गणेश चतुर्थीला गणपती पूजनासाठी मुहूर्त असतो काय ?

गणेश चतुर्थीला गणपती पूजनासाठी मुहूर्त असतो काय ?

सध्या एखाद्या सण जवळ आला की, सोशल मिडीयावर तथाकथित धर्माशास्त्रींची रेलचेल सुरु होते. ही मंडळी समाज व लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याऐवजी त्यात नवनवीन गोष्टींची भर घालून लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचे काम अधिक करत असतात . त्यात सोशल मिडिया हाती मिळाला तर कहर माजवतात. सध्या गणपती आणणे व स्थापन करण्याविषयी बऱ्याच पोष्ट फिरत आहेत.

 

भाद्रपदशुक्लचतुर्थीवरदचतुर्थी सामध्यान्हव्यापिनीग्राह्या | निर्णयसिन्धु

भाद्रपद शुक्ल चतुर्थी वरदचतुर्थी – ती मध्यान्ह व्यापिनी घ्यावी.

 

धर्मशास्त्राचा निर्णय देताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जिथे एखाद्ये विशिष्ट कार्य एखाद्या विशिष्ट वेळेत सांगितले असते तिथे ती “विशिष्ट वेळ” महत्वाची असते. इतर गोष्टी आपोआपच गौण ठरतात. उदा. गणेश चतुर्थीबाबतीत सांगायचे झाले तर, गणपती पूजन भाद्रपद शु. चतुर्थीला मध्यान्हाकाळी करावे, असे सांगितले आहे. इथे  “भाद्रपद शु. चतुर्थीला मध्यान्हाकाळी” हे महत्वाचे झाले मग इतर गोष्टी आपोआपच गौण ठरतात, मग त्यावेळी विष्टी करण असेल, राहू काळ असेल अथवा पंचांग शुद्धी नसेल या सर्व गोष्टी गौण होतात इथे फक्त “भाद्रपद चतुर्थी मध्यान्ह व्यापिनी” असली कि झालं.

 

गणेशोत्सवा निमित्त दाते पंचांगात दिलेली माहिती खालील प्रमाणे आहे. (पंचांग कर्त्याचा शब्द अधिक महत्वाचा असतो.)

  • भाद्रपदमहिन्यातील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करणेसाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रात:काल पासून मध्यान्हापर्यंत (अंदाजे दु. १.३० पर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना करता येते.
  • उजव्या सोंडेचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत चूकीची आहे.
  • भाद्रपद शु. ४ या दिवशी श्रीगणेश स्थापना/पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये. एखाद्या वर्षी लोप झाल्यास चालतो.
  • गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या दिवशी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील.
  • घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशावेळी मूर्तीचे विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे आहे.
  • श्री गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारीही (कोणत्याही वारी) अथवा कोणत्याही नक्षत्रावर करता येते.
  • गौरी विसर्जन “मूळ” नक्षत्रावर करावयाचे असल्याने मंगळवारी/शुक्रवारी (कोणत्याही वारी) करता येते.

संदर्भ दाते पंचांग पान. ९०. (२०१९-२०)

 

आपले धर्मशास्त्र तसं सोप व सुटसुटीत आहे, पण काही अतिविद्वान मंडळी त्याला क्लिष्ट बनवत आहेत.

—————————————————————————————–

             श्री उत्तम गावडे

                 ज्योतिष – वास्तु सल्लागार

               9901287974

 

Back To Home

BACK TO SHANKA SAMADHAN INDEX

मकर संक्रांति – 2019

        आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात मकर संक्रात ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नांवाने ओळखली जाते. गुजरात- राजस्थान मध्ये उत्तरायण, आसाम मध्ये  मघ विहु किंवा भोगली बिहू तमिलनाडु मध्ये ‘पोंगल’, पंजाबात लोहड़ी, हरियाणा- हिमांचल प्रदेश मध्ये माघी. कश्मीर घाटी मध्ये शिशुर संक्रांत, दक्षिण भारतात मकर संक्रमण इ. पण नांवे आणि पद्धत  थोड्याफार फरकाने वेगळ्या असल्या तरी सूर्य पूजा हेच मुख्य ध्येय असते. उत्तरायणाची सुरवात म्हणजेच देवांचा दिवस सुरु होतो म्हणून या संक्रातीचे महत्व अधिक असते. इथून पुढे मंगल कार्यांची सुरुवात होते.                 

             कोणताही ग्रह ज्यावेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांति म्हणतात. रवि म्हणजेच सूर्य हा एका वर्षात १२ वेळा राशी बदलतो म्हणजेच एका वर्षात सूर्याच्या १२ संक्रांति होतात, त्यात मकर संक्रांति ही उत्तरायणाची सुरुवात असते म्हणून अत्यंत शुभ व महत्वाची मानण्यात येते.

सूर्याच्या १२ संक्राति अशा आहेत.

 
तूळ व मेष – विषुव संक्रांति.
कुंभ, वृश्चिक, वृषभ व सिंह – विष्णुपद.
धनु, कन्या, मिथुन, मीन – षडशीति.
कर्क संक्रांति- दक्षिणायन.
मकर संक्रांति – उत्तरायण.

सर्वच संक्रांतिकाल हे धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ मानले जातात.

 

        मकर संक्रांत 2019 – या वर्षी मंगळवार दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी मकर संक्रांत आहे. शके 1940 पौष शुक्ल अष्टमी (८) सोमवारी (14 जानेवारी) सायंकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी  सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतिचा पुण्यकाल – 15 जानेवारी 2019 मंगळवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे.

        या दिवसाचे कर्तव्य – तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. 

 

      संक्रांति वर्णन

बव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार पुढील प्रमाणे –

        वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. श्वेत (पांढरे) वस्त्र परिधान केले आहे. हातात भृशुंडी हे शस्त्र घेतले आहे. कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. वयाने बाल असून बसली आहे. वासाकरिता चाफ्याचे (पुन्नाग) फूल घेतले आहे. अन्न भक्षण करीत आहे. देव जाति आहे. भूषणार्थ प्रवाळ (पोवळे) रत्न धारण केले आहे. वारनांव व  नाक्षत्रनांव ध्वांक्षी आहे. सामुदाय मुहूर्त 30 आहेत. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे. मुख पश्चिमेस असून ईशान्य दिशेस पाहत आहे.

 

           संक्रांती  ज्या ज्या वस्तूंचा स्वीकार (धारण) करते त्या वस्तू महाग होतात, अथवा त्यांचा नाश होतो व ती विकणारे व विकत घेणारे लोक याना भय प्राप्त होते. संक्रांती ज्या दिशेकडून जाते तिकडे सुख होते, जिकडे जाते तिकडे दुःख होते आणि जिकडे पहाते तिकडे हानी होते.

 

       संक्रांति बसलेली असून समुदाय मुहूर्त ३० असल्याने अन्न धान्य भाव सम असेल. व्यापाऱ्यांना सुविधा मिळाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल, शेअर मार्केट मध्ये तेजी दिसून येईल व गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळेल. वित्तीय संस्थानासाठी शुभ असेल.

 

      संक्रांतिच्या पर्वकाळात पुढील कामे करू नये-

कठोर बोलणे, दात घासणे. *( इथे दांत घासु नये याचा अर्थ झाडाच्या काठीने दांत घासु नये असा घ्यावा , बोटाने घासणे, चूल भरने अथवा ब्रश करने चालते.)
वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे. कामविषय सेवन आदी कामे करू नयेत.

 

     

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

  

नक्षत्र परत्वे संक्रांति कोणा-कोणाला शुभाशुभ आहे.

रेवती, अश्विनी, भरणी नक्षत्र असणाऱ्यांना –प्रवास योग घडेल.                                                                                     कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य नक्षत्र असणाऱ्यांना  – सुखभोग.                                                                आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असणाऱ्यांना  – शरीरपीडा, आरोग्याची काळाजी घ्यावी.                                                उत्तरा फाल्गुनी , हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, वस्त्र आभूषण प्राप्ति.                              ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा नक्षत्र असणाऱ्यांना द्रव्यनाश, अर्थिक नुकसान.                                                                  उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, धनप्राप्ति, यशप्राप्ति.

ज्या नक्षत्रांना संक्रांति अशुभ आहे त्यांनी तिळमिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पन, तिलभक्षण व तिलदान या सहा अथवा यापैकी कोणतिही कामे संक्रांतिच्या पुण्यकालात करावी.

 

[ टिप  –  दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.]

संक्रांति पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने

नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

 

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

संक्रांतिच्या दानाचा संकल्प – देशकाल कथन करून – मम आत्मन: सकलपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतीद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायु:महैश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन्‌ मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये । असा संकल्प करून दानवस्तूचे पूजन करून दान द्यावे. दक्षिणा द्यावी.

 

                       संक्रांतिच्या पर्व काळात पुजाअर्चा, दान, व्रत इ. चे  पुण्य मिळतेच पण या काळात आपण आपल्या पत्रिकेतील बलहीन व अशुभ ग्रहांच्या संबंधित वस्तुंचे दान देऊन त्यांची अशुभताही कमी करू शकता. कोणत्या ग्रहासाठी कोणत्या वस्तु दान करू शकता ते पाहु.

सूर्य – माणिक रत्न, गहू, गाय, लाल वस्त्र, गूळ, सोने, तांबे, रक्तचंदन, कमळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

चंद्र – तांदूळ, कापूर, मोती, पांढरे वस्त्र, बैल, तूपाने भरलेला कुंभ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

मंगळ – पोवळे, गहु, मसुर, लाल बैल, गूळ, सोने, लाल वस्त्र, तांबे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

बुध – निळे वस्त्र, सोने, काशाचे भांडे, अख्खे मूग, पाचू रत्न, फुले यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

गुरु – पुष्कराग मणी, हळद, साखर, घोडा, पिवळे वस्त्र, मीठ, सोने यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शुक्र – चित्रविचित्र वस्त्र, पांढरा घोडा, गाय, हिरा, सोने, रूपे, अत्तर, तांदूळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शनि – नीलमणी, उडिद, तेल, तीळ, कुळीथ, म्हैस, लोखंड, काळ्या रंगाची गाय, चप्पल, घोंगडे, छत्री यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

राहु – गोमेदमणी, घोडा, निळे वस्त्र, तेल, कांबळे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

केतू – वैडूर्य मणी (लसण्या), तेल, तीळ, कांबळे, कस्तुरी, मेंढा, वस्त्र यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

[दान नेहमी सत्पात्र व्यक्तीलाच करावे. दान अशुभ व बलहीन ग्रहाचेच करावे.]

आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा |
|| तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला.. ||


 

हे हि लेख वाचा . . . . .

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 

सूर्योपासना आणि हृदयविकार

शनीची साडेसाती – शोध आणि बोध

साडेसाती आणि शनिमाहात्म्य

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद .

बेळगांव – कर्नाटक

9901287974

मंगळसूत्र कसे असावे?

विवाहात वधूने परिधान करावयाचे मंगळसूत्र कसे असावे?

         मंगळसूत्रास प्रांतनिहाय डोरले, गळेसारी, गंठन अशी निरनिराळी नावे असून मंगळसूत्र गाठवण्याच्या पद्धतीमध्ये देखील विविधता आढळते.

ऋग्वेदीय ब्रह्मकर्मात

“ब्रह्मविष्ण्वीशरूपं रंध्रवच्च त्रितंतुकम ।

त्रिरत्नं रुक्मजं स्त्रीणां मांगल्याभरणं विदु:।

वामहस्ते एकसरं कंठे तु त्रिसरं स्मृतमिति ॥”

            असे मंगळसूत्राचे वर्णन केलेले आहे. त्याप्रमाणे शास्त्रानुसार मंगळसूत्रामध्ये तीन पदर व सोन्याचे अठरा मणी आसावेत असे सांगितलेले असले तरी प्रचलित रुढीनुसार मंगळसूत्रात दोन पदर व सोन्याचे बारा मणी असतात. उपरोक्त दोन्ही प्रकारांत मंगळसूत्राचे पदर व सोन्याचा मण्यांची संख्या ह्यांच्या बाबतीत थोडीशी तफावत आढळून येते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

       शास्त्रानुसार मंगळसूत्राची बांधणी करावयाची झाल्यास स्त्रीच्या ह्रदयापर्यंत असे मंगळसूत्राचे माप ठेवावे. त्या मापाचे तीन घट तंतू घेऊन त्यामध्ये काळे मणी व थोड्या थोड्या अंतावर सोन्याचे मणी ओवून घ्यावेत. मंगलसूत्रातील तीन तंतू म्हणजे त्रयींचे प्रतीक होय. ब्रह्म-विष्णू-शिव, महाकाली-महालक्षी-महासरस्वती, सत्त्व-रज-तम इत्यादी अनेकविध त्रयींचे प्रतिनिधित्व तंतूंकडून होत असते. सोन्याच्या दोन वाट्या म्हणजे पति, पत्नी, जीव-उपाधी इत्यादी द्वयींचे प्रतीक होय. ह्या मंगलसूत्रासाठी उडदाच्या आकाराचे तीनशेसाठ (३६०) काळे मणी व अठरा (१८) सोन्याचे मणी वापरले तर पर्याप्त लांबीचे मंगलसूत्र तयार होते. अशा वेळी तीनशेसाठ काळे मणी हे वर्षाच्या तीनशेसाठ दिवसांचे, सोन्याचे बारा मणी म्हणजे बारा महिन्यांचे, तर सहा मणी सहा ऋतूंचे प्रतिनिधित्व करतात. अर्थात, मोठे काळे मणी वापरणे शक्य नसेल तर उपलब्ध होतील ते काळे मणी मंगळसूत्राच्या लांबीनुसार यथासंख्येने वापरले तरी चालतात.

      अशा प्रकारे तयार केलेले मंगळसूत्र विवाहात दोन्ही हाताच्या तळव्याच्या संपुटात ठेवुन वराने खालील मंत्राने ते अभिमंत्रित करावे.

इदं सौभाग्यदं सूत्रं मत्प्रीत्या ते ददाम्यहम्‌ ।

तिष्ठामि च  तद्रूपेण त्वद्‌ह्रदि चिरकाम्यया ॥

नंतर वधूच्या मागे उभे राहून सद्‍गुरू व कुलदेवता ह्यांचे स्मरण करत व खालील मंत्र म्हणत मंगळसूत्र वधूच्या कंठात घालावे.

मांगल्यतंतुनानेन भर्तृजीवनहेतुना ।

कंठे बध्नामि सुभगे सा जीव शरद: शतम्‌ ॥

वधूने मंगळसूत्र दोन्ही तळहातामध्ये धरुन खालील मंत्र उच्च स्वरात म्हणावेत.

“मणिसूत्रं महासूत्रं ब्रह्मविष्णुशिवात्मकम्‌ । दिनमासर्तुसमेतं जीवोपाधिसमन्वितम्‌ ।

भर्तुरायुर्विवृद्ध्यर्थं सर्वरक्षाकरं महत्‌ । चिरसौभाग्यसिद्ध्यर्थं कंठे वै धारयाम्यहम्‌ ॥”

 

      स्त्रीने मंगलसूत्र कंठातून कधीही बाहेर काढू नये. जर सूत्र तुटल्यामुळे मंगलसूत्र ओघळले तर लगेचच पुन्हा दुसरे मंगलसूत्र तयार करुन ते घालावे, तोपर्यंत अन्न ग्रहण करु नये. दररोज स्नान झाल्यावर मंगलसूत्राच्या वाट्या उजव्या जातात घेऊन डाव्या हाताने त्यावर थोडे पाणी घालून त्या प्रक्षालन कराव्यात व स्वच्छ पुसाव्यात. पुन्हा तसेच त्यावर थोडे पाणी घालून ते तीर्थ म्हाणून प्राशन करावे. वाट्यांना हळदीकुंकू लावून त्या मस्तकी लावून नमस्कार करावा. ह्या छोट्याशा विधीमुळे पतीचे आयु-आरोग्य तर वृद्धिंगत होतेच पण त्याचबरोबर पतिपत्नीमधील वैचारिक मतभेद नष्ट होऊन वैवाहिक जीवन सुखसमृद्धि व आनंदाने व्यतीत होण्यास साहाय्य होते.

 

        वरील मंगलसूत्राखेरीज पूर्ण सोन्यात गाठवलेले व वाट्यांच्या ऐवजी इतर कलाकृती असलेले मंगलसूत्र परिधान करण्याची खरेतर आवश्यकता नाही. तथापि, हौसेचा भाग म्हणून सणसुदीच्या दिवशी वा समारंभास जाताना असा मंगळसूत्रसदृश दगिना तेवढ्यापुरता परिधान केला तरी फारशी हरकत येत नाही.


साभार – शास्त्र असे सांगते (उत्तरार्ध)

हे लेखही वाचा ……

 

कर्पूर होमएक प्रभावी उपाय

कुंकुमार्चनएक प्रभावी विधी

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

कर्पूरहोम – एक प्रभावी उपाय

कर्पूरहोम म्हणजे काय?

कर्पूरहोम केंव्हा केंव्हा करतात ?

कर्पूरहोम कोणकोणत्या उद्यीष्टपूर्तीसाठी केला जातो ?

कर्पूरहोम करताना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ?

कर्पूरहोम करताना कोणता मंत्र अगर स्तोत्र म्हणावे ?

 

‘कर्पूरहोम’ हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्व, अतिप्रभावशाली व अत्यंत उपयुक्त, पण आजपर्यंत फारच कमी लोकांना माहीत असलेला असा हा विधी आहे.

  कर्पूरहोमाची संकल्पना-

   कर्पूरहोमामध्ये, शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर कापराची वडी प्रज्वलित करतात. हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसून आपण यज्ञ करत आहोत अशी कल्पना ह्या वेळी केली जाते. कारण नारळातील पाणी बाह्य वातावरणाशी संपर्करहित असल्यामुळे ते हरिद्वार येथील ब्रह्मकुंडातील गंगेप्रमाणेच पूर्णतया प्रदूषणरहित, स्फटिकासारखे शुद्ध व पवित्र असते. त्याचप्रमाणे नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडाचा गंगाकाठ मानला जातो. ज्याप्रमणे ब्रह्मकुंडावर यज्ञयाग केल्यास त्याचे फळ कोटिपट मिळते अशी श्रद्धा आहे, त्याप्रमाणे कर्पूरहोमाचे फळही असेच भरघोस असते. कारण मन:पूर्वक कर्पूरहोम करताना वरील दोन्ही अत्यंत पवित्र गोष्टींबरोबरच परमपावन अशा अग्नीचा संयोग झाल्यास त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढून इच्छाशक्ती तीव्र होते व त्या कठोर इच्छाशक्तीमुळे मन:कामाना पूर्ण होण्यास साहाय्य होते. त्याबरोबर मनात विचारांचे काहूर उठले असेल तर त्यांचे शमन होऊन मनास अनामिक शांती लाभते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

  कर्पूरहोम केंव्हा करावा?

   कर्पूरहोम कोणत्याही वेळी करता येतो. तथापि दररोज ठरावीक वेळ ठेवल्यास आपण आवाहित असलेली देवता नेमकी त्या वेळी उपस्थित असल्याचे जाणवते. कर्पूरहोमामुळे घरात शांती नांदते.  एखाद्या महत्वाचा कार्याला निघण्यापूर्वी कर्पूरहोम अवश्य करावा. त्यामुळे त्या कार्याचा सिद्धीसाठी आवश्यक ते मन:स्थैर्य व विवेकबुद्धी ह्या गोष्टी जागृत राहतात आणि कार्यात यश असेल तरच त्या ठिकाणी जावे असे वाटते, ह्याउलट कार्यहानी होणार असेल तर तेथे न जाण्याची मनास प्रेरणा होते. ह्याखेरीज ज्या वेळी पर्याय शोधताना बुद्धीला शीण होतो व नक्की निर्णय घेता येत नाही, अशा वेळी कर्पूरहोम अवश्य करावा. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीस घर खरेदी करावयाचे आहे तिला त्यास एकदम दोन-तीन चांगली घरे दृष्टिपथात येतात किंवा एखाद्या उपवर मुलीस एकदम दोन- तीन चांगल्या स्थळांकडून होकार येतो, तसेच एकाच वेळी दोन मनपसंत नोकऱ्यांची नेमणूकपत्रे येतात; अशा वेळी ’हे करु की ते करु’ अशी मनाची दोलायमान अवस्था होते. एखाद्याचा सल्ला घ्याला जावे तर देणारी व्यक्ती निरपेक्षपणे सल्ला देईल ह्याची खात्री नसते. प्रत्येक जण देताना स्वत:कडे जोखीम न घेता दुय्यम मत (सेकंड ओपिनियन) देतो. कारण चुकल्यास त्याचा वाईटपणा स्वत:कडे घेण्यास तयार नसतो. काळाची पावले अचूक ओळखणाऱ्या एखाद्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तर अशी व्यक्ती अभावानेच आढळते. ह्या सर्व पेचप्रसंगी कर्पूरहोमासारखा उत्कृष्ट पर्याय नाही. कर्पूरहोम करुन थोडा वेळ शांत बसल्यावर मनाची स्थिरता होऊन त्यात आपल्याला श्रेयस्कर पर्यायाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे कुणाचाही सल्ला न घेता स्वत:हून पर्यायी मार्ग काढता येतो.

 

  कर्पूरहोम करताना विशेष असा कोणयाही मंत्र अथवा स्तोत्र पठन करणे आवशयक असते असे नाही. तथापि आपली इष्टदेवता वा कुलदेवता ह्यांचे नामस्मरण केल्यास, किंवा आपल्यास माहित असलेल्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठन केल्यास कर्पूरहोमामध्ये अधिक एकाग्रता साधली जाते. ज्या वेळी शोक, दु:ख, अपमान इत्यादी भावना उफाळून मन हताशा होते, त्या वेळी कर्पूरहोम केल्यास नैराश्य दूर पळते आणि मनाला दुप्पट उत्साह व उमेद वाटून पुढील कार्ये सुकर ठरतात. एखादे मोठे धर्मसंकट समोर येताच कर्पूरहोम केल्यास अनाकलनीयरीत्या मार्ग सुचतो. जात, धर्म, लिंग, वय, अवस्था, अशौच इत्यादी कोणत्याही गोष्टींचा अडथळा कर्पूरहोमास येत नाही.

 

  संकटकाळी हातपाय धुऊन केलेली किमान शारीरिक शुचिता कर्पूरहोमास पुरेशी ठरते. कर्पूरहोम शक्यतो देवासमोर करावा. देवाकडून योग्य निर्णय वा पर्याय हवा असेल तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे करावी. आत्मनिवेदन, पश्चात्तापनिवेदन, ध्यानधारणा, त्राटक इत्यादी करताना शेंडी आपल्याकडे करावी. कर्पूरहोम करताना अपेक्षित फलनिष्पत्ती होईपर्यंत एकाच नारळावर दररोज कर्पूरहोम करता येतो. त्या वेळी नारळावर एकाच जागी कापूर लावण्याऐवजी जागा बदलली तरी चालते. त्यामुळे एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत वापरता येतो. तथापि काही दिवसांनी त्यातील पाणी आटल्यावर तसेच अमावस्या, पौर्णिमा ह्या तिथींना वा नारळ भग्र पावल्यास त्या जागी नवीन नारळ घ्यावा. पहिला नारळ प्रसाद म्हणून भक्षण करता येतो. नारळ नासलेला असेल तर त्याचे विसर्जन करावे.

 

  कर्पूरहोमाचा विनियोग;

१) पापमोचन, २) संकटपरिहार, ३) दोषनिरास ह्या उद्दिष्टांसाठीही  केला जातो.

 

१) एखादे वाचिक, मानसिक वा कायिक पाप घडले असेल तेव्हा पापमोचनासाठी कर्पूरहोम करताना, हातात कापराची एक वडी घेऊन आपल्या पापाचा मनोमन उच्चार करुन ते पापकृत्य वडीत समाविष्ट झाल्याची कल्पना करावी व ती वडी नारळावर ठेवून प्रज्वलित करावी. जेव्हा मन पश्चात्तप्त होऊन पापकृत्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी ग्वाही देते, त्या क्षणी पापमोचनार्थ कर्पूरहोम थांबवावा.

२) दुसरे उद्दिष्ट म्हणजे संकटपरिहार होय. ज्या वेळी अनाकलनीय व अत्यंत दुर्धर असे पेचप्रसंगात्मक संकट (किंवा समस्या) समोर येते, त्या वेळी हातात कापराची वडी घेऊन त्या संकटाचा (किंवा समस्येचा) मनोमन उच्चार करून ते संकट (किंवा समस्या) त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर ठेवुन प्रज्वलित करावी. संकटनिराकरणाचा योग्य मार्ग दिसताच संकटपरिहारात्मक कर्पूरहोम थांबवावा.

३) तिसरे उद्दिष्ट म्हणजे दोषनिरास होय. जेव्हा आपल्या अंगी परस्त्रींचींतन, परद्रव्यापहरण, परनिंदा, परानिष्टचिंतन. दुर्व्यसन, कामक्रोधादी विकार इत्यादींचा फैलाव आहे अशी जाणीव होऊ लागते तेव्हा क्रमाक्रमाने एकेक दोष निवडावा व हातात कापराची वडी घेऊन त्या दोषाचा मनोमन उच्चार करुन तो त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर लावावी. तो दोष निरस्त झाल्याची खात्री होईपर्यंत दोषनिरासात्मक कर्पूरहोम करावा. अशा प्रकारे अंगातील सर्व दोष कर्पूरहोमाने नष्ट करता येतात. वरील तीन उद्दिष्टंपैकी संकटपरिहारार्थ कर्पूरहोम करताना नारळाची शेंडी देवाकडे करावी. पापमोचनार्थ व दोषनिरासार्थ कर्पूरहोम करताना नाराळाची शेंडी आपल्याकडे करावी . एकाहून अधिक उद्दिष्टंसाठीही एकाच बैठकीवर, एकाच नारळावर कर्पूरहोम करता येतो.

 

  वरील तीन उद्दिष्टांखेरीज कामनापूर्ती होण्यासाठी कर्पूरहोम करता येतो. हातात कापराची वडी घेऊन आपल्या कामनेचा मनोमन उच्चार करुन त्या कामनापूर्तीतील विविध अडथळे त्या वडीत सामावल्याची भावना करुन नारळावर ती वडी प्रज्वलित करावी. त्या वेळी नाराळाची शेंडी देवाकडे करावी. ह्याप्रमाणे दररोज ठरावीक संख्येने कर्पूरहोम केल्यास काही दिवसांत आपल्या कामनापूर्तीसाठी ते प्रयत्न करण्याविषयीचे मार्गदर्शन मिळते.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

  कर्पूरहोमातील काही समस्यांचे निराकरण –

काही वेळा कर्पूरहोम करताना नारळ एकदम तडकतो किंवा त्याची दोन शकले होतात. अशा वेळी लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूर होम करावा. एखादे स्तोत्र वा ठरावीक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकल्यास ते स्तोत्र वा ती संख्या पूर्ण करावी व नंतर नारळ बदलावा. तडकलेला नारळ खाण्यास योग्य असल्यास त्याचा उपयोग घरात करावा, अन्यथा त्याचे विसर्जन करावे. कधीकधी कर्पूरहोमसाठी नारळ घेतानाच तो तडकतो. अशा वेळी मन:शांती ढळू न देता दुसरा नारळ घ्यावा. जेव्हा संचित-प्रारब्ध-क्रियमाण कर्मांनी उभ्दवलेल्या प्रतिरोधांचा (विरोधांचा) रेटा अधिक प्रमाणात असतो तेव्हा त्याची परिणती नारळ तडकण्यात होते. नारळ तडकणे बंद होणे म्हणजे प्रतिरोध संपणे असे सूचित होते. काही वेळा कर्पूरहोम करताना नारळाच्या एका, दोन्ही किंवा तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहू लागते. एका डोळ्यातून पाणी वाहते तेव्हा सामान्य अडचण, दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा उपाययोजना करता येण्याजोगी समस्या व तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा अत्यंत कठीण पेचप्रसंग सूचित होतो. अशा वेळी नारळ बदलून, नाराळाची शेंडी देवाकडे करुन, मनाचे धौर्य राखून योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूरहोम चालू ठेवावा.

 

  नेहमीच्या यज्ञकर्मास कर्मकांडाचे अधिष्ठान असते, तर कर्पूरहोमास साधनेचे व श्रद्धेचे अधिष्ठान असते. उपरोक्त दोन्हींची अंतिम फलश्रुती ही कामनापूर्ती असली तरी कर्पूरहोम हा यज्ञाचा पूर्णतया पर्याय होऊ शकत नाही. तथापि सर्वसामान्यांना नित्य यज्ञकार्य सहजशक्य नसल्यामुळे त्यांना कर्पूरहोमातून यज्ञ समाधान तर मिळतेच, पण त्याचबरोबर श्रद्धेचे फळही मिळते.


साभार – शास्त्र असे सांगते! (पूर्वार्ध)

हे ही लेख वाचा . . . .

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

लक्ष्मी कुठे राहत नाही ?

महापर्व मकर संक्रांत

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?*

कुंकुमार्चनाचा विधी ?

त्या संबधी कोणती काळजी घ्यावी?

कुंकुमार्चनाचे शास्त्र अथवा फायदे काय ?

 

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपुजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते.  

कुंकुमार्चन पूजा विधी :- एका तांब्याच्या किंवा पितळेच्या / चांदीच्या ताम्हणमध्ये देवी ची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट) पात्रात घेऊन शुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. लाल फुले,गुलाब वाहणे. शक्य असल्यास ताम्हणात हि फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप – धूप लावावा. गायीच्या तुपाचा दिवा लावावा, (शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.)

त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत, अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक-एक नामाचा जप करत, अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता “मृगी मुद्रेने” म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे.

काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासुन सुरु करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे.


मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी.

कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता.

 

 ‘मूळ कार्यरत शक्तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या  सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’

——————————————————————— —————————————————————–

इंटरनेटवरून साभार

हे लेखही वाचा . . . .


देवदीपावली


धनप्राप्तीचे ११ सहज उपाय


लक्ष्मी कुठे राहत नाही ?


महापर्व मकर संक्रांत  


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

“देवदीपावली”

“देवदीपावली” ह्या सणाचे स्वरुप कसे असते?

 

उत्तर : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस ‘देवदीपावली’ किंवा ‘देवदिवाळी’ हा सण येतो . हा सण मुख्यत्वे कोकणप्रांतीय लोकांत साजरा केला जातो.

 

     देवदीपावलीच्या वेळी देव्हाऱ्यात तेलातुपाच्या दिवे लावून ठेवावेत. देव्हाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करुन अत्तर गरम पाण्याने स्नान घालावे. ह्या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता ह्यांच्याखेरीज स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देव उदाहरणार्थ: महापुरूष, वेतोबा, उपदेवदेवता ह्यांना त्यांच्या-त्यांच्या मानाचा भाग (नैवेद्य) पोचवला जातो. वर्षातून एखादे दिवशी ह्या सर्व देवदेवतांची आपल्याकडून पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक आहे, त्यामुळे कोकणप्रांतीय लोक देवदिवाळीस ’देवांचे नैवेद्य’ असे म्हणतात.

 

  सद्य: काली घरात विविध तळलेले जिन्नस त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा करतात. देवदीपावलीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांखेरीज ताटात पुरणांचे कडबू, भरड्याचे वडे, सांज्याचे घागरे, अळणी वडे, घावन-घाटले ह्यांतील पदार्थ नैवेद्यास ठेवतात. त्यांपैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देवदीपावलीच्या निमित्ताने घरातील, गावातील व घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या अशा सर्व देवतांचा उल्लेख करुन त्यांचा आदरसत्कार केला जातो.


संदर्भ – शास्त्र असे सांगते- उत्तरार्ध

धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

      आजच्या या भौतिक जगात प्रत्येक व्यक्तीला एक सुखवस्तू जीवन जगण्याची इच्छा नेहमीच होत असते. आजच्या जगात “पैसा” हे जीवन नसले तरी यापेक्षा कमीही नाही. त्यामुळे अधिकधिक धन कमावणारी व्यक्तीच अधिकाधिक सुखवस्तू जीवन जगू शकते. (किमान आज प्रत्येकाची धारणा तरी अशीच आहे.) त्यामुळे आज प्रत्येक जण अधिकाधिक पैसे कमावण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या प्रयत्नाना जर दैवी उपायांची सोबत मिळाली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

आज आम्ही या दिवाळीच्या मुहूर्तावर असे ११ उपाय सांगणार आहोत ज्यामार्फत आपण आपले आर्थिक संकट दूर करून, अपार धन समृद्धी मिळवून धनवान बनू शकता.

 

टीप – केवळ हे उपायच धन मिळवून देऊ शकत नाहीत तर त्यासाठी आपण आपल्या  निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिक मेहनत करीत असणे हि तितकेच गरजेचे आहे.  व्यावहारिक प्रयत्न सोडून उपायांच्या मागे लागून काहीच होणार नाही. आपल्या व्यावहारिक प्रयत्नांबरोबर या उपायांचा वापर करावा हेच योग्य होईल. हे उपाय केवळ दैवी संकटावर मात करण्यात मदत करतील.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

१) अपार धनाची ईच्छा असणाऱ्या व्यक्तींनी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात अथवा कार्यालयात श्रीयंत्राची स्थापना करून नियमित श्रीसुक्तानी त्याची पूजा करावी. शास्त्रानुसार ज्याच्या घरी श्रीसुक्तानी श्रीयंत्राची नियमित पूजा होते तेथे नेहमी धन व समृद्धीची वृद्धी होत राहते. श्री लक्ष्मी पूजनातील हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

 

२) दिवाळीच्या वेळी लक्ष्मी मंत्राचा कमळाच्या बीजाच्या माळेवर (कमलगट्टा) जप करून श्री लक्ष्मीमातेला कमळाचे फुल अर्पण केल्यास नेहमी लक्ष्मीची कृपा राहते.

 

३) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी ११ पिवळ्या कवड्या श्री लक्ष्मीला अर्पण कराव्यात व दुसरे दिवशी त्या एका लाल कपड्यात बांधून , आपल्या तिजोरी, गल्ला अथवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

 

४) दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली सात दिवे लावून पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्यास कोणत्याही व कितीही मोठ्या आर्थिक संकटातून मुक्तता होते. प्रदक्षिणा घालताना श्री लक्ष्मी-नारायणाच्या मंत्राचा जप करावा.

 

५) दिवाळीच्या दिवशी श्री लक्ष्मी देवीला तुळशीच्या पानांचा हार अर्पण केल्यास, श्री लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावल्यास व पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास दारिद्य दूर होते.

 

६) लक्ष्मी पूजनाच्या वेळी कुबेराच्या पूजनाचेही अतिशय महत्व आहे. कुबेर यंत्र अथवा कुबेराची प्रतिमा पुजून, कुबेर मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप केल्यास धनवृद्धी होते. 

 

७) (व्यापाऱ्यांसाठी)  – दिवाळीच्या पूजनानंतर सायंकाळी उजव्या हातात एक अखंड सुपारी व एक चलनी नाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन, नमस्कार करून मागे न बघता यावे, दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन त्याच पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून आणावे व ते पान आपल्या गल्ल्यात अगर तिजोरीत ठेवावे. ग्राहकांची वाढ होईल व आर्थिक आवक वाढेल.  

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

८) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी वापरलेल्या अक्षता एका नव्या पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास वर्षभर पैशाची तंगी जाणवणार नाही, हा उपाय दरवर्षी करावा, आदल्या वर्षीच्या अक्षता कपड्यासकट वाहत्या पाण्यात सोडाव्यात. 

 

९) दिवाळीत लक्ष्मी पूजनानंतर मध्यरात्री  “ॐ श्रीं ऐश्वर्य लक्ष्मै ह्रीं नम:” हा मंत्र अष्टगंधाने डाळिंबाच्या लेखणीने पांढऱ्या कागदावर लिहावा. नंतर याच मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप करावा. कागदाची घडी करून तो चांदीच्या ताईत मध्ये घालून उजव्या दण्डावर अथवा गळ्यात घालावा. किंवा चांदीच्या डबीत घालून तिजोरीत ठेवावा. यामुळे धनप्राप्तीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती सुधारेल.

 

१०) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ११ काळ्या गुंजा पूजेत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी शुचिर्भूत होऊन त्या गुंजा एका पांढऱ्या पिशवीत घालून तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास श्री लक्ष्मीचा वरदहस्त निरंतर राहील.

 

११) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी आंब्याच्या झाडावरील बांधा (बांडगुळ) जर पूजन करून  तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास अशा घरात  श्री लक्ष्मीचा निरंतर वास राहतो.

 

वरील प्रयोग करताना श्रद्धा व सबुरी अत्यंत आवश्यक असेल. वरील उपाय पूर्ण श्रद्धेने करून फलप्राप्तीसाठी थोडा धीर धरावा. काहींचा अनुभव तात्काळ तर काहींचा थोड्या कालांतराने येतो.  आपल्याला आलेले अनुभव आम्हाला जरूर कळवावेत.

आमच्या समस्त वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्यावर व आपल्या परिवारावर आई लक्ष्मीची कृपादृष्टी निरंतर राहो हीच सदिच्छा !


हे लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

कुमारीपुजन

    नवरात्रीचा काळ हा देवी उपासनेसाठी प्रशस्त मानला जातो. या कालावधी देवी उपासना अधिक लवकर फलद्रुप होते असे मानले जाते. या कालावधीत अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते. त्यातील एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे कुमारी पूजन. देवी भागवत तसेच भविष्य पुराणात  कुमारी पूजनाशिवाय नवरात्रीचे व्रत पूर्ण होत नाही असे सांगितले आहे. २ ते १०  वर्षाच्या कुमारी मुलींची देवीच्या स्वरूपात पूजा केली जाते. यात नऊ दिवसात रोज नऊ, अष्टमी अथवा नवमी च्या दिवशी नऊ अथवा रोज एक अथवा अष्टमी अथवा नवमी कोणत्याही एक दिवशी किमान एक कुमारीची पूजा केली जाते. हा एक प्रकारे स्त्रियांना सन्मान देण्याचाच प्रकार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. मातेला तर देवासमानच  मानले आहे.   इतर कोणत्याही धर्मात अगर संस्कृतीत “स्त्री देवता” हि संकल्पनाच नाही आहे ती केवळ आपल्या हिंदू धर्मातच आढळते यातच सर्व काही आले. मग स्त्रियांना दुय्यम दर्जा वगैरे गोष्टी कुठून आल्या ? देवी हि देवाची शक्ती मानली आहे व प्रत्येक देव हा त्याच्या शक्तीशिवाय अपूर्ण मानला आहे. स्त्रियांप्रती व्यवहार कसा असावा हे सांगणारा हा श्लोक सर्व काही सांगून जातो. 

 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवत: ।

यतैतस्तु न पूज्यते सर्वास्तत्राऽफला: क्रिया: ॥ मनुस्मृती:-३/५६

ज्या कुळात (घरात) स्त्रियांची पूजा (मान/सन्मान, आदर/सत्कार) होते देवता त्या घरात वास करतात. आणि ज्या घरात स्त्रियांचा आदर होत नाही, जिथे स्त्रिया दु:खी असतात त्या घरात केलेले सर्व धर्म-कर्म व्यर्थ (निष्फळ) होते.


   एक वर्षाची कन्या पूजेला वर्ज्य करावी. दोन वर्षाच्या कन्येपासून दहा वर्षाच्या कन्येंपर्यंत कुमारीपूजन करावें. दोन वर्षाची कुमारी ती कुमारिका, तीन, वर्षाची त्रिमूर्ती, चार वर्षाची कल्याणी, पांच वर्षाची रोहिणी, सहा वर्षाची काली, सात वर्षाची चंडिका, आठ वर्षाची शांभवी, नऊ वर्षाची दुर्गा व दहा वर्षाची भद्रा-याप्रमाणे, कुमारींची नांवे जाणावीं.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

कुमारी पूजनाचा विधि

कुमारी मुलींना भोजन आणि पूजनासाठी आदल्या दिवशी सन्मानपूर्वक आमंत्रण द्यावे. अचानक पूजेच्या वेळी आसपासच्या मुलींना जमा करू नये. 

कुमारी मुली गृह प्रवेश करताना संपूर्ण परिवार सोबत फुलांच्या वर्षावाने त्याचे स्वागत करावे. तसेच देवीच्या नामाचा जयघोष करावा.

 सर्व कुमारींना आसनावर बसवून दुधाने भरलेल्या ताटात पाय धुवावे व त्याचा आशीर्वाद घ्यावा. 

त्यानंतर प्रत्येक कुमारीची  फुल, अक्षत व कुंकुम इ ने पूजा करावी.

त्यानंतर देवीचे ध्यान करून मंगल कामना करावी.

 व शेवटी सर्व कुमारींना भोजन व उपहार भेट देऊन आशीर्वाद घ्यावा. 

 

वयानुसार प्रत्येक कुमारीचे रूप व पूजनाचे फळ – 

 

१-   दोन वर्षाच्या कुमारिकेच्या पूजनाने दु:ख आणि दरिद्रता दार होते.  

२-   तीन वर्षाच्या त्रिमूर्तीच्या पूजनाने धनधान्य प्राप्ती व परिवारात सुख समृद्धी नांदते.

३-  चार वर्षाच्या कल्याणीच्या पूजनाने परिवाराचे कल्याण होते.

४- पाच वर्षाच्या रोहिणीच्या पूजनाने रोगमुक्ती होते.

५- सहा वर्षाच्या कालीच्या पूजनाने विद्या, विजय व राजयोगाची प्राप्ती होते.

६- सात वर्षाच्या चंडिकेच्या पूजनाने ऐश्वर्य प्राप्ती होते.

७- आठ शाम्भवीच्या कुमारिकेच्या पूजनाने वादविवादात, कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळते.

८ – नऊ वर्षाच्या दुर्गाच्या पूजनाने शत्रूंचा नाश व असाध्य कार्यात यश मिळते.

९- दहा वर्षाच्या भद्राच्या पूजनाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.

 

नवरात्रात प्रतिदिन एक किंवा अष्टमी अथवा नवमीला नऊ अशा कुमारी पुजाव्या.

 

रोज एक कुमारिका पूजन — सुख व ऐश्वर्य प्राप्ती.

रोज दोन कुमारिका पूजन — मोक्ष प्राप्ती.

रोज तीन कुमारिका पूजन — धर्म, अर्थ, काम प्राप्ती.

रोज चार कुमारिका पूजन — राज्यपद प्राप्ती .

रोज पाच कुमारिका पुजन — विद्या लाभ.

रोज सहा कुमारिका पूजन — सर्व सिद्धि प्राप्ती.

रोज सात कुमारिका पूजन — राज्य प्राप्ती.

रोज आठ कुमारिका पूजन — धन आणि संपत्ती प्राप्ती .

रोज नऊ कुमारिका पूजन — विजय प्राप्ती.


अशा प्रकारे  दररोज एकेक अधिक अथवा रोज एक याप्रमाणें कुमारीची पूजा करावी.

 

’मन्त्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रुपधारिणीम्‌ । नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्यायावाहयाम्यहम्‌ ॥

जगत्पूज्ये जगद्वंद्ये सर्वशक्तिस्वरुपिणि । पूजां गृहाण कौमारी जगन्मातर्नमोस्तुते ते ॥’

 

या मंत्राने पादप्रक्षालनपूर्वक वस्त्र, कुंकुम, गंध, धूप, दीप, भोजन, यांनी पूजा करावी, असा संक्षेप विधी आहे.

 

नवरात्रीसंदर्भातील इतर लेख इथे वाचा ……

भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

दसरा आणि आपट्याची पाने


Shri Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद

बेळगांव- कर्नाटक

9901287974

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवरात्रातील आचार पालन – भाग -३

 नवरात्रातील आचारपालन –

 

             धर्मशास्त्रदृष्ट्या आदर्श आचारसंहितेमध्ये पैशुन्य (चहाड्या करणे), चौर्यकर्म, असत्यभाषण, कलह, करणे ह्या सर्वकालीन निषिद्ध गोष्टी सर्वथा वर्ज्य असतात. धार्मिक कार्यप्रसंगी मनाची संवेदनशीलता तीव्र असल्यामुले कोणत्याही कटुगोड प्रसंगाचे पडसाद मनावर कोरले जातात. ह्यास्तव उपरोक्त निषिद्ध गोष्टि निदान धार्मिक कार्यप्रसंगी तरी घडणार नाहीत ह्या बाबतीत दक्ष असावे. त्याचप्रमाणे निषिद्धाहार, सामिषाहार व मद्यप्राशन ह्या गोष्टीही कटाक्षाने टाळाव्यात.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

            नवरात्रव्रताच्या बाबतीत संकल्पोक्त कामना अत्यंत उच्च कोटीतील असल्यामुळे त्यास पोषक अशा आचारपालनास अनन्यसाधारण महत्त्व असते. ह्या आचारपालनामध्ये उपरोक्त आचारसंहितेबरोबरच अन्य काही व्रताचारात्मक नियमांचा अंतर्भाव असतो. ही व्रताचारात्मक नियमावली कर्त्याबरोबरच घरातील सर्व कुटुंबीयांना लागू असते. तथापि सध्याच्या धकाधकीच्या गतिमान जीवनात, जागेच्या व वेळेच्या अभावामुळे आणि लौकिकात अप्रस्तुत ठरत असल्यामुळे त्यातील सर्वच गोष्टींचे काटेकोर पालन करणे काही वेळा व्यावहारिकदृष्ट्या गैरसोयीचे व कष्टप्रद ठरते. अशा वेळी अनिवार्य आचारपालन व कृताकृत (परिस्थितीनुसार करावयाचे) आचारपालन असे वर्गीकरण करणे क्रमप्राप्त ठरते. अनिवार्य आचारपालनामध्ये घरातील सर्वांनी निषिद्धान्न (कांदा, लसूण, शिळे अन्न इत्यादी) टाळणे व मस्तकावरील केशकर्तन न करणे तसेच विवाहितांनी एकशय्या वर्ज्य करणे ह्यांचा समावेश होतो. ह्याखेरीज कर्त्याने (उभयता पतिपत्नींनी) कारावयाच्या अनिवार्य आचारपालनात परानाभक्षण न करणे, पलंगावर व गादीवर न झोपणे, दिवसा निद्रा न घेणे आणि यशाशक्ति उपवास करणे ह्यांचा समावेश होतो. कर्त्यासह सर्व कुटूंबीयांनी करावयाच्या कृताकृत आचारपालनामध्ये श्मश्रू (फक्त दाढी – मिश्या कापणे) व प्रस्थान (वेस उल्लंघणे) न करणे आणि पादत्राण न वापरणे ह्यांचा समावेश होत असून सद्य:काली ह्या बाबतीत परिस्थितीनुसार निर्णय घेणे इष्ट ठरते. कर्त्या पतिपत्नींचा उपवास असला तरी देवांस नेहमीप्रमाणे अन्नचा नैवेद्य दाखवावा. अशा वेळी तो प्रसाद कुटूंबीयातील अन्य व्यक्तींना घेता येतो.

                    

                      उपरोक्त नियमावलीमधील पादत्राण न वापरणे, गादीवर न झोपणे अशा नियमांचे पालन म्हणजे एक प्रकारची तपस्याच असून ह्या तपाचरणामध्ये परंपरागत अन्य काही नियमांचा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार अंतर्भाव करता येतो. ह्या तपाचरणामुळे नवरात्राचे भरघोस फळ तर मिळतेच, पण व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही होते.


                     नवरात्र हा कुलधर्म त्यामध्ये खंड न पाडता निरलसपणे त्याचे पालन केल्यास त्या कुटूंबावर कुलदेवतेचे कृपाछत्र राहत असल्यामुळे त्या घरावर सहसा आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक संकटे येत नाहीतच, पण जरी आली तरी ती सुसह्य होऊन त्यांचे सहजतया निवारण होते. अनेक वर्षांच्या दीर्घ खंडानंतर नवरात्र नव्याने चालू करावयाचे झाल्यास कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन सांगणे (प्रार्थना) करुन त्या वर्षीपासून नवरात्रमहोत्सवास प्रारंभ करावा. खंडदोषपरिहारार्थ त्या देवतेचा यशाशक्ति जप करुन सप्तशतीपाठ, पवमान / विष्णुसहस्रनाम, रुद्रपठन अशा प्रकारची पुरश्चरणात्मक उपासना करावी. तसेच शक्य झाल्यास चंडी, पवमान, रुद्र, अशा प्रकारचे स्वाहाकार करावेत. विभक्त कुटूंबात अन्य कुलाचारांप्रमाणे नवरात्रमहोत्सवदेखील स्वतंत्रपणे होणे आवश्यक असते.

 

 साभार – शास्त्र असे सांगते !

 

यापूर्वीचे  भाग इथे वाचा …

 

 नवरात्र – शास्त्रीय मीमांसा – भाग – १

 

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

 

कुमारीपुजन

दसरा आणि आपट्याची पाने


 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

नवरात्राचे विधिविधान –

               नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवघर व देव्हाऱ्याची साफसफाई करून देवमुर्तींचे उद्वार्जन (स्वच्छता) करून घ्यावे. ह्यानंतर संकल्प करून घटस्थापन (वरुणस्थापन), वेदिकास्थापन व त्यानंतर दीपस्थापन झाल्यानंतर मुख्य देवतेचे अभिषेकासहित षोडशोपचारपूजन करावे. ताम्हणात तांदूळ व विड्याच्या पानांनी तयार केलेल्या पीठावर देवतेच्या प्रतिमेची स्थापना करुन नंतर मालाबंधन करावे. मध्याह्नी महानैवेद्य दाखवून आरती करावी व प्रथेनुसार दांपत्य, कुमारी इत्यादिकांना अन्नसंतर्पण करावे. महोत्सव कालामध्ये दरदोज जलप्रोक्षण करुन (फुलाने पाणी शिंपडून ) पूजा व मालाबंधन करुन यशाशक्ति देवीआराधना करावी.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

              नवरात्रोत्थापनाच्या  दिवशी (म्हणजेच दहाव्या दिवशी – दशमीला) जलप्रोक्षणाने पूजा, मालाबंधन व नेहमीची देवीउपसना झाल्यावर ’मात: क्षमस्व’ किंवा ’देव क्षमस्व’ अशी प्रार्थना करावी. नंतर त्या देवतेचा घोष करुन (उदाहरणार्थ; ’दुर्गायै नम:, व्यंकटेशाय नम:, मल्लारिमार्तंडाय नम:) देवतेच्या ईशान्य दिशेस एक फूल वाहून देवप्रतिमा त्या दिशेकडे किंचित हालवावी व्यंकटेशाचे व जोतिबावे देवीच्या शारदीय नवरात्रकाळातच येत असल्यामुळे दोन्ही नवरात्रे दशमीस उठवण्याची प्रथा आहे. नवरात्र उठवाल्यानंतर घट, शेतातील अंकुर, माळा ह्यांच्यावर अक्षता वाहून त्याचें विसर्जन झाल्यावर घटातील जलाने घरातील सर्वांवर सिंचन करावे. ह्यानंतर दांपत्य-कुमारी भोजन घालून वेळेच्या उपलब्धीनुसार त्याच दिवशी अन्यथा दुसऱ्या दिवशी देवतांचे उद्वार्जनपूर्वक षोडशोपचारपूजन करावे.


 नवरात्रकाळातील अशौचप्राप्ती –

नवरात्र व अशौच (सोहेर व सूतक) ह्यांच्या संदर्भात तीन पर्यात संभवतात.

१) अशौच चालू असताना नवरात्र आले असता उपवासादी व्रताचार सुरु करुन अशौचसमाप्ती होताच घटस्थापना करुन नवरात्रप्रारंभ करावा, अशा वेळी नवरात्र महोत्सवाचा कालावधी जरी घटत असला, तरी नवरात्राचे पालन होणे क्रमप्राप्त ठरते.

 

२) नवरात्र चालू असताना अशौच आले असरा घरातील ब्रह्मचारी मुलगा, कुलोपाध्याय किंवा आप्त (स्नेही) ह्यांचेकडून नवरात्रातील पूजा, मालाबंधन इत्यादी नित्यविधी तसेच नवरात्रोत्थापन करवून घ्यावे, अशा वेळी आपल्या घरातील वा दुसऱ्याच्या घरातील (परान्न) शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य चालत नसल्यामुळे दुधसाखरेचा नैवेद्य दाखवाव. स्वत:च्या उपवासादी व्रताचारामध्ये खंड पडू देऊ नये. नवरात्रापूर्वी अशौचसमाप्ती होत असेल तर उर्वरित दिवशी नेहमीप्रमाणे  स्वत: उपरोक्त विधी करावेत.

 

३) नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होण्यापुर्वी घरामध्ये निधनघटना घडून अशौच आले व ते नवरात्र समाप्ती पर्यंत रहात असेल तर सपंडीकरण होईपर्यंत कोणतेही देवकार्य करण्यास शास्त्रसंमती नसल्याकारणाने नवरात्रमहोत्सव करता येत नाही. तथापि उपवासात्मक व्रताचाराचे पालन करावे. अशौचसमाप्तीनंतर नवरात्र खंडित झाल्याबद्दल महाभिषेकपूर्वक पूजा व समाराधन करावी.

 

  नवरात्रकाळातील श्राद्ध – शार्दीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामहश्राद्ध असते. सुवासिनी स्त्रीस आपल्या दिवंगत पित्यास श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी ह्या दिवशी दौहित्रश्राद्धरुपाने मिळत असते. नवरात्रकाळात प्रथम वर्षश्राद्ध अथवा प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आल्यास ते नवरात्राकाळातच करावे, पुढे ढकलू नये.


साभार – शास्त्र असे सांगते !

पुढील भागात पाहू नवरात्र काळातील आचार पालन…..

इथे वाचा …..

(मागील) भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

पुढील भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

                    कुमारीपुजन

दसरा आणि आपट्याची पाने

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)