साप्ताहिक राशिभविष्य 17 ते 23 फेब्रुवारी 2019

[रविवार १७ फेब्रुवारी २०१९ ते शनिवार २३ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुध उदय होत आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या कामातून सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. अविचारी निर्णयामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

वृषभ –  व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीला उष्णतेच्या विकारांपासून त्रास. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये शुभ परिणाम मिळतील. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १९, २०.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत नौकरीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अपेक्षेप्रमाणे सफलता मिळणार नाही. भावंडांच्या वागण्यामुळे त्रास होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. १७, १८, २१, २२.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून ठरविलेली कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १९, २०.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वाहनांच्या वेगांवर योग्य नियंत्रण आवश्यक. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १७, १८, २१, २२.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १७, १८, १९. २०.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ लाभेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १९, २०, २१, २२.

 

धनु –  संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अति उतावळेपणा नुकसानकारक ठरेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात यश मिळेल. प्रवास शुभ फलदायी राहतील. मित्र-मंडळींच्या जोडीदारामुळे वादाचे प्रसंग येतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कामात सफलता लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

मकर – प्रवासामधून चर्चेमध्ये अडचणी निर्माण होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला लाभ देईल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत जबाबदारीत वाढ. शुभ ता. १७, १८.

 

कुंभ – व्यावसायिक जोखमीतून लाभ चांगले मिळतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या ओळखीतून फायदे मिळतील. कफाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. शुभ ता. १७, १८, १९, २०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक समाधानकारक राहणार नाही. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. खर्चामुळे आर्थिक नियोजनात अडचणी येतील. सरकारी कामात अडथळे निर्माण होतील. संततीच्या नौकरीविषयक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना शुभ. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १९, २०, २१, २२, २३.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

शिवजयंती – तारीख कि तिथी

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 10 ते 16 फेब्रुवारी 2019

[रविवार १० फेब्रुवारी २०१९ ते शनिवार १६ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी रवी मकर राशीतून कुंभ  राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुध उदय होत आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरदारांना समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्वतःच्या रागांवर नियंत्रण आवश्यक आहे. वाहने जपून चालवावीत. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ११, १२, १५, १६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. अचानक खर्चामुळे नियोजनात बिघाड होईल. संततीला वाहनांपासून धोका संभवतो. विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा विरोध सहन करावा लागेल. जोडीदाराला प्रतिकुलता. मित्रांशी साथ मिळेल. शुभ ता. १०, १३, १४.

 

मिथुन – व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. फुफ्फुसाचे विकार त्रास देतील. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवासामधून सफलता मिळेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १०, ११, १२, १५, १६.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात खळबळजनक घटना. आर्थिक नियोजनात बाधा. नौकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग. संततीच्या बाबतीत दुर्घटना शक्य. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. भावंडांच्या बाबतीत विचित्र समस्या. प्रवासामधून अनपेक्षित अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ११, १२, १३, १४.

 

सिंह – नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीला अधून-मधून निराशा जाणवेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. भावंडांच्या जोडीदारामुळे अडचणी येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये रोजचे कामकाज सुरळीत चालेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सासुरवाडीमध्ये अनपेक्षित घटना घडतील. स्वतःच्या वाहनाने शक्यतो प्रवास टाळावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, १५, १६.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींमुळे चांगले फायदे मिळतील. शुभ ता. १०, ११, १२.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १२, १३, १४.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत शुभाशुभ घटना अनपेक्षितरित्या घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. स्थावराच्या संधी चालून येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या जोडीदाराबाबतीत अडचणी. संततीच्या अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १०, १५, १६.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना कष्टाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ मनासारखी मिळेल. शुभ ता. ११, १२.

 

मीन – व्यावसायिक प्राप्ती अपेक्षेपेक्षा कमी राहील. नौकरीमध्ये इच्छित कामात यश मिळेल. संततीच्या कामात अडचणी येतील. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराला अपघात भय. विद्यार्थ्यांना यश देणारा काळ राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून अपेक्षित यश मिळेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, १३, १४.


सौजन्यदाते पंचांग


 

हे लेख हि वाचा ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


 

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 03 ते 09 फेब्रुवारी 2019

[रविवार ०३ फेब्रुवारी २०१९ ते शनिवार ०९ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात ०५ फेब्रुवारी रोजी मंगळ मीन राशीतून मेष  राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी समज-गैरसमजातून त्रास होतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. वाहने जपून चालवावीत. अविचारी कृतीतून नुकसान होईल. सरकारी कामात यश. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा येतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासात बाधा. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ६, ७, ८, ९.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त बोजा सहन करावा लागेल. संततीला चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात धोका पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वडिलोपार्जित स्थावरापासून वादाचे प्रसंग. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कांही जणांना मानसिक अस्थिरता जाणवेल. प्रवास लाभ देतील. मित्रांमुळे फायदा होईल. शुभ ता. ३, ४, ५.

 

सिंह – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत बेफिकिर राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. सासुरवाडीबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवास संमिश्र य़श देतील. मित्रांची साथ मिळेल. संततीला संमिश्रता. शुभ ता. ६, ७, ८, ९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबातील वातावरण ताण-तणावाचे राहील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. जोडीदाराला अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी गैरसमजातून वाद. संततीच्या बाबतीत शुभ घटना. विद्यार्थ्यांनी बेफिकिर राहू नये. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदारामुळे खर्च वाढतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३, ४, ५.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. वैयक्तिक दृष्टिकोनातून लाभ मिळतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या वर्तणुकीमुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून लाभ मिळतील. मित्रांच्या ओळखीतून फायदा. शुभ ता. ३, ४, ५.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना कामाचे वाढते दडपण राहील. संततीच्या मुळे अनपेक्षित खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावरासंबंधीच्या कामात कटकटी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांबरोबर गैरसमजातून वाद होतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कुटुंबात गैरसमजातून तणाव निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रांची साथ मिळेल. प्रवास आनंददायी ठरतील. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

सौजन्यदाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 20 ते 26 जानेवारी 2019

[रविवार २० जानेवारी २०१९ ते शनिवार २६ जानेवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात २१ जानेवारी रोजी बुध धनु राशीतून मकर राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक चढ-उतार राहतील. नौकरी करणाऱ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांच्या बाबतीत दुर्घटनांची शक्यता प्रवासामधून बाधा. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २५, २६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. नौकरीमध्ये वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना यशदायी काळ राहील. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीचे त्रास होतील. वाहन दुर्घटना शक्य. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. प्रवास सफल होतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २१, २२.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये अनपेक्षित त्रास होतील. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग मिळतील. जोडीदाराबरोबर टोकाचे वाद होतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मूत्र विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींपासून अलिप्त रहावे. शुभ ता. २०, २३, २४.

 

कर्क –  संततीच्या कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. व्यावसायिक अडचणी येतील. नौकरीत कामाचे दडपण जाणवेल. नौकरवर्गामुळे त्रास होतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २५, २६.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. हाडांचे विकार त्रासदायक ठरतील. प्रवासामधून चर्चेसाठी उपयुक्तता राहील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. २०, २३, २४.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. कौटुंबिक वाद चिघळतील. वाहनांपासून त्रास होईल. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २०, २३, २४, २५, २६.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. पत्रव्यवहारातून मनस्ताप होतील. प्रवास लाभ देणार नाहीत. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २१, २२, २३, २४.

 

वृश्चिक – व्यावसायिक आर्थिक अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. जोडीदाराला अपघात भय दर्शविते. सरकारी कामे होतील. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. २३, २४, २५, २६.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीच्या ठिकाणी रागांवर नियंत्रण ठेवावे. अविचारी निर्णयांमुळे नुकसान. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. संततीच्या बाबतीत अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. वैयक्तिक कामात बाधा येतील. सरकारी कामात संमिश्रता. प्रवास शक्यतो टाळावेत. मित्रांचा सल्ला उपयुक्त शुभ ता. २०, २५, २६.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वाढते मानसिक दडपण राहील. अनपेक्षित खर्चामुळे नियोजनात बिघाड. संततीला वाहनांपासून त्रास होतील. विद्यार्थ्यांना परिश्रम खूप घ्यावे लागतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास शुभ फलदायी राहतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २२.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत अकारण मनस्तापाचे प्रसंग. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग. विवाहीत संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवासामधून कामात अडचणी येतील. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. २१, २२, २३, २४.

 

मीन – व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरदारांना खडतर सप्ताह. कायदेविषयक बाबीतून त्रास होतील. संततीच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात अनुकुलता राहील. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५, २६.


सौजन्यदाते पंचांग

 

हे लेख हि वाचा ………

मकर संक्रांति – २०१९

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 13 ते 19 जानेवारी 2019

[रविवार १३ जानेवारी २०१९ ते शनिवार १९ जानेवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १४ जानेवारी रोजी रवी धनु राशीतून मकर राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे.

 * शनि १६ जानेवारी रोजी मार्गी होत आहे.]

ज्योतिष जगतच्या सर्व वाचकांना नवीन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा  !

 तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला  !

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी गैरसमजाचे वातावरण राहील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. वडिलांशी वादाचे प्रसंग. प्रवासामधून कामात बाधा येतील. मित्र-मंडळींवर अवलंबून राहू नये. शुभ ता. १५, १६, १९.

 

वृषभ –  व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. शेजाऱ्यांशी गैरसमजातून वाद होतील. ऐनवेळी वाहनांपासून त्रास होईल. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मौल्यवान वस्तू जपाव्यात. शुभ ता. १३, १४, १७, १८.

 

मिथुन – नौकरीमध्ये पारदर्शी रहावे अन्यथा त्रास होतील. व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. संततीच्या कामात सफलता मिळेल. कुटुंबात अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामध्ये अडचणी येतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५, १६, १९.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांच्या जोडीदारामुळे त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६, १७, १८.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्याचे धोरण ठेवावे. कुठल्याही प्रलोभनात्मक गोष्टींपासून दूर रहावे. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामे कुणावर विश्वास ठेऊन करु नयेत. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १७, १८, १९.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये स्वतःविषयी गैरसमज होईल अशी वर्तणुक टाळावी. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जवळच्या नातेवाईकांमुळे मनस्ताप होतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १५, १६, १७, १८.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये विनाकारण मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक वातावरण ताण-तणावाचे राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अस्थिर वातावरण राहील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १३, १४, १९.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरी करणाऱ्यांना सप्ताह अडचणीचा राहील. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अविचारी निर्णय घेऊ नयेत. मोठ्या भावंडांमुळे त्रास होतील. मित्र-वर्गावर अवलंबून राहू नये. प्रवासामधून मानसिक आनंद मिळेल. शुभ ता. १३, १४, १७, १८.


सौजन्यदाते पंचांग

 

हे लेख हि वाचा ………

 

मकर संक्रांति – २०१९.

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य.

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

मकर संक्रांति – 2019

        आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात मकर संक्रात ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नांवाने ओळखली जाते. गुजरात- राजस्थान मध्ये उत्तरायण, आसाम मध्ये  मघ विहु किंवा भोगली बिहू तमिलनाडु मध्ये ‘पोंगल’, पंजाबात लोहड़ी, हरियाणा- हिमांचल प्रदेश मध्ये माघी. कश्मीर घाटी मध्ये शिशुर संक्रांत, दक्षिण भारतात मकर संक्रमण इ. पण नांवे आणि पद्धत  थोड्याफार फरकाने वेगळ्या असल्या तरी सूर्य पूजा हेच मुख्य ध्येय असते. उत्तरायणाची सुरवात म्हणजेच देवांचा दिवस सुरु होतो म्हणून या संक्रातीचे महत्व अधिक असते. इथून पुढे मंगल कार्यांची सुरुवात होते.                 

             कोणताही ग्रह ज्यावेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांति म्हणतात. रवि म्हणजेच सूर्य हा एका वर्षात १२ वेळा राशी बदलतो म्हणजेच एका वर्षात सूर्याच्या १२ संक्रांति होतात, त्यात मकर संक्रांति ही उत्तरायणाची सुरुवात असते म्हणून अत्यंत शुभ व महत्वाची मानण्यात येते.

सूर्याच्या १२ संक्राति अशा आहेत.

 
तूळ व मेष – विषुव संक्रांति.
कुंभ, वृश्चिक, वृषभ व सिंह – विष्णुपद.
धनु, कन्या, मिथुन, मीन – षडशीति.
कर्क संक्रांति- दक्षिणायन.
मकर संक्रांति – उत्तरायण.

सर्वच संक्रांतिकाल हे धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ मानले जातात.

 

        मकर संक्रांत 2019 – या वर्षी मंगळवार दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी मकर संक्रांत आहे. शके 1940 पौष शुक्ल अष्टमी (८) सोमवारी (14 जानेवारी) सायंकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी  सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतिचा पुण्यकाल – 15 जानेवारी 2019 मंगळवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे.

        या दिवसाचे कर्तव्य – तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. 

 

      संक्रांति वर्णन

बव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार पुढील प्रमाणे –

        वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. श्वेत (पांढरे) वस्त्र परिधान केले आहे. हातात भृशुंडी हे शस्त्र घेतले आहे. कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. वयाने बाल असून बसली आहे. वासाकरिता चाफ्याचे (पुन्नाग) फूल घेतले आहे. अन्न भक्षण करीत आहे. देव जाति आहे. भूषणार्थ प्रवाळ (पोवळे) रत्न धारण केले आहे. वारनांव व  नाक्षत्रनांव ध्वांक्षी आहे. सामुदाय मुहूर्त 30 आहेत. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे. मुख पश्चिमेस असून ईशान्य दिशेस पाहत आहे.

 

           संक्रांती  ज्या ज्या वस्तूंचा स्वीकार (धारण) करते त्या वस्तू महाग होतात, अथवा त्यांचा नाश होतो व ती विकणारे व विकत घेणारे लोक याना भय प्राप्त होते. संक्रांती ज्या दिशेकडून जाते तिकडे सुख होते, जिकडे जाते तिकडे दुःख होते आणि जिकडे पहाते तिकडे हानी होते.

 

       संक्रांति बसलेली असून समुदाय मुहूर्त ३० असल्याने अन्न धान्य भाव सम असेल. व्यापाऱ्यांना सुविधा मिळाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल, शेअर मार्केट मध्ये तेजी दिसून येईल व गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळेल. वित्तीय संस्थानासाठी शुभ असेल.

 

      संक्रांतिच्या पर्वकाळात पुढील कामे करू नये-

कठोर बोलणे, दात घासणे. *( इथे दांत घासु नये याचा अर्थ झाडाच्या काठीने दांत घासु नये असा घ्यावा , बोटाने घासणे, चूल भरने अथवा ब्रश करने चालते.)
वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे. कामविषय सेवन आदी कामे करू नयेत.

 

     

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

  

नक्षत्र परत्वे संक्रांति कोणा-कोणाला शुभाशुभ आहे.

रेवती, अश्विनी, भरणी नक्षत्र असणाऱ्यांना –प्रवास योग घडेल.                                                                                     कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य नक्षत्र असणाऱ्यांना  – सुखभोग.                                                                आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असणाऱ्यांना  – शरीरपीडा, आरोग्याची काळाजी घ्यावी.                                                उत्तरा फाल्गुनी , हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, वस्त्र आभूषण प्राप्ति.                              ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा नक्षत्र असणाऱ्यांना द्रव्यनाश, अर्थिक नुकसान.                                                                  उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, धनप्राप्ति, यशप्राप्ति.

ज्या नक्षत्रांना संक्रांति अशुभ आहे त्यांनी तिळमिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पन, तिलभक्षण व तिलदान या सहा अथवा यापैकी कोणतिही कामे संक्रांतिच्या पुण्यकालात करावी.

 

[ टिप  –  दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.]

संक्रांति पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने

नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

 

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

संक्रांतिच्या दानाचा संकल्प – देशकाल कथन करून – मम आत्मन: सकलपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतीद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायु:महैश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन्‌ मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये । असा संकल्प करून दानवस्तूचे पूजन करून दान द्यावे. दक्षिणा द्यावी.

 

                       संक्रांतिच्या पर्व काळात पुजाअर्चा, दान, व्रत इ. चे  पुण्य मिळतेच पण या काळात आपण आपल्या पत्रिकेतील बलहीन व अशुभ ग्रहांच्या संबंधित वस्तुंचे दान देऊन त्यांची अशुभताही कमी करू शकता. कोणत्या ग्रहासाठी कोणत्या वस्तु दान करू शकता ते पाहु.

सूर्य – माणिक रत्न, गहू, गाय, लाल वस्त्र, गूळ, सोने, तांबे, रक्तचंदन, कमळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

चंद्र – तांदूळ, कापूर, मोती, पांढरे वस्त्र, बैल, तूपाने भरलेला कुंभ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

मंगळ – पोवळे, गहु, मसुर, लाल बैल, गूळ, सोने, लाल वस्त्र, तांबे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

बुध – निळे वस्त्र, सोने, काशाचे भांडे, अख्खे मूग, पाचू रत्न, फुले यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

गुरु – पुष्कराग मणी, हळद, साखर, घोडा, पिवळे वस्त्र, मीठ, सोने यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शुक्र – चित्रविचित्र वस्त्र, पांढरा घोडा, गाय, हिरा, सोने, रूपे, अत्तर, तांदूळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शनि – नीलमणी, उडिद, तेल, तीळ, कुळीथ, म्हैस, लोखंड, काळ्या रंगाची गाय, चप्पल, घोंगडे, छत्री यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

राहु – गोमेदमणी, घोडा, निळे वस्त्र, तेल, कांबळे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

केतू – वैडूर्य मणी (लसण्या), तेल, तीळ, कांबळे, कस्तुरी, मेंढा, वस्त्र यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

[दान नेहमी सत्पात्र व्यक्तीलाच करावे. दान अशुभ व बलहीन ग्रहाचेच करावे.]

आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा |
|| तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला.. ||


 

हे हि लेख वाचा . . . . .

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 

सूर्योपासना आणि हृदयविकार

शनीची साडेसाती – शोध आणि बोध

साडेसाती आणि शनिमाहात्म्य

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद .

बेळगांव – कर्नाटक

9901287974

१२ राशींचे २०१९ सालचे वार्षिक राशिभविष्य

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा आवडता विषय आहे.  सर्व साधारणपणे प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय आहे याची उत्सुकता असते. प्रत्येक व्यक्तीला येणारे वर्ष कसे जाणार याची चिंता असते. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, विवाह, संतती बद्दलचे प्रश्न मनात असतात. ह्या प्रश्नांची उत्तरे गोचर भ्रमणानुसार खूप चांगल्या तऱ्हेने मिळतात . सर्व व्यवस्थित चालणाऱ्या व्यक्तीला  उत्सुकता म्हणून  भविष्य पाहायचे असते, तर अडचणीतून  जाणाऱ्याला ह्यातून परिस्थिती कधी बदलेल हे पाहायचे असते. महत्वाचे म्हणजे भविष्य कथनाने त्या त्या व्यक्तीला दिलासा मिळतो आणि तो अधिक जोमाने प्रयत्न करू लागतो. भारतीय पारंपारिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र राशीकडून गोचर भ्रमणानुसार भविष्य लिहिले आहे.  इथे फक्त ग्रहांच्या  गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो. याचा शास्त्रानुसार मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. खाली दिलेले २०१९ चे प्रत्येक राशीचे भविष्य जळगाव च्या प्रख्यात ज्योतिषी  “ज्योतिष भास्कर सौ. ज्योती जोशी “ यांनी लिहिले आहे. अधिक माहिती साठी वाचक त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात.

ज्योतिष शास्त्र तुम्हाला ग्रह नक्षत्रांच्या आधारे आयुष्यात घडणाऱ्या घटनांविषयी मार्गदर्शन करू शकते. वेळ अनुकूल आहे कि प्रतिकूल हे सांगू शकते. त्यातून मिळणाऱ्या संकेतांचा विचारपूर्वक वापर करण्याचे काम हे प्रत्येक व्यक्तीचे असते. मिळणाऱ्या संकेतांचा अंदाज घेऊन आपले जीवन कसे अधिकाधिक सुखकर करता येईल याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. प्रतिकूल वेळी अधिक सावध राहून कार्य केल्यास भविष्यातील हानी कमी करता येऊ शकते. जसे पाऊस पडणार याचा अंदाज असेल तर घरातून निघताना छत्री घेऊन जाऊन पावसात भिजण्यापासून वाचता येते. पाऊस थांबवण्याचा प्रयत्न आपणास करायचाच नाही आहे. महागाई वाढणार असे दिसत असेल तर वस्तूंचा साठा  करून ठेवता येते. ज्याप्रमाणे एक बुद्धिमान शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करतो, त्याचाच  प्रमाणे एक बुद्धिमान व्यक्ती काही गोष्टींच्या पूर्वसूचनांचा आढावा घेऊन आपले पुढील यशस्वी नियोजन करू शकतो. मला आशा आहे कि, *ज्योतिष भास्कर सौ. ज्योती जोशी* जी नि लिहिलेल्या या वार्षिक राशिभविष्याचाही आमचे सुज्ञ वाचक योग्य वापर करून घेतील. ज्योतिष जगत च्या सर्व वाचकांना २०१९ हे वर्ष सुख समृद्धीने युक्त एक यशस्वी वर्ष ठरावे अशीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो .

इति शुभं भवतु !

धन्यवाद !

खाली दिलेल्या लिंकवर जाऊन प्रत्येक राशीचे (१२ राशींचे)   २०१९ मधील राशिभविष्य आपण वाचु शकता….

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मंगळसूत्र कसे असावे?

विवाहात वधूने परिधान करावयाचे मंगळसूत्र कसे असावे?

         मंगळसूत्रास प्रांतनिहाय डोरले, गळेसारी, गंठन अशी निरनिराळी नावे असून मंगळसूत्र गाठवण्याच्या पद्धतीमध्ये देखील विविधता आढळते.

ऋग्वेदीय ब्रह्मकर्मात

“ब्रह्मविष्ण्वीशरूपं रंध्रवच्च त्रितंतुकम ।

त्रिरत्नं रुक्मजं स्त्रीणां मांगल्याभरणं विदु:।

वामहस्ते एकसरं कंठे तु त्रिसरं स्मृतमिति ॥”

            असे मंगळसूत्राचे वर्णन केलेले आहे. त्याप्रमाणे शास्त्रानुसार मंगळसूत्रामध्ये तीन पदर व सोन्याचे अठरा मणी आसावेत असे सांगितलेले असले तरी प्रचलित रुढीनुसार मंगळसूत्रात दोन पदर व सोन्याचे बारा मणी असतात. उपरोक्त दोन्ही प्रकारांत मंगळसूत्राचे पदर व सोन्याचा मण्यांची संख्या ह्यांच्या बाबतीत थोडीशी तफावत आढळून येते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

       शास्त्रानुसार मंगळसूत्राची बांधणी करावयाची झाल्यास स्त्रीच्या ह्रदयापर्यंत असे मंगळसूत्राचे माप ठेवावे. त्या मापाचे तीन घट तंतू घेऊन त्यामध्ये काळे मणी व थोड्या थोड्या अंतावर सोन्याचे मणी ओवून घ्यावेत. मंगलसूत्रातील तीन तंतू म्हणजे त्रयींचे प्रतीक होय. ब्रह्म-विष्णू-शिव, महाकाली-महालक्षी-महासरस्वती, सत्त्व-रज-तम इत्यादी अनेकविध त्रयींचे प्रतिनिधित्व तंतूंकडून होत असते. सोन्याच्या दोन वाट्या म्हणजे पति, पत्नी, जीव-उपाधी इत्यादी द्वयींचे प्रतीक होय. ह्या मंगलसूत्रासाठी उडदाच्या आकाराचे तीनशेसाठ (३६०) काळे मणी व अठरा (१८) सोन्याचे मणी वापरले तर पर्याप्त लांबीचे मंगलसूत्र तयार होते. अशा वेळी तीनशेसाठ काळे मणी हे वर्षाच्या तीनशेसाठ दिवसांचे, सोन्याचे बारा मणी म्हणजे बारा महिन्यांचे, तर सहा मणी सहा ऋतूंचे प्रतिनिधित्व करतात. अर्थात, मोठे काळे मणी वापरणे शक्य नसेल तर उपलब्ध होतील ते काळे मणी मंगळसूत्राच्या लांबीनुसार यथासंख्येने वापरले तरी चालतात.

      अशा प्रकारे तयार केलेले मंगळसूत्र विवाहात दोन्ही हाताच्या तळव्याच्या संपुटात ठेवुन वराने खालील मंत्राने ते अभिमंत्रित करावे.

इदं सौभाग्यदं सूत्रं मत्प्रीत्या ते ददाम्यहम्‌ ।

तिष्ठामि च  तद्रूपेण त्वद्‌ह्रदि चिरकाम्यया ॥

नंतर वधूच्या मागे उभे राहून सद्‍गुरू व कुलदेवता ह्यांचे स्मरण करत व खालील मंत्र म्हणत मंगळसूत्र वधूच्या कंठात घालावे.

मांगल्यतंतुनानेन भर्तृजीवनहेतुना ।

कंठे बध्नामि सुभगे सा जीव शरद: शतम्‌ ॥

वधूने मंगळसूत्र दोन्ही तळहातामध्ये धरुन खालील मंत्र उच्च स्वरात म्हणावेत.

“मणिसूत्रं महासूत्रं ब्रह्मविष्णुशिवात्मकम्‌ । दिनमासर्तुसमेतं जीवोपाधिसमन्वितम्‌ ।

भर्तुरायुर्विवृद्ध्यर्थं सर्वरक्षाकरं महत्‌ । चिरसौभाग्यसिद्ध्यर्थं कंठे वै धारयाम्यहम्‌ ॥”

 

      स्त्रीने मंगलसूत्र कंठातून कधीही बाहेर काढू नये. जर सूत्र तुटल्यामुळे मंगलसूत्र ओघळले तर लगेचच पुन्हा दुसरे मंगलसूत्र तयार करुन ते घालावे, तोपर्यंत अन्न ग्रहण करु नये. दररोज स्नान झाल्यावर मंगलसूत्राच्या वाट्या उजव्या जातात घेऊन डाव्या हाताने त्यावर थोडे पाणी घालून त्या प्रक्षालन कराव्यात व स्वच्छ पुसाव्यात. पुन्हा तसेच त्यावर थोडे पाणी घालून ते तीर्थ म्हाणून प्राशन करावे. वाट्यांना हळदीकुंकू लावून त्या मस्तकी लावून नमस्कार करावा. ह्या छोट्याशा विधीमुळे पतीचे आयु-आरोग्य तर वृद्धिंगत होतेच पण त्याचबरोबर पतिपत्नीमधील वैचारिक मतभेद नष्ट होऊन वैवाहिक जीवन सुखसमृद्धि व आनंदाने व्यतीत होण्यास साहाय्य होते.

 

        वरील मंगलसूत्राखेरीज पूर्ण सोन्यात गाठवलेले व वाट्यांच्या ऐवजी इतर कलाकृती असलेले मंगलसूत्र परिधान करण्याची खरेतर आवश्यकता नाही. तथापि, हौसेचा भाग म्हणून सणसुदीच्या दिवशी वा समारंभास जाताना असा मंगळसूत्रसदृश दगिना तेवढ्यापुरता परिधान केला तरी फारशी हरकत येत नाही.


साभार – शास्त्र असे सांगते (उत्तरार्ध)

हे लेखही वाचा ……

 

कर्पूर होमएक प्रभावी उपाय

कुंकुमार्चनएक प्रभावी विधी

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध

पिता-पुत्र संबंध  –

पितापुत्राचे संबंध कसे असतील हे सांगणारे काही श्लोक “भावप्रकाश” व “प्रश्नमार्ग” ग्रंथात दिले आहेत. तसे पाहता हे नियम लॉजिकल वाटतात, पण जसेच्या तसे  वापरता येतील असे मात्र नाही. पत्रिकेतील इतर काही गोष्टी या योगावर परिणाम करतील त्यामुळे एक अभ्यास म्हणून तपासून पाहावेत.  इथे केवळ लग्न व दशम यांचाविचार केला आहे, पत्रिकेतील व नात्यांचे कारक यांचा विचार केला नाही आहे. यांचा सुद्धा अशाच प्रकारे  विचार केल्यास मात्र आणखीन थोडी अचूकता आणता येईल.

हे नियम एक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे (guidelines ) म्हणून वापरता येतील, तसेच याच्याबरोबर इतर काही पद्धती व नियमांचा वापर करून यात आणखीन अचूकता साधता येते. ज्योतिषशास्त्रात असे बरेच नियम दिलेले आहेत आणि ते नियम योग्यही आहेत पण कोणत्या नियमाचा कुठे आणि कसा वापर करायचा हे चांगल्या ज्योतिषालाच उत्तम प्रकारे जमते, त्यासाठी अनेक पत्रिकेचा अभ्यास व अनुभव असावा लागतो.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

1) लग्नेशाच्या तुलनेत दशमेश बलवान असून शुभ ग्रहांनी युक्त केंद्रात असेल तर जातक आपल्या पित्याच्या अधीन असतो,  जातक आपल्या वडिलांचा आज्ञाकारी असतो.

2) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्न पाचवे (पंचम) असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांची सर्व कामे करणारा व वडिलांना सुख देणारा असतो. आणि जर दशमात असेल तर मुलामध्ये  वडिलांसमान गुण असतात. तसेच तृतीयात असेल तर वडिलांच्या धनावर (संपत्तीवर) जीवन जगणारा असतो.

3) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्न षष्ठ किंवा अष्टम असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांशी शत्रुत्व करणारा असतो. पिता-पुत्रांमध्ये संबंध फारसे चांगले नसतात. याउलट वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्नरास, द्वितीय, नवम किंवा एकादश असेल तर मुलगा वडिलांचा आज्ञाकारी असून त्या दोघांमध्ये चांगले संबंध असतात. 

4) वडिलांच्या जन्मलग्नापासून अष्टमात शनीची राशी (मकर/कुंभ) असून आणि त्यात मुलाचा जन्म झाला असेल (लग्न अथवा रास ) तर तो मुलगा आपल्या वडिलांचा आज्ञाकारी असून आपल्या वडिलांना पुत्र- पौत्राचे सुख प्रधान करतो.

5) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास, लग्नरास अथवा नवमांश बारावा असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांना त्रास देऊन वडिलांपासून दूर (परदेशात) जाऊन राहतो.  अशा पिता-पुत्रांचे संबंध हे नेहमीच तणावपूर्ण असतात.

भावप्रकाश – अ. ५  (दशमभाव)-श्लो. १ ते ४

योग्य उत्तराधिकारी- वारसदार –

6) वडिलांच्या जन्म चंद्राच्या दशमात असलेल्या राशीत ज्याचे लग्न असेल असा मुलगा आपल्या गुणाने वडिलांसारखाच असतो, आणि वडिलांचा दशमेश मुलाच्या लग्नात असेल तर असा मुलगा वडिलांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात वरचढ असून वडिलांचे काम पुढे नेतो. 

7) जर लग्नेश नवमेशने अथवा सूर्याने युक्त  असेल अथवा  लग्नेश नवम भावात असेल तर मुलगा आपल्या वडिलांप्रमाणेच विद्या प्राप्त करेल व  वडिलांचाच व्यवसाय करेल. (माझ्या मते हा नियम प्रश्न कुंडलीत पाहावा.)

8) ज्या मुलाची जन्म राशी (चंद्र राशी) वडिलांच्या नवम, एकादशी किंवा द्वितीय स्थानात असेल तर तो मुलगा सदैव आपल्या वडिलांचा अनुयायी असेल. तो प्रत्येक आपल्या वडिलांचे अनुकरण करत राहील.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

9) मुलाच्या जन्म राशीपासून अथवा लग्नेशापासून वडिलांची जन्म राशी लाभ अथवा त्रिकोणात असेल तो मुलगा आपल्या वडिलांची संपत्ती प्राप्त करून त्याचा उपभोग घेईल.

 

वडिलांचा अंतिम संस्कार कोणता मुलगा करेल ? असा प्रश्न पाहताना खालील योग पाहावेत.

10) वडिलांच्या अष्टमात असलेली राशी जर मुलाची लग्न रास असेल आणि मुलाच्या लग्नस्थानात वडिलांचा अष्टमेश असेल यापैकी कोणताही योग असेल तर, वडिलांचा अंतिम संस्कार तो मुलगा करेल.   

11) जो मुलगा वडिलांच्या जन्म चंद्रापासून (लग्नापासूनही पाहता येईल) अष्टमेशच्या नक्षत्रामध्ये (३ पैकी कोणत्याही)   जन्माला असेल तो मुलगा आपल्या पुत्रांसोबत आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार करेल.

12) ज्या मुलाच्या कुंडलीत लग्नापासूनचा नवमेश लग्नापासून लाभ स्थानात आणि चंद्रापासूनचा नवमेश चंद्रापासून लाभस्थानात असेल तो मुलगा वृद्धापकाळी आपल्या वडिलांची सेवा सुश्रुषा करेल, व वडिलांच्या मृत्यूनंतर समस्त कर्म क्रिया करून वडिलांना (आत्म्याला) प्रसन्न करेल. 

 

13) वडिलांच्या जन्मराशीपासूनच्या द्वादशेश ग्रहाच्या नक्षत्रात (३ पैकी कोणत्याही) जर मुलाचा जन्म झाला असेल तर तो मुलगा आपल्या वडिलांपासून दूर (परदेशात) राहत असल्याने आपल्या वडिलांना दु:ख देत राहील. 

14) जर वडिलांच्या जन्मराशीपासून षष्टेशाच्या नक्षत्रात (३ पैकी कोणत्याही) मुलाचा जन्म झाला असेल तर पिता-पुत्रात शत्रुता असेल. दोघांचे संबंध चांगले नसतील.

कोणता मुलगा आपले कर्ज फेडेल ?

15) वडिलांचा राशिपती  ज्या मुलाच्या व्ययशाबरोबर असेल त्या  मुलाला आपल्या वडिलांचे कर्ज फेडावे लागते.

 

प्रश्न मार्ग अ. १६ श्लो. ६४ ते ६७

संदर्भ – प्रश्नमार्ग , भावप्रकाश .


हे लेखही वाचा –

 

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग १- आयुर्दाय

संतान दीपिका अर्थात संतती योग

राहूच अतिरेकीपणा – शोध आणि बोध

कुंडलीतील चंद्राचे महत्व

कारक ग्रहांचे महत्व

अमावस्येचे गोचर भ्रमण


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्र – भाग १ – आयुर्दाय

               सर्व प्रथम पत्रिका हातात आल्यावर ज्योतिषांनी काय पाहावे ? (सांगावे नव्हे). फलदीपिकेत मंत्रेश्वरानी म्हटले आहे कि, “सर्वप्रथम जातकाच्या आयुष्याचा विचार करावा, त्यानंतर पत्रिकेतील इतर योगांच्या फळांचा विचार करावा.” बऱ्याच जुन्या  ज्योतिषांचेही  हेच मत आहे कि सर्वप्रथम पत्रिका हातात आल्यावर जातकाचे आयुष्यमान पाहावे आणि त्यानंतरच इतर भविष्य  कथानकडे वळावे. बरेच ज्योतिषी जातकाच्या पत्रिकेतील मोठ- मोठे राजयोग पाहून बऱ्याच लांब पल्ल्याची भविष्यवाणी करतात पण तो जातक खरच त्या दशेपर्यंत हयात राहील का ? हे पाहताच नाहीत.  ज्योतिष शास्त्रात सुद्धा जातकाच्या आयुर्दायासंबंधात विशेष किचकट गणित न करता जातकाच्या आयुर्दायाविषयी एक अंदाज बांधता येतो अशी काही सूत्रे आहे. यासाठी लग्न व नवमांश कुंडलीची गरज असते, काही ठिकाणी द्रेष्काण कुंडलीचा विचार केला जातो. बऱ्याच वेळी केवळ लग्न कुंडलीवरूनच चांगला अंदाज बांधता येतो.

           तसे पाहता जातकाचे आयुष्य किती आहे हे पाहण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, जसे पिंडायू , अंशायु , अष्टकवर्ग इ. पण या सर्व पद्धती अतिशय किचकट गणित करून पाहाव्या लागतात, असेच वेळखाऊ हि आहेत. एक अभ्यास म्हणून या विद्यार्थ्यांनी जरूर आत्मसात कराव्यात, पण जातक समोर असताताना सहज व झटपट काही सूत्रे माहित असतील तर त्याचा ज्योतिषांना नक्कीच फायदा होऊ शकतो. खालील पैकी कोणतेही एक सूत्र वापरून आपण विशेष गणित न करता जातकाच्या आयुर्दायासंबंधात एक निश्चित अंदाज बांधू  शकतो.

मनुष्याच्या आयुर्दायासंबंधात आपल्या ज्योतिष शास्त्रात ४ प्रकारात वर्गवारी केली आहे.

पहिली ८ वर्षे बलारिष्ट .

८-३२ वर्षापर्यंत अल्पायु.

३३-६५ वर्षापर्यंत मध्यायु .

६५ वर्षापेक्षा अधिक दीर्घायु .

इथे आपण बलारिष्टचा विचार करणार नाही आहोत, इथे केवळ अल्पायु, मध्यायु व दीर्घायु या बद्दलच विचार केला आहे.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

सूत्र – १   –

 फलदीपिका  या ग्रंथात फारसे गणित न करता जातकाचा आयुर्दाय ठरविण्यासाठी काही सूत्रे  दिलेली आहेत.

 हा नियम पाहताना, लग्न व नवमांश कुंडलीचा विचार करावा लागतो. खालील  पैकी कोण आपल्या अष्टमेशापेक्षा बलवान आहे ते पाहावे, व निर्णय करावा

१) लग्नाचा स्वामी २) लग्न नवमांशाचा स्वामी ३) चंद्र राशीचा स्वामी ४) चंद्र नवमांशाचा स्वामी – जर हे चारही आपापल्या अष्टमेश पेक्षा बलवान असतील तर दीर्घायु व बलहीन असतील तर अल्पायु समाजावे.

लग्नाचा स्वामी अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

नवमांश लग्नस्वामी नवमांश अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

जन्म राशी स्वामी जन्मराशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

चंद्र नवमांश राशी स्वामी चंद्र नवमांश राशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

तर व्यक्ती दीर्घायु असेल आणि उलट असेल तर अल्पायु.  इतर वेळी म्हणजे काही मध्ये लग्न स्वामी बलवान व काही मध्ये अष्टमेश बलवान तर तारतम्याने विचार करावा.

  • फलदीपिका – अ.- १३ श्लो. १६

 

सूत्र – २   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी लग्न कुंडली, नवमांश कुंडली व द्वादशांश कुंडलीची गरज लागते. या तीनही कुंडलींचा साकल्याने विचार करून आयुर्दाय ठरवता येतो.

  • लग्न द्रेष्काण राशी आणि चंद्र द्रेष्काण राशी पहा,

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

 

  • लग्नेशाची नवमांश राशी आणि चंद्रशाची नवमांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* (चंद्रशाची नवमांश राशी म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्याचा स्वामी ज्या नवमांशात आहे ती राशी.)

 

  • लग्नेशाची द्वादशांश राशी आणि अष्टमेशाची द्वादशांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* वरील तीनही मतांचा विचार करून बहुमतांनी जो निर्णय येईल त्याप्रमाणे आयुर्दाय ठरवावा.

– फलदीपिका अ. १३ श्लो. १४

सूत्र – ३   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी केवळ लग्न कुंडली विचारात घेतली जाते.

जर लग्नाचा स्वामी आणि सर्व शुभ ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर दीर्घायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर अल्पायु असेल. 

जर अष्टमेश आणि सर्व क्रूर ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर  अल्पायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर दीर्घायु असेल. 

 

सूत्र – ४   –

 कुंडलीत खालील ग्रह परस्पर मित्र आहेत कि शत्रू ते पहा.

१) चंद्र राशीचा स्वामी व चंद्र राशीच्या अष्टमाचा स्वामी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

२) लग्नेश आणि अष्टमेश एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

३) लग्नेश आणि रवी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

जर वरील ग्रह परस्परांचे मित्र असतील तर दीर्घायु , सॅम असतील तर मध्यायु आणि शत्रू असतील तर अल्पायु असेल.

  • फलदीपिका अ. १३ श्लो. १५

 

सूत्र – ५  –

       जैमिनी पद्धतीमध्येही असेच एक सूत्र सांगितले आहे आणि ते जास्त प्रचलितही आहे. यासाठी लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेशचा विचार केला जातो. लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेश पहा.

१) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

२) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

३) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

सूत्र – ६ –

       कृष्णमूर्ती पद्धतीतही असेच एक सूत्र सांगितले आहे कि, ज्यावरून जातक अल्पायु आहे, मध्यायु आहे कि दीर्घायु आहे हे फारसे गणित न करता सांगता येते.

* पण कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम जन्म कुंडलीला लागू करावे का ? खास करून अशा महत्वाच्या बाबतीत हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. जेथे दिड – दोन मिनिटाच्या फरकाने उपनक्षत्र स्वामी बदलतात अशा ठिकाणी असे नियम वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. (रुलिंग प्लॅनेटच्या साहाय्याने केलेले बर्थ टाइम रेक्टिफिक्शन हे मला तरी पटत नाही.) असो, इथे सूत्र काय आहे ते पाहू.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार १, ५, ९, १० व ११ हि आयुष्यवर्धक स्थाने आहेत.  (*९ स्थान हे स्थिर लग्नाला व ११ स्थान हे चर लग्नाला बाधक असल्याने स्थिर लग्नाच्या बाबतीत ९ व चर लग्नाच्या बाबतीत ११ हे स्थान वगळावे.)

६, ८ व १२ व मारक (२, ७), बाधक (चर लग्न – ११, स्थिर लग्न – ९, द्विस्वभाव लग्न – ७) हि स्थाने आयुष्य विघातक मनाली जातात.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आयुर्दाय ठरविताना नियम असा आहे कि,

१) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्यवर्धक स्थानाचाच कारक असेल व आयुष्याविघातक स्थानाचा कारक नसेल तर जातक दीर्घायु असेल. 

२) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्याविघातक  स्थानाचाच कारक असेल व आयुष्यवर्धक स्थानाचा कारक नसेल तर जातक अल्पायु असेल.

३)  जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा आयुष्यवर्धक व  आयुष्याविघातक  अशा दोनही स्थानाचा कारक असेल  तर जातक मध्यायु  असेल.

हा नियम पाहताना बरेच ज्योतिषी वरील प्रमाणेच ३ व ८ स्थानाचा उपनक्षत्र स्वामीही तपासून  पाहतात. तसेच कारक म्हणून शनी ग्रहही वरील पैकी कोणत्या स्थानाचा कारक आहे तेही पाहतात. सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची अवस्था हि “कृष्णमूर्ती आपली आपली” अशीच झाली आहे. असो.  

पुढच्या लेखात दुसऱ्या एखाद्या विषयावर अशीच काही ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्रे पाहू.

 सूचना – प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

 धन्यवाद !

 


 

हे हि लेख वाचा

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध

संतान दीपिका अर्थानं संतती योग

सहदेव भाडळी

क्रकच योग

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Uttam Gawade

 

श्री उत्तम गावडे
ज्योतिष विशारद, वास्तु विशारद
9901287974