साप्ताहिक राशिभविष्य 03 ते 09 फेब्रुवारी 2019

[रविवार ०३ फेब्रुवारी २०१९ ते शनिवार ०९ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात ०५ फेब्रुवारी रोजी मंगळ मीन राशीतून मेष  राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी समज-गैरसमजातून त्रास होतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. वाहने जपून चालवावीत. अविचारी कृतीतून नुकसान होईल. सरकारी कामात यश. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा येतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासात बाधा. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ६, ७, ८, ९.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त बोजा सहन करावा लागेल. संततीला चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात धोका पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वडिलोपार्जित स्थावरापासून वादाचे प्रसंग. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कांही जणांना मानसिक अस्थिरता जाणवेल. प्रवास लाभ देतील. मित्रांमुळे फायदा होईल. शुभ ता. ३, ४, ५.

 

सिंह – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत बेफिकिर राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. सासुरवाडीबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवास संमिश्र य़श देतील. मित्रांची साथ मिळेल. संततीला संमिश्रता. शुभ ता. ६, ७, ८, ९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबातील वातावरण ताण-तणावाचे राहील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. जोडीदाराला अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी गैरसमजातून वाद. संततीच्या बाबतीत शुभ घटना. विद्यार्थ्यांनी बेफिकिर राहू नये. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदारामुळे खर्च वाढतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३, ४, ५.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. वैयक्तिक दृष्टिकोनातून लाभ मिळतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या वर्तणुकीमुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून लाभ मिळतील. मित्रांच्या ओळखीतून फायदा. शुभ ता. ३, ४, ५.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना कामाचे वाढते दडपण राहील. संततीच्या मुळे अनपेक्षित खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावरासंबंधीच्या कामात कटकटी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांबरोबर गैरसमजातून वाद होतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कुटुंबात गैरसमजातून तणाव निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रांची साथ मिळेल. प्रवास आनंददायी ठरतील. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

सौजन्यदाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

मकर संक्रांति – 2019

        आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात मकर संक्रात ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नांवाने ओळखली जाते. गुजरात- राजस्थान मध्ये उत्तरायण, आसाम मध्ये  मघ विहु किंवा भोगली बिहू तमिलनाडु मध्ये ‘पोंगल’, पंजाबात लोहड़ी, हरियाणा- हिमांचल प्रदेश मध्ये माघी. कश्मीर घाटी मध्ये शिशुर संक्रांत, दक्षिण भारतात मकर संक्रमण इ. पण नांवे आणि पद्धत  थोड्याफार फरकाने वेगळ्या असल्या तरी सूर्य पूजा हेच मुख्य ध्येय असते. उत्तरायणाची सुरवात म्हणजेच देवांचा दिवस सुरु होतो म्हणून या संक्रातीचे महत्व अधिक असते. इथून पुढे मंगल कार्यांची सुरुवात होते.                 

             कोणताही ग्रह ज्यावेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांति म्हणतात. रवि म्हणजेच सूर्य हा एका वर्षात १२ वेळा राशी बदलतो म्हणजेच एका वर्षात सूर्याच्या १२ संक्रांति होतात, त्यात मकर संक्रांति ही उत्तरायणाची सुरुवात असते म्हणून अत्यंत शुभ व महत्वाची मानण्यात येते.

सूर्याच्या १२ संक्राति अशा आहेत.

 
तूळ व मेष – विषुव संक्रांति.
कुंभ, वृश्चिक, वृषभ व सिंह – विष्णुपद.
धनु, कन्या, मिथुन, मीन – षडशीति.
कर्क संक्रांति- दक्षिणायन.
मकर संक्रांति – उत्तरायण.

सर्वच संक्रांतिकाल हे धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ मानले जातात.

 

        मकर संक्रांत 2019 – या वर्षी मंगळवार दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी मकर संक्रांत आहे. शके 1940 पौष शुक्ल अष्टमी (८) सोमवारी (14 जानेवारी) सायंकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी  सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतिचा पुण्यकाल – 15 जानेवारी 2019 मंगळवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे.

        या दिवसाचे कर्तव्य – तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. 

 

      संक्रांति वर्णन

बव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार पुढील प्रमाणे –

        वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. श्वेत (पांढरे) वस्त्र परिधान केले आहे. हातात भृशुंडी हे शस्त्र घेतले आहे. कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. वयाने बाल असून बसली आहे. वासाकरिता चाफ्याचे (पुन्नाग) फूल घेतले आहे. अन्न भक्षण करीत आहे. देव जाति आहे. भूषणार्थ प्रवाळ (पोवळे) रत्न धारण केले आहे. वारनांव व  नाक्षत्रनांव ध्वांक्षी आहे. सामुदाय मुहूर्त 30 आहेत. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे. मुख पश्चिमेस असून ईशान्य दिशेस पाहत आहे.

 

           संक्रांती  ज्या ज्या वस्तूंचा स्वीकार (धारण) करते त्या वस्तू महाग होतात, अथवा त्यांचा नाश होतो व ती विकणारे व विकत घेणारे लोक याना भय प्राप्त होते. संक्रांती ज्या दिशेकडून जाते तिकडे सुख होते, जिकडे जाते तिकडे दुःख होते आणि जिकडे पहाते तिकडे हानी होते.

 

       संक्रांति बसलेली असून समुदाय मुहूर्त ३० असल्याने अन्न धान्य भाव सम असेल. व्यापाऱ्यांना सुविधा मिळाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल, शेअर मार्केट मध्ये तेजी दिसून येईल व गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळेल. वित्तीय संस्थानासाठी शुभ असेल.

 

      संक्रांतिच्या पर्वकाळात पुढील कामे करू नये-

कठोर बोलणे, दात घासणे. *( इथे दांत घासु नये याचा अर्थ झाडाच्या काठीने दांत घासु नये असा घ्यावा , बोटाने घासणे, चूल भरने अथवा ब्रश करने चालते.)
वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे. कामविषय सेवन आदी कामे करू नयेत.

 

     

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

  

नक्षत्र परत्वे संक्रांति कोणा-कोणाला शुभाशुभ आहे.

रेवती, अश्विनी, भरणी नक्षत्र असणाऱ्यांना –प्रवास योग घडेल.                                                                                     कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य नक्षत्र असणाऱ्यांना  – सुखभोग.                                                                आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असणाऱ्यांना  – शरीरपीडा, आरोग्याची काळाजी घ्यावी.                                                उत्तरा फाल्गुनी , हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, वस्त्र आभूषण प्राप्ति.                              ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा नक्षत्र असणाऱ्यांना द्रव्यनाश, अर्थिक नुकसान.                                                                  उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, धनप्राप्ति, यशप्राप्ति.

ज्या नक्षत्रांना संक्रांति अशुभ आहे त्यांनी तिळमिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पन, तिलभक्षण व तिलदान या सहा अथवा यापैकी कोणतिही कामे संक्रांतिच्या पुण्यकालात करावी.

 

[ टिप  –  दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.]

संक्रांति पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने

नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

 

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

संक्रांतिच्या दानाचा संकल्प – देशकाल कथन करून – मम आत्मन: सकलपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतीद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायु:महैश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन्‌ मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये । असा संकल्प करून दानवस्तूचे पूजन करून दान द्यावे. दक्षिणा द्यावी.

 

                       संक्रांतिच्या पर्व काळात पुजाअर्चा, दान, व्रत इ. चे  पुण्य मिळतेच पण या काळात आपण आपल्या पत्रिकेतील बलहीन व अशुभ ग्रहांच्या संबंधित वस्तुंचे दान देऊन त्यांची अशुभताही कमी करू शकता. कोणत्या ग्रहासाठी कोणत्या वस्तु दान करू शकता ते पाहु.

सूर्य – माणिक रत्न, गहू, गाय, लाल वस्त्र, गूळ, सोने, तांबे, रक्तचंदन, कमळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

चंद्र – तांदूळ, कापूर, मोती, पांढरे वस्त्र, बैल, तूपाने भरलेला कुंभ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

मंगळ – पोवळे, गहु, मसुर, लाल बैल, गूळ, सोने, लाल वस्त्र, तांबे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

बुध – निळे वस्त्र, सोने, काशाचे भांडे, अख्खे मूग, पाचू रत्न, फुले यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

गुरु – पुष्कराग मणी, हळद, साखर, घोडा, पिवळे वस्त्र, मीठ, सोने यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शुक्र – चित्रविचित्र वस्त्र, पांढरा घोडा, गाय, हिरा, सोने, रूपे, अत्तर, तांदूळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शनि – नीलमणी, उडिद, तेल, तीळ, कुळीथ, म्हैस, लोखंड, काळ्या रंगाची गाय, चप्पल, घोंगडे, छत्री यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

राहु – गोमेदमणी, घोडा, निळे वस्त्र, तेल, कांबळे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

केतू – वैडूर्य मणी (लसण्या), तेल, तीळ, कांबळे, कस्तुरी, मेंढा, वस्त्र यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

[दान नेहमी सत्पात्र व्यक्तीलाच करावे. दान अशुभ व बलहीन ग्रहाचेच करावे.]

आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा |
|| तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला.. ||


 

हे हि लेख वाचा . . . . .

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 

सूर्योपासना आणि हृदयविकार

शनीची साडेसाती – शोध आणि बोध

साडेसाती आणि शनिमाहात्म्य

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद .

बेळगांव – कर्नाटक

9901287974

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध

पिता-पुत्र संबंध  –

पितापुत्राचे संबंध कसे असतील हे सांगणारे काही श्लोक “भावप्रकाश” व “प्रश्नमार्ग” ग्रंथात दिले आहेत. तसे पाहता हे नियम लॉजिकल वाटतात, पण जसेच्या तसे  वापरता येतील असे मात्र नाही. पत्रिकेतील इतर काही गोष्टी या योगावर परिणाम करतील त्यामुळे एक अभ्यास म्हणून तपासून पाहावेत.  इथे केवळ लग्न व दशम यांचाविचार केला आहे, पत्रिकेतील व नात्यांचे कारक यांचा विचार केला नाही आहे. यांचा सुद्धा अशाच प्रकारे  विचार केल्यास मात्र आणखीन थोडी अचूकता आणता येईल.

हे नियम एक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे (guidelines ) म्हणून वापरता येतील, तसेच याच्याबरोबर इतर काही पद्धती व नियमांचा वापर करून यात आणखीन अचूकता साधता येते. ज्योतिषशास्त्रात असे बरेच नियम दिलेले आहेत आणि ते नियम योग्यही आहेत पण कोणत्या नियमाचा कुठे आणि कसा वापर करायचा हे चांगल्या ज्योतिषालाच उत्तम प्रकारे जमते, त्यासाठी अनेक पत्रिकेचा अभ्यास व अनुभव असावा लागतो.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

1) लग्नेशाच्या तुलनेत दशमेश बलवान असून शुभ ग्रहांनी युक्त केंद्रात असेल तर जातक आपल्या पित्याच्या अधीन असतो,  जातक आपल्या वडिलांचा आज्ञाकारी असतो.

2) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्न पाचवे (पंचम) असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांची सर्व कामे करणारा व वडिलांना सुख देणारा असतो. आणि जर दशमात असेल तर मुलामध्ये  वडिलांसमान गुण असतात. तसेच तृतीयात असेल तर वडिलांच्या धनावर (संपत्तीवर) जीवन जगणारा असतो.

3) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्न षष्ठ किंवा अष्टम असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांशी शत्रुत्व करणारा असतो. पिता-पुत्रांमध्ये संबंध फारसे चांगले नसतात. याउलट वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्नरास, द्वितीय, नवम किंवा एकादश असेल तर मुलगा वडिलांचा आज्ञाकारी असून त्या दोघांमध्ये चांगले संबंध असतात. 

4) वडिलांच्या जन्मलग्नापासून अष्टमात शनीची राशी (मकर/कुंभ) असून आणि त्यात मुलाचा जन्म झाला असेल (लग्न अथवा रास ) तर तो मुलगा आपल्या वडिलांचा आज्ञाकारी असून आपल्या वडिलांना पुत्र- पौत्राचे सुख प्रधान करतो.

5) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास, लग्नरास अथवा नवमांश बारावा असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांना त्रास देऊन वडिलांपासून दूर (परदेशात) जाऊन राहतो.  अशा पिता-पुत्रांचे संबंध हे नेहमीच तणावपूर्ण असतात.

भावप्रकाश – अ. ५  (दशमभाव)-श्लो. १ ते ४

योग्य उत्तराधिकारी- वारसदार –

6) वडिलांच्या जन्म चंद्राच्या दशमात असलेल्या राशीत ज्याचे लग्न असेल असा मुलगा आपल्या गुणाने वडिलांसारखाच असतो, आणि वडिलांचा दशमेश मुलाच्या लग्नात असेल तर असा मुलगा वडिलांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात वरचढ असून वडिलांचे काम पुढे नेतो. 

7) जर लग्नेश नवमेशने अथवा सूर्याने युक्त  असेल अथवा  लग्नेश नवम भावात असेल तर मुलगा आपल्या वडिलांप्रमाणेच विद्या प्राप्त करेल व  वडिलांचाच व्यवसाय करेल. (माझ्या मते हा नियम प्रश्न कुंडलीत पाहावा.)

8) ज्या मुलाची जन्म राशी (चंद्र राशी) वडिलांच्या नवम, एकादशी किंवा द्वितीय स्थानात असेल तर तो मुलगा सदैव आपल्या वडिलांचा अनुयायी असेल. तो प्रत्येक आपल्या वडिलांचे अनुकरण करत राहील.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

9) मुलाच्या जन्म राशीपासून अथवा लग्नेशापासून वडिलांची जन्म राशी लाभ अथवा त्रिकोणात असेल तो मुलगा आपल्या वडिलांची संपत्ती प्राप्त करून त्याचा उपभोग घेईल.

 

वडिलांचा अंतिम संस्कार कोणता मुलगा करेल ? असा प्रश्न पाहताना खालील योग पाहावेत.

10) वडिलांच्या अष्टमात असलेली राशी जर मुलाची लग्न रास असेल आणि मुलाच्या लग्नस्थानात वडिलांचा अष्टमेश असेल यापैकी कोणताही योग असेल तर, वडिलांचा अंतिम संस्कार तो मुलगा करेल.   

11) जो मुलगा वडिलांच्या जन्म चंद्रापासून (लग्नापासूनही पाहता येईल) अष्टमेशच्या नक्षत्रामध्ये (३ पैकी कोणत्याही)   जन्माला असेल तो मुलगा आपल्या पुत्रांसोबत आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार करेल.

12) ज्या मुलाच्या कुंडलीत लग्नापासूनचा नवमेश लग्नापासून लाभ स्थानात आणि चंद्रापासूनचा नवमेश चंद्रापासून लाभस्थानात असेल तो मुलगा वृद्धापकाळी आपल्या वडिलांची सेवा सुश्रुषा करेल, व वडिलांच्या मृत्यूनंतर समस्त कर्म क्रिया करून वडिलांना (आत्म्याला) प्रसन्न करेल. 

 

13) वडिलांच्या जन्मराशीपासूनच्या द्वादशेश ग्रहाच्या नक्षत्रात (३ पैकी कोणत्याही) जर मुलाचा जन्म झाला असेल तर तो मुलगा आपल्या वडिलांपासून दूर (परदेशात) राहत असल्याने आपल्या वडिलांना दु:ख देत राहील. 

14) जर वडिलांच्या जन्मराशीपासून षष्टेशाच्या नक्षत्रात (३ पैकी कोणत्याही) मुलाचा जन्म झाला असेल तर पिता-पुत्रात शत्रुता असेल. दोघांचे संबंध चांगले नसतील.

कोणता मुलगा आपले कर्ज फेडेल ?

15) वडिलांचा राशिपती  ज्या मुलाच्या व्ययशाबरोबर असेल त्या  मुलाला आपल्या वडिलांचे कर्ज फेडावे लागते.

 

प्रश्न मार्ग अ. १६ श्लो. ६४ ते ६७

संदर्भ – प्रश्नमार्ग , भावप्रकाश .


हे लेखही वाचा –

 

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग १- आयुर्दाय

संतान दीपिका अर्थात संतती योग

राहूच अतिरेकीपणा – शोध आणि बोध

कुंडलीतील चंद्राचे महत्व

कारक ग्रहांचे महत्व

अमावस्येचे गोचर भ्रमण


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्र – भाग १ – आयुर्दाय

               सर्व प्रथम पत्रिका हातात आल्यावर ज्योतिषांनी काय पाहावे ? (सांगावे नव्हे). फलदीपिकेत मंत्रेश्वरानी म्हटले आहे कि, “सर्वप्रथम जातकाच्या आयुष्याचा विचार करावा, त्यानंतर पत्रिकेतील इतर योगांच्या फळांचा विचार करावा.” बऱ्याच जुन्या  ज्योतिषांचेही  हेच मत आहे कि सर्वप्रथम पत्रिका हातात आल्यावर जातकाचे आयुष्यमान पाहावे आणि त्यानंतरच इतर भविष्य  कथानकडे वळावे. बरेच ज्योतिषी जातकाच्या पत्रिकेतील मोठ- मोठे राजयोग पाहून बऱ्याच लांब पल्ल्याची भविष्यवाणी करतात पण तो जातक खरच त्या दशेपर्यंत हयात राहील का ? हे पाहताच नाहीत.  ज्योतिष शास्त्रात सुद्धा जातकाच्या आयुर्दायासंबंधात विशेष किचकट गणित न करता जातकाच्या आयुर्दायाविषयी एक अंदाज बांधता येतो अशी काही सूत्रे आहे. यासाठी लग्न व नवमांश कुंडलीची गरज असते, काही ठिकाणी द्रेष्काण कुंडलीचा विचार केला जातो. बऱ्याच वेळी केवळ लग्न कुंडलीवरूनच चांगला अंदाज बांधता येतो.

           तसे पाहता जातकाचे आयुष्य किती आहे हे पाहण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, जसे पिंडायू , अंशायु , अष्टकवर्ग इ. पण या सर्व पद्धती अतिशय किचकट गणित करून पाहाव्या लागतात, असेच वेळखाऊ हि आहेत. एक अभ्यास म्हणून या विद्यार्थ्यांनी जरूर आत्मसात कराव्यात, पण जातक समोर असताताना सहज व झटपट काही सूत्रे माहित असतील तर त्याचा ज्योतिषांना नक्कीच फायदा होऊ शकतो. खालील पैकी कोणतेही एक सूत्र वापरून आपण विशेष गणित न करता जातकाच्या आयुर्दायासंबंधात एक निश्चित अंदाज बांधू  शकतो.

मनुष्याच्या आयुर्दायासंबंधात आपल्या ज्योतिष शास्त्रात ४ प्रकारात वर्गवारी केली आहे.

पहिली ८ वर्षे बलारिष्ट .

८-३२ वर्षापर्यंत अल्पायु.

३३-६५ वर्षापर्यंत मध्यायु .

६५ वर्षापेक्षा अधिक दीर्घायु .

इथे आपण बलारिष्टचा विचार करणार नाही आहोत, इथे केवळ अल्पायु, मध्यायु व दीर्घायु या बद्दलच विचार केला आहे.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

सूत्र – १   –

 फलदीपिका  या ग्रंथात फारसे गणित न करता जातकाचा आयुर्दाय ठरविण्यासाठी काही सूत्रे  दिलेली आहेत.

 हा नियम पाहताना, लग्न व नवमांश कुंडलीचा विचार करावा लागतो. खालील  पैकी कोण आपल्या अष्टमेशापेक्षा बलवान आहे ते पाहावे, व निर्णय करावा

१) लग्नाचा स्वामी २) लग्न नवमांशाचा स्वामी ३) चंद्र राशीचा स्वामी ४) चंद्र नवमांशाचा स्वामी – जर हे चारही आपापल्या अष्टमेश पेक्षा बलवान असतील तर दीर्घायु व बलहीन असतील तर अल्पायु समाजावे.

लग्नाचा स्वामी अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

नवमांश लग्नस्वामी नवमांश अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

जन्म राशी स्वामी जन्मराशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

चंद्र नवमांश राशी स्वामी चंद्र नवमांश राशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

तर व्यक्ती दीर्घायु असेल आणि उलट असेल तर अल्पायु.  इतर वेळी म्हणजे काही मध्ये लग्न स्वामी बलवान व काही मध्ये अष्टमेश बलवान तर तारतम्याने विचार करावा.

  • फलदीपिका – अ.- १३ श्लो. १६

 

सूत्र – २   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी लग्न कुंडली, नवमांश कुंडली व द्वादशांश कुंडलीची गरज लागते. या तीनही कुंडलींचा साकल्याने विचार करून आयुर्दाय ठरवता येतो.

  • लग्न द्रेष्काण राशी आणि चंद्र द्रेष्काण राशी पहा,

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

 

  • लग्नेशाची नवमांश राशी आणि चंद्रशाची नवमांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* (चंद्रशाची नवमांश राशी म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्याचा स्वामी ज्या नवमांशात आहे ती राशी.)

 

  • लग्नेशाची द्वादशांश राशी आणि अष्टमेशाची द्वादशांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* वरील तीनही मतांचा विचार करून बहुमतांनी जो निर्णय येईल त्याप्रमाणे आयुर्दाय ठरवावा.

– फलदीपिका अ. १३ श्लो. १४

सूत्र – ३   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी केवळ लग्न कुंडली विचारात घेतली जाते.

जर लग्नाचा स्वामी आणि सर्व शुभ ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर दीर्घायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर अल्पायु असेल. 

जर अष्टमेश आणि सर्व क्रूर ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर  अल्पायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर दीर्घायु असेल. 

 

सूत्र – ४   –

 कुंडलीत खालील ग्रह परस्पर मित्र आहेत कि शत्रू ते पहा.

१) चंद्र राशीचा स्वामी व चंद्र राशीच्या अष्टमाचा स्वामी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

२) लग्नेश आणि अष्टमेश एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

३) लग्नेश आणि रवी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

जर वरील ग्रह परस्परांचे मित्र असतील तर दीर्घायु , सॅम असतील तर मध्यायु आणि शत्रू असतील तर अल्पायु असेल.

  • फलदीपिका अ. १३ श्लो. १५

 

सूत्र – ५  –

       जैमिनी पद्धतीमध्येही असेच एक सूत्र सांगितले आहे आणि ते जास्त प्रचलितही आहे. यासाठी लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेशचा विचार केला जातो. लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेश पहा.

१) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

२) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

३) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

सूत्र – ६ –

       कृष्णमूर्ती पद्धतीतही असेच एक सूत्र सांगितले आहे कि, ज्यावरून जातक अल्पायु आहे, मध्यायु आहे कि दीर्घायु आहे हे फारसे गणित न करता सांगता येते.

* पण कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम जन्म कुंडलीला लागू करावे का ? खास करून अशा महत्वाच्या बाबतीत हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. जेथे दिड – दोन मिनिटाच्या फरकाने उपनक्षत्र स्वामी बदलतात अशा ठिकाणी असे नियम वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. (रुलिंग प्लॅनेटच्या साहाय्याने केलेले बर्थ टाइम रेक्टिफिक्शन हे मला तरी पटत नाही.) असो, इथे सूत्र काय आहे ते पाहू.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार १, ५, ९, १० व ११ हि आयुष्यवर्धक स्थाने आहेत.  (*९ स्थान हे स्थिर लग्नाला व ११ स्थान हे चर लग्नाला बाधक असल्याने स्थिर लग्नाच्या बाबतीत ९ व चर लग्नाच्या बाबतीत ११ हे स्थान वगळावे.)

६, ८ व १२ व मारक (२, ७), बाधक (चर लग्न – ११, स्थिर लग्न – ९, द्विस्वभाव लग्न – ७) हि स्थाने आयुष्य विघातक मनाली जातात.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आयुर्दाय ठरविताना नियम असा आहे कि,

१) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्यवर्धक स्थानाचाच कारक असेल व आयुष्याविघातक स्थानाचा कारक नसेल तर जातक दीर्घायु असेल. 

२) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्याविघातक  स्थानाचाच कारक असेल व आयुष्यवर्धक स्थानाचा कारक नसेल तर जातक अल्पायु असेल.

३)  जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा आयुष्यवर्धक व  आयुष्याविघातक  अशा दोनही स्थानाचा कारक असेल  तर जातक मध्यायु  असेल.

हा नियम पाहताना बरेच ज्योतिषी वरील प्रमाणेच ३ व ८ स्थानाचा उपनक्षत्र स्वामीही तपासून  पाहतात. तसेच कारक म्हणून शनी ग्रहही वरील पैकी कोणत्या स्थानाचा कारक आहे तेही पाहतात. सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची अवस्था हि “कृष्णमूर्ती आपली आपली” अशीच झाली आहे. असो.  

पुढच्या लेखात दुसऱ्या एखाद्या विषयावर अशीच काही ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्रे पाहू.

 सूचना – प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

 धन्यवाद !

 


 

हे हि लेख वाचा

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध

संतान दीपिका अर्थानं संतती योग

सहदेव भाडळी

क्रकच योग

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Uttam Gawade

 

श्री उत्तम गावडे
ज्योतिष विशारद, वास्तु विशारद
9901287974

 

धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

      आजच्या या भौतिक जगात प्रत्येक व्यक्तीला एक सुखवस्तू जीवन जगण्याची इच्छा नेहमीच होत असते. आजच्या जगात “पैसा” हे जीवन नसले तरी यापेक्षा कमीही नाही. त्यामुळे अधिकधिक धन कमावणारी व्यक्तीच अधिकाधिक सुखवस्तू जीवन जगू शकते. (किमान आज प्रत्येकाची धारणा तरी अशीच आहे.) त्यामुळे आज प्रत्येक जण अधिकाधिक पैसे कमावण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या प्रयत्नाना जर दैवी उपायांची सोबत मिळाली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

आज आम्ही या दिवाळीच्या मुहूर्तावर असे ११ उपाय सांगणार आहोत ज्यामार्फत आपण आपले आर्थिक संकट दूर करून, अपार धन समृद्धी मिळवून धनवान बनू शकता.

 

टीप – केवळ हे उपायच धन मिळवून देऊ शकत नाहीत तर त्यासाठी आपण आपल्या  निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिक मेहनत करीत असणे हि तितकेच गरजेचे आहे.  व्यावहारिक प्रयत्न सोडून उपायांच्या मागे लागून काहीच होणार नाही. आपल्या व्यावहारिक प्रयत्नांबरोबर या उपायांचा वापर करावा हेच योग्य होईल. हे उपाय केवळ दैवी संकटावर मात करण्यात मदत करतील.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

१) अपार धनाची ईच्छा असणाऱ्या व्यक्तींनी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात अथवा कार्यालयात श्रीयंत्राची स्थापना करून नियमित श्रीसुक्तानी त्याची पूजा करावी. शास्त्रानुसार ज्याच्या घरी श्रीसुक्तानी श्रीयंत्राची नियमित पूजा होते तेथे नेहमी धन व समृद्धीची वृद्धी होत राहते. श्री लक्ष्मी पूजनातील हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

 

२) दिवाळीच्या वेळी लक्ष्मी मंत्राचा कमळाच्या बीजाच्या माळेवर (कमलगट्टा) जप करून श्री लक्ष्मीमातेला कमळाचे फुल अर्पण केल्यास नेहमी लक्ष्मीची कृपा राहते.

 

३) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी ११ पिवळ्या कवड्या श्री लक्ष्मीला अर्पण कराव्यात व दुसरे दिवशी त्या एका लाल कपड्यात बांधून , आपल्या तिजोरी, गल्ला अथवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

 

४) दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली सात दिवे लावून पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्यास कोणत्याही व कितीही मोठ्या आर्थिक संकटातून मुक्तता होते. प्रदक्षिणा घालताना श्री लक्ष्मी-नारायणाच्या मंत्राचा जप करावा.

 

५) दिवाळीच्या दिवशी श्री लक्ष्मी देवीला तुळशीच्या पानांचा हार अर्पण केल्यास, श्री लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावल्यास व पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास दारिद्य दूर होते.

 

६) लक्ष्मी पूजनाच्या वेळी कुबेराच्या पूजनाचेही अतिशय महत्व आहे. कुबेर यंत्र अथवा कुबेराची प्रतिमा पुजून, कुबेर मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप केल्यास धनवृद्धी होते. 

 

७) (व्यापाऱ्यांसाठी)  – दिवाळीच्या पूजनानंतर सायंकाळी उजव्या हातात एक अखंड सुपारी व एक चलनी नाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन, नमस्कार करून मागे न बघता यावे, दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन त्याच पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून आणावे व ते पान आपल्या गल्ल्यात अगर तिजोरीत ठेवावे. ग्राहकांची वाढ होईल व आर्थिक आवक वाढेल.  

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

८) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी वापरलेल्या अक्षता एका नव्या पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास वर्षभर पैशाची तंगी जाणवणार नाही, हा उपाय दरवर्षी करावा, आदल्या वर्षीच्या अक्षता कपड्यासकट वाहत्या पाण्यात सोडाव्यात. 

 

९) दिवाळीत लक्ष्मी पूजनानंतर मध्यरात्री  “ॐ श्रीं ऐश्वर्य लक्ष्मै ह्रीं नम:” हा मंत्र अष्टगंधाने डाळिंबाच्या लेखणीने पांढऱ्या कागदावर लिहावा. नंतर याच मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप करावा. कागदाची घडी करून तो चांदीच्या ताईत मध्ये घालून उजव्या दण्डावर अथवा गळ्यात घालावा. किंवा चांदीच्या डबीत घालून तिजोरीत ठेवावा. यामुळे धनप्राप्तीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती सुधारेल.

 

१०) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ११ काळ्या गुंजा पूजेत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी शुचिर्भूत होऊन त्या गुंजा एका पांढऱ्या पिशवीत घालून तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास श्री लक्ष्मीचा वरदहस्त निरंतर राहील.

 

११) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी आंब्याच्या झाडावरील बांधा (बांडगुळ) जर पूजन करून  तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास अशा घरात  श्री लक्ष्मीचा निरंतर वास राहतो.

 

वरील प्रयोग करताना श्रद्धा व सबुरी अत्यंत आवश्यक असेल. वरील उपाय पूर्ण श्रद्धेने करून फलप्राप्तीसाठी थोडा धीर धरावा. काहींचा अनुभव तात्काळ तर काहींचा थोड्या कालांतराने येतो.  आपल्याला आलेले अनुभव आम्हाला जरूर कळवावेत.

आमच्या समस्त वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्यावर व आपल्या परिवारावर आई लक्ष्मीची कृपादृष्टी निरंतर राहो हीच सदिच्छा !


हे लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

कुमारीपुजन

    नवरात्रीचा काळ हा देवी उपासनेसाठी प्रशस्त मानला जातो. या कालावधी देवी उपासना अधिक लवकर फलद्रुप होते असे मानले जाते. या कालावधीत अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते. त्यातील एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे कुमारी पूजन. देवी भागवत तसेच भविष्य पुराणात  कुमारी पूजनाशिवाय नवरात्रीचे व्रत पूर्ण होत नाही असे सांगितले आहे. २ ते १०  वर्षाच्या कुमारी मुलींची देवीच्या स्वरूपात पूजा केली जाते. यात नऊ दिवसात रोज नऊ, अष्टमी अथवा नवमी च्या दिवशी नऊ अथवा रोज एक अथवा अष्टमी अथवा नवमी कोणत्याही एक दिवशी किमान एक कुमारीची पूजा केली जाते. हा एक प्रकारे स्त्रियांना सन्मान देण्याचाच प्रकार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. मातेला तर देवासमानच  मानले आहे.   इतर कोणत्याही धर्मात अगर संस्कृतीत “स्त्री देवता” हि संकल्पनाच नाही आहे ती केवळ आपल्या हिंदू धर्मातच आढळते यातच सर्व काही आले. मग स्त्रियांना दुय्यम दर्जा वगैरे गोष्टी कुठून आल्या ? देवी हि देवाची शक्ती मानली आहे व प्रत्येक देव हा त्याच्या शक्तीशिवाय अपूर्ण मानला आहे. स्त्रियांप्रती व्यवहार कसा असावा हे सांगणारा हा श्लोक सर्व काही सांगून जातो. 

 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवत: ।

यतैतस्तु न पूज्यते सर्वास्तत्राऽफला: क्रिया: ॥ मनुस्मृती:-३/५६

ज्या कुळात (घरात) स्त्रियांची पूजा (मान/सन्मान, आदर/सत्कार) होते देवता त्या घरात वास करतात. आणि ज्या घरात स्त्रियांचा आदर होत नाही, जिथे स्त्रिया दु:खी असतात त्या घरात केलेले सर्व धर्म-कर्म व्यर्थ (निष्फळ) होते.


   एक वर्षाची कन्या पूजेला वर्ज्य करावी. दोन वर्षाच्या कन्येपासून दहा वर्षाच्या कन्येंपर्यंत कुमारीपूजन करावें. दोन वर्षाची कुमारी ती कुमारिका, तीन, वर्षाची त्रिमूर्ती, चार वर्षाची कल्याणी, पांच वर्षाची रोहिणी, सहा वर्षाची काली, सात वर्षाची चंडिका, आठ वर्षाची शांभवी, नऊ वर्षाची दुर्गा व दहा वर्षाची भद्रा-याप्रमाणे, कुमारींची नांवे जाणावीं.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

कुमारी पूजनाचा विधि

कुमारी मुलींना भोजन आणि पूजनासाठी आदल्या दिवशी सन्मानपूर्वक आमंत्रण द्यावे. अचानक पूजेच्या वेळी आसपासच्या मुलींना जमा करू नये. 

कुमारी मुली गृह प्रवेश करताना संपूर्ण परिवार सोबत फुलांच्या वर्षावाने त्याचे स्वागत करावे. तसेच देवीच्या नामाचा जयघोष करावा.

 सर्व कुमारींना आसनावर बसवून दुधाने भरलेल्या ताटात पाय धुवावे व त्याचा आशीर्वाद घ्यावा. 

त्यानंतर प्रत्येक कुमारीची  फुल, अक्षत व कुंकुम इ ने पूजा करावी.

त्यानंतर देवीचे ध्यान करून मंगल कामना करावी.

 व शेवटी सर्व कुमारींना भोजन व उपहार भेट देऊन आशीर्वाद घ्यावा. 

 

वयानुसार प्रत्येक कुमारीचे रूप व पूजनाचे फळ – 

 

१-   दोन वर्षाच्या कुमारिकेच्या पूजनाने दु:ख आणि दरिद्रता दार होते.  

२-   तीन वर्षाच्या त्रिमूर्तीच्या पूजनाने धनधान्य प्राप्ती व परिवारात सुख समृद्धी नांदते.

३-  चार वर्षाच्या कल्याणीच्या पूजनाने परिवाराचे कल्याण होते.

४- पाच वर्षाच्या रोहिणीच्या पूजनाने रोगमुक्ती होते.

५- सहा वर्षाच्या कालीच्या पूजनाने विद्या, विजय व राजयोगाची प्राप्ती होते.

६- सात वर्षाच्या चंडिकेच्या पूजनाने ऐश्वर्य प्राप्ती होते.

७- आठ शाम्भवीच्या कुमारिकेच्या पूजनाने वादविवादात, कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळते.

८ – नऊ वर्षाच्या दुर्गाच्या पूजनाने शत्रूंचा नाश व असाध्य कार्यात यश मिळते.

९- दहा वर्षाच्या भद्राच्या पूजनाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.

 

नवरात्रात प्रतिदिन एक किंवा अष्टमी अथवा नवमीला नऊ अशा कुमारी पुजाव्या.

 

रोज एक कुमारिका पूजन — सुख व ऐश्वर्य प्राप्ती.

रोज दोन कुमारिका पूजन — मोक्ष प्राप्ती.

रोज तीन कुमारिका पूजन — धर्म, अर्थ, काम प्राप्ती.

रोज चार कुमारिका पूजन — राज्यपद प्राप्ती .

रोज पाच कुमारिका पुजन — विद्या लाभ.

रोज सहा कुमारिका पूजन — सर्व सिद्धि प्राप्ती.

रोज सात कुमारिका पूजन — राज्य प्राप्ती.

रोज आठ कुमारिका पूजन — धन आणि संपत्ती प्राप्ती .

रोज नऊ कुमारिका पूजन — विजय प्राप्ती.


अशा प्रकारे  दररोज एकेक अधिक अथवा रोज एक याप्रमाणें कुमारीची पूजा करावी.

 

’मन्त्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रुपधारिणीम्‌ । नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्यायावाहयाम्यहम्‌ ॥

जगत्पूज्ये जगद्वंद्ये सर्वशक्तिस्वरुपिणि । पूजां गृहाण कौमारी जगन्मातर्नमोस्तुते ते ॥’

 

या मंत्राने पादप्रक्षालनपूर्वक वस्त्र, कुंकुम, गंध, धूप, दीप, भोजन, यांनी पूजा करावी, असा संक्षेप विधी आहे.

 

नवरात्रीसंदर्भातील इतर लेख इथे वाचा ……

भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

दसरा आणि आपट्याची पाने


Shri Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद

बेळगांव- कर्नाटक

9901287974

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

नवरात्राचे विधिविधान –

               नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवघर व देव्हाऱ्याची साफसफाई करून देवमुर्तींचे उद्वार्जन (स्वच्छता) करून घ्यावे. ह्यानंतर संकल्प करून घटस्थापन (वरुणस्थापन), वेदिकास्थापन व त्यानंतर दीपस्थापन झाल्यानंतर मुख्य देवतेचे अभिषेकासहित षोडशोपचारपूजन करावे. ताम्हणात तांदूळ व विड्याच्या पानांनी तयार केलेल्या पीठावर देवतेच्या प्रतिमेची स्थापना करुन नंतर मालाबंधन करावे. मध्याह्नी महानैवेद्य दाखवून आरती करावी व प्रथेनुसार दांपत्य, कुमारी इत्यादिकांना अन्नसंतर्पण करावे. महोत्सव कालामध्ये दरदोज जलप्रोक्षण करुन (फुलाने पाणी शिंपडून ) पूजा व मालाबंधन करुन यशाशक्ति देवीआराधना करावी.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

              नवरात्रोत्थापनाच्या  दिवशी (म्हणजेच दहाव्या दिवशी – दशमीला) जलप्रोक्षणाने पूजा, मालाबंधन व नेहमीची देवीउपसना झाल्यावर ’मात: क्षमस्व’ किंवा ’देव क्षमस्व’ अशी प्रार्थना करावी. नंतर त्या देवतेचा घोष करुन (उदाहरणार्थ; ’दुर्गायै नम:, व्यंकटेशाय नम:, मल्लारिमार्तंडाय नम:) देवतेच्या ईशान्य दिशेस एक फूल वाहून देवप्रतिमा त्या दिशेकडे किंचित हालवावी व्यंकटेशाचे व जोतिबावे देवीच्या शारदीय नवरात्रकाळातच येत असल्यामुळे दोन्ही नवरात्रे दशमीस उठवण्याची प्रथा आहे. नवरात्र उठवाल्यानंतर घट, शेतातील अंकुर, माळा ह्यांच्यावर अक्षता वाहून त्याचें विसर्जन झाल्यावर घटातील जलाने घरातील सर्वांवर सिंचन करावे. ह्यानंतर दांपत्य-कुमारी भोजन घालून वेळेच्या उपलब्धीनुसार त्याच दिवशी अन्यथा दुसऱ्या दिवशी देवतांचे उद्वार्जनपूर्वक षोडशोपचारपूजन करावे.


 नवरात्रकाळातील अशौचप्राप्ती –

नवरात्र व अशौच (सोहेर व सूतक) ह्यांच्या संदर्भात तीन पर्यात संभवतात.

१) अशौच चालू असताना नवरात्र आले असता उपवासादी व्रताचार सुरु करुन अशौचसमाप्ती होताच घटस्थापना करुन नवरात्रप्रारंभ करावा, अशा वेळी नवरात्र महोत्सवाचा कालावधी जरी घटत असला, तरी नवरात्राचे पालन होणे क्रमप्राप्त ठरते.

 

२) नवरात्र चालू असताना अशौच आले असरा घरातील ब्रह्मचारी मुलगा, कुलोपाध्याय किंवा आप्त (स्नेही) ह्यांचेकडून नवरात्रातील पूजा, मालाबंधन इत्यादी नित्यविधी तसेच नवरात्रोत्थापन करवून घ्यावे, अशा वेळी आपल्या घरातील वा दुसऱ्याच्या घरातील (परान्न) शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य चालत नसल्यामुळे दुधसाखरेचा नैवेद्य दाखवाव. स्वत:च्या उपवासादी व्रताचारामध्ये खंड पडू देऊ नये. नवरात्रापूर्वी अशौचसमाप्ती होत असेल तर उर्वरित दिवशी नेहमीप्रमाणे  स्वत: उपरोक्त विधी करावेत.

 

३) नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होण्यापुर्वी घरामध्ये निधनघटना घडून अशौच आले व ते नवरात्र समाप्ती पर्यंत रहात असेल तर सपंडीकरण होईपर्यंत कोणतेही देवकार्य करण्यास शास्त्रसंमती नसल्याकारणाने नवरात्रमहोत्सव करता येत नाही. तथापि उपवासात्मक व्रताचाराचे पालन करावे. अशौचसमाप्तीनंतर नवरात्र खंडित झाल्याबद्दल महाभिषेकपूर्वक पूजा व समाराधन करावी.

 

  नवरात्रकाळातील श्राद्ध – शार्दीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामहश्राद्ध असते. सुवासिनी स्त्रीस आपल्या दिवंगत पित्यास श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी ह्या दिवशी दौहित्रश्राद्धरुपाने मिळत असते. नवरात्रकाळात प्रथम वर्षश्राद्ध अथवा प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आल्यास ते नवरात्राकाळातच करावे, पुढे ढकलू नये.


साभार – शास्त्र असे सांगते !

पुढील भागात पाहू नवरात्र काळातील आचार पालन…..

इथे वाचा …..

(मागील) भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

पुढील भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

                    कुमारीपुजन

दसरा आणि आपट्याची पाने

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवरात्र – शास्त्रीय मीमांसा- भाग – १

 ‘अनाचारेण मालिन्यं अत्याचारेण मूर्खता । विचाराचारयोर्योग : सदाचार: स उच्यते ॥’ अर्थात, आचारहीनतेमुळे जीवनास मालिन्य तर आचाराधिक्यामुळे मुर्खता येते. विचार व आचार ह्यांचा चपखल मेळ म्हणजेच सदाचार होय. ज्या – ज्या काळात दैत्यदानवांनी अनचार व अत्याचाराच्या रुपाने भूमीवर थैमान घातले, त्या- त्या वेळी आदिशक्तीने दुर्गारुपातील विविध अवतार घेतले आणि सत्प्रवृत जनांची त्या आपत्प्रसंगातून मुक्तता करुन सद्धर्म व सदाचार ह्यांची तिने संस्थापना केली. शक्तिदेवीच्या महत्कृत्त्यांची स्मरणगथा म्हणून साजरा केला जाणारा दुर्गामहोत्सव भारतभर कोणत्या ना कोणत्यातरी स्वरुपात प्रचलित आहे. वर्षभर विविध ऋतुकालांत संपन्न होणाऱ्या दुर्गापूजेमध्ये  शरद ऋतूमधील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत केला जाणारा नवरात्र महोत्सव विशेष लक्षणीय आहे. कारण श्रीदुर्गासप्तशती ग्रंथातील ‘शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी ॥’ (अ १२.१२) ह्या मंत्रानुसार देवीनेच ह्या शारदीय महोत्सवाचे (महापुजेचे) महत्त्व निर्धारित केलेले आहे. शारदीय महोत्सव संपूर्ण भारतातील बहुतेक कुटुंबांत कुळधर्म स्वरूपात संपन्न होतो. हा महोत्सव नऊ दिवसांचा असल्यामुळे  त्यास ‘नवरात्र’ असे संबोधले जाते. ह्या कालामध्ये संपन्न होणारी दुर्गापूजा आपापल्या कुलस्वामिनीच्या (उदाहरणार्थ: तुळजाभवानी, सप्तशृंगनिवासिनी, करवीरनिवासिनी, एकवीरा, कामाक्षी, रेणुका इत्यादी)  स्वरुपांत केली जाते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

   नवरात्रात नंदादीप, घट, पुष्पमाला व बीजारोपण (शेत) ह्या चार महत्त्वाच्या गोष्टी असून त्या कोणत्या ना कोणत्यातरी तत्त्वाचे द्योतक होत. त्या अनुषंगाने नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे, घट हे आपल्या नाशवंत देहाचे, घटातील जल हे त्यातील चैतन्याचे, पुष्पमाला हे सत्कार्याने सुगंधित झालेल्या मानवी जीवनसूत्राचे, तर बीजारोपण हे नवनिर्मितीचे प्रतिक आहे. ह्या सर्वांच्या समन्वयाने गूढार्थाच्या दृष्टिकोनातून समालोचन केल्यास त्यामध्ये एक उदात्त संकल्पना दिसून येते.

 

                               शारदीय नवरात्रामागील कथानकानुसार देवीने नऊ दिवस युद्ध करुन महिषासुराचा वध केला. हा महिषासुर सद्य: कालीदेखील सर्वसामान्य मानवाच्या अंतर्मनात ह्या ना त्या विकाररुपाने कमीजास्त प्रमाणात थैमान घालत असून तोच मानवाच्या अधोगतीस कारणीभूत होत असतो. नवरात्राचे औचित्य साधून आपणांस त्या विकाररुपी महिषासुराचा निरास करावयाचा असतो. ज्याप्रमाणे नऊ दिवसांच्या युद्धानंतर देवीकडून महिषासुराचे पारिपत्य झाले, त्याप्रमाणे आपल्यातील षड्‌विकाररुपी असुरांच्या नाशाची जिद्द मनी बाळगून नवरात्रातील नऊ देवीच्या सांनिध्यात यथामति आराधना केली असता ते उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होते. ह्यास्तव नवरात्रातील घटस्थापनेमध्ये आपल्या विकारवश व नाशवंत देहाचे प्रतीक म्हणून एक मातीचा घट घेऊन त्यामध्ये जलाच्या माध्यमातून वरुणरुपी चैतन्याची स्थापना केली जाते. हाच घट देवीसांनिध्यात म्हणजेच देवीस्वरुप नंदादीपाजवळ ठेवला जातो. त्या समीप एका पत्रावळीवर मृत्तिकेच्या वेदीवर नबनिर्मितीचे प्रतीक म्हणून बीजारोपण केले जाते. तेथे मानवी देहाचे मृत्तिकेमध्ये विलीनीकरण व परत मृत्तिकेतून पुनर्निर्माण ही सृष्टिचक्रातील वास्तवता सूचित होते. त्या नऊ दिवसांत इकडे षड्‌विकाररुपी असुरांची शकले उडत असतात, तर तिकडे बीजारोपण झालेल्या धान्यातून नवांकुरांसारखे जीवात्म्यांचे उन्नयन होत असते. (गव्हांकुररसामध्ये अत्यंत पोषक अशा जीवनसत्त्वांचा अनमोल साठा असून त्याच्या नित्य सेवनाने वार्धक्यप्रक्रिया मंदावते.) ह्या नऊ दिवसांत दररोज मालाबंधन करण्यात येते. ह्या सुत्ररुपी मालेच्या साहाय्यानेच साधकाचा जीवात्मा हा आपल्या देहरुपी घटाशी जुडलेला असतो हे ध्वनित होते. ज्याप्रमाणे गर्भस्थित भ्रूण नऊ महिन्यांच्या खडतर तपश्चर्येनंतर यशस्वीरीत्या जन्मास येतो, त्याप्रमाणे नऊ दिवसांच्या ह्या समरप्रसंगानंतर साधकातील कामक्रोधरुपी असुरांचा नि:पात होऊन साधकाचा जणू नव्याने जन्म झालेला असतो. आपल्यातील आसुरी वृत्तीवर मिळवलेला विजय हा नवरात्रानंतर येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो.


                        हिंदुधर्मातील सर्व वर्णीयांत प्राचीन कालापासून चालत आलेला नवरात्रमहोत्सव त्यांच्या – त्यांच्या प्रथेनुसार साजरा केला जात असे . क्षात्रवर्णीय लोक धर्मावर संकट आणणाऱ्या आसुरी वृत्तींच्या शत्रुंचा पाडाव करण्यासाठी सीमोल्लंघनानंतर युद्धावर जात असत. ह्या कार्यास प्रेरणा मिळावी म्हणून नवरात्रामध्ये बलीची प्रथा समाविष्ट केली असावी. तथापि सद्य:कालीन बदललेली समाजरचना पाहता सर्व वर्णीयांसाठी प्रत्यक्ष पशुबली नव्हे तर आपल्यातील विकाररुपी असुरांचे दमन अपेक्षित असल्याकारणाने हिंसेचा निषेध सर्व स्तरांवर करणे हेच खरे धर्माचरण ठरते. ‘धृत्ति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह: । धीर्विद्या सत्म्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम ॥’ (मनुस्मृती – ६. १२) अर्थात; धैर्य, क्षमा, मनोदमन, प्ररोपकार, शुचित्व, इंद्रियनिग्रह, विद्या, सत्य आणि शांती ही धर्माची दहा आहेत. जे धर्माचरण उपरोक्त कसोटीस उतरत नाही, ते शास्त्रबाह्य ठरवून त्यामध्ये योग्य दिशेने बदल केला पाहिजे.

 

                             शारदीय नवरात्राच्या धर्तीवरच राम, नृसिंह कृष्ण, व्यंकटेश, ज्योतिर्लिंग, सिद्धनाथ, विठल, मल्लारी, दत्तप्रभृती देवांच्या त्याचप्रमाणे शांकभरीप्रभृती देवींच्या अन्य कालावधीतील प्रचलित झालेल्या महोत्सवांनाही ‘नवरात्र’ असे संबोधले जाऊ लागले. ’ नवरात्र’ ह्या शब्दातील ’नव’ हे पद जरी संख्यावाचक असले तरी ह्या नवरात्रांतील व्रताचरण नऊ दिवसांचे असेलच असे नाही. सर्वसाधारणपणे हा कालावधी सहा दिवसांपासून बारा दिवसांपर्यंत असतो. कारण ह्या विविध देवतेवताचे अवतारकार्य हे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेले होते. त्यामध्ये मुख्यत : दैत्यांपासून भक्तजनांचे रक्षण होण्यासाठी किंवा भक्तजनांवर कोसळलेल्या आपत्तींच्या निवारणासाठी ह्या देवतेने अवतार घेतलेला होता. ह्या अवतारकार्याच्या पूर्तसाठी जेवढा कालावधी लागला त्यानुसार त्या – त्या देवतेचे नवरात्र संपन्न होते.

 

                       उपरोक्त मूळ संकल्पना मनी वाळगून नवरात्रमहोत्सव साजरा केल्यास मानवातील विकारवशता क्षीण होऊन होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती तर होईल, पण त्याचबरोबर समाजसंस्थही अधिकाधिक निकोप व एकसंध होण्यास साहाय्य होईल. 

क्रमश:

पुढचा भाग इथे वाचा …

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

                                        कुमारीपुजन

दसरा आणि आपट्याची पाने


साभार – शास्त्र असे सांगते !

आमच्या सर्व वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

वटपौर्णिमा

उद्या वट पौर्णिमा, आता WhatsApp व Facebook वर यासंबंधित अनेक जोक फिरु लागतील. मला या गोष्टिचा जास्त खेद वाटतो कि, जगातले इतर धर्मीय लोक आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपापल्या धर्मातील चांगल्या गोष्टी जगापुढे मांडत असतात व वाईट गोष्टींवर चुप्पी साधून असतात. इतर धर्मातसुध्दा वाईट गोष्टी, कुप्रथा आहेतच की, पण त्यांच्यांकडुन याबद्यल कधी ऐकलेत का? पण आपल्या हिन्दू लोकांचे अगदि यापेक्षा उलट आहे. आपण आपल्याच धर्माच्या वाईट गोष्टींवर बोलतो, कुप्रथांवर चर्चा करतो पण चांगल्या गोष्टींचा कधी उल्लेखही करत नाही. याचे कारण आपल्या लोकांना आपल्याच धर्म, संस्कृती व परंपरांविषयीचे असलेले अज्ञान. त्यांना आपल्या संस्कृती व परंपरा किती वैज्ञानिक व विचारपूर्वक बनवल्या गेल्या आहेत याची जाणिवच नाही. आपल्या धर्माविषयीचे ज्ञान हाच यावर उपाय आहे. तर जाणून घ्या आपल्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी आपल्या परंपरांविषयी.

पुराणांमधील गोष्टी या दंतकथेच्या माध्यमांतून सांगण्याची प्रथा आहे. पण नवीन पिढीला त्या पटतील, समजतील अशा शब्दात त्या सांगणे गरजेचे आहे. तरच पुढची पिढी या गोष्टींना मानतील.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

सावित्रीची गोष्ट अशी असू शकते – सत्यवान हा लाकूडतोड्या जंगलात लाकडे तोडताना बेशुध्द होऊन पडतो तेंव्हा त्याची पत्नी सावित्री त्याला उचलून वडाच्या झाडाखाली झोपवते, तिथे तो शुध्दीवर येतो. सावित्री ही बुध्दिमान व हुषार असल्याने तीने समयोचितपणा दाखवत आपल्या पतिचे प्राण वाचविले अशी ही कहाणी आहे. आता वडाचेच झाड का तर, वडाचे झाड हे तेवढ्याच मोठ्या कोणत्याही झाडाच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन एकावेळेला बाहेर सोडते. म्हणजे हे त्यावेळेतले ऑक्सिजन सिलेंडरचेच काम करत होते असे समजल्यास गैर होणार नाही. (याचा अर्थ असा की वडाला फेऱ्या मारल्याने तुमच्या पतिचे आयुष्य नाही वाढणार तर तुमचेच आरोग्य चांगले राहून तुमचेच आयुष्य वाढणार आहे.) यासाठी प्रत्येक गावात एक तरी मोठा वटवृक्ष असतो, पंचायतीच्या सभाही त्याखालीच होत असत. याशिवाय आयुर्वेदात वडाचे अनेक औषधी गुण सांगितले आहेत. पण वडाच्या झाडाचा सर्वात महत्वाचा उपयोग होतो तो म्हणजे वातावरणातील ओझोनचा थर राखण्यात, सध्या या थराला मोठी छिद्रे पडल्याने ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या उभ्या रहात आहेत. गेल्या काही वर्षात या वृक्षाची प्रचंड प्रमाणात तोड झाली आहे. आणि गेल्या काही वर्षापासून उन्हाळा अति तीव्र होत आहे याविषयीही विचार झाला पाहीजे. आपल्या संस्कृतीमध्ये वड , पिंपळ, औदुंबर, शमी, हे पवित्र वृक्ष म्हणून सांगितले आहेत.   ज्या  वृक्षांना देवत्व बहाल करण्यात आले आहे, ती सर्वच वृक्षे वातावरणाचा व पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून यांची तोड रोखण्यासाठी त्या वृक्षांना देवता व सणांशी जोडण्यात आले आहे.  यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो, झाड लावणे जितके महत्वाचं आहे तितकंच त्याची जोपासना करणे महत्वाचे आहे, झाड लावण्याचे महत्व आपल्या पुराण ग्रंथात खूप सुंदर सांगितलं आहे .

व्रताविषयीचे गैर समज-

सावित्रीच्या गळ्यात सत्यवान बांधला नव्हता उलट सत्यवान हा दरिद्री व अल्पायुषी आहे , असे नारदानि तिच्या लग्नापूर्वी सांगितले होते . म्हणून कुटुंबातील सर्वांची इच्छा तिने सत्यवानाशी लग्न करू नये ,अशीच होती. शिवाय सत्यवान काही राजा किंवा धनवान हि नव्हता. उलट सावित्री हि अश्वपती राजाची मुलगी म्हणजे राजकन्या होती, असे असूनही ” मनाने मी सत्यवानाला वरले आहे व मी त्याच्याशीच विवाह करणार” असे तिने स्पष्ट सांगितले. (यावरून पूर्वीच्या काळी स्त्रियांना पतीची निवड करण्याचे स्वातंत्र्य होते असे दिसते.) स्वेच्छेनीच तिने सत्यवानाशी विवाह करण्याचे ठरवले होते.
 वट सावित्रीचे व्रत जन्मोजन्मी (७ जन्म ) हाच पती मिळावा म्हणून केले जात नाही , तर आपल्या पतीला चांगले आरोग्य, दीर्घायुष्य,(अखंड सौभाग्य) संपत्ती , पुत्र पौत्र व सन्मान लाभावा म्हणुन केले जाते. (* ७ जन्म हाच पती मिळावा, अशा चुकीच्या समजुती चित्रपट व टी. व्ही. मालिकातून पसरविण्यात आल्या आहेत व लोकांनाही धर्मशास्त्राचे ज्ञान नसल्याने त्या गोष्टी खर्या मानल्या गेल्या आहेत. ) या व्रताचा संकल्प असा आहे. -” मम इहजन्मनि अखंड सौभाग्य पुत्र पौत्र धनधान्य ऐश्वर्य अभिवृध्द्र्थम वटमुले ब्रम्ह सावित्रीदेवाता प्रित्यर्थ ।” * यात कुठेही ७ जन्म हाच पती मिळावा असा शब्दही नाहि आहे. आज सुशिक्षित (?) लोकच जास्त चुकीच्या समजुती पसरवितात.

वट सावित्रीच्या व्रताचा बोध-

महान पतीव्रतेत सावित्रीची गणना आहे, ती प्रातःस्मरनिय आहे , तिला यमजेत्री असे म्हणले आहे. असे असताना हे व्रत गुलामीचे निदर्शक कसे होते? सत्यवानाशी विवाह केल्याने जी सुख दुःखे पदरी येतील ती सोसण्याची तिचीतयारी आहे , सावित्री हि एखादी विलासलोलुप , ब्रमर वृत्तीची युवती नव्हती. ती तेजस्वी आणि निश्चयी होती . प्रसंगी ठामपणे व योग्य निर्णय घेण्याचा गुण आपल्या अंगी यावा , हा बोध यातून घेतला पाहिजे.

गुलामी नव्हे समर्पण –

जीवनातील खऱ्या यशासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा तेजस्वी आदर्श सावित्री आपल्यापुढे ठेवते. स्वेच्छेनीच जाणीवपूर्वक निवडलेल्या पतीच्या सुख दुःखात भागीदारी होणे , त्याला संकटातून वाचविण्यासाठी काळालाहि आव्हान देण्याची तयारी ठेवणे, त्याची साथ न सोडणे आणि उभयतांनी जीवने श्रेयोन्मुख करणे हे स्त्रीचे फार मोठे सद्गुण आहेत, यात स्त्रीची लाचारी नाही. वट सावित्रीचा नुसता उपहास करण्यापेक्षा श्रद्धेने व निष्ठेने ते व्रत आचरण करून काय आत्मिक समाधान लाभते ते पहावे,

सर्व वृक्षात वट वृक्षाचे आयुष्य जास्त आहे , परंब्यांनी त्याचा विस्तार हि खूप होतो. वटवृक्ष हा एक स्थिर आणि दीर्घकाळ जगणारा वृक्ष असल्याने दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. स्त्रियांचे मासिकधर्मसंबंधित विकार, पुरुषांमधील शुक्रधातूसंबंधित विकार, स्त्री-पुरुष यांमधील वंध्यत्व, अत्याधिक रक्तस्राव यांसारख्या अनेक समस्यांवर वडाचे विविध भाग उपयुक्त आहेत.कोणताही वृक्ष औषधनिर्मितीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणास्तव तोडणे अयोग्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सणांच्या माध्यमातून त्याची जोपासना करण्याची उक्ती आपल्या पूर्वजांनी योजली होती .
तर मग चला वडाचे झाड लाऊन त्याचि जोपासना करून साजरी करुया यावर्षीची वट पौर्णिमा.
* आपला धर्म, आपली संस्कृती, आपले सण व आपली परंपरा नीट जाणून समजून घ्या . त्यांचा अभिमान बाळगा.

 

यावर्षीच्या वटपौर्णिमे विषयीचा खुलासा –

यावर्षी (शके-१९४१, इ.स. २०१९) ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी दुपारी ०२. ०१ पर्यंत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र शु. १४ रविवारी दिलेली आहे. सुर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक (२ तास २४ मि.) व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे असे वचन आहे. दि. १५ जून रोजी रविवारी ज्येष्ठ शु. १४ दुपारी ०२. ०१ मि पौर्णिमा सुरु होत असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायान्हकाळी ६ घटीपेक्षा (२ तास २४ मि.) अधिक आहे म्हणून दि. १५ जून रोजी वटपौर्णिमा दिलेली आहे. वटपौर्णिमा दिलेल्या दिवशी सकाळी जरी चतुर्दशी तिथी असली तरीही सुर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी सुमारे १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. तेंव्हा शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शु. १४ रविवारी दि. १५ जून रोजी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे.

 

– दाते पंचांग

  • संदर्भ – व्रतराज 
    धर्मशास्त्रीय निर्णय 

इति शुभं भवतु !

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Uttam Gawade

Shri Uttam Gawade

Astrologer And Vastu Consultant

uttam239@gmail.com

9901287974

 

अधिक मास – हिंदु कालगणणेचे एक वैशिष्ट्य

यावर्षीच्या पंचांगावर नजर टाकल्यास लक्ष्यात येईल की, हे मराठी (हिंदू) वर्ष १३ महिन्यांचे आहे. यात ज्येष्ठ अधिक मास म्हणून दिला आहे, व या अधिक मासामुळेच होळी-गुढी पाडवा हे सण जरा लवकर आले व आता वट पौर्णिमा, श्रावण यापुढचे सर्व सण जरा उशीरा येत आहेत. तर हा अधिक मास काय असतो? तो कसा येतो ? व त्याचे महत्व काय हे पाहू.

आपली हिंदू कालगणना ही निसर्गाशी निगडीत कालगणना आहे. ही कालगणना पूर्णपणे पृथ्वी, सूर्य व चंद्र यांच्या गतिवर आधारलेली आहे. आपल्या कालगणनेप्रमाणे एका वर्षात २ अयने, सहा ऋतू व १२ महिने होतात. आपले सर्व धार्मिक सण व प्रथा या अयन व ऋतूंवर आधारीत आहेत. ऋतूंचा मानवाच्या आरोग्यावर खूपच परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या आरोग्याचे संतुलन योग्य राखण्याचे काम आपल्या सणांद्वारे होते. अशी योजनाच आपल्या पूर्वाचार्यानी करून ठेवली आहे. ऋतू -सण-आहार असा हा मेळ घातला गेला आहे.

आपल्या पंचागात व्यवहारासाठी चांद्रमास वापरण्यात येतात, एक चांद्रमास हा २९.५३ दिवसांचा असतो. याप्रमाणे एक चाद्रवर्ष ३५४ दिवसांचे होते. तर एक सौर वर्ष ३६५ दिवसाचे असते. सौर वर्ष म्हणजे सुर्याला राशीचक्राचे भ्रमण पूर्ण करावयास लागणारा काळ.(पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षणा पूर्ण करावयास लागणारा काळ.) सौर वर्ष व चांद्रवर्ष यात दर वर्षाला ११ .२५ दिवसाच फरक पडतो. असा हा फरक दर ३२ महिन्यानंतर एक महिना वाढवून पुन: पुर्ववत केला जातो. या वाढवलेल्या महिन्यासच अधिक मास म्हणतात. या अधिक महिन्यामुळे चंद्रवर्ष सौरवर्षापेक्षा लहान असूनही ते सौर वर्षाच्या कधिच पुढे जात नाही. व यामुळेच आपले सर्व सण विशिष्ट ऋतूमधेच येतात. नाहीतर आपले गणपतीही १२ महीने फिरले असते. सण व ऋतूंचे संबंध येथे योग्य प्रकारे साधले जातात. असा हा अधिक मास. अधिक मास असलेले हे वर्ष १३ महिन्यांचे असते. याचे काही नियम आहेत.

रवि एक रास बदलून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हणतात. अशा प्रत्येक चांद्र मासात रवीच्या एक एक संक्रांती होतात.

एकाच संक्रांतीने रहित जो शुक्लपक्षादिक चंद्रमास तो मलमास. – निर्णयसिंधु

एकाच संक्रांतीने रहित याचा अर्थ ज्यात संक्रांत नाही व ज्यात दोन संक्रांत आहेत तोही मलमास जाणावा. मलमास दोन प्रकारचा आहे एक अधिक मास व दुसरा क्षय मास. ज्यात दोन संक्रांत होतात तो क्षय मास व ज्यात संक्रांत नाही तो अधिक मास.
यालाच “श्रीपुरुषोत्तम मास ” असेही म्हणतात. याशिवाय याला ’मलमास’ , ’मलिम्लुच मास’ असेही संबोधतात.
सूर्य प्रत्येक महिन्यात एकेका राशीत असतो या बारा राशी प्रमाणे त्या त्या सूर्याला काही नांवे दिली आहेत ती चैत्रादी नांवे अशी वरूण, सूर्य, भानु, तपन, चण्ड, रवि, गभस्ति, आर्यमा, हिरण्यरेता, दिवाकर, मित्र आणि विष्णू . पण अधिक मासातील सूर्याला मात्र कोणतेही नांव नाही म्हणून या मासाला ’मलिम्लुच मास ’ असे म्हणतात.

साधरणत: फल्गुन ते अश्विन हे महिनेच अधिक मास होऊ शकतात. अधिक मास दर ३२.५ महिन्यानी येतो म्हणजेच दर तिसऱ्या वर्षी अधिक मास येतो. दोन अधिक मासामध्ये कमीत कमी २५ तर जास्तीत जास्त ३५ महीन्यांचे अंतर असते.

क्षय मास म्हणजे एक महिना कमी होतो पण क्षय मासाच्या पुर्वी व नंतर असे दोन अधिक मास होतात तेव्हा ते वर्षही १३ महिन्याचेच असते. कार्तिक, मार्गशिर्ष व पौष महिन्यात रवीची गति जास्त असते त्यामुळे गणिताने फक्त हे महीनेच क्षय मास होऊ शकतात. भास्कराचार्यांच्या म्हणण्यानुसार (शके १०७२) पूर्वी शके ९७४ ला क्षय मास येऊन गेला. पुढे १११५, १२५६ व १३७८ ला क्षयमास येईल. क्षयमास हा बहुदा १४१ वर्षानी किंवा क्वचित १९ वर्षानी पुन:पुन्हा येतो. असा सामान्य नियम आहे.

अधिक मासात कोणती कर्मे करावी व कोणती कामे करु नये या संबंधात लोकांमध्ये संभ्रम असतो. याकरीता अधिक मासात कोणती कर्मे करावी कोणती कामे करु नये या संबंधी ही माहीती.

अधिक मासात फल प्राप्तीची अपेक्षा ठेऊन करावयाची सर्व कामे वर्ज्य आहेत व फल प्राप्तीची अपेक्षारहित सर्व कामे (निष्काम) करता येतात. असा हा अधिक मास धर्मशास्त्र व पुराणात अतिशय पवित्र म्हणून वर्णिला गेला आहे.

अधिक मासात कोणती कर्मे करावी

नित्य व नैमित्तिक कर्मे करावी. जे केल्यवाचून गति नाही अशी कामे करावी. देवाची पुन:प्रतिष्ठापना करता येते, ग्रहणश्राध्द, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करता येतात. मन्वादि व युगादिसंबंधी श्राध्दादि कृत्ये केल्यास चालतात. तीर्थयात्रा, दर्शश्राध्द, नित्यश्राध्दही करावे. 

अधिक मासात कोणती कर्मे करु नये

काम्यकर्मांचा आरंभ व समाप्ती करू नये. पूर्वी कधी न केलेली तीर्थयात्रा, महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ व वास्तुशांति, संन्यासग्रण, नूतनव्रतग्रहण दीक्षा, विवाह, उपनयन (मुंज), चौल, देवताप्रतिष्ठान करु नये.

अधिक मासांत व्रते –

अशा या अति पवित्र व महत्वाच्या महीन्यात केलेले पुण्य अक्षय होते, या महिन्यात केलेल्या व्रताना अधिक महत्व प्राप्त होते म्हणूनच या महिन्यात काही विशिष्ट व्रते, व दाने करावयास शास्त्रात व पुराणात सांगितले आहे.

पुरुषोत्तममास व्रत – भविष्यपुराणात या व्रताविषयी श्री कृष्णांनी सांगितले आहे की, याचा फलदाता, भोक्ता आणि अधिष्ठाता सर्व काही मीच आहे.(म्हणूनच याचे नांव पुरुषोत्तम आहे.) या मासात केवळ ईश्वरच्या उद्देशाने जे लोक व्रत , उपवास, स्नान , दान किंवा पुजा अर्चा करतात त्याचे त्यांना अक्षय फल मिळते. या व्रताने संपूर्ण अनिष्ठ नष्ट होते.

मलमास व्रत – देवी भागवतात याचे वर्णन आहे. या महीन्यात दान पुण्य किंवा शरिर पोषण जे काही कराल त्याचे अक्षय फल मिळते. जर सामर्थ्य नसेल तर साधु संतांची व ब्राम्हणांची सेवा करावी. पुण्य कर्मासाठी खर्च केलेले धन हे कमी न होता वाढते जसे अणु समान वट वृक्षाचे बीज अक्षय वृक्षात रुपांतरीत होते. मलमासात केलेले पुण्य कर्मही असेच अक्षय होते.

अधिमासीयार्चव्रत नांवाचे व्रत “पूजापंकजभास्करात” ही दिले आहे. हेमाद्रितही याचे एक व्रत दिले आहे व अपूप दान सांगितले आहे. पुत्रपौत्र व विपुल संपत्ति प्राप्त होते असे सांगितले आहे.

हे व्रत मनुष्याच्या संपूर्ण पापांचे हरण करणारे आहे. यात एकभुक्त, नक्त अथवा उपवास व भगवान सूर्याचे पूजन कास्य पात्रातून अन्न (अपूप) व वस्त्रादि दान केले जाते. प्राचिन काळी नहुष राजाने इंद्रत्व प्राप्तीच्या गर्वाने आपल्या पालखीला वाहण्या करिता महर्षी अगस्तींना नियुक्त करुन सर्प ….सर्प (चल ..चल ) असे म्हणून त्याना हिनवले होते. त्याच्या या दुष्टपणामुळे तो स्वत: साप बनला , शेवटी महर्षी व्यासांच्या आदेशानुसार त्याने अधिक मासाचे हे व्रत केले व तो सर्प योनीतून मुक्त झाला.


व्रताचे विधान असे –

अधिक मास आरंभ झाल्यावर सकाळी स्नानादि नित्यकर्मे करुन विष्णूस्वरुप “सहत्रांशु”(सहत्र किरणांनी युक्त असा सूर्य) पूजन करावे. गहू, तूप व गुळानी बनलेले ३३ अपूप (अनरसे) काश्याच्या पात्रातून खालील मंत्र म्हणून दान करावे.

विष्णूरुपी सहत्रांशु: सर्वपापप्रणाशन: !
अपूपान्नप्रदानेन मम पापं व्यापोहतु !!

या व्रताने कुरुक्षेत्रादी स्नान, गो-भू-सुवर्ण दान व असंख्य ब्राम्हण भोजनाचे पुण्य प्राप्त होते. तसेच सर्व प्रकारचे धन धन्य, पुत्र पौत्रांचा लाभ होऊन वंशवृध्दी होते.

अपूप दानाचा संकल्प व विधि दाते पंचागातही (पान २५) दिला आहे.

अधिकमासांत श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित, नक्त अथवा एकभुक्त रहावे.अशक्ताने या चार प्रकारापैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती, निदान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पाप निवृत्ती, मौन भोजन केल्यास पापांचे निरसन होते.अपूप दानाने पुत्रपौत्र व विपुल संपत्ति प्राप्त होते. शक्य असेल त्याने महिनाभर अपूप दान करावे. (अपूप म्हणजे अनरसे.)महिनाभर शक्य नसेल तर निदान कृष्ण व शुक्ल द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीस व वैधृति, व्यतिपात योगावर किंवा यापैकी एका दिवशी अथवा श्रध्दाभाव उत्पन्न होइल त्या दिवशी तरी अपूप दान करावे.

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद

uttam239@gmail.com

9901287974