साप्ताहिक राशिभविष्य 19 -25 नोव्हेंबर 2017

[ रविवार १९ नोव्हेंबर २०१७ ते शनिवार  २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट- बुध – २४ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत जात आहे. या आठवड्यात बुध ग्रहा व्यतिरिक्त (चंद्र सोडून ) इतर कोणताही ग्रह राशीपालट करीत नाही आहे.]

 

मेष – व्यावसायिक स्थिति ठीक राहील. नौकरीमध्ये बेफिकिर राहू नये. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वाद होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. २४, २५.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी आर्थिक कारणावरुन वाद होतील. सरकारी कामात प्रयत्नास यश मिळेल. आर्थिक प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. खाणे-पिणे सांभाळावे. शुभ ता. १९, २०.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामात यश मिळेल. संततीच्या आर्थिक गोष्टी तपासून पहाव्यात. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून लांब रहावे. सरकारी कामात अनुकूलता राहील. आर्थिक जोखीम पत्करु नये. स्थावराचे कामात यश मिळेल. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २१, २२.

 

कर्क – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. परंतु महत्वाचे आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावेत. संततीच्या बाबतीत समाधान देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आर्थिक नुकसानीचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २१, २२, २३, २४, २५.

सिंह –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. भावंडांशी आर्थिक व्यवहार टाळावेत. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. अनपेक्षित खर्चामुळे मेळ बसविणे कठीण जाईल. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५.

 

कन्या –  संततीच्या कामात व्यत्यय येतील. कुटुंबात आर्थिक बाबींबाबत संभ्रमावस्था निर्माण होईल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये विसंबून राहून कामे करणे टाळावे. सरकारी कामात सफलता मिळेल. आर्थिक बाबतीत पारदर्शी रहावे. अविचारी कृती टाळावी. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. १९, २०.

 

तुला – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रलोभनांपासून दूर रहावे. सरकारी कामात संमिश्र सफलता मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

वृश्चिक – संततीच्या बाबतीत आर्थिक नुकसानीचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. उद्योग-व्यवसायात प्रलोभनाला बळी पडून जोखीम घेऊ नये. नौकरीमध्ये आर्थिक अमिषाला बळी पडू नये. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १९, २०, २४, २५.

 

धनु –  व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. विवाहीत संततीच्या जीवनात त्रास होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. मोठ्या भावंडांबरोबर आर्थिक कारणांवरुन वाद होतील. प्रवासामधुन कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

मकर –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लावता येतील. व्यावसायिक आर्थिक निर्णय घाईने घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १९, २०, २४, २५.

 

कुंभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचे दडपण सतत वाढते राहील. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. शेजाऱ्यांच्या भानगडीत पडू नये. सरकारी कामात अनुकूलता राहील. प्रवासातून कामे सफलता दर्शवितात. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २१, २२, २३.

 

मीन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. वडिलधाऱ्यांचा विरोध सहन करावा लागेल. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३, २४, २५.


सौजन्य – दाते पंचांग

साप्ताहिक राशिभविष्य 12 -18 नोव्हेंबर 2017

[ रविवार १२ नोव्हेंबर २०१७ ते शनिवार  १८ नोव्हेंबर २०१७ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट- रवी – १६ नोव्हेंबर रोजी तुला राशीतून वृश्चिक राशीत जात आहे. या आठवड्यात रवी व्यतिरिक्त (चंद्र सोडून ) इतर कोणताही ग्रह राशीपालट करीत नाही आहे.]

 

मेष – व्यावसायिक स्थिति अपेक्षेप्रमाणे राहणार नाही. नौकरीमध्ये अतिरिक्त कामाचे प्रसंग येतील. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून संमिश्र सफलता लाभेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५, १६, १७.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या आर्थिक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास पूर्वार्ध चांगला राहील. मधुमेह असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १६, १७, १८.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये उत्तरार्ध समाधानकारक राहील. संततीच्या बाबतीत समाधानकारक परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी उत्तरार्ध अनुकूल नाही. स्थावराचे संधी चालून येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १२, १३, १८.

 

कर्क – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात दरंगाई निर्माण होईल. भावंडांच्या ओळखीतून लाभ मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५.

 

सिंह –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. प्रवासामधून कामे सफल होतील. कुटुंबातील अनावश्यक कामावर नियंत्रण ठेवावे. शुभ ता. १२, १३, १६, १७.

 

कन्या –  संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास उत्तरार्ध चांगला राहील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. महत्वाचे निर्णय तडकाफडकी घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५.

 

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारी वाढेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. अनावशय्क खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १२, १३, १६, १७.

वृश्चिक – सरकारी कामासाठी उत्तरार्ध चांगला राहील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मोठ्या भावंडांच्या ओळखीतून लाभ होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचे चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १२, १३, १४, १५.

 

धनु –  नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. व्यावसायिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. व्यावसायिक धाडसी निर्णयातून लाभ मिळतील. प्रवास कार्यपूर्ती दर्शवितात. मित्र-मंडळींमुळे फायद्याच्या घटना घडतील. शुभ ता. १४, १५, १६, १७.

 

मकर –  संततीच्या आर्थिक समस्या त्रास देतील. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून लांब रहावे. व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. नौकरीमध्ये जबाबदारी वाढेल. आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १६, १७, १८.

 

कुंभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या शैक्षणिक अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास उत्तरार्ध चांगला राहील. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामे सफलता दर्शवितात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १२, १३, १८.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या अडचणीतून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात अडचणी येतील. जोडीदाराच्या वागण्यामुळे मनस्ताप होतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. शुभ ता. १२, १३, १४, १५.


सौजन्य – दाते पंचांग