डाऊसिंग कसे करतात

मागील भागात पहिले कि डाऊसिंग काय आहे. (तो भाग इथे वाचु शकता – डाऊसिंग काय आहे ?)

या भागात पाहू  डाऊसिंग कसे करतात.

 डाऊझिंग करताना डाऊझर त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध उपकरणे वापरीत असले, तरी बऱ्याचवेळा ते लंबकाचा उपयोग करताना आढळतात. ह्याचे कारण लंबक सुटसुटीत असून हाताळण्यास एकदम सोपा आहे. दोऱ्याला अडकवलेली थोडीशी जड अशी वस्तू म्हणजे लंबक. असा लंबक डाऊझर आपल्या हाताच्या अंगठ्यात आणि पहिल्या बोटांत अगदी अलगद असा पकडतो. अशा तऱ्हेने धरलेला लंबक त्याला गती प्राप्त झाल्यानंतर बोटातुन सुटण्याची शक्यता असते, असे घडु नये म्हणून त्या दोऱ्याला बोटांत ज्या ठिकाणी तो पकडलेला असतो त्या ठिकाणी एक गाठ मारतात. सर्वसाधारणपणे लंबकाची लांबी दहा सेंटिमीटरपासून पंचवीस सेंटिमीटरपर्यंत असते. काही वेळेला ती ह्यापेक्षा जास्तही असू शकते. लंबक बोटांत पकडल्यानंतर डाऊझर मनातल्यामनात अथवा मोट्याने पुढील प्रश्न क्रमाने विचारतो,


Can I do dowsing?  मी डाऊसिंग करू शकतो का?

May I do dowsing?  मी डाऊसिंग करू का?

Shall I do dowsing? मी डाऊसिंग सुरू करू का?

          ह्या सर्व प्रश्नांनाच नाही, तर डाऊझरने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला डाऊझरने बोटांत पकडलेला लंबक आंदोलनाद्वारा ’होय’ अथवा ’नाही’ अशी उत्तरे देतो. लंबकाची ही विशिष्ट आंदोलने म्हणजेच “लंबकाची भाषा”. लंबकाची ही हालचाल निरनिराळ्या पाच प्रकारांनी होत असते. त्याचा सामान्यत: खालीलप्रमाणे अर्थ लावला जातो.

 

१) घड्याळाच्या काट्याप्रमाणे उलट म्हणजे Clockwise  हलला तर “होय”.

२) घड्याळाच्या काट्याच्या उलट म्हणजे Anticlockwise  हालला तर “नाही”.

३) आलेखाच्या ’Y’ अक्षासारखा मागुन-पुढे अथवा पुढून-मागे तर “होय”.

४) आलेखाच्या ’X’ अक्षासारखा डावीकडून उजवीकडे अथावा उजवीकडून डावीकडे तर “नाही”.

५) ज्या वेळेस तो कोणत्याही प्रकारची हालचाल न करता एकदम स्थिर अवस्थेत राहतो त्यावेळी “लंबक उत्तर देत नाही” असे समजतात.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

  लंबकाच्या ह्या आंदोलनांमुळे पुढील प्रश्न निर्माण होतात –

१) डाऊझरने जे प्रश्न विचारले ते लंबकाला उद्देशून होते का? कारण डाऊझरने पहिला प्रश्न “मी डाऊझिंग करू का?” असे विचारल्यावर क्षणार्धातच लंबकाने पद्धतशीर पणे आंदोलने घेण्यास सुरूवात केलेली असते ह्याचा अर्थ लंबकाला जो प्रश्न विचारला तो समजला आणि तो आंदोलने घेऊ लागला असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. खरोखरच असे असेल का? असल्यास ते कसे घडते? अथवा.

  २) विचारलेला प्रश्न आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा निसर्गातील शक्तीला (ऊर्जेला) उद्देशून विचारलेला असतो काय? व त्यामुळे लंबकाची आंदोलने सुरु होत असतील काय? असल्यास कशी?

३) डाऊझर जे प्रश्न विचारतो त्याला काही अर्थ आहे काय? नसल्यास हे प्रश्न निरर्थक आहेत काय? निरर्थक असूनही हे पश्न डाऊझिंगच्या सुरुवातीस अगदी पूर्वीपासून का विचारले गेले? त्याचप्रमाणे हे तीन प्रश्न आणि डाऊझर विचारणार असलेले इतर अनेक प्रश्न विचारणे आवश्यक आहे का? आणि ते योग्यही आहे का?

   ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऊर्जेची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनांतुन संपूर्ण विश्वाचा अभ्यास करताना असे आढळून येते की, आपले संपूर्ण विश्व हे विविध प्रकारच्या ऊर्जांनी भरलेले असून, ह्या विविध ऊर्जांचे एकमेकांत सतत परिवर्तन होत असते. ह्या परिवर्तनाचाच एक परिणाम म्हणून ऊर्जेचे वस्तुमानात आणि वस्तुमानाचे ऊर्जेतही सतत रूपांतर होत असते. त्याचप्रमाणे ही ऊर्जा निर्माणही करता येत नाही. अथावा नष्टही करता येत नाही. फक्त तिचे रुपांतर करता येते. काही विचारवंत असे मानतात की, ’मन:शक्ती ही एक प्रकारची ऊर्जा असून तिचे रुपांतर इतर ऊर्जेत करता येते. तसे असेल तर डाऊझिंग करताना ह्या ऊर्जेद्वारा (मन:शक्तीद्वारा) डाऊझर ह्या ऊर्जांशी संपर्क साधित असावा का? असल्यास कसा?

   वैज्ञानिक दृष्टिकोनातुन डाऊझिंगचा अभ्यास केला गेला तेव्हा शास्त्रज्ञांना पुढील गोष्टी आढळून आल्या. डाऊझर ज्यावेळी प्रश्न विचारतो त्यावेळी त्याच्या मेंदूत काही विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण होतात. ह्या लहरी अल्फा तरंगलहरीशी बऱ्यास प्रमाणांत जुळल्या असल्याचे आढळते. डाऊझर ज्या वेळेस मनातल्यामनात अथवा मोठ्याने प्रश्न विचारतो तेंव्हा मेंदूतील त्या लहरी रेडिओ लहरींसारख्या संपूर्ण विश्वांत क्षणार्धात प्रसारित होत असाव्यात आणि त्या डाऊझरच्या मेंदूकडे उत्तर घेऊन परत येत असाव्यात. (ह्यासंबंधी विचारवंतांत मतभेद आहेत). आलेल्या उत्तरानुसार ज्या लहरी मेंदूत निर्माण होतात त्या अगदी सूक्ष्म असून त्या मेंदूपासून हातातील मज्जातंतूद्वारे अंगठा व पहिल्या बोतापर्यंत येतात. ह्या सुक्ष्मतरंग लहरींमुळे अंगठा व पहिल्या बोटांत पकडलेल्या लंबकास गति प्राप्त होऊन लंबक विशिष्ट पद्धतीने आंदोलन घेऊ लागतो. ह्या सुक्ष्म लहरी लंबकाच्या आंदोलनाद्वारा वर्धित होतात. लंबकापर्यंत येणाऱ्या लहरींचे मूळ डाऊझरच्या मेंदूत असल्यामुळे मेंदूही माध्यम असतो. ह्या दोन्ही माध्यमांत फरक इतकाच की, डाऊझरचा मेंदू लहरीचे (प्रोजेक्शन) प्रक्षेपण करतो आणि (रिसीव्ह) ग्रहणही करु शकतो.                                                                                                                                           

     लंबकाला विशिष्ट आंदोलनांद्वारा नेमक काय सांगावयाचे आहे हे स्पष्ट समजण्यासाठी बहुतेक डाऊझर्स त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगळे वेगळे (चार्टस) तक्ते वापरतात. ह्या तक्त्यांत जर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर असले तर लंबकाची आंदोलने त्या उत्तराच्या दिशेने होताना आढळतात. उत्तर त्या तक्त्यात नसल्यास तशी होत नाहीत.


     डाऊझींगद्वारा सर्वसाधारणपणे ज्या गोष्टीचा शोध घेतला जातो त्यांत भूमिगत पाणी व खनिजांना सर्वात जास्त महत्त्व आहे. असा शोध घेण्यासाठी डाऊझरला त्या स्थळी (प्रत्यक्ष) जावे लागते काय? नसल्यास तो काही अंतरावरुन असा शोध घेऊ शकतो का? असल्यास त्या अंतराला काही मर्यादा असते का? तशी असल्यास जगाच्या पाठीवरील नव्हे, तर विश्वातील कोणत्याही स्थळावरुन घेता येते का? अंतराला तशी मर्यादा नसते. कोणत्याही स्थळावरुन प्रत्यक्ष जागेवर न जाता डाऊझिगंद्वारा शोध घेता येतो. मात्र त्यासाठी त्या जागेचा (स्थळाचा) अचूक नकाशा लागतो. नकाशाच्या सहाय्याने डाऊझिंग केले जाणार असल्याने ह्या प्रकाराला “मॅप डाऊझिंग”असे नाव दिले आहे. अशा विविध प्रकारांनी डाऊझिंगद्वरा अज्ञाताचा शोध कसा घेतला जातो त्याचा पाठपुरावा ह्या निरनिराळ्या लेखांतुन घेण्याचा प्रयतन करीत आहे.

 

हे लेख हि वाचा …..

     डाऊसिंग काय आहे ? ….

                                             डाऊसिंग, पेंड्युलम किंवा लिलाव विद्या


* ग्रहांकित एप्रिल २००२ मधील डॉ. व्ही. एच. कुलकर्णी यांचा लेख.

 

BACK TO HOME

BACK TO DOWSING

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

डाऊसिंग काय आहे ?

डाऊसिंग ह्या शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोषांत सापडला नाही म्हणून प्रचलित इंग्रजी शब्दकोश चाळले, तर तो त्यातही आढळला नाही. त्यामुळे वाचनालयांत जाऊन मोठ्या शब्दकोषात त्याचा अर्थ पाहिला असताना The Advance Learner’s Dictionary of Current English 1 मध्ये सापडला तो असा Dowsing – Searching for underground water or metals by using ‘Y’ shaped stick or rod. (see diviner) असे त्याच्यापुढे लिहिलेले आहे.  Divine  शब्दाचा  अर्थ-  Discover or learn about future events, hidden things, etc. by means not based on reasons  असून Diviner चा अर्थ  Person who divines, esp., one who claims to have the power to find out where there is water under the earth by using ‘Y’ shaped stick or rod (called divine rod) असा दिला आहे.


    ह्या शब्दाकोषांत दिलेल्या अर्थाचा सखोल अभ्यास करीत असताना अनेक गोष्ट ध्यानांत आल्या, त्यातल्या प्रमुख-

१) डाऊझिंगची क्रिया ही (Divine) डिव्हाईन म्हणजे अलौकिक असून, तिच्याद्वारे भविष्यकालीन घटनांची जाण अथवा शोध घेता येतो; मात्र या गोष्टी कशा ज्ञात झाल्या त्याचे मात्र योग्य असे स्पष्टीकरण देता येत नाही.

२) डाऊझिंग करणाऱ्या व्यक्तीत म्हणजे डाऊझरमध्ये (ESP) एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणजे इंद्रियनिरपेक्षा संवेदनक्षमता असते. ह्या क्षमतेमुळे ते जमिनीखाली (Y) वाय अक्षरासारख्या फांदीच्या सहाय्याने-ज्याला ते डिव्हाइनिंग रॉड म्हणजेच शोध घेणारी फांदी म्हणतात- सांगू शकतात.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

   ह्या अचूकतेमागे नेमक कोणते कारण आहे ह्याचे अगदी ह्या घटकेपर्यंत तरी समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. त्यातल्या त्यात जे समाधानकारक पर्याय आहेत त्यातील काही असे:-

१) डाऊझरला इंद्रियनिरपेक्षा क्षमता असते.

२)’वाय’ आकाराच्या फांदीत काही गुणधर्म असतात.

३) डाऊझर विशेष संवेदनशील असल्यामुळे त्याला अंत:प्रेरणा होत असावी.

४) डाऊझर आणि वाय आकाराची फांदी ह्या दोघांच्यामुळे उत्तरे मिळत असावीत.

         ह्या पर्यायाखेरीज इतरही पर्यात आहे. त्यातले प्रमुख डाऊझरजवळ असलेल्या संवेदनशीलतेमुळे डाऊझर (सुपर नॅचरल पॉवरशी) निसर्गातील ऊर्जेशी – मग ती चुंबकीय, विद्युतचुंबकीय, गुरुत्वाकर्षण, उष्णता इत्यादीपैकी एक अथवा अनेक, अथावा ह्यातील सर्व किंवा ह्यातली कोणतीही नसून, जी अजून अज्ञातच आहे अशा ऊर्जांशी संपर्क साधून उत्तरे मिळवीत असावा आणि त्यामुळेच इंग्लंड (रेडिएस्थेशिया), अमेरिका (रेडिऑनिक्स) व रशिया (बायोफिजिकल एनर्जी) यासारख्या प्रगत देशांनी डाऊझिंगला निराळी नावे दिली असावीत. असा संबंध जर असेल, तर डाऊझर अशा ऊर्जांशी संपर्क कसा साधतो हा प्रश्न उदभवतो. ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने इतरही प्रश्न निर्माण होतात ते असे-


१) असा संपर्क साधल्यानंतर उत्तर कसे प्राप्त होते?

२) आलेले उत्तर डाऊझर त्याला ज्ञात असलेल्या गोष्टींशी पडताळून पहातो का?

३) पहात असल्यास त्यावरून तो योग्य तो निष्कर्ष कसा काढतो?

४) निष्कर्ष काढण्यासाठी त्याला इतर गोष्टिंची आवश्यकता भासते का?

५) भासत असल्यास त्या गोष्टी कोणत्या?

६) योग्य तो निष्कर्ष किती टक्के अचूक असू शकतो?

७) इतर डाऊझर्सनी जर त्या प्रश्नांची उत्तरे काढली तर ती किती टक्के एकमेकांशी जुळतात?

८) अशा प्रकारचे डाऊझिंग किती टक्के लोकांना जमू शकते?

९) सर्वसाधारण व्यक्तीसुध्दा डाऊझींग करु शकेल का?

१०) जर विशीष्ट व्यक्तींनाच जमत असेल तरी त्याला (युनिव्हर्सल ट्रूथ) सर्वात्रिका सत्य समजावयाचे का?

११) विशिष्ट व्यक्तींनाच जमत असेल तरी त्याला (सब्जेक्टिव) व्यक्तीसापेक्ष समजावयाचे का?

१२) जर व्यक्तिसापेक्ष असेल तर ते स्विकारणे कितपत योग्य आहे?

१३) योग्य असल्यास ते का? त्याचप्रमाणे

१४) वाय (Y) आकाराच्या फांदीच्या सहाय्यानेच फक्त करता येते का?

१५) इतर उपकरणे चालत असतील तर ती कोणती?

१६) डाऊझिंग करताना काही नियम पाळावे लागतात का?

१७) असल्यास कोणते?

१८) डाऊझिंगसाठी योग्य असा काळ अथवा वेळ असते का?

१९) असल्यास कोणती?

    अशाप्रकारचे अनेक प्रश्न मिर्माण होतात. ह्या व अशाप्रकारे निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. असा विचार करण्यासाठी डाऊझर डाऊझींग कसे करतो त्याची निदान तोंडओळख तरी असणे आवश्यक असल्यामुळे पुढील भागात डाऊझींग कसे केले जाते ते पाहू.  –  डाऊसिंग कसे करतात.

 

हे लेख हि वाचा …..

         डाऊसिंग कसे करतात …

                                                डाऊसिंग, पेंड्युलम किंवा लिलाव विद्या


 * ग्रहांकित एप्रिल २००२ मधील डॉ. व्ही. एच. कुलकर्णी यांचा लेख.

 

 

BACK TO HOME

BACK TO DOWSING

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

डाऊझिंग, पेंड्युलम किंवा लोलक विद्या….

 ज्योतिष्यशास्त्र हे मुलत: भविष्यातील घटना जाणून घेण्यासाठी निर्माण झाले आहे. यामध्ये विविध विषयांचा व विद्यांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने होरा किंवा कुंडली शास्त्र, हस्तसामुद्रिक, अंकज्योतिष्य, रमलविद्या डाऊझिंग वा लोलक विद्या इ. शास्त्रे मूलभुत आहेत. ह्या सर्व शास्त्रांचा विस्तार भूमिका अमर्याद आहे व सिध्दांत ठरविण्यास लागणारी साधनसामुग्री (वैयक्तिक अनुभव) जितकी अधिकात अधिक असेल तितकी विशेष सहाय्यक ठरते व त्यामुळे फलितात अचुकता निर्माण होण्यास मदत होते. प्रस्तुत लेखात डाऊझिंग वा लोलकविद्येबाबत संयुक्तीक विचार मांडले आहेत ते वाचकांना फारच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

                   या विश्वात अशा अनेक घटना घडतात की ज्या घटनांचा कार्यकारणभाव आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने सिध्द करणे केवळ अशक्यच आहे. त्याप्रमाणे अशाही काही विद्या आहेत की ज्यांचा अनुभव येतो व उपयोगही होतो परंतु त्या विद्यांच्या आधारे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींना नेमका कोणता शास्त्रीय आधार आहे हे अजुन तरी सांगता आलेले नाही.  या अशा विद्यांमध्ये डाऊझिंग किंवा लोलक विद्या येते. या विद्येचा मुख्य उपयोग भूगर्भातील पाणी (प्रवाह किंवा स्त्रोत) शोधण्यासाठी होतो. यासाठी इंग्रजी वाय अक्षरासारखी किंवा आकाराची झाडाच्या फांदिचा उपयोग करण्यात येतो. काही वेळेस दोन ताब्यांच्या तारांचाही उपयोग केला जातो. या फांदिमुळे भूगर्भातील पाणी नेमक कोणत्या ठिकाणी आहे याचा शोध घेता येतो. या डऊझिंग विद्येमध्ये लोलक (रुद्राक्ष-पेंड्युलम) विद्येचाही उपयोग करता येतो व या लोलक पध्दतीनुसार पाण्याच्या शोधा व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींचा शोध घेता येतो. उदा. असे ऐकीवात आहे की जर्मनीमधील काही होमिओपाथिक डॉक्टर अशा लोलकाचा किंवा लंबकाचा उपयोग करतात. एखाद्या रुग्णाला जो आजार झाला आहे त्या आजारवर चार पाच औषधातील अधिक गुणकारक औषध कोणते असू शकेल हे लंबकाच्या मदतीने काढता येते.


                       पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे माननीय अध्यक्ष डॉ. एम. कटककर यांनी १९६० सालापासून या तंत्राचा उपयोग अनेक क्षेत्रांत केला आहे. लोलकाचा (रुद्राक्ष) उपयोग करुन हातावरील उंचवटे व रेषा किती कार्यक्षम आहेत व त्यामुळे त्या व्यक्तिच्या जीवनाचा आलेख कसा आहे याचे अचुक निदान त्यांनी कित्येक केसेसमध्ये केले आहे. त्याचप्रमाणे हातावरुन रोगनिदान किंवा शरिरातील रोगनिदान किंवा शरिरातील वेदनांचे मुख्य ठिकाण कोठे आहे. डाऊझिंग करणाऱ्या व्यक्तीला डाऊझर म्हणतात. या डाऊझिंग किंवा लोलक विद्येच्या आधारे नैसर्गिक तेल व वायुचे साठे, जमिनीखालील धातूंचे साठे, अशा अनेक गोष्टींच्या शोध घेता येणे शक्य होते.

 

  सिद्धांत:

                  आता प्रश्न पडतो की लोलक विद्या आहे तरी काय ? व लोलक दाखवित असलेल्या दिशा व फिरण्याच्या गतीवरुन अचुक निदान कसे होते व या मागील सिद्धांत किंवा तत्व आहे तरी काय ? या बाबतीत विविध प्रणाली आल्या व त्यानुसार या लोलकाव्दारे प्रश्नांची उकल कशी होते याचे गुढ समजाऊन सांगण्याचे प्रयत्न केले गेले. या सर्वात अधिक लोकप्रिय व मान्यता पावलेला विचार किंवा सिद्धांत पुढीलप्रमाणे आहे.

                  या विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये विद्युत लोहचुंबकीय लहरी असतात त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये “जैव विद्युत लोहचुंबकीय लहरी” असतात. या लहरींमुळे व्यक्तिला निर्सगातील उर्जेशी एकरुपाता साधता येते व काही गूढ गोष्टींचे आकलन होते ही एकरुपता किंवा तादात्म किंवा त्यापासून निर्माण होणारी जाणीव त्या व्यक्तीला त्याच्या हातातील वाय (Y) आकाराच्या फांदिमुळे अथवा हातातील लोककामुळे होऊ शकते व त्यात जाणीवेच्या आधारे ती फांदी एकदम खाली किंवा वरील वाजूस वळते व भूगर्भातील पाण्याचा साठा (प्रवाह वा स्त्रोत) नेमक कोठे आहे हे दर्शविते. हातात लोलक असल्यास ठराविक दिशेने गति घेवून तो लोलक फिरु लागतो. आता विश्वातील या लहरींबरोबर संपर्क साधण्याची हातोटी काही व्यक्तिनां निसर्गत:च असते, तर इतरांना ती काही साधना (अभ्यास) केल्याने प्राप्त होते. मात्र अचूक निदानासाठी त्यावेळी आपले मन निर्विकार असणे, एकाग्रता साधने व आपल्यातिल जैव विद्युत-चुंबकीयता वाढलेली असणे आवश्यक आहे.

 

  डाऊझिंग करण्याची क्षमता:-

                   डाऊझिंग करण्याची क्षमता एखाद्या व्यक्तित आहे किंवा नाही याचा प्रत्यय पाहणे असल्यास त्यांनी पुढील प्रयोग जरुर करुन पहावा. (आपला अनुभव मला जरुर कळवावा.)


                    कोणत्याही झाडाची (उदा. पेरुची) साधारण दीड हात लांबीची (सुमारे १८ इंच) बारीक लवचिक फांदी (इंग्रजी वाय (Y) या आकाराची) घ्यावी, फांदीची टोके (अ आणि ब) दोन्ही हातात धरुन (घेवून) छातीजवळ आणावेत व फांदीचे लहान टोक जमिनीला समांतर ठेवून, ज्या ठिकाणी जमिनीखाली पाणी असण्याचा जास्त संभव आहे, अशा ठिकाणी हळू हळू चालत जावे. (विहिर किंवा कूपनलीका), जमिनीखाली नैसर्गिक पाण्याचा प्रवाह वा स्त्रोत असेल व प्रयोग करणाऱ्या व्यक्तिची, वर नमुद केल्याप्रमाणे, सूप्तशक्ती जागृत होत असेल तर फांदीचे पुढील टोक आपोआप वर किंवा खालच्या बाजूस वळते व त्याची जाणीव स्वत:ला होते. पाण्याचा स्त्रोत किंवा प्रवाह मोठा असल्यास फांदि फिरण्यास जोर उत्पन्न होतो. हाच प्रयोग हातात लोलक किंवा नारळ घेवूनही पहता येतो. डाऊझिंग किंवा लोलविद्येचा उपयोग ऊठ-सूठ व सामान्य प्रश्नासाठी करणे गैर ठरेल व ते प्रयत्नवादास मारक ठरेल. काही वेळेस मतिकुंठीत करणारे प्रश्न अनाकलनीय समस्या, अवघड आजार, वास्तुदोष, संकटे निवार्णार्थ या विद्येचा उपयोग सहाय्यभूत म्हणून विश्वासपूर्वक केल्यास निश्चित मार्गदर्शक ठरवा असे वाटते. या बाबत लेखकाचा वरील विद्येचा अनुभव दोन तपा पेक्षा जास्त आहे.

 

हे लेख हि वाचा …..

                         डाऊसिंग कसे करतात …

                                                    डाऊसिंग काय आहे ? ….


सौजन्य / साभार – भाग्य संकेत २००४ च्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेला श्री मोहन दिवेकर पुणे यांचा लेख .

 

BACK TO HOME

BACK TO DOWSING

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)