Cards Spread beautifully

Whenever we come across Tarot reading, we observe that the Reader use different techniques to handle the cards for different types of readings.

We see that the cards are shuffled first. Then they are spread and ask the reader to select few numbers of cards. Then these cards are laid down in the desired and required manner.

We find different number of cards in different patterns. Sometimes the cards are laid down horizontally or vertically, sometimes in a curved manner, sometimes the cards even cross over each other.

These special patterns of laying down the cards are referred as cards SPREADS in the world of Tarot.

Celtic-Cross Jyotish Jagat

Celtic-Cross Jyotish Jagat

Tarot spreads play a very significant role in cards reading. The pattern we select, the number of cards used in the selected pattern, the way we lay down the cards in this pattern, each step holds its own significance.

Getting over the spreads is not a job of day or two. Each book providing information about Tarot also provides basic knowledge of Tarot spreads. There are also the books available which explain the Tarot spreads with number of examples. I personally appreciate the book TAROT SPREADS by Barbara Moore.

Tarot Spreads is the most wonderful part of Tarot reading. All the books explaining spread gives the explanation about the spreads to be used for the particular question. We find right from basic PAST-PRESENT-FUTURE 3 cards spreads up to the traditional CELTIC 10 cards spreads. Apart from this we find many different spreads like HORSE SHOE spread, HEALTH spread, LOVE spread and so on.

If we think deeply, we find that these books explain the spreads which works best for the author or for that particular reader. In the field of Tarot we have vast opportunity to enhance and enrich our creativity. We can create our own new spreads. Initially start with single card, and then gradually go on increasing the number of cards in your readings. Think deeply on the question, see all the aspects to be considered in the particular reading, follow your intuitions and start laying the cards in the particular patterns. Let the cards spreads in the way your heart guides them. And then the miracles happen, the divine plays its role, and our Tarot guides us on the right path.

Make a note of each spread you use for the particular reading in your journal. In a course of time you will find that you have your own collection of Tarot Spreads.

Thanks to the DIVINE

Thank you Thank you Thank you

 


Vrushali N

Vrushali N

Tarot Reader

9663454836

vrushalivs@gmail.com

 

शनि महात्म्य आणि साडेसाती

मागच्या  वर्षी शनि जयंती निमित्त “शनिची साडेसाती शोध आणि बोध ” हा लेख लिहीला होता. त्यात साडेसाती म्हणजे काय ? ती कोणाला शुभ व कोणाला अशुभ असू शकते. त्यावरील उपाय व त्याबद्यलचे गैर समज यावर विचार मांडला होता. माझ्या ब्लॉगवरील तो आतापर्यंत सर्वात जास्त वाचला गेलेल्या लेखापैकी एक आहे. यावर्षी शनीच्या राशी पालटा निमित्त “शनिमहात्म्य आणि साडेसाती” याविषयी थोडा वेगळा विचार मांडत आहे.

 

अध्यात्म ज्योतिषशास्त्र दृष्ठ्या शनि-

अध्यात्म ज्योतिषशास्त्रात शनिला कर्म विपाककारक ग्रह मानलेले आहे. शनिचे महत्वच असे आहे, इतर कोणत्याही ग्रहांचे महात्म्य वर्णन करणाऱ्या पोथ्या नाहीत केवळ शनि महात्म्यच अस्तित्वात आहे यातच सर्व काही आले.

शनि महात्म्य आणि त्याचा संदेश –

त्याची दृष्टी पडे जयावर ! करी तयाचा चकनाचूर !
अथवा कृपा करी जयावर ! तयासी सर्व आनंदच प्राप्त होय !!
दृष्टीचा ऐका चमत्कार ! जन्मला जेंव्हा शनैश्वर !
तेंव्हा दृष्टी पडली पित्यावर ! तेणे कुष्ठ भरला सर्वांगी !!
पित्याच्या रथी होता सारथी ! तो पांगुळा झाला निश्चिती !
अश्वांचिया नेत्रांप्रती ! अंधत्व आले तत्क्षणी !!

            असे शनीचे वर्णन केले आहे शनी महात्म्यामध्ये. हे वर्णन वाचल्यावर कुणालाही शनी व शनीच्या साडेसातीची भिती वाटणे साहजीकच आहे. साडेसाती म्हणजे त्रास, साडेसाती म्हणजे अधोगती, साडेसाती म्हणजे नुकसान, साडेसाती म्हणजे आता काहीतरी वाईटच, भयंकर असे घडणार अशी भीती बऱ्याच लोकांच्या मनात येते. पण वरील वर्णनातील “अथवा कृपा करी जयावर ! तयासी सर्व आनंदच प्राप्त होय !! ” या ओळींकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही असे दिसते. शनी जेंव्हा एखाद्याला शुभ असतो तेंव्हा तो भरभरून देतो, कशाचीही कमतरता भासू देत नाही. व्यक्तीला नशीबाची नेहमी साथ लाभते. ही शनीची दुसरी बाजू आहे.


साडेसातीत शनी महात्म्य ही पोथी वाचण्याची प्रथा आहे, त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो असे समजले जाते. शनी महात्म्य ह्या पोथी मध्ये एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. त्याचे प्रमुख पात्र आहे राजा विक्रम. या कथेत शनी राजा विक्रमाला साडेसातीत अनेक प्रकारच्या यातना भोगावयास भाग पाडतो. त्या सर्व यातना भोगताना सुध्दा राजाने आपला संयम, सत्वगुण व विवेक सोडला नाही. लोभ, लालच व कामविकार यांचा त्याग केला. राजा विक्रम हा शनि महात्म्याचे माध्यम आहे, कोणत्याही व्यक्तीने मस्तपणा, टिंगळ टवाळी, माज, गर्व, मत्सर हे कुठल्याही परिस्थितीत करू नये हेच या राजा विक्रमाच्या कथेच्या माध्यमातून शनि महात्म्यकारास सांगायचे आहे. यातून प्रत्येकाने हा बोध घेऊन आपले आचरण शुध्द व सात्विक ठेवावे, तरच साडेसातीची तीव्रता कमी होईल. केवळ पोथी वाचून काही होणार नाही.

साडेसाती म्हणजे मनाविरुध्द घडणाऱ्या घटनांचा काळ असा समज आहे पण वास्तविक पाहता शनीची साडेसाती ही व्यक्तीला सहनशील, धार्मिक, दानशील व कर्मशील बनवते. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. याकाळात व्यक्तीला आपल्या परक्याची जाणीव होते. स्वत:चे गुण दोष लक्षात येतात, गर्व हरण होते, अहंकार गळून पडतो. माणूसकीची जाणीव होते. एक माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कामांची फळे साडेसातीत मिळताना दिसतात.

वरील विवेचनावरुन हे लक्षात येते की साडेसाती म्हणजे एक सत्व परीक्षाच असते. साडेसाती म्हणजे आपण केलेल्या कर्मांचे फळ मिळण्याचा कालखंड. जर आपण चांगले कर्म केले असतील तर साडेसातीच्या काळात भाग्योदय होईल, उत्कर्ष होईल, उच्च पद प्राप्ती होईल, आपण ठरवलेले ध्येय- लक्ष साध्य होईल आणि जर का वाईट कर्मे केली असतील अथवा हातून घडली असतील तर त्रास, नुकसान, अपयश सहन करावे लागेल, नोकरी व्यवसायात पिछेहाट होईल. मग या व्यक्तीनी अशा घटनानी खचून न जाता यातून काही बोध घ्यावा. इतकेच.

कर्म तैसे फळ ! लाभते केवळ !
आणि कां तें ! दोष लावू नये !
पेरोनिया साळी ! गव्हाचे ते पीक !
घ्यावया नि:शंक धावू नये !
पहावे ते दिसे ! दर्पणीं साचार !
आपुला आचार ओळखावा !
स्वामी म्हणे होसी ! सर्व थैव जाण !
तुझा तूं कारण ! सुखदु:खा !

                                                                   -स्वामी स्वरुपानंद.

(* या लेखातील काही भाग, भाग्यसंकेत २००० च्या दिवाळी अंकातील स्व. श्री म. दा. भट यांच्या लेखातून घेतला आहे.) 

*हा हि लेख वाचा शनिची साडेसाती शोध आणि बोध 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

 


 

Uttam Gawade

 

श्री उत्तम गावडे
ज्यो. विशारद, वास्तु विशारद
9901287974, 8722745745


शनिची साडेसाती शोध आणि बोध

शनि म्हटल्यावर आठवते ती शनीची साडेसाती! शनिच्या साडेसातीबद्यल जनमानसात अनेक प्रकारच्या गैरसमजूती पसरल्या आहेत. साडेसाती खरोखरच इतकी अशुभ असते का ? तर उत्तर असेल “नाही”. पण हा एक विशिष्ट प्रकारच काळ मात्र नक्कीच असतो, व त्याला थोड्या अध्यात्मिक दृष्टीनेही पहावे लागेल. अध्यात्म ज्योतिषशास्त्रात शनिला कर्म विपाककारक ग्रह मानलेले आहे. शनिचे महत्वच असे आहे, इतर कोणत्याही ग्रहांचे महात्म्य वर्णन करणाऱ्या पोथ्या नाहीत केवळ शनि महात्म्यच अस्तित्वात आहे यातच सर्व काही आले.


शनि हा पाप ग्रह समजला जतो तो भले करण्याऐवजी वाईटच जास्त करतो असे जे चित्र उभे केले आहे ते तितकेसे खरे नाही. थोडे निरिक्षण केल्यास हे दिसून येते की शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुध्द करणारा, मनातील घाण व कुविचार काढून टाकून उच्च प्रतिला घेऊन जाणारा ग्रह आहे. शनि हा गर्व, अहंकार, पूर्वग्रह यांना दूर करून माणसाला माणूसकी शिकवतो, अंतरंगातील उच्च गुणांची ओळख करून देतो हा सत्यवादी पण निष्ठूर ग्रह आहे. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक आहे. जे शिस्तबध्द, विनयशिल व नम्र आहेत त्यांना उच्च पदाला घेऊन जातो तर जे अहंकारी, गर्विष्ठ व स्वार्थी आहेत त्यांना त्रास देतो. वास्तविक पाहता शनीची साडेसाती ही व्यक्तीला सहनशील, धार्मिक, दानशील व कर्मशील बनवते. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. याकाळात व्यक्तीला आपल्या परक्याची जाणीव होते. स्वत:चे गुण दोष लक्षात येतात, गर्व हरण होते, अहंकार गळून पडतो. माणूसकीची जाणीव होते. एक माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कामांची फळे साडेसातीत मिळताना दिसतात.


ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या शुभ (गुण) व अशुभ (दोष) अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा केवळ शुभच असतो असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्याही दोन बाजू आहेत पण शनिची फक्त एकच बाजू विचारात घेतली जाते म्हणूनच लोकांच्या मनात शनिविषयी भीती निर्माण होते.

शनिचे गुण – न्यायीपणा, क्षमाशील, नि:स्वार्थ, व्यवहारी, जबाबदारीची जाणीव, कडक शिस्त, वैराग्य, नम्रता, इंद्रायावर ताबा असणे, कष्टाळू, सहनशील, चिकाटी, विचारी, गंभीर, दयाळू, निष्ठावान, सेवावृत्ती, नीतीने वागणारा, कर्तव्यनिष्ठ, स्थिर, शुध्द नैतिक आचरण, कायद्याने वागणारा, विचारवंत, आशावादी.

शनिची दोष- अक्षमाशील, खूनशीपणा, क्रूर, निर्दयी, निरुद्योगी, निराशावादी, उदास, हटी दुराग्रही, चंचल, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, दुसऱ्यांची टिंगल- टवाळी करणारा, गलिच्छ- अस्वच्छ, अनितीने वागणारा, लाचार, जुगारी, दारूडा, नशा करणारा, व्यसनी, तामसी, पर निंदा करणारा, अस्थिर, अनैतिक आचरण, बेकायदेशीर कर्म करणारा.
ज्यावेळी आपण म्हणतो की, एखाद्याला शनि शुभ आहे तेव्हा त्याचा अर्थ असतो कि त्या व्यक्तित शनिचे गुण आहेत व ज्यावेळी म्हणतो की, एखाद्याला शनि अशुभ आहे तेव्हा त्याचा अर्थ असतो कि त्या व्यक्तित शनिचे दोष आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, शनिला शुभ, अनुकुल बनवायचे असेल तर आपल्या स्वभावात बदल घडवून शनिचे गुण अंगिकारले पाहीजेत. स्वभाव बदलणे हे १००% शक्य नसले तरी “बहुगुण: अल्पदोष:” हे तर करु शकतोच.वरील विवेचनावरुन हे लक्षात येते की साडेसाती म्हणजे एक सत्व परिक्षाच असते. साडेसाती म्हणजे आपण केलेल्या कर्मांचे फळ मिळण्याचा कालखंड. जर आपण चांगले कर्म केले असतील तर साडेसातीच्या काळात भाग्योदय होईल, उत्कर्ष होईल, उच्च पद प्राप्ती होईल, आपण ठरवलेले ध्येय- लक्ष साध्य होईल आणि जर का वाईट कर्मे केली असतील अथवा हातून घडली असतील तर त्रास, नुकसान, अपयश सहन करावे लागेल, नोकरी व्यवसायात पिछेहाट होईल. मग या व्यक्तीनी अशा घटनानी खचून न जाता यातून काही बोध घ्यावा. इतकेच.


साडेसातीच्या काळात अनेक उपाय सुचवले जातात, शनिमहात्म्याचे पठण, शनि स्तोत्रावे पठण, तीळ उडिद , कंबळ, छत्री चप्पल यांचे दान, शनिचे दर्शन, शनि अथवा मारुतीला रुई व तेल वाहणे इ. व बरेच लोक ते करतातही. तसे पाहता तंत्र,मंत्र, दान,स्नान, होमहवन, पूजा अर्चा, अनुष्ठान उपवास जप तप हे सर्व बाह्य उपचार आहेत या साऱ्यांचा फायदा तेंव्हांच होईल जेंव्हा आपण आपल्या स्वभावात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करु. अन्यत: अंतर्मनाच्या शुध्दीशिवाय बाह्य उपचारांने काहीही होणार नाही. तसेच वरील बाह्य उपचार हे भक्तीभावाने व श्रध्देने व्हावेत केवळ साडेसातीच्या भीतीने नको. इतकेच…

*हा हि लेख वाचाशनि महात्म्य आणि साडेसाती

इति शुभं भवतु !

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Uttam Gawade

श्री उत्तम गावडे
ज्यो. विशारद, वास्तु विशारद
9901287974, 8722745745

 

 

 

धनत्रयोदशी – धनतेरस

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस यादिवशी चांगल्या आरोग्यासाठी देवांचे वैद्य श्री धन्वतरीं चे पूजन करावे सांगितले आहे. कारण उत्तम आरोग्य हेच खरे धन समजले जाते. या दिवशी दिवाळीची खरेदी केली जाते, खास करून चांदीच्या वस्तू या दिवशी खरेदी करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशी या सणामागे एक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात.  या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. यावेळी आणि यमाने असा वरदान दिला  कि, अश्विन कृष्ण त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या पाच दिवसात जे लोक आपल्या परिसरात दिवे लावून रोषणाई करतात त्यांना “अपमृत्यूचे”  भय नसेल.   अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. धनत्रयोदशी बद्दल अजून एक कथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

*आपल्या सर्वाना धनत्रयोदशी व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास व आपल्या परिवारास हि दिवाळी आरोग्यदायक तसेच सुख , समृद्धी व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !*
www.jyotishjagat.com

ज्योतिष, वास्तुशास्त्र व धर्मशास्त्र याविषयीचे दर्जेदार व माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नियमित भेट द्या.

धन्यवाद !

ज्योतिष जगत

 

हा लेख हि वाचा ………

 

गोवत्स द्वादशीवसुबारस

आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमा

त्रिपुरी पौर्णिमाकार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

गोवत्स द्वादशी – वसुबारस

क्षीरोदार्णवसंभूते सुरासुरनमस्कृते !!
सर्वदेवमये मातर्गृहाणार्ध्यं नमो नम: !!

दिवाळी हा हिंदू धर्मातील एक मोठा व महत्वाचा सण मानला जातो. याला दिपोत्सव, दिपमाला अथवा दिपावली अशा नावानेही संबोधले जाते. अंधाराचा नाश करुन प्राकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिप हा मांगल्याचे प्रतिक मानले जाते. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दिपोत्सव साजरा केला जातो. आपल्या कृषीप्रधान देशात निसर्गाने पावसाळ्यात भरभरुन देलेल्या समृद्धीचा आनंद कृतज्ञतापुर्वक साजरा करण्याचा सोहळा म्हणजे दिवाळीचा उत्सव. अश्विन कृष्ण त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशी (धनतेरस) ते कार्तिक शुद्ध द्वितियेपर्यंत भाऊ बीज (यमद्वितीया) हा उत्सव चालतो.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

पण वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो;  याची सुरवात होते ती अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस याला वसुबारस असेही म्हणतात. आपली कृषीप्रधान संस्कृती असल्याने या दिवसाला अधिक महत्व आहे. आपल्या येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. गाय हि गोधन म्हणजेच धन आणि समृद्धीचे  प्रतीक आहे. तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.  या दिवशी सायंकाळी गायी चरुन परत आल्यावर, घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून सवत्स(वासरासहीत) गायीची गंध-पुष्पमालानी पुजा केली जाते. तांब्याच्या पात्रातून फुले, अक्षता व तिळ घेऊन अर्ध्य दिले जाते.

आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य, धन-संपत्ती व समृद्धीचा लाभ व्हावा या इच्छेने जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व आपली सर्व मनोरथे पूर्ण करण्याची प्रार्थना करतात . समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यांतील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात.  घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या  पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. या दिवसापासून रांगोळी काढण्यास सुरुवात होते. यानंतर पुढचे काही दिवस लक्ष्मीच्या स्वागतासाठी अंगणात दिव्यानी रोशनाई करुन, सुंदर रांगोळ्या काढून प्रसन्न वातावरण निर्माण केले जाते.

*अशा या पवित्र गोवत्सद्वादशीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !*

*रोषणाईचा हा सण आपल्या जीवनात धन समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा !*

 

हा लेख हि वाचा ………

 

आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमा

धनत्रयोदशीधनतेरस

त्रिपुरी पौर्णिमाकार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?


संकलित – ज्योतिष जगत

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

पाश्चिमात्य ज्योतिष शस्त्राचा इतिहास

मागच्या दोन भागात आपण भारतीय ज्योतिष शास्त्राचा इतिहास भाग १भाग २ पहिला. आता पाश्चिमात्य ज्योतिष शस्त्राचा इतिहास पाहू.

ख्रितापूर्वी सुमारे ३ हजार वर्षे मेसोपोटेमियामध्ये सुमेरियन लोक ज्योतिषाचा अभ्यास करु लागले. त्यांच्याकडून खाल्डियनांनी हा वारसा घेतला. उर, उरूक, बॅबिलोन व इतरत्र त्यांनी ग्रहवेध घेण्यासाठी उंच उंच मनोरे बांधले त्यांनी तयार केलेल्या कोष्टकांचा आधार ग्रिकांनी घेताला. अरबांमार्फत हे ज्ञान भारत, तीन, ग्रिस, इजिप्त, मेक्सिको इत्यादी देशात पसरले असा पाश्चात्यांचा अभ्रिप्राय आहे. (मुळात अरब हा शब्द संस्कृत आहे. अरब म्हणजे अश्व. राशी चक्रासाठी वापरला जाणारा झोडाईक हा शब्दही संस्कृत अपभ्रंश आहे.) टॉलेमी या ग्रीक ज्योतिषाने १ ल्या शतकात द आल्माजेस या ग्रंथात रवि, चंद्र व ग्रहांच्या गतीविषयक नियम  दिले. टेट्राबिब्लास हा त्याचा दुसरा ग्रंथ. हिपार्कस या ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील ज्योतिर्विदाचा तसेच बेरॉसोस या खाल्डियन ज्योतिर्विदाने लिहिलेला (ख्रि.पू.२८०) बबिलोनियाका हा ग्रंथ बहुधा त्याचा मार्गदर्शक ठरलेला असणार. ग्रीक तत्त्वज्ञ पायथॅगोरस , प्लॅटो, ऍरिस्टॉटल यांचा ग्रह परिणामांवर विश्वास असल्याने खाल्डियन ग्रहगणित स्विकारणे ग्रीकांना सोपे गेले. रोमनांनी ग्रीकांकडून हा वारसा घेताना ग्रहांची नावे आपल्या देवतांनुसार बदलली व  तीच रोमन नावे सध्या पाश्चिमात्यात वापरली जातात.

ख्रिशचनांनी सुरुवातीला ज्योतिष हे दैववादी आहे असे मानून त्याविरुद्ध काही उपाय अधूनमधून केले. परंतु टॉलेमीच्या ग्रंथामुळे चौथ्या शतकानंतर पाश्चिमात्यात ज्योतिषाला शास्त्रीयतेचा दर्जा प्राप्त झाला. युरोपमधील अनेक राजे, संत, पुरुष, धार्मिक नेते, विचारवंत यांचा ज्योतिषावर विशवास होता व विद्यापीठात हा विषय होता. न्युटन गणिताकडे वळला कारण ज्योतीषावर त्यावा विश्वास होता. गेल्या तीन शतकात मात्र पाश्चात्य विद्यापीठातून आणि संशोधकांच्या वर्तुळातून ज्योतिषाची हाकलपट्टी* होऊन ज्योतिष हे अंधश्रद्धा मानले जाऊ लागते. परंतु याच बरोबर लोकांमध्ये ज्योतिषाचे आकर्षण खूपच वाढले असून ज्योतिर्विदांच्या संघटना ठिकठिकाणी निघाल्या आहेत. अनेक विचारवंत, विशेषत: डॉक्टर व मानस रोगतज्ञ, ज्योतिषाचा व हस्तसामुद्रिकाचा अभ्यास व प्रसार करु लागल्याने ज्योतिष हा पुन्हा पाश्चात्य विश्वविद्यालयातील अभ्यासविषय ठरेल अशी चिन्हे आहेत.

पाशचात्य व भारतीय ग्रंथांंमध्ये फरक नाही. राशी, ग्रह, ग्रहयोग, भाव हा ढाचा ९० टक्के सारखा आहे. राशी चक्राच्या आरंभबिंदूबद्दल वैचारिक भेद आहे तो तांत्रिक स्वरुपाचा आहे. ज्योतिष विषयाचा अभ्यास अगदी  प्राचीन कालापासून सर्व देशात पद्धतशीरपणे होत आहे. त्यावर सहस्त्रावधी ग्रंथ लिहिले गेले आहेत. इतर अनेक शास्त्रांपेक्षा ही ग्रंथसंख्या अधिक आहे. अनेक भारतीय विद्यापीठात ज्योतिषशास्त्र हा विषय या ना त्या स्वरुपात सध्याही आहे.

 

** हे हि वाचा……

भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – भाग -१

भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – भाग – २


साभार –  ज्योतिष सोबती – ज्योतिष संशोधन मंडळ डोंबिवली प्रकाशित

मूळ संदर्भ – भारतीय ज्योतिषशास्त्र – अर्थात भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – लेखक स्व. श्री शंकर बाळकृष्ण दीक्षित

भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – भाग – २

सिद्धान्त अथवा ज्योतिर्गणित –    

ज्योतिर्गणितात अगदी पहिले ज्ञात ग्रंथ म्हणजे सूर्यासिद्धान्तादि पाच सिद्धान्त होत. वराहमिहिराने पौलिश, रोमक, वसिष्ट, सौर आणि पितामह अशा पाच सिद्धान्तांची नावे दिली आहेत. पूर्ण ज्योतिष ग्रंथ उपलब्ध असलेला वराह मिहिर हा आद्य भारतीय ज्योतिष ग्रंथकार मानला जातो. त्याचे सिद्धान्त, संहिता व होरा या तीन्ही स्कंधावर ग्रंथ आहेत. बृहत संहिता हा त्याचा ग्रंथ म्हणजे भारतातील पहिला विश्वकोषच आहे. दीक्षितांच्या मते त्याचा जन्म शके ४०७ (इ.स. ४८५) आहे. (मात्र काहींच्या मते वराहमिहीर विक्रमादित्याच्या पदरी होता. म्हणजे इसवी सनापूर्वी वराहमिहिर होऊन गेला.) आर्यभट हा वराहमिहिरापूर्वींचा असला तरी त्याचा पूर्ण ग्रंथ उपलब्ध नाही. आपला जन्म शक त्याने ३९८ (इ.स.४७७) दिला आहे.

सांप्रत जो सूर्यसिद्धान्त वापरला जातो तो या नंतरचा असावा. त्याव बरेच टीका ग्रंथ उपलब्ध आहेत, वराहमिहिराच्या ग्रंथावर भटोत्पल याची टिका प्रसिद्ध आहे. ब्रहगुप्त (आद्य बीजगणित ग्रंथकार) याचा शके ५५० मध्ये लिहिलेला, ब्रहसिद्धान्तही प्रसिद्ध आहे. आज आपल्या देशात ज्योतिशास्त्र ज्या रुपात आहे त्याची सर्व अंगे ब्रह्मगुप्ताचे वेळी (इ. स. ६ शे सुमारास) पूर्ण झालेली दिसतात. लल्ल (शके ५६०), द्वितीय आर्यभट (शके ८७५) (याने अयनगतीचे गणित  दिले), भटोत्पल (शके ८८८), श्रीपति (शके ९६१), राजमृगांक (शके ९६४) असे महत्त्वाचे ग्रंथकार भास्कराचार्यापर्यत होऊन गेले. भास्कराचार्य (जन्म शके १०३६ इ. स. ११२४) याचे सिद्धान्त शिरोमणी, करण कुतूहल, लीलावती ग्रंथ आहेत. भासकराचार्य हा बीडजवळ राहणारा. कोकणात नंदिग्रम (सध्या नांदगाव) तेथे राहणारा गणेश दैवज्ञ हा ख्यातनाम असलेला दुसरा महाराष्ट्रीय ग्रंथकार होय. (शके १५००). ग्रहलाघव हा याचा प्रसिद्ध ग्रंथ भारतभर पंचांग तयार करताना वापरला जातो. शके १५८० मध्ये कमलाकर या ग्रंथकाराने ’सिद्धात तत्व विवेक’ हा ग्रंथ लिहिला. त्यात ध्रुव ताऱ्याचे चलन, काही गावांचे अक्षांश-रेखांश, मेघ, गारा, उल्कापात यांची कारणे, गणिताचे नवे प्रकार, इ. भाग आहे. जयसिंग या राजाने (इ.स. १६९३) जयपूर, दिल्ली, उज्जयिनी, काशी, मथुरा तेथे वेधशाळा (जंतर मंतर) उभारल्या. इंग्रज अमदानीत, नृसिंह उर्फ बापू देव, केरो लक्षण छत्रे, विसाजी रघुनाथ लेले, दप्तरी, चिंतामणी रघुनाथाचार्य, गोडबोले, इत्यादी ग्रंथकार झाले.

संहिता ग्रंथ –

ज्योतिषाच्या सर्व शाखांचे ज्यात विवेचन आहे त्यास प्रांरभी संहिता म्हणत. परंतु वराहमिहिरानंतर गणित व होरा खेरीज इतर ज्योतिषविषयक ग्रंथांना संहिता म्हणू लागले. वराहाच्या संहितेत तत्कालिन गरजेच्या अनेक विषयांचे विवेचन आले. त्यापैकी बरेच पुराणात समाविष्ट असतात.

संहितेतील मुहूर्त प्रकरणावर बरेच ग्रंथ झाले आहेत. व्यवहारातील अनेक प्रकारची कामे केव्हा करावी किंवा नव्याने सुरू करावी तसेच गर्भाधानादि संस्कारची केव्हा करावेत यासंबंधी वर्ज्यावर्ज्य विचार ज्यात केला जातो त्याला मुहूर्त अशी संज्ञा आहे. लल्लाचा रत्नकोष (शके ५६०), श्रीपतीचा रत्नमाला (शके ९६१), भोजकृत राजमार्तंड (शके ९६४), शारंङधराचा विवाहपटल (शके १४००), केशव दैवज्ञाचा मुहूर्ततत्त्व (शके १४२०), नारायणाचा मुहूर्तमार्तंड (शके १४०३), रामभटाचा मुहूर्त चिंतामणी (शके १४२२) मुहूर्त गणपती (शके १७४२) लेखक-गणपती हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

होरा स्कंध-

वर सांगितलेल्या गणितादि ग्रंथांचा विकास किमान तीन हजार वर्षापासून जो होत आहे त्याची कारणे १) ग्रहाचारांपासून व्यक्तिमात्रांवर होणाऱ्या परिणामांचा विचार २) यज्ञार्थ किंवा इतर कार्याकरिता मुहूर्तांची आवश्यकता आणि ३) ग्रहचारांचे व्यक्तिमात्रावर होणारे परिणाम. युरोपात नौकानयन हे आणखी एक वाढीव कारण होते, असे प्रतीपादन करून दीक्षित लिहितात “ग्रहगति स्थितीचे चांगले ज्ञान होण्यापूर्वींच हल्लीची जातक पद्धति स्थापित झाली असली पाहिजे हे उघड आहे. ज्योतिषाचे प्राचीनत्व हे त्यामुळे अगदी ब्रह्मदेवापर्यंत मागे देण्यात येते.”

ब्रह्माचार्यो वसिष्टोऽत्रिर्मुनु: पौलस्त्य लोमेशौ ।

मरीचिरंगिरो व्यासो नारद: शौनको भृगु: ॥

च्यवनो यवनो गर्ग: कश्यपश्चपराशर: ।

अष्टदशैते गंभीरा: ज्योतिष:शास्त्र प्रवर्तका: ॥

                                                                                                             नारद संहिता अ. १ श्लो. २-३

बृहत पाराशरी व लघुपाराशरी असे पारशरांचे दोन ग्रंथ आहेत. बृहत पाराशरीत बरेच मिश्रण झाले असून श्लोक ५ हजारवर असावेत. लघुपाराशरी (किंवा उडुदाय प्रदीप) हा ग्रंथ आजही प्रणाम मानला जातो. गर्गाच्या नावे होराशास्त्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. वसिष्ठ, भारद्वाज, शौनक, अत्रि या ऋषींची वचने इतर ग्रंथातून आढळतात. भृगुसूत्रे या नावाचे ग्रंथही कोठे कोठे मिळतात. भृगुसंहिता किंवा भृगुनाडी हे ग्रंथही फार प्रसिद्ध आहेत. भृगुंहितेत प्रत्येक व्यक्तीची पत्रिका मिळते असे सांगितले जाते. “भृगुसंहिता ग्रंथ आहे यात संशय नाही, आणि त्यातील काही पत्रिका मी पाहिल्या आहेत. त्यावरुन त्यातली फले बरीच जमतात. नाडीग्रंथ अनेक आहेत. नाडी त्यातील सत्याचार्यांचा ध्रुवनाडी ग्रंथ चांगला आहे. त्यात दिलेले ग्रहांच स्पष्ट अंश आजच्या गणिताशी जुळणारे आहेत हे विशेष,” असे भारतीय ज्योतिषशास्त्र या ग्रंथात श्री. शं. बा दीक्षित यांनी लिहिले आहे.

यवनजातक म्हणून एक प्राचीन ग्रंथ आहे. मीनराजजातक किंवा वृद्धयवनजातक असे नांव आहे. वराहमिहिराचे बृहज्जातक व लघुजातक कालिदासाचे उत्तरकालामृत, नृहरि याचा जातकसार, कल्याणवर्मा याचा सारावली (शके ८२१) श्रीपतीचा जातकपद्धती, नंदिग्रामस्थ केशवाची जातकपद्धती किंवा केशवी (शके १४९८), ढुंढीराजाचा जातकाभरण, गणेशकृत जातकालंकार, दामोदरसुत (शके १४६०), बलभद्राचा होरारत्न (शके १५७७), वैद्यनाथचा जातक पारिजात हे ग्रंथ सध्या ज्योतिषात प्रमाणभूत मानले जातात. जैमिनी सूत्र या नावाचा ग्रंथ दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. पूर्वमीमांसा या दर्शनाचा कर्ता व हा जैमिनी एकच असे मानले जाते.

प्रश्नशास्त्रावर वराहमिहिराचे दैवज्ञ वल्लभ, त्याचा मुलगा पृथुयशचे षट्‌पंचशिका, भटोत्पलाचे प्रश्नज्ञानम (शके ८८८) नीलकंठाचे प्रश्नतंत्र व ताजिक नीलकंठी, सिद्धनारायणदासचे प्रश्नवैष्णव ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

* पुढील भागात पाहू पाश्चिमात्य ज्योतिष शास्त्राचा (संक्षिप्त) इतिहास…

इथे वाचा.…. भाग -१……भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – भाग -१


साभार –  ज्योतिष सोबती – ज्योतिष संशोधन मंडळ डोंबिवली प्रकाशित

मूळ संदर्भ – भारतीय ज्योतिषशास्त्र – अर्थात भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – लेखक स्व. श्री शंकर बाळकृष्ण दीक्षित

भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – भाग -१

भारतीय ज्योतिषशास्त्राचे सिद्धान्त, संहिता आणि होरा असे तीन स्कंध किंवा भाग आहेत.

 

सिद्धान्त संहिताहोरारुपं स्कंधत्रयात्मकं ।

वेदस्य निर्मलं चक्षुज्योति:शास्त्रमनूत्तमं ॥

                                                                                                                                             –    नारदसंहिता १. ४

 

सिद्धान्तालाच तंत्र व गणितही म्हणतात. यात कालमापनाची व त्या दृष्टीने ग्रहांची स्थितिगतीविषयक गणिते यांचा समावेश आहे. ही गणिते, १) कल्पारंभापासून. २) महायुगापासून (तंत्र) किंवा, ३) शंकारभांपासून (करण) अशी तीन प्रकारची आहेत. मध्यमाधिकार, स्पष्टाधिकार, प्रश्नाधिकार (अधिकार म्हणजे ग्रहगणित) चंद्र-सुर्य ग्रहणे, उदयास्त, ग्रहयुति, नक्षत्रग्रहयुति, शृंगोन्नति इत्यादी प्रकारणे सिद्धान्त ग्रंथात असतात. संहिता ग्रंथात ग्रह व उल्कापात, धुमकेतु, सौरडाग, संवत्सरारंभ इत्यादींमुळे एकंदर पृथ्वीवर व मानवी जीवनावर काय परिणाम होतील या विषयांचा समावेश होतो. तर होरा किंवा जातक यात या ग्रहादिकांचे व्यक्तिगत मानवी जीवनावर काय परिणाम होतात त्याचा विचार होतो.

भारतीय तत्त्वज्ञानात काळ हा ईश्वरस्वरुप, सृष्टीचा नियंता मानला गेला आहे. सर्व मानवी व्यवहार हे कालमानानुसारच होऊ शकतात. दिवस, मास, वर्ष ही कालमापनाची स्वाभाविक साधने आकाशातील चमत्कारांवर अवलंबून असतात. ऋग्वेदाच्या वेदांग ज्योतिषात पहिल्याच मंगलाचरणात..

पंचसंवत्सरमयं युगाध्यक्षं प्रजापतिम्‌ ।

दिनत्वर्यनमासांग प्रणम्य शिरसा शुचि ॥

प्रणम्य शिरसा कालमभिवाद्य सरस्वतीं ।

कालज्ञानं प्रवक्ष्यामि लगधस्य महात्मन:॥

“दिवस, ऋतु, अयन, मास ही ज्याची अंगे आहेत अशा पंचसंवत्सरमय युगाध्यक्ष आणि सरस्वतीस अभिवादन करुन महात्मा लगधाचे कालज्ञान सांगतो” असे म्हटले आहे.

 

सूर्य हा द्यु लोकात, देव म्हणजे तारका त्याच्यावरच्या म्हणजे स्वर्ग भागात असून पृथ्वी व द्यौ यामध्ये अंतरिक्ष लोक असतो. अंतरिक्षात मेघ, वायु, विद्युत आदींचा संचार असतो. चंद्र हा सुर्याच्या खाली म्हणजे अंतरिक्ष लोकात आहे. सूर्य एकाच मार्गाने नेहमी जातो आणि ऋतूंचे नियमन करुन पृथ्वीच्या पूर्वादि दिशा निर्माण करतो. पृथ्वी गोलाकार आणि निराधार आहे. सूर्य चंद्राशिवाय पांच ग्रह आहेत. इत्यादी माहिती वेदांमध्ये ठिकठिकाणी आलेली आहे.

कालज्ञान सर्वांना चांगल्या प्रकारे होणे कठिण असते. यज्ञाची सांगड घालून ही अडचण दूर केली आहे. ऋग्वेदात तिष्य (पष्य), चित्रा, रेवती, अघा (मघा), अर्जुनी नक्षत्र नामे आहे. तैत्तिरीय श्रुतीत, नक्षत्रांची नावे व देवता दिल्या आहेत. ज्योतिष वेदांचे अंग; वेदांचे चक्षु म्हणजे नेत्र मानले आहेत. (छंद-पाय, व्याकरण-तोंड, कल्प-वाणी, शिक्षा-नाक, निरुक्त-कान).

 

                                   विनैतदखिलं श्रोतस्मार्त कर्मं सिध्द्य़ति ।

                                   तस्माज्जगहितात्‌येदं ब्रह्मणा रचिता पुरा ॥   

                                                                                                                                   –   नारद संहिता अ. १ श्लो.७

 

याच्या शिवाय संपूर्ण श्रुति स्मृतिमध्ये सांगितलेले कर्म सिद्ध होत नाही, म्हणून ब्रह्माजीनी सर्वप्रथम या शास्त्राची रचना केली. असे नारदसंहितेत म्हटले आहे.

 

होराशास्त्राची बीजे :

नक्षत्र तारकांचे शुभाशुभत्व हाच फलज्योतिष तसेच संहिता स्कंधांचा पाया आहे व तो ऋग्वेदासह सर्व वैदक वाङ्‌मयात स्पष्ट दिसतो.

अथो नक्षत्राणामेषामुपस्थे सोम आहित:॥

        नक्षत्रात सोम ठेवला आहे. या अर्थी ऋग्वेद सं. १०. ८२. २ व इतरत्र उल्लेख आहेत. प्रजापतीची मुलगी सुर्या सोमाला दिली त्यावेळी ज्या गाई दिल्या त्या मघा नक्षत्री घरी नेल्या आणि कन्या अर्जुनी (फल्गुनी) नक्षत्री नेली. अशी कथा आहे. यात कोणते कर्म केव्हा करावे या नंतरच्या  ज्योतिष सूत्रांचे मूळ दिसते. फल ज्योतिषाचे निश्चित गमक अथर्ववेद संहितेत मिळते. माणसांच्या सुखदु:खांशी नक्षत्रांचा व ग्रहांचा निकटचा संबंध आहे, किंबहुना माणसाच्या भाग्याचे व दौर्भाग्याचे कारकत्व नक्षत्रांकडे अहे, निदान त्यांचा माणसाच्या जीवनावर शुभाशुभ परिणाम होतो अशी निश्चित समजूत अथर्ववेदकाली होती. अथर्व ज्योतिष संहितेचे १६२ श्लोक आहेत त्यात कालमापन आहे. तसेच शंकूच्या छायेनुसार ८ वेगवेगळे (रौद्र ते अभिजित) मुहुर्त आहेत. रौद्रावर रौद्र तर मैत्र मुहुर्तावर मैत्रकर्में करावी. तिथिचे नंदा, भद्रा, जया, रिक्ता व पूर्णा हे वर्गीकरण व शुभाशुभत्व, वार व अधिपतींचा उल्लेख आहे. “जन्म संपद्विपत्क्षेम्य: प्रत्वर: साधकस्तथा । नैधनो मित्रवर्गश्च परमो मैत्र एवच” अशी २७ नक्षत्रांची नऊ गटात शुभाशुभ विभागणी केली आहे.

 

वैदिक ग्रंथानंतर स्मृती ग्रंथात ज्योतिषशास्त्र अधिक विकसित झाले. मनुस्मृतीत सांगितलेली युगपद्धतीच  ज्योतिष व पुराण ग्रंथातून दिलेली असते. याज्ञवल्क्य स्मृतीत ग्रहयज्ञात ’सुर्य सोमो महीपुत्र: सोमपुत्रो बृहस्पति शुक्र शनिश्चरो राहु: केतुश्चेते ग्रहा: स्मृता:’ अशी ग्रहांची नावे आहेत ती वारांच्या क्रमाने आहेत. या स्मृतीत राशींचा नामोल्लेख नाही पण क्रांतिवृत्ताचे बारा भाग कल्पिलेले आहेत. व्यतिपातादियोग अगस्ति, सप्तर्षी यांचा निर्देश आहे तसेच “यस्य यश्च ग्रहो दुष्ट: स तं यत्नेन पूजयेत (१.३०६) असे म्हटले आहे. ” ग्रह जर अनिष्ट असले तर त्यांची प्रयत्नपूर्वक पूजा करावी ” असा हा निष्कर्ष आहे. महाभारत व रामायण या इतिहास ग्रंथात ज्योतिषाचे बरेच उल्लेख आहेत. महाभारतात राशींचे उल्लेख नाहीत. पण रामायणात रामजन्माचे वेळी सर्व ग्रह उच्चीचे होते असा राशीनिर्देशित उल्लेख आहे.

पुढील भागात पाहू सिद्धांत (ज्योतिर्गणित), संहिता व होराशास्त्राचा इतिहास…

इथे वाचा….. भाग- २- भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास – भाग – २


साभार –  ज्योतिष सोबती – ज्योतिष संशोधन मंडळ डोंबिवली प्रकाशित

मूळ संदर्भ – भारतीय ज्योतिषशास्त्र – अर्थात भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास

                    – लेखक स्व. श्री शंकर बाळकृष्ण दीक्षित

कुंडलीतील चंद्राचे महत्व

फलज्योतिष एक उत्तम शास्त्र आहे पण त्याची सत्यता फलज्योतिष सांगणाऱ्या ज्योतिषाच्या व्यासंगावर फारच अवलंबून आहे. याचे प्रमुख कारण इतर भौतिक शास्त्रातील ग्रंथावरून कोणासही शास्त्राची प्रचीती जितक्या स्पष्टपणे अनुभवता येते तशी ज्योतिषशास्त्र ग्रंथावरून चटकन अनुभवता येणार नाही. ज्योतिषशास्त्राची संपूर्ण तऱ्हेने व्यवस्थित बांधणी आपल्या मराठी वाङ्‌मयांत अजून तरी झालेली नाही. ग्रहांची स्थानगत, राशिगत फले, कारकत्व, ग्रहयोग ह्यापलीकडे आपले ग्रंथ अजून गेलेले नाहीत. फलज्योतिषशास्त्र हे इतके गुंतागुंतीचे आहे की त्याला शब्दरूपाने, ग्रंथरूपाने बद्ध करणे हे फारच अवघड आहे. त्यातून ग्रंथकाराच्या अभ्यासाची कुवत त्याच्या लिखाणात प्रतिबिंबित होते ह्या दृष्टीने मराठी ज्योतिष वाङ्‌मय पाहिले तर ते फारच निराशाजनक आहे.

 

फलज्योतिष तत्वे प्रत्यक्ष उदाहरणांची प्रचीती दाखवल्याशिवाय कळणे शक्य नाही. एका दृष्टीने वैद्यकीय शास्त्र व ज्योतिषशास्त्र ह्यांचे साम्य आहे. नुसते ग्रंथ वाचून कोणीही उत्तम डॉक्टर होऊ शकत नाही. अनेक केसेस त्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या असतील तरच त्याला रोग निदान बरोबर होऊ शकेल.

 

ज्योतिषशास्त्रातील बरेचसे नियम अजून ग्रंथातूनसुद्धा स्पष्टपणे आलेले नाहीत कसे ते एकाच उदाहरणावरून विषद करतो. आपल्याकडे लग्नकुंडली बरोबरच सोबत राशी कुंडली मांडण्याची पद्धत आहे. ही पद्धत का झाली असावी ह्याचा विचार बहुतेक चंद्राला जास्त प्राधान्य असल्यामुळे, चंद्र मनाचा कारक असल्यामुळे, किंवा गोचर फळे चंद्राकडून पाहण्याचा प्रघात असल्यामुळे राशिकुंडली माडण्याची प्रथा असावी असे वाटत होते. अनेक ग्रंथातून चंद्र हा महत्वाचा ग्रह आहे असे सांगून त्याचे कारकत्व दिलेले आहे. माझ्याकडे एकदा शंका विचारायला आलेल्या विद्यार्थ्याने ‘चंद्राला कुंडलीत फार महत्व आहे’ म्हणजे काय ते समजावून सांगा असे मला म्हटल्यावर मी त्याला नाना तऱ्हेने चंद्राचे कारकत्व समजावून सांगितले तरी त्याचे समाधान झालेले दिसले नाही, म्हणून प्रत्यक्ष उदाहरणानेच त्याला पटवून दिले.

chandrache mahatwa jyotish jagat

chandrache mahatwa jyotish jagat

‘अ’ कुंडलीतील मुलाचा मृत्यु १९७३ साली वाहन अपघातात झाला आहे. वरील घटनेचे कारण त्या विद्यार्थ्याने अगदी अचूक सांगितले सिंह लग्नाचा मोठा अशुभ ग्रह शनि हा लग्नात आहे. रवि-शनि लग्नात असल्याने अल्पायू योग झाला. मी त्याला त्याची कारणमीमांसा अगदी बरोबर आहे असे सांगून पुढील कुंडली (ब) दाखवली.

 

‘अ’ कुंडली प्रमाणेच रवि- शनि लग्नात आहेत. मंगळ गुरूसुद्धा त्याच स्थानात आहेत. ग्रहांना स्थानागत, राशिगत, भावेशगत म्हणून जी काही फले आसतात ती दोनही (अ व ब) कुंडल्यात सारख्याच तऱ्हेने मिळावयास पाहिजेत, किंबहुना अशा तऱ्हेच्या सर्वच कुंडल्याना ते परिणाम सारखेच अनुभवास यावयास पाहिजेत. आता कुंडली ’क’ पहा. ’क’ कुंडलीत सुद्धा रवि-शनि लग्नातच असून मंगळ तृतियातच आहे, तेंव्हा ’अ’ कुंडलीत रवि-शनि योगामुळे आयुष्यमान कमी हे विधान केले की, ’ब’ व ’क’ ह्यांना तसा अपघात झालेला नाही. तेंव्हा आता तिन्ही कुंडल्या चंद्राकडून मांडून पहा.  राशिकुंडल्या त्या दृष्टीने जास्त बोलक्या आहेत. ’अ’ कुंडलीत चंद्राच्या अष्टमात रवि-शनि आहे. ’ब’ कुंडलीत तसे नाही. ’ब’ कुंडलीत चंद्र उच्च राशीत, तर ’क’ कुंडलीत शुक्र वर्गोत्तम आहे. (जास्त खोल कारणमीमांसा सोडून देऊ.)

 

वरील उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे आज एका लग्नावर जन्मलेल मूल, उद्या व परवा त्याच लग्नावर जन्मणारी मुले ह्यांचे जीवन सारखे नसणार, राशिकुंडली म्हणजे केवळ चंद्राच्या स्थितीवर त्याच्या जीवनात फार मोठे फरक पडणार. ग्रहांच्या स्थानागत, राशीगत, भावेशगत परस्पर योगांचा कितीही कथ्याकूट करूनही हा फरक स्पष्ट करता येणार नाही. तर केवळ चंद्रापासून सर्व परिस्थिती बदलते, म्हणून चंद्रालाच महत्व दिले पाहीजे.

चंद्राकडून होणरे योग हे किती मोठे परिणाम करतात हे माझ्याकडील आणखी दोन कुंडल्यांवरून मला समजू शकले. एका सुप्रसिद्ध मंत्री महाशायांची कुंडली व एका शाळामास्तरांची कुंडली फक्त चंद्र सोडल्यास बाकी सर्व ग्रहांच्या दृष्टीने सारखीच. दोघांच्या कुंडलीत शनि, हर्षल, गुरू मेषेचे एकाच स्थानात, मंगळ-शुक्र तुळेचे एकाच स्थानात, पण एकाची मेष रास तर शाळामास्तरांची धनू रास. आता मेष राशीकडून केन्द्रकोणाधिपती पाहा व धनु राशीकडूनही पहा. चर राशीतील ग्रह चर जन्मरास असल्याने जसे राजयोगकारक झाले तसे ते धनु राशिकडून झालेले नाहीत. सर्व प्रकारचे राजयोग अथवा इतर योग चंद्राकडूनही महत्वाचे व्हावे लागतात हे ह्या उदाहरणावरून कळून येईल.

 

राशिकुंडलीस इतके महत्व आहे हे सोदाहरण सिद्ध झाल्यावर ज्योतिषशास्त्रातील काही नियमांचे नव्या दृष्टीकोनातून मूल्यमापन होणे किती आवश्यक आहे हे कळून येईल. विवाह जूळणीत पाहिला जाणारा मंगळ, हा या दृष्टीने किती हस्यास्पद ठरतो. ’अ’ मुलीच्या कुंडलीत सप्तमात मंगळ व ’ब’ मुलीच्या कुंडलीतही सप्तमात मंगळ आहे पण ’ब’ च्या कुंडलीत चंद्रच्या सप्तमात जर गुरू-शुक्र असतील तर ? त्या दोन्ही कुंडल्यांचे केवळ सप्तमातील मंगळ असे साम्य दाखवून एका मापाने त्या मोजताच येणार नाहीत. किंबहुना ’ब’ कुंडली मंगळाची म्हणून ज्योतिषी नाकारत असेल तर अशा पंडितांची कीव करावीशी वाटेल.

 

राशीकुंडलीप्रमाणे पडणारे फरक पाहिले म्हणजे आपण पाहात असलेली लग्न कुंडली म्हणजे केवळ नाण्याची एकच बाजू हे कळून येईल .


साभार- श्री व. दा. भट

ग्रहांकित दिवाळी अंक १९७७

हे लेखही वाचा –

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रेभाग आयुर्दाय

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रेभाग पितापुत्र संबंध

संतान दीपिका अर्थात संतती योग

राहूच अतिरेकीपणाशोध आणि बोध

कुंडलीतील चंद्राचे महत्व

कारक ग्रहांचे महत्व

अमावस्येचे गोचर भ्रमण


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

क्रकच योग

“पाश्चात्य देशात १३ या संख्येला अतिशय घाबरतात. हि संख्या सैतानाशी निगडीत आहे असे त्या अति पुढारलेल्या देशांचे म्हणणे आहे. लंडन मध्ये थेटरात ‘M’ हे अक्षर तेरावे म्हणून तो ‘रो’ नसतो तर अमेरिकेत १३ व मजलाच नसतो..या पूर्णपणे वैज्ञानिक विचार करणाऱ्या देशात घडते.”

काल इंटरनेट वर सहज फेरफटका मारताना वरील माहीती वाचनात आली. एका मराठी वेबसाईट वर याविषयी एक लेख आला आहे. पाश्चिमात्य देशातही लोक कशा अंधश्रद्धा पाळतात हे सांगत लेख गंमतीदार पद्धतीने सादर करण्यात आला असला तरी वरील माहीती महत्वाची आहे. रात्रीच्या वाचनाच्या वेळी अगदी योगायोगाने “क्रकचयोग” वाचण्यात आला, हे पुर्वीही वाचले होते पण यावेळी वरील १३ नंबरच्या लेखामुळे लक्ष वेधले गेले आणि आपल्या मुहुर्त शास्त्रात सुद्धा या १३ नंबरबद्यल असेच लिहिले गेले हे ध्यानात आले. न्युमरॉलोजी मध्ये हे आहेच पण आपल्या ज्योतिषातही आहे हे पाहुन जरा गंमतही वाटली. मुहुर्त शास्त्रात अनेक प्रकारचे योग सांगितले आहेत. “योग” म्हणजे संयोग, एकत्रित करणे. ज्योतिषशास्त्रात “योग” हा तीन अर्थाने येतो. एक म्हणजे विष्कंभादि योग जे नक्षत्रांप्रमाणे २७ आहेत. दुसरा ग्रह योग म्हणजे ग्रहांच्या युती, प्रतियुति इ. व तिसरा म्हणजे मुहुर्त शास्त्रातील तिथी-वार-नक्षत्रांच्या संयोगाने होणारे योग जसे अमृतसिद्धी योग, दग्ध योग इ. हा “क्रकच योग” या तिसऱ्या प्रकारातील आहे.

 

नारद संहितेत अध्याय १० मध्ये श्लोक ४ व ५ मध्ये याविषयी सांगितले आहे.

 

क्रकच योग –

 

क्रकचं हि प्रवक्ष्यामि योगं शास्त्रानुसम्मतम्‌ ।

निंदितं सर्वकार्येषु तस्मिन्नैवाचरेच्छुभम्‌ ॥ ४

 

क्रकच योग हा अति अशुभ असून तो प्रत्येक शुभ कार्यात वर्ज्य करावा असे सांगण्यात आले आहे. शुभ अथवा मंगलाची ईच्छा असणाऱ्यांनी क्रकच योगावर कोणतेही शुभ कार्य करू नये, असे यात म्हटले आहे.

 

तर असा हा क्रकच योग कसा होतो ते पाहू.

 

त्रयोदशस्युर्मिलने संख्यया थितीवारयो: ।

क्रकचो नाम योगोयं मंगलेष्वतिगर्हित: ॥ ५

 

तिथी आणि वाराच्या संख्येची बेरीज जर १३ येत असेल तर क्रकच नांवाचा योग होतो. तिथींची संख्या तर सर्वांना माहीतच आहे वारांची संख्या इथे रविवार पासून घ्यायची आहे. जसे रविवार -१, सोमवार -२ इ. क्रकच योग होण्यासाठी वाराची संख्या व तिथीची संखेची बेरिज करावी व ती १३ आली तर क्रकच योग होतो असे समजावे. अर्थात तिथी अथवा वार बदलेपर्यंत योग असेल. उदा. – रविवारी (१) द्वादशी (१२) आली तर हा योग होईल. किंवा सोमवारी (२) एकादशी (११) याप्रमाणे इअतर वारीही पहावी. म्हणजे ज्योतिषतही १३ आकडा अशुभ सूचक म्हणूनच समजला आहे. निदान तिथी योगाच्या बाबतीत तरी.

 

 


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्यो. विशारद, वास्तु विशारद

 9901287974, 8722745745