात सतत आर्थिक चढ-उतार राहतील. नोकरीमध्ये दुस-यावर विसंबून राहू नये. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून दूर रहावे. सरकारी कामात सफलता मिळेल. महत्वाच्या कामात वडिलांचा सल्ला लाभदायक ठरेल. वाहने जपून चालवावीत. उष्णतेचे विकार त्रास देतील. विश्वास ठेवून व्यवहार करु नयेत. प्रवास लाभ देतील. शुभ ता. 21, 24, 25, 26.

 

वृषभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा जाच राहील. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधा-यांचा विरोध सहन करावा लागेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 21, 22, 23, 27.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक ठीक राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. मधुमेह असणा-यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. 22, 23, 24, 25.

 

कर्क – संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. चुकीचा आत्मविश्वास विद्यार्थ्याचे नुकसान ठरेल. व्यावसायिक अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी हलगर्जीपणा करु नये. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. ओटीपोटाचे विकार त्रास देतील. प्रवासामुळे विनाकारण तणाव राहील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 24, 25, 26, 27.

 

सिंह –  व्यवसायामध्ये आर्थिक नियोजनात बाधा निर्माण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. व्यसनांवर नियंत्रण ठेवावे अन्यथा शारीरिक त्रास होतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कार्यपूर्ती होईल. मित्र-मंडळीकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 21, 27.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीविषयक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. भावंडांच्या ओळखीतून लाभ मिळतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींच्या अडचणीत सहकार्य करावे लागेल. शुभ ता. 21, 22, 23.

 

तुला – व्यावसायिक स्थिति फारशी चांगली राहणार नाही. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. स्थावरासंबंधी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. जोडीदाराला तब्येतीचे त्रास. मित्रांकडून चांगली साथ. शुभ ता. 22, 23, 24, 25.

 

वृश्चिक – संततीविषयक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात सफलता लाभेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये इच्छित कार्यात सफलता मिळेल. उष्णतेचे विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. स्थावराच्या संधी चालून येतील. प्रवास फायदा देतील. मित्र-मंडळींमुळे कुटुंबात वाद होतील. शुभ ता. 24, 25, 26, 27.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात तणावाचे वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी मनाविरुद्ध दडपण जाणवेल. संततीला वाहनांपासून त्रास संभवतो. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जोडीदाराला त्रास. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळीकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 21, 27.

 

मकर –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी. विद्यार्थ्यांना अतिउत्साह नुकसानकारक ठरेल. एखादा कौटुंबिक प्रश्न चिंता निर्माण करेल. कफाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 22, 23.

 

कुंभ –  संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. महत्वाच्या कामात व्यत्यय येतील. पचनाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासात अडचणी येतील. मित्र-मंडळीकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 21, 24, 25, 26.

 

मीन – व्यवसायात प्राप्ती चांगली परंतु तणाव राहील. नोकरीच्या ठिकाणी मानसिक दडपण जाणवेल. संततीला शैक्षणिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळणार नाही. भावंडांच्या जोडीदारामुळे त्रास. मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. शारीरिक कटकटी जाणवतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 22, 23, 27.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE FREE

साप्ताहिक राशिभविष्य 14 ते 20 जानेवारी 2018

[रविवार १४ ते २० जानेवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  सूर्य १४ जानेवारी रोजी धनु राशीतून मकर राशीत जाईल, तर मंगळ १७ जानेवारी रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत जाईल .  याव्यतिरिक्त  कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र -अस्त ]

 

मेष – व्यवसायात सतत चढ-उतार राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अंगीकृत कार्यात व्यत्यय निर्माण होतील. प्रवासात संमिश्रता. मित्रांकडून चांगले सहकार्य. शुभ ता. 17, 18, 19, 20.

 

वृषभ – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. जोडीदाराच्या वागण्यामुळे चिंता निर्माण होईल. संततीला शुभ परिणाम मिळतील. आई-वडिलांची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. थायरॉईडच्या आजारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. 14, 20.

 

मिथुन – संततीला वाहन खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. संसर्गजन्य आजारांपासून त्रास होईल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. नोकरवर्गाकडून त्रासाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 14, 15, 16.

 

कर्क – संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अतिविश्वास नुकसानकारक ठरेल. व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळवावे लागेल. जोडीदाराबरोबर आर्थिक कारणावरुन वाद. प्रवासातून मानसिक आनंद मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 15, 16, 17, 18, 19.

 

सिंह –  व्यावसायिक आर्थिक अडचणी येतील. नोकरीमध्ये सहका-यांशी जमवून घेणे कठीण जाईल. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. आपल्या वागण्यामुळे हितसंबंध तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. सरकारी कामे होतील. प्रवासातून कामे यशस्वी होतील. स्थावराच्या संधी येतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग. शुभ ता. 17, 18, 19, 20.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांच्या माध्यमातून प्रश्न सोडविता येतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना. विद्यार्थ्यांना सहज यशप्राप्ती राहील. शारीरिक त्रास जाणवतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 14, 20.

 

तुला – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. नातेवाईकांपासून शक्यतो अलिप्त रहावे. वडिलधा-यांशी सामंजस्याचे धोरण ठेवावे. सरकारी कामात अडचणी येतील. संततीच्या नोकरीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 15, 16.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. आर्थिक निर्णयातून लाभ मिळतील. नोकरीमध्ये रागांवर नियंत्रण ठेवावे. संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. 14, 17, 18, 19.

 

धनु –  संततीच्या कामात अनपेक्षित अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. कौटुंबिक प्रश्नांतून मार्ग निघतील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. प्रवासामधून कार्यपूर्ती लाभेल. मित्र-मंडळींतून कौटुंबिक प्रश्नात सहकार्य लाभेल. शुभ ता. 15, 16, 20.

 

मकर –  नोकरीत वरिष्ठांमुळे मनस्तापाचे प्रसंग. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मोठ्या भावंडांमुळे फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल. अविचारी कृती टाळावी. प्रवासामधून कामात अडचणी येतील. मित्र-मंडळींचा सल्ला फायदेशीर ठरेल. शुभ ता. 14, 17, 18, 19.

 

कुंभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना आळशीपणा जाणवेल. सरकारी कामात अडचणी येतील. धाडसी निर्णयातून फायदा होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासात अडचणी येतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 14, 15, 16, 20.

 

मीन – व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये समाधान देणा-या घटना घडतील. संततीचे दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. एखादा कौटुंबिक प्रश्न चिंता निर्माण करेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. 15, 16, 17, 18, 19.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR FREE E-MAGAZINE

साप्ताहिक राशिभविष्य 07 ते 13 जानेवारी 2018

[रविवार ०७ ते ०६ जानेवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात शुक्र १३ जानेवारीला तर सूर्य १४ जानेवारी रोजी धनु राशीतून मकर राशीत जाईल, याव्यतिरिक्त  कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र -अस्त ]

 

मेष – व्यावसायिक स्थिती चांगली परंतु भागिदारीत वाद. नोकरीमध्ये अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदारामुळे मनस्ताप शक्य. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 7, 8, 9, 10, 11.

 

वृषभ – संततीला मौल्यवान वस्तू खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना थोडे कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीत सहका-यांवर अवलंबून राहू नये. प्रवासामध्ये तांत्रिक अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 10, 11, 12, 13.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये सहका-यांची साथ चांगली मिळेल. सराकारी कामात यश मिळेल. पोटाचे विकारांपासून त्रास होईल. संततीच्या दृष्टीने समाधान देणा-या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. महत्वाच्या कामात मित्रांवर अवलंबून राहू नये. शुभ ता. 12, 13.

 

कर्क – उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसणार नाही. नोकरीमध्ये आर्थिक बाबतीत सावध रहावे. संततीमुळे खर्चाचे प्रमाणात वाढ होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मधुमेह असणा-यांनी कुपथ्य टाळावीत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 7, 8, 9.

 

सिंह –  संततीच्या विवाहकार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता. कौटुंबिक प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 9, 10, 11.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत संततीच्या नोकरीविषयक कामात वाद. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. कुटुंबात वादाचे प्रसंग. प्रवासामध्ये वेळेचा व्यय होईल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 7, 8, 9, 12, 13.

 

तुला – व्यवसायात आर्थिक चढ-उतार राहतील. नोकरीमध्ये समाधान देणा-या घटना घडतील. संततीविषयक अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना अतिउतावळेपणा नुकसान करेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. रागांवर नियंत्रण ठेवावे. शुभ ता. 10, 11.

 

वृश्चिक – संततीला आर्थिक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीत वरिष्ठांची साथ लाभेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधा-यांचा सल्ला लाभ देईल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळीची साथ मिळेल. जोडीदाराला आर्थिक फायदे मिळतील. शुभ ता. 7, 8, 12, 13.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये विनाकारण तणाव जाणवेल. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणा-यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर आर्थिक देणे-घेणे टाळावे. शुभ ता. 7, 8, 9, 10, 11.

 

मकर –  उद्योग व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. नोकरीमध्ये अतिरिक्त कामाचे योग. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. 10, 11, 12, 13.

 

कुंभ –  संततीच्या बाबतीत शैक्षणिक समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. आर्थिक नियोजनातून लाभ. नोकरीमध्ये बढतीचे संकेत. प्रवासामधून कामात व्यत्यय येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता 12, 13.

 

मीन – संततीच्या बाबतीत अनपेक्षित लाभ. विद्यार्थ्यांना कष्टदायक काळ. व्यावसायिक आर्थिक मेळ बसवणे कठीण जाईल. नोकरीमध्ये वडिलांचे सहकार्य चांगले मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. उष्णतेचे विकार त्रास देतील. वाहने जपून चालवावीत. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 7, 8, 9.


-सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

साप्ताहिक राशिभविष्य 31 डिसेंबर 2017 ते 06 जानेवारी 2018

[रविवार ३१  डिसेंबर २०१७ ते ०६ जानेवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र -अस्त, शनी – ४ जानेवारीला उदय  , हर्षल – २ जानेवारीला मार्गी ]

 

मेष – व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरदारांनी तडजोडीचे धोरण ठेवावे. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. महत्वाचे व जोखमीचे व्यवहार करु नयेत. जोडीदाराशी समज-गैरसमजातून वाद होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. पोटाचे विकार त्रास देतील. प्रवासातून कामे यशस्वी होतील. शुभ ता. 01, 02.

 

वृषभ – संततीसाठी वाहन खरेदीचे योग. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. सासुरवाडीमुळे लाभ. सरकारी कामात अडचणी. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 31, 01, 04.

 

मिथुन – संततीच्याबाबतीत अनपेक्षित अडचणी. विद्यार्थ्यांना अतिउत्साह त्रासदायक ठरेल. व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ. जोडीदाराच्या माध्यमातून आर्थिक फायदे. सरकारी कामात व्यत्यय येतील. जोडीदाराला तब्येतीचे त्रास. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींपासून शक्यतो अलिप्त रहावे. शुभ ता. 01, 02, 05, 06.

 

कर्क – व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये स्त्रीवर्गामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामे यशस्वी होतील. स्थावराचे कटकटी वाढतील. शेजा-यांबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या वागण्यावर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. प्रवासातून कामे यशस्वी होतील. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शुभ ता. 31, 03, 04.

 

सिंह –  संततीच्या विवाहाच्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात परिश्रमाने सफलता मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. पत्रव्यवहारातून मनस्ताप. प्रवासात नुकसानीचे भय. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. 31, 01, 02, 05, 06.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामांत संमिश्रता राहील. कुटुंबात तणाव राहील. आर्थिक नियोजनात बिघाड. संततीविषयक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. प्रवासामधून मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 01, 02, 03, 04.

 

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये ईच्छित कार्यात यश मिळेल. संततीविषयक शुभ समाचार येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रलोभनांपासून लांब रहावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. जोडीदाराबरोबर वाद. मित्र-मंडळीकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. 03, 04, 05, 06.

 

वृश्चिक – व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये रोजच्या कामाकाजात बाधा येणार नाहीत. अनोळखी लोकांशी व्यवहार टाळावेत. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. संततीच्या बाबतीत समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना झगडावे लागेल. सरकारी कामात यश मिळेल. डोळ्यांची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 31, 05, 06.

 

धनु –  संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये जबाबदारींमुळे तणाव वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. भावंडांपासून अलिप्त रहावे. मित्रांशी देण्या-घेण्यावरुन वादाचे प्रसंग. प्रवासामधून कामे होतील. आईला शारीरिक कटकटी. शुभ ता. 31, 01, 02.

 

मकर –  कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीच्या बाबतीत फसवणुकीचे योग. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. वैयक्तिक चैनीसाठी खर्चाचे प्रसंग. सरकारी कामात अडचणी येतील. जोखीम घेऊ नये. प्रवासामधून आनंद मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. शुभ ता. 1, 2,3, 4.

 

कुंभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. भांवंडांच्या जोडीदारामुळे मनस्तापाचे प्रसंग. प्रवासामधून कामात तांत्रिक व्यत्यय. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ. ता. 3, 4, 5, 6.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आर्थिक प्राप्ती कमी राहील. नोकरीमध्ये वडिलांची साथ चांगली मिळेल. संततीच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना वाईट संगतीमुळे त्रास. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक प्रश्न चिंता दर्शवितात. तब्येतीची काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. प्रवास फायदा देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. 31, 05, 06.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HAME

साप्ताहिक राशिभविष्य 24 ते 30 डिसेंबर 2017

[रविवार २४ डिसेंबर २०१७ ते शनिवार ३०  डिसेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र – शनी अस्त, हर्षल वक्री . ]

मेष – व्यावसायिक स्थिति चांगली राहील परंतु आर्थिक कामात दिरंगाई निर्माण होईल. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीविषयक कामातून सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना यश. धार्मिक कार्यातून आनंद. वडिलधाऱ्यांचा विरोध सहन करावा लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. २४, २५, २८, २९.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अकारण निरुत्साह जाणवेल. सरकारी कामात अडचणी येतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २४, २५, २६, २७, ३०.

 

मिथुन – व्यवसायात अनपेक्षित आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्याचे उतावळेपणा नुकसान करेल. आर्थिक वसुलीमध्ये बाधा निर्माण होतील. सरकारी कामात संमिश्रता राहील. जोडीदाराबरोबर आर्थिक कारणावरुन वाद होतील. शुभ ता. २६, २७, २८, २९.

 

कर्क – व्यावसायिक अडचणींचा सामना करावा लागेल. खर्चाचा मेळ बसविणे कठीण जाईल. संततीच्या बाबतीत कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्याची मानसिकता नीट राहणार नाही. कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात अनुकूलता राहील. नौकरीमध्ये आर्थिक बाबी नीट हाताळाव्यात. मित्र-मंडळींचा सल्ला हितकारक ठरेल. शुभ ता. २८, २९, ३०.

 

सिंह –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र फळे मिळतील. संततीविषयक कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नापेक्षा कमी यश मिळेल. सरकारी कामात फारशी सफलता मिळणार नाही. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. प्रवासामधून वादाचे प्रसंग टाळावेत. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, ३०.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नित्य व्यवहार सुरळीत चालतील. कुटुंबात खर्चाचे प्रमाण वाढते राहील. बोलण्यावर नियंत्रण आवश्यक. आई-वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्रता राहील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७.

 

तुला –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आनंद देणाऱ्या घटना घडतील. भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. संततीच्या बाबतीत फायदे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. पत्रव्यवहारासाठी अनुकूलता राहील. सरकारी कामात यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २६, २७, २८, २९.

 

वृश्चिक – संततीच्या नौकरी संदर्भात कांही अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक कामात तांत्रिक अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २८, २९, ३०.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये विनाकारण तणाव जाणवतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येत सांभाळावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, ३०.

 

मकर –  संततीच्या कार्यात सहज यश प्राप्ती राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात व्यत्यय येतील. व्यावसायिक निर्णयातून लाभ मिळतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. २६, २७.

 

कुंभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये बढत-बदलीचे योग येतील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास अनुकूलता राहील. आर्थिक गुंतवणुक फायद्याची ठरेल. प्रवासामध्ये दिरंगाई निर्माण होईल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २८, २९.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली राहील. महत्वाचे आर्थिक निर्णय विचारपुर्वक घ्यावेत. सरकारी कामास अनुकूलता राहील. संततीमुळे खर्चाचे प्रमाणात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. प्रवासामधून कार्यपूर्ती लाभेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २६, २७, ३०.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

साप्ताहिक राशिभविष्य 17 ते 23 डिसेंबर 2017

[रविवार १७ डिसेंबर २०१७ ते शनिवार २३  डिसेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात शुक्र (अस्त) २० डिसेंबर रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत जाईल. याव्यतिरिक्त कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र – शनी अस्त, बुध – वक्री ]

 

मेष – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात अडचणी येतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. शुभ ता. १७, २३.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९, २०

 

कर्क – संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २१, २२

 

सिंह –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. हटवादी भूमिकेमुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात यश मिळेल. कुटुंबातील वातावरणावर योग्य नियंत्रण ठेवावे. स्थावराचे कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामात व्यत्यय निर्माण होतील. शुभ ता. १७, २३.

 

तुला –  नौकरदारांना बढती-बदलीचे संकेत मिळतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. आर्थिक गुंतवणुक फायद्याची ठरेल. संततीचे बाबतीत लाभदायक घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे सहज पुर्ण होतील. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. प्रवास फायद्याचे ठरतील. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १८, १९, २०.

 

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीच्या कामात संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. कौटुंबिक कार्याचे नियोजन यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. प्रवास फायद्याचे ठरतील. शुभ ता. १७, २१, २२.

 

धनु –  व्यवसायात आवक चांगली राहील. अचूक आर्थिक अंदाजांचा फायदा होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. वैयक्तिक चैनीकडे ओढा जाईल. संततीच्या बाबतीत अडचणी राहतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २३.

 

 

मकर –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वैयक्तिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, २१, २२.

 

कुंभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. गुंतवणुकीच्या संधी चालून येतील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे योग येतील. सरकारी कामात अनुकूलता राहील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मित्र-मंडळींमुळे फायदा मिळेल. प्रवासामधून वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १७, १८, १९, २०, २३.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून लांब रहावे. सरकारी कामात सफलता मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. १८, १९, २०, २१, २२.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

साप्ताहिक राशिभविष्य 10 ते 16 डिसेंबर 2017

[रविवार १० डिसेंबर २०१७ ते शनिवार १६  डिसेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.]

 

मेष – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. पोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सासुरवाडीमुळे फायदा देणाऱ्या घटना घडतील. शुभ ता. ११, १२, १३, १४, १५.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक कामे असणाऱ्यांनी गाफील राहू नये. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कफाचे व संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

मिथुन – व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अति उतावळेपणा नुकसान कारक ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, १६.

 

कर्क – व्यावसायिक बाबतीत चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या विवाहासंबंधी कामे य़शस्वी होतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात संमिश्रता राहील. स्थावराच्या कांही संधी चालून येतील. पचनाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ११, १२.

 

सिंह –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांबरोबर आर्थिक कारणावरुन वाद टाळावेत. जागा खरेदीसाठी अनुकूलता राहील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, १३, १४, १५.

 

कन्या –  संततीमुळे आनंदाच्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनूकूलता राहील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रसंग वाढते राहील. प्रवासामधून कामात व्यत्यय येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ११, १२, १६.

 

तुला –  कौटुंबिक वातावरण चांगले राहील. परंतु कौटुंबिक खर्चाबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, १३, १४, १५.

 

 

वृश्चिक – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये गाफील राहू नये. संततीविषयक कार्यात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रलोभनांपासून दूर रहावे लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १२, १६.

 

धनु –  संततीच्या दृष्टिने सप्ताह अडचणीचा राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडी कराव्या लागतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात वेळ व पैसा खर्च होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ११, १२, १३, १४, १५

 

 

मकर –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे योग येतील. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. धाडसी निर्णयातून लाभ मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींमुळे फायदेशीर घटना घडतील. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

कुंभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात सफलता लाभेल. वडिलांच्या ओळखीतून लाभ मिळतील. व्यावसायिक व्यवहारांबाबत गाफील राहू नये. प्रवासात वादाचे प्रसंग टाळावेत. शुभ ता. १०, १६.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. वाहनांच्या वेगांवर नियंत्रण ठेवावे. रागाच्या भरात कृती करणे टाळावे. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. मित्र-मंडळींचा सल्ला हितकारक ठरेल. शुभ ता. १०, ११, १२.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

साप्ताहिक राशिभविष्य 03 ते 09 डिसेंबर 2017

[रविवार ०३ डिसेंबर २०१७ ते शनिवार ०९  डिसेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.]

मेष – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरदारांना मिळते-जुळते घ्यावे लागेल. संततीच्या दृष्टिने संमिश्रता राहील. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. सरकारी कामात विनाकारण दिरंगाई होईल. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ५, ६.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नौकरदारांना मनाविरुद्ध कामाचे प्रसंग येतील. जोडीदारामुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. अडलेली कामे मार्गी लावता येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ३, ४, ७, ८.

 

मिथुन – व्यावसायिक आवक प्रमाणापेक्षा कमी राहील. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या आर्थिक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ५, ६, ९.

 

कर्क – संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना उतावळेपणा नुकसानकारक ठरेल. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र सप्ताह राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. पोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ३, ४, ७, ८.

 

सिंह –  व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या मानसिकता सांभाळावी लागेल. विद्यार्थ्यांना विनाकारण तणाव जाणवतील. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळेल. स्थावराच्या संबंधी काही संधी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. प्रवासामधून नियोजित कामात यश मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ९.

 

कन्या –  संततीच्या बाबतीत एखादा प्रश्न चिंता निर्माण करेल. विद्यार्थ्यांना विनाकारण निराशा जाणवेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. कौटुंबिक खर्च वाढतील. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. स्नायूंच्या आजारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ५, ६, ७, ८.

 

तुला –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये कामाची व्याप्ती वाढेल. कौटुंबिक कार्याचे नियोजन यशस्वी होईल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितकारक ठरेल. संततीला नौकरीच्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. भावंडांविषयी चिंता निर्माण होईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. शुभ ता. ७, ८, ९.

 

 

वृश्चिक – नौकरीमध्ये आर्थिक फायद्यासह जबाबदारी वाढेल. व्यवसाय फारसे चढ-उतार राहणार नाहीत. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. ३, ४, ९.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात अकारण तणाव जाणवेल. नौकरदारांनी आपली मानसिकता जपावी. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. थायरॉईडचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ३, ४, ५, ६.

 

 

मकर –  संततीच्या आर्थिक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. अडलेले व्यवहार मार्गी लावता येतील. नौकरीमध्ये मनाला समाधान देणाऱ्या घटना घडतील. सरकारी कामात सफलता मिळेल. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ५, ६, ७, ८.

 

कुंभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. परंतु जोखीम घेऊ नये. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सरकारी कामात सहज सफलता राहील. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. ७, ८, ९.

 

मीन – संततीच्या बाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना कष्टाने साध्यता राहील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. वडिलधाऱ्यांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. ३, ४. ९.


सौजन्य – दाते पंचांग

साप्ताहिक राशिभविष्य 26 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर2017

[रविवार २६ नोव्हेंबर २०१७ ते शनिवार   ०२ डिसेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट- शुक्र २५ नोव्हेंबर रोजी  राशीतून तुला  वृश्चिक राशीत तर  मंगळ – २९ नोव्हेंबर रोजी  कन्या राशीतून तुला राशीत जात आहे. या आठवड्यात मंगळ व शुक्र ग्रहा व्यतिरिक्त (चंद्र सोडून ) इतर कोणताही ग्रह राशीपालट करीत नाही आहे.]

 

मेष – व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास थोडा कमी राहील. जोडीदाराबरोबर किरकोळ वाद होतील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या नित्य कामात बाधा येणार नाहीत. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होतील. जोडीदाराच्या हटवादी वागण्याचा त्रास होईल. कफाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. २६, २७, २८, २९.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील, परंतु आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामास अनुकूलता राहील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. प्रवास संमिश्र फळे देतील. शुभ ता. २८, २९, ३०, १, २.

 

कर्क – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना कष्टाने सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १, २.

 

सिंह –  संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कष्टसाध्य यश मिळेल. कौटुंबिक अडचणीतून मार्ग निघतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७.

 

कन्या –  व्यवसायात आर्थिक निर्णय लाभ देतील. नौकरीमध्ये नियोजित कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. शुभ ता. २६, २७, २८, २९.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला लाभ देईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीच्या नौकरीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींच्या ओळखीचा फायदा होईल. शुभ ता. २८, २९, ३०, १, २.

 

वृश्चिक – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. अचूक आर्थिक अंदाजामुळे फायदा होईल. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. रागांवर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १, २.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल. संततीच्या कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २६, २७.

 

 

मकर –  व्यावसायिक आवक वाढेल. नौकरदारांना समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २८, २९, ३०.

 

कुंभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामातून यश मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २६, २७.

 

मीन – संततीच्या बाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वाहनांच्या वेगांवर योग्य नियंत्रण ठेवावे. शुभ ता. २८, २९, ३०.


सौजन्य – दाते पंचांग