धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

      आजच्या या भौतिक जगात प्रत्येक व्यक्तीला एक सुखवस्तू जीवन जगण्याची इच्छा नेहमीच होत असते. आजच्या जगात “पैसा” हे जीवन नसले तरी यापेक्षा कमीही नाही. त्यामुळे अधिकधिक धन कमावणारी व्यक्तीच अधिकाधिक सुखवस्तू जीवन जगू शकते. (किमान आज प्रत्येकाची धारणा तरी अशीच आहे.) त्यामुळे आज प्रत्येक जण अधिकाधिक पैसे कमावण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या प्रयत्नाना जर दैवी उपायांची सोबत मिळाली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

आज आम्ही या दिवाळीच्या मुहूर्तावर असे ११ उपाय सांगणार आहोत ज्यामार्फत आपण आपले आर्थिक संकट दूर करून, अपार धन समृद्धी मिळवून धनवान बनू शकता.

 

टीप – केवळ हे उपायच धन मिळवून देऊ शकत नाहीत तर त्यासाठी आपण आपल्या  निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिक मेहनत करीत असणे हि तितकेच गरजेचे आहे.  व्यावहारिक प्रयत्न सोडून उपायांच्या मागे लागून काहीच होणार नाही. आपल्या व्यावहारिक प्रयत्नांबरोबर या उपायांचा वापर करावा हेच योग्य होईल. हे उपाय केवळ दैवी संकटावर मात करण्यात मदत करतील.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

१) अपार धनाची ईच्छा असणाऱ्या व्यक्तींनी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात अथवा कार्यालयात श्रीयंत्राची स्थापना करून नियमित श्रीसुक्तानी त्याची पूजा करावी. शास्त्रानुसार ज्याच्या घरी श्रीसुक्तानी श्रीयंत्राची नियमित पूजा होते तेथे नेहमी धन व समृद्धीची वृद्धी होत राहते. श्री लक्ष्मी पूजनातील हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

 

२) दिवाळीच्या वेळी लक्ष्मी मंत्राचा कमळाच्या बीजाच्या माळेवर (कमलगट्टा) जप करून श्री लक्ष्मीमातेला कमळाचे फुल अर्पण केल्यास नेहमी लक्ष्मीची कृपा राहते.

 

३) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी ११ पिवळ्या कवड्या श्री लक्ष्मीला अर्पण कराव्यात व दुसरे दिवशी त्या एका लाल कपड्यात बांधून , आपल्या तिजोरी, गल्ला अथवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

 

४) दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली सात दिवे लावून पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्यास कोणत्याही व कितीही मोठ्या आर्थिक संकटातून मुक्तता होते. प्रदक्षिणा घालताना श्री लक्ष्मी-नारायणाच्या मंत्राचा जप करावा.

 

५) दिवाळीच्या दिवशी श्री लक्ष्मी देवीला तुळशीच्या पानांचा हार अर्पण केल्यास, श्री लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावल्यास व पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास दारिद्य दूर होते.

 

६) लक्ष्मी पूजनाच्या वेळी कुबेराच्या पूजनाचेही अतिशय महत्व आहे. कुबेर यंत्र अथवा कुबेराची प्रतिमा पुजून, कुबेर मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप केल्यास धनवृद्धी होते. 

 

७) (व्यापाऱ्यांसाठी)  – दिवाळीच्या पूजनानंतर सायंकाळी उजव्या हातात एक अखंड सुपारी व एक चलनी नाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन, नमस्कार करून मागे न बघता यावे, दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन त्याच पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून आणावे व ते पान आपल्या गल्ल्यात अगर तिजोरीत ठेवावे. ग्राहकांची वाढ होईल व आर्थिक आवक वाढेल.  

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

८) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी वापरलेल्या अक्षता एका नव्या पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास वर्षभर पैशाची तंगी जाणवणार नाही, हा उपाय दरवर्षी करावा, आदल्या वर्षीच्या अक्षता कपड्यासकट वाहत्या पाण्यात सोडाव्यात. 

 

९) दिवाळीत लक्ष्मी पूजनानंतर मध्यरात्री  “ॐ श्रीं ऐश्वर्य लक्ष्मै ह्रीं नम:” हा मंत्र अष्टगंधाने डाळिंबाच्या लेखणीने पांढऱ्या कागदावर लिहावा. नंतर याच मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप करावा. कागदाची घडी करून तो चांदीच्या ताईत मध्ये घालून उजव्या दण्डावर अथवा गळ्यात घालावा. किंवा चांदीच्या डबीत घालून तिजोरीत ठेवावा. यामुळे धनप्राप्तीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती सुधारेल.

 

१०) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ११ काळ्या गुंजा पूजेत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी शुचिर्भूत होऊन त्या गुंजा एका पांढऱ्या पिशवीत घालून तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास श्री लक्ष्मीचा वरदहस्त निरंतर राहील.

 

११) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी आंब्याच्या झाडावरील बांधा (बांडगुळ) जर पूजन करून  तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास अशा घरात  श्री लक्ष्मीचा निरंतर वास राहतो.

 

वरील प्रयोग करताना श्रद्धा व सबुरी अत्यंत आवश्यक असेल. वरील उपाय पूर्ण श्रद्धेने करून फलप्राप्तीसाठी थोडा धीर धरावा. काहींचा अनुभव तात्काळ तर काहींचा थोड्या कालांतराने येतो.  आपल्याला आलेले अनुभव आम्हाला जरूर कळवावेत.

आमच्या समस्त वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्यावर व आपल्या परिवारावर आई लक्ष्मीची कृपादृष्टी निरंतर राहो हीच सदिच्छा !


हे लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Success Mantra – यश मंत्र

Jyotish jagat

Jyotish jagat

नमस्कार,
आमच्या या वेब साईट वर ” Yash Mantra (यश मंत्र)” हे सदर आम्ही सुरु करीत आहोत. यामध्ये आम्ही जीवनात यशस्वी कसे बनावे, श्रीमंत कसे बनावे, नेतृत्व गुण विकसित करुन यशस्वी नेता अगर प्रशासक कसे बनावे यासंबंधात काही मुलभूत पण महत्वच्या विषयांवर लेख माला सुरु करणार आहोत.
इथे श्रीमंती याचा अर्थ केवळ पैसा कमावणे इतकेच नाही तर आरोग्य, नातेसंबंध (वैयक्तिक व सामाजीक) व अर्थिक या तिनही स्तरावर सशक्त व समाधान स्थितीत असणे होय. एखाद्याकडे भरपुर संपत्ती आहे पण आरोग्य चांगले नसेल तर ती व्यक्ती त्या संपत्तीचा उपभोग घेण्यास असमर्थ ठरते हीच गोष्ट नातेसंबंध नीट नसतील तरीही होते.
आमच्या या लेख मालेतून शारिरीक व मानसिक आरोग्य कसे प्राप्त करावे, वैयक्तीक व सामाजीक नातेसंबंध उत्तम कसे बनवावे, नेतृत्व गुण कसे विकसित करावे, अर्थिक स्थिती कशी मजबूत बनवावी, विचार करण्याची दिशा काय व कशी असावी, या संबंधात विचार मांडणार आहोत. आमच्या या लेख मालेचा जर कोणा एकालाही जरासा जरी फायदा झाला तरी आम्ही आमचा उद्येश यशस्वी झाला असे समजू शकतो.

——-
टिम- ज्योतिष जगत.