CARD FOR THE WEEK 29 Jan. to 04 Feb 2018

29TH JANUARY TO 4TH FEBRUARY

Two Of Wands

 

The card of this week has come with a very promising message.

Till now you were enjoying your life in your comfort zone. But at the same time raw ideas for your future were sprouting in your mind.

Now it’s the time to come out of your comfort zone. Let your raw ideas come down to plans and make a way towards the new horizon.

Discover an adventurous identity within yourself. It’s a time to plan for a change. Set long term goals. It can be your education, career or any other field.

It’s the right time for decision. Go ahead. Take risk.

Sometimes we ignore our own potential while in comfort zone. But, now it’s time to explore your potential. This world has much more to offer you than you already have. Sometimes we forget that there’s still a vast ocean beyond the horizon visible to our eyes.

So, work on your ideas, set new goals, plan accordingly, step ahead without hesitation, leave your comfort zone, explore your potential and move ahead towards a new adventurous journey.


BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE) 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

vrushalivs@gmail.com

 

साप्ताहिक राशिभविष्य 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2018

[रविवार २८ जानेवारी ते शनिवार ०३ फेब्रुवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध धनु राशीतून मकर राशीत जात आहे इतर  कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्राचा  -१ फेब्रुवारी रोजी पश्चिमेस उदय  ]

 

मेष – व्यवसायात आर्थिक समस्या जाणवतील. जोखीम पत्करू नये. नोकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून दूर रहावे. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर समज गैरसमजातून वाद होतील. सरकारी कामे यशस्वी होतील. प्रवासामधून नियोजित कामे सफल होतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 29, 30.

 

वृषभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्येस गैरसमज होतील अशी वर्तणूक टाळावी. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. आई-वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. सरकारी कामांत विलंब निर्माण होईल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. शुभ ता. 28, 31, 01.

 

मिथुन – व्यवसायात आर्थिक नुकसानीचे योग. नोकरदारांनी कुठल्याही गैरमार्गांचा अवलंब करु नये. संततीचे कामात पूर्ण सावध रहावे. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात खूप अडचणी येतील. सासुरवाडीबरोबर देणे- घेणे टाळावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. 29, 30, 02, 03.

 

कर्क – संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. जोडीदाराला अनोळखी लोकांकडून फसवणुकीचा धोका. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावी. व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये मानसिक दडपण सतत वाढते राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत. शुभ ताः- 28, 31, 01.

 

सिंह –  व्यावसायिक स्थिती फारशी मनासारखी राहणार नाही. नोकरीमध्ये हितशत्रूंच्या कारवाया त्रास देतील. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. नोकरवर्गाकडून फसवणूक संभवते. संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. प्रवासात महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 28, 29, 30, 02, 03.

 

कन्या –  व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदारांनी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या दृष्टीने आर्थिक फसवणुकीचे योग. विद्यार्थ्याची मानसिक स्थिती गोंधळात्मक राहील. सरकारी कामासाठी फारशी अनुकूलता नाही. महत्वाच्या कामात भावंडांमुळे फायदा होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. 29, 30, 31, 01.

 

तुला – व्यवसायात आर्थिक अंदाज चुकतील. नोकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्याबाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांना आर्थिक सहकार्याचे प्रसंग येतील. शुभ ता. 31, 01, 02, 03.

 

वृश्चिक –  संततीविषयक कामे प्रयत्नाने होतील. विद्यार्थ्यांना बेफिकिरपणा नुकसानकारक ठरेल. व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नोकरीमध्ये गैरमार्गासाठी कुणाला सहकार्य करु नये. सरकारी कामात यश मिळेल. रक्तदाब असणा-यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वाद होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 28, 02, 03.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. डोळ्यांच्या विकारांची काळजी घ्यावी. सरकारी कामात तांत्रिक व्यत्ययामुळे विलंब होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर समज-गैरसमज टाळावेत. शुभ ता. 28, 29, 30.

 

मकर –  संततीच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून दूर रहावे. व्यावसायिक अंदाज चुकून नुकसानीचे योग. नोकरीच्या ठिकाणी पारदर्शी वागणूक ठेवावी. सरकारी कामात अडचणी येतील. महत्वाच्या गाठी-भेटी टाळाव्यात. मोठ्या भावंडांचा सल्ला हितकारक ठरेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. प्रवासातून आनंद मिळेल. शुभ ता. 29, 30, 31, 01.

 

कुंभ –  व्यावसायिक धाडसी निर्णय यशस्वी होतील. परंतु आर्थिक जोखीम पत्करु नये. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज होतील अशी वर्तणूक टाळावी. संततीच्याबाबतीत शूभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्याचा अनावश्यक गोष्टींसाठी वेळ वाया जाईल. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 31, 01, 02, 03.

 

मीन – संततीच्याबाबतीत फसवणुकीचे योग. विद्यार्थ्यांना खडतर काळ राहील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. मोठे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. सरकारी कामात अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून फसवणुकीचे योग घडतील. नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. शुभ ता. 28, 02, 03.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME 

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 22 jan to 28 jan 2018

22ND JANUARY TO 28TH JANUARY

Three Of Wands

Three of Wands suggests us to stay cool and calm.

Whatever problems you have faced so far can all be overcome now. This card promises you the solution in your favour but the only thing expected here is a sensible and mature behaviour from you.

        No matter what and who is responsible for the present situation, if your own mistakes have lead to this current situation, act in mature and responsible manner. If the problems are caused due to the interference of the opponents, still stay calm and act in mature manner.

        Destiny may seem to be far, path may not seem to be so easy. You have wands in your hands. Instead of using it to fight against, use it as your strong support to move further.

        This approach will make your journey easy and lead you to gain.

There’s also an indication of beginning of one solid foundation of an upcoming enterprise or a new project.

But again I would like to remind you that step with calm and cool mind. Use your knowledge, intellect and inner powers efficiently.

        This card conveys a very special message that co-operation and maturity is the key of success.  


Vrushali N.

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

vrushalivs@gmail.com

BACK TO HOME

BACK TO INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE FREE

साप्ताहिक राशिभविष्य 21 ते 27 जानेवारी 2018

[रविवार २१ ते शनिवार २७ जानेवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र -अस्त ]

 

मेष – व्यवसायात सतत आर्थिक चढ-उतार राहतील. नोकरीमध्ये दुस-यावर विसंबून राहू नये. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून दूर रहावे. सरकारी कामात सफलता मिळेल. महत्वाच्या कामात वडिलांचा सल्ला लाभदायक ठरेल. वाहने जपून चालवावीत. उष्णतेचे विकार त्रास देतील. विश्वास ठेवून व्यवहार करु नयेत. प्रवास लाभ देतील. शुभ ता. 21, 24, 25, 26.

 

वृषभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा जाच राहील. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधा-यांचा विरोध सहन करावा लागेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 21, 22, 23, 27.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक ठीक राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. मधुमेह असणा-यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. 22, 23, 24, 25.

 

कर्क – संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. चुकीचा आत्मविश्वास विद्यार्थ्याचे नुकसान ठरेल. व्यावसायिक अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी हलगर्जीपणा करु नये. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. ओटीपोटाचे विकार त्रास देतील. प्रवासामुळे विनाकारण तणाव राहील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 24, 25, 26, 27.

 

सिंह –  व्यवसायामध्ये आर्थिक नियोजनात बाधा निर्माण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. व्यसनांवर नियंत्रण ठेवावे अन्यथा शारीरिक त्रास होतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कार्यपूर्ती होईल. मित्र-मंडळीकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 21, 27.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीविषयक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. भावंडांच्या ओळखीतून लाभ मिळतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींच्या अडचणीत सहकार्य करावे लागेल. शुभ ता. 21, 22, 23.

 

तुला – व्यावसायिक स्थिति फारशी चांगली राहणार नाही. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. स्थावरासंबंधी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. जोडीदाराला तब्येतीचे त्रास. मित्रांकडून चांगली साथ. शुभ ता. 22, 23, 24, 25.

 

वृश्चिक – संततीविषयक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात सफलता लाभेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये इच्छित कार्यात सफलता मिळेल. उष्णतेचे विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. स्थावराच्या संधी चालून येतील. प्रवास फायदा देतील. मित्र-मंडळींमुळे कुटुंबात वाद होतील. शुभ ता. 24, 25, 26, 27.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात तणावाचे वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी मनाविरुद्ध दडपण जाणवेल. संततीला वाहनांपासून त्रास संभवतो. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जोडीदाराला त्रास. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळीकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 21, 27.

 

मकर –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी. विद्यार्थ्यांना अतिउत्साह नुकसानकारक ठरेल. एखादा कौटुंबिक प्रश्न चिंता निर्माण करेल. कफाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 22, 23.

 

कुंभ –  संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. महत्वाच्या कामात व्यत्यय येतील. पचनाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासात अडचणी येतील. मित्र-मंडळीकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 21, 24, 25, 26.

 

मीन – व्यवसायात प्राप्ती चांगली परंतु तणाव राहील. नोकरीच्या ठिकाणी मानसिक दडपण जाणवेल. संततीला शैक्षणिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळणार नाही. भावंडांच्या जोडीदारामुळे त्रास. मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. शारीरिक कटकटी जाणवतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 22, 23, 27.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE FREE

सहदेव भाडळी

पैठण येथील ‘मार्तंड जोशी नावाच्या एक ब्राह्मण ज्योतिष्याला अंत्यज (शूद्र) स्त्रीपासून झालेली एक विद्वान कन्या भाडळी, तिच्या सहदेव नावाच्या सावत्र भावाच्या नावासकट “सहदेव भाडळी” या नावाने ओळखली जाते.

 

       सहदेव भाडळी हा ग्रंथ बाराव्या शतकात रचला गेला आहे, यात अनेक प्राणी/पक्षी यांच्या निरीक्षणावरून हवामानाचे अंदाज कसे करतात याचे पारंपरिक वर्णन आढळते. पूर्वी समाजाचा प्रत्येक घटक हा, ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊसपाणी कसे होईल, येते वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी सहदेव भाडळीचा आधार घेत असे. सहदेव भाडळी ही कला मूलत: पर्जन्यमानाच्या तर्काशी संबंधित आहे. तो लिहिताना भाडळीने पर्जन्य विचारांवर स्वतःचे असे काही विचारही मांडले आहेत. त्याचबरोबर इतर भविष्यविषयक ज्ञानही यातून मिळते. भाडळीने संस्कृतचे बंधन तोडून प्राकृतात ज्ञाननिर्मिती केली. तिने ‘मेघमाला’ नावाचा व्यासांनी लिहिलेला ग्रंथ प्राकृतात आणला. तिने गांधर्व विवाह, शल्यचिकित्सा, आयविचार, पिकांवरील रोग व त्यांवरील उपचार, आरोग्य व ज्योतिष, पर्जन्याचे हवामान शास्त्राच्या अंगाने केलेले विवेचन, स्त्री-प्रशंसा व इतरही अनेक आधुनिक बाबींचा विचार मांडला.तिच्या ज्ञानरचनेवर शाहीर हैबती घाडगे यांनी रचना केल्या व भाडळीचे ज्ञान लावण्यांच्या रूपाने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सहदेव भाडळी विषयी महाराष्ट्रात दोन कथा प्रचलित आहेत त्या अशा…

 

              पैठण नगरात मार्तंड जोशी नांवाचा एक मोठा विद्वान ब्राह्मण रहात असे. तो ज्योतिष शास्त्रात निपुण असून त्रिकाल ज्ञानी म्हणून त्याची ख्याती झाली होती. त्याला त्याच्या धर्मपत्नी पासून सहदेव नावाचा पुत्र झाला व एका शुद्र स्त्रीपासून भाडळी नांवाची कन्या झाली. पुढे काही वर्षांनी मार्तंड जोशी मरण पावले.

सहदेव हा आपल्या लहानपणापासूनच ज्योतिष विद्या शिकत होता. पण त्याला त्रिकाल ज्ञान जाणण्याची विद्या येत नव्हती. तेंव्हा एके दिवशी त्याने विचार केला की, त्रिकालज्ञान जाणण्याची विद्या गुरुशिवाय प्राप्त होणार नाही त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक गुरु केला पाहीजे म्हणून तो आपल्याच गावातील एका गोसाव्याच्या मठात गेला व त्याला आपली सर्व हकीकत सांगून आपणास त्रिकालज्ञान विद्या शिकविण्याबद्दल आग्रह करु लागला. तेव्हा तो गोसावी गुरुजी म्हणाला, बाबारे, ही विद्या मलाही अवगत नाही. माझे गुरुजी त्या विद्येत निपूण होते, परंतु ते माझ्या दुर्दैवाने समाधिस्त झाले. ते जर जिवंत असते तर त्यांचेपासून तुला ती विद्या नक्कीच प्राप्त करुन दिली असती. पण आता एक उपाय आहे. तुला जर ती विद्या साध्य करुन घ्यायची असेल, तर माझ्या गुरुजींच्या समाधी धारानगरी येथे आहे जाऊन, माझ्या गुरुजींच्या समाधीवर लिंबाचा वृक्ष आहे, ती समाधी ओळखून त्या समाधीत माझ्या गुरुजींच्या डोक्याची जी कवटी आहे ती उकरुन काढून घेऊन ये व नदीवर जाऊन स्नानादिक कर्में केल्यानंतर ती कवटी एका दगडावर उगाळून तू दररोज पीत जा. म्हणजे तिच्या योगाने तुला त्रिकालज्ञान प्राप्त होऊन तू ज्योतिषशास्त्रात निपूण होशील. असे त्या गोसाव्याने सांगितले. ते ऐकून सहदेव तसाच धारानगरीस गेला. त्याने ती कवटी मिळविली व आपल्या गावी आणून गुपचूप नदीच्या वाळंवटात पुरुन ठेवली. दररोज सकाळी तो नदीवर स्नानादी कर्मे आटोपून कवटी दगडावर उगाळून पिऊन, पुन्हा तेथेच ठेवून तो घरी येत असे. असा त्याचा नित्य क्रम चालू होता व तेंव्हापासून त्यास हळूहळू ज्ञान प्राप्त होऊ लागले.

            नित्यक्रमाप्रमाणे सहदेव नदीतीरी जाऊन ती कवटी उगांळून पीत असता मार्तंड जोशी यास शुद्र स्त्रीपासून झालेली कन्या भाडळी हिने ते कृत्य पाहिले.

              नंतर सहदेव आपले काम आटोपून कवटी पुन्हा त्याच जागेवर ठेवून घरी गेला. भाडळी नदीवर गेली, आंघोळ केली व कवटी पुरलेल्या जागी येऊन, तेथून ती काढून घेऊन घरी आली. तिने ती कवटी उखळात कुटून पीठ केले व पाण्यात कालवून पिऊन टाकिले. त्यामुळे तिला त्रिकालज्ञान प्राप्त झाले व ती ज्योतिषशास्त्रात पूर्ण निपूण झाली. ती लोकांत जे जे सांगे ते ते सर्व खरे होऊ लागले. त्यामुळे तिची सर्वत्र प्रसिद्धी झाली.

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

                  दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे सहदेव नदीवर गेला. पाहतो तो तेथे कवटी नाही. त्यामुळे मनात दु:खी होऊन तो पुन्हा गोसावी बुबाजवळ गेला व त्यास सर्व हकीगत सांगितली. तेव्हा गोसावी बुवा अंतर्ज्ञानानी म्हणाले-“बाबारे, तुझ्या नशीबी जितकी विद्या होती तितकी तुला मिळाली. जास्त कोठून मिळेल? भाडळी ही जातीची मांगीण, पण तिच पूर्वसंचित चांगले म्हणून तिला हे ज्ञान प्राप्त झाले. कवटीचा पुष्कळ भाग पोटात गेल्यामुळे ती ज्ञानी झाली. आता उपाय नाही. ईशवराची इच्छा! आता तू तिचा शिष्य हो व तिजपासून जास्त ज्ञान मिळव.” नंतर जातीचा वगैरे विचार न करता ज्ञानप्राप्तीसाथी म्हणून सहदेव तिचा शिष्य झाला. पुढे ज्योतिषशास्त्रासंबंधी दोघांची प्रश्नोत्तरे (कविता, श्लोक, लावण्या वगैरे रुपाने) होऊ लागली. ती लोकांच्या प्रचीतीस येऊ लागली. त्यामुळे ज्योतिषशास्त्र त्या दोघांचीही प्रसिद्धी झाली.   

 

           दुसऱ्या एका कथेनुसार मार्तंड जोशी हे एक विद्वान ज्योतिषी होते. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना एकदा त्यांना, त्या काळी एका अंत्यज समजल्या जाणाऱ्याच्या झोपडीत आसरा घ्यावा लागला. घरात एक म्हातारी आणि तिची मुलगी राहत असे. आपण घरी वेळेवर पोहोचू शकत नाही या विचाराने जोशी अस्वस्थ होते. म्हातारीने कारण विचारले. त्यांनी सांगितले की आजच्या दिवशी ज्या स्त्रीची गर्भधारणा होईल तिला होणारा पुत्र हा मोठा ज्योतिषी होणार आहे; मी जंगलात अडकल्यामुळे ही सुवर्णसंधी हुकणार आहे. म्हातारीने त्यांना आपल्या मुलीबरोबर रात्र घालवायची परवानगी दिली.

              मार्तंड जोशी यांना त्या अंत्यज मुलीपासून पुत्र न होता कन्या झाल्याने जोशी फार उदास झाले. कन्येचे नाव भाडळी ठेवले होते. पुढे भाडळीला घेऊन मार्तंड जोशी त्यांच्या घरी आले. कालांतराने आपल्या सहदेव नावाच्या मुलाला ज्योतिष शिकवण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक त्यांच्या लक्षात आले की शेजारी बसलेली भाडळी मन लावून ऐकते आहे. हीच भावी ज्योतिषी हे ध्यानात आल्यावर मार्तंड जोशींनी आपली सगळी विद्या भाडळीला दिली.

         याच धर्तीवर हिंदीमध्ये “घाग भड्डरी” नावाचे अशाच आशयाचे पुस्तक आहे. उत्तर भारतात एक वेगळी कथा सांगण्यात येते. उत्तरेत काही प्रांतातून वरील कथा प्रसिद्ध ज्योतिषी वराहमिहिरांच्या नावानेही परिचित आहे.


– ज्योतिष जगत द्वारा संकलित

BACK TO INDEX

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK

CARD FOR THE WEEK

15TH  JANUARY TO 21ST JANUARY

STRENGTH

Happy Makarsankranti to all our readers.

This week has come with one of the Card which reveals our power, our inner strength.

This is the week to use all your inner powers.

In life when we come across many obstacles, it’s not necessary that always the weapons sorts out the solution. Here, the obstacles can be external like, competition, or can be internal like your own fears.

It’s the time to use all your inner strength. Again the inner strength can be your intellect, power of your prayers or all what you have gain on your spiritual path.

Here the obstacle may not be easy to overcome. But each time swords or other powerful weapons won’t work. Taming the lion doesn’t require hunter always. It can be handled in a tricky loving way too.

This week will make you aware of your inner strength.

This is good time to step on the path of spirituality if you had not done so far.

Thank you Thank you Thank you Universe.


BACK TO INDEX

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N.

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

vrushalivs@gmail.com

 

साप्ताहिक राशिभविष्य 14 ते 20 जानेवारी 2018

[रविवार १४ ते २० जानेवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  सूर्य १४ जानेवारी रोजी धनु राशीतून मकर राशीत जाईल, तर मंगळ १७ जानेवारी रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत जाईल .  याव्यतिरिक्त  कोणताही ग्रह(चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * शुक्र -अस्त ]

 

मेष – व्यवसायात सतत चढ-उतार राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अंगीकृत कार्यात व्यत्यय निर्माण होतील. प्रवासात संमिश्रता. मित्रांकडून चांगले सहकार्य. शुभ ता. 17, 18, 19, 20.

 

वृषभ – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. जोडीदाराच्या वागण्यामुळे चिंता निर्माण होईल. संततीला शुभ परिणाम मिळतील. आई-वडिलांची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. थायरॉईडच्या आजारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. 14, 20.

 

मिथुन – संततीला वाहन खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. संसर्गजन्य आजारांपासून त्रास होईल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. नोकरवर्गाकडून त्रासाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 14, 15, 16.

 

कर्क – संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अतिविश्वास नुकसानकारक ठरेल. व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळवावे लागेल. जोडीदाराबरोबर आर्थिक कारणावरुन वाद. प्रवासातून मानसिक आनंद मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 15, 16, 17, 18, 19.

 

सिंह –  व्यावसायिक आर्थिक अडचणी येतील. नोकरीमध्ये सहका-यांशी जमवून घेणे कठीण जाईल. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. आपल्या वागण्यामुळे हितसंबंध तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. सरकारी कामे होतील. प्रवासातून कामे यशस्वी होतील. स्थावराच्या संधी येतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग. शुभ ता. 17, 18, 19, 20.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांच्या माध्यमातून प्रश्न सोडविता येतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना. विद्यार्थ्यांना सहज यशप्राप्ती राहील. शारीरिक त्रास जाणवतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 14, 20.

 

तुला – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. नातेवाईकांपासून शक्यतो अलिप्त रहावे. वडिलधा-यांशी सामंजस्याचे धोरण ठेवावे. सरकारी कामात अडचणी येतील. संततीच्या नोकरीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 15, 16.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. आर्थिक निर्णयातून लाभ मिळतील. नोकरीमध्ये रागांवर नियंत्रण ठेवावे. संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. 14, 17, 18, 19.

 

धनु –  संततीच्या कामात अनपेक्षित अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. कौटुंबिक प्रश्नांतून मार्ग निघतील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. प्रवासामधून कार्यपूर्ती लाभेल. मित्र-मंडळींतून कौटुंबिक प्रश्नात सहकार्य लाभेल. शुभ ता. 15, 16, 20.

 

मकर –  नोकरीत वरिष्ठांमुळे मनस्तापाचे प्रसंग. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मोठ्या भावंडांमुळे फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल. अविचारी कृती टाळावी. प्रवासामधून कामात अडचणी येतील. मित्र-मंडळींचा सल्ला फायदेशीर ठरेल. शुभ ता. 14, 17, 18, 19.

 

कुंभ –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना आळशीपणा जाणवेल. सरकारी कामात अडचणी येतील. धाडसी निर्णयातून फायदा होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासात अडचणी येतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 14, 15, 16, 20.

 

मीन – व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये समाधान देणा-या घटना घडतील. संततीचे दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. एखादा कौटुंबिक प्रश्न चिंता निर्माण करेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. 15, 16, 17, 18, 19.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR FREE E-MAGAZINE

महापर्व – मकर संक्रांति (मराठी)

आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात मकर संक्रात ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नांवाने ओळखली जाते. गुजरात- राजस्थान मध्ये  उत्तरायण, आसाम मध्ये  मघ विहु किंवा भोगली बिहू तमिलनाडु मध्ये ‘पोंगल’, पंजाबात लोहड़ी, हरियाणा- हिमांचल प्रदेश मध्ये माघी. कश्मीर घाटी मध्ये शिशुर संक्रांत, दक्षिण भारतात  उगादि इ. पण नांवे आणि पद्धत  थोड्याफार फरकाने वेगळ्या असल्या तरी सूर्य पूजा हेच मुख्य ध्येय असते. उत्तरायणाची सुरवात म्हणजेच देवांचा दिवस सुरु होतो म्हणून या संक्रातीचे महत्व अधिक असते. इथून पुढे मंगल कार्यांची सुरुवात होते.                 

             कोणताही ग्रह ज्यावेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांति म्हणतात. रवि म्हणजेच सूर्य हा एका वर्षात १२ वेळा राशी बदलतो म्हणजेच एका वर्षात सूर्याच्या १२ संक्रांति होतात, त्यात मकर संक्रांति ही उत्तरायणाची सुरुवात असते म्हणून अत्यंत शुभ व महत्वाची मानण्यात येते.

सूर्याच्या १२ संक्राति अशा आहेत. 
तूळ व मेष – विषुव संक्रांति.
कुंभ, वृश्चिक, वृषभ व सिंह – विष्णुपद.
धनु, कन्या, मिथुन, मीन – षडशीति.
कर्क संक्रांति- दक्षिणायन
मकर संक्रांति – उत्तरायन

सर्वच संक्रांतिकाल हे धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ मानले जातात.

        मकर संक्रांत 2018 – या वर्षी रविवार दिनांक 14 जानेवारी 2018 रोजी मकर संक्रांत आहे. शके 1939 पौष कृष्ण १३, रविवारी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो. 
संक्रांतिचा पुण्यकाल – 14 जानेवारी 2018 रविवारी दुपारी १ वाजून ४६ ते सूर्यास्तापर्यंत आहे.
        या दिवसाचे कर्तव्य – तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. 

        संक्रांति वर्णन
वणिज करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार पुढील प्रमाणे –

        वाहन म्हैस (रेडा) असून उपवाहन उंट आहे. श्याम वर्ण (निळे) वस्त्र परिधान केले आहे. हातात तोमर हे शस्त्र घेतले आहे. अळीताचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध (प्रगल्भा) असून बसली आहे. वासाकरिता रुई घेतले आहे. दही भक्षण करीत आहे. मृग (हरिण) जाति आहे. भूषणार्थ निल रत्न धारण केले आहे. वारनांव घोरा असून नाक्षत्रनांव देखील राक्षसी आहे. सामुदाय मुहूर्त 30 आहेत. उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व पूर्व दिशेकडे मुख असून नैऋत्य दिशेस पाहत आहे.

      संक्रांतिच्या पर्वकाळात पुढील कामे करू नये-

कठोर बोलणे, दात घासणे. *( इथे दांत घासु नये याचा अर्थ झाडाच्या काठीने दांत घासु नये असा घ्यावा , बोटाने घासणे, चूल भरने अथवा ब्रश करने चालते.)
वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे. कामविषय सेवन आदी कामे करू नयेत.

        संक्रांति पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने

नवे भांडे , गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

संक्रांतिच्या दानाचा संकल्प – देशकाल कथन करून – मम आत्मन: सकलपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतीद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायु:महैश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन्‌ मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये । असा संकल्प करून दानवस्तूचे पूजन करून दान द्यावे. दक्षिणा द्यावी.

 

नक्षत्र परत्वे संक्रांति कोणा-कोणाला शुभाशुभ आहे.

ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा नक्षत्र असणाऱ्यांना –प्रवास योग घडेल

उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा  नक्षत्र असणाऱ्यांना  – सुखभोग                                

रेवती, अश्विनी, भरणी नक्षत्र असणाऱ्यांना  – शरीरपीडा, आरोग्याची काळाजी घ्यावी.                                               

कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, वस्त्र आभूषण प्राप्ति.                                                 

आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असणाऱ्यांना – द्रव्यनाश, अर्थिक नुकसान.                                                                 

उत्तरा फाल्गुनी , हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा नक्षत्र असणाऱ्यांना – शुभ, धनप्राप्ति, यशप्राप्ति.

 

ज्या नक्षत्रांना संक्रांति अशुभ आहे त्यांनी तिळमिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पन, तिलभक्षण व तिलदान या सहा अथवा यापैकी कोणतिही कामे संक्रांतिच्या पुण्यकालात करावी.

[ टिप  –  दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.]

संक्रांतिच्या पर्व काळात पुजाअर्चा, दान, व्रत इ. चे  पुण्य मिळतेच पण या काळात आपण आपल्या पत्रिकेतील बलहीन व अशुभ ग्रहांच्या संबंधित वस्तुंचे दान देऊन त्यांची अशुभताही कमी करू शकता. कोणत्या ग्रहासाठी कोणत्या वस्तु दान करू शकता ते पाहु.

सूर्य – माणिक रत्न, गहू, गाय, लाल वस्त्र, गूळ, सोने, तांबे, रक्तचंदन, कमळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

चंद्र – तांदूळ, कापूर, मोती, पांढरे वस्त्र, बैल, तूपाने भरलेला कुंभ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

मंगळ – पोवळे, गहु, मसुर, लाल बैल, गूळ, सोने, लाल वस्त्र, तांबे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

बुध – निळे वस्त्र, सोने, काशाचे भांडे, अख्खे मूग, पाचू रत्न, फुले यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

गुरु – पुष्कराग मणी, हळद, साखर, घोडा, पिवळे वस्त्र, मीठ, सोने यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शुक्र – चित्रविचित्र वस्त्र, पांढरा घोडा, गाय, हिरा, सोने, रूपे, अत्तर, तांदूळ यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

शनि – नीलमणी, उडिद, तेल, तीळ, कुळीथ, म्हैस, लोखंड, काळ्या रंगाची गाय, चप्पल, घोंगडे, छत्री यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

राहु – गोमेदमणी, घोडा, निळे वस्त्र, तेल, कांबळे यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

केतू – वैडूर्य मणी (लसण्या), तेल, तीळ, कांबळे, कस्तुरी, मेंढा, वस्त्र यापैकी आपल्या सामर्थ्यानुसार गरजु व योग्य व्यक्तिला दान करावे.

[दान नेहमी सत्पात्र व्यक्तीलाच करावे. दान अशुभ व बलहीन ग्रहाचेच करावे.]

आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा |
|| तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला.. ||


BACK TO HOME

BACK TO INDEX

DOWNLOAD OUR FREE E-MAGAZNE

हिंदी में पढे

मकर संक्रांति – एक महापर्व – (हिंदी)

एक राशि से दूसरी राशि में किसी ग्रह का प्रवेश संक्रांति कहा जाता है। सूर्य का धनु राशि से मकर राशि म प्रवेश का नाम ही मकर संक्रांति है। हमारे देश में अलग-अलग भागोंमें मकर संक्रांति का त्यौहार अलग-अलग नाम से एवं रीतिरिवाजोंसे मनाया जाता है। कहीं इसे मकर संक्रांति कहते हैं, कही उगादी तो कहीं पोंगल लेकिन इस त्यौहार को मनाने के पीछे का उद्देश्य एक ही रहता है और वह है सूर्य की उपासना, तीर्थ स्नान और दान। संक्रांति के लगते ही सूर्य उत्तरायण हो जाता है जिसे देवताओं का सूर्योदय होता है और असुरोंका सूर्यास्त होने पर उनकी रात्रि प्रारंभ हो जाती है।

संक्रांति २०१८

संक्रांतिका पुण्यकाल – रविवार १४ जनवरी २०१८  को दोपहर १.४६ से लेकर सूर्यास्त तक है।

संक्रांतिके दिन क्या करे – तिल मिश्रित जल से स्नान, तिल का अंगराग, तिलोंसे होम, तिलोंसे तर्पण, तिल भक्षण और तिल दान इस तरह छे प्रकारसे इस दिन तिलोंका उपयोग करने से समस्त पापोंका नाश हो जाता है।

संक्रांति का स्वरुप –

संक्रांत वणिज करण और रविवार के दिन हो रही है तो वाहनादि प्रकार इस प्रकार है। वार नाम घोरा और नक्षत्र नाम राक्षसी है।  बैठी हुयी है। उत्तर से दक्षिण दिशा की और जा रही है, पूर्व की और मुख है और नैऋत्य दिशा में देखा रही है। वाहन महिष और उपवाहन ऊंट है। फलस्वरूप महंगाई रहेगी और क्लेश रहेगा। श्याम वस्त्र पहना है, आयुध के तौर पे हैट में तोमर है। अगर का गंध लेपन लगाया है, उम्र में प्रगल्भा है। दुपहरिआ का पुष्प लिया है, वर्ण से विप्र है। नीलमणि धारण किया है। शूद्रों के लिए सुख।

मकर संक्रांति कुछ पौराणिक संदर्भ – 

  • इस दिन देवताओं के दिन की शुरुवात होती है और असुरोंकी रात्र शुरू हो जाती है।
  • इस दिन भगवान सूर्य अपने पुत्र शनि से मिलने स्वयं उसके घर जाया करते हैं। शनिदेव मकर राशि के स्वामी हैं, अतः इस दिन को मकर संक्रांति के नाम से जाना जाता है।
  • मकर संक्रांति के दिन ही गंगाजी भागीरथ के पीछे-पीछे चलकर कपिल मुनि के आश्रम से होकर सागर में जा उनसे मिली थीं। यह भी कहा जाता है कि गंगा को धरती पर लाने वाले महाराज भगीरथ ने अपने पूर्वजों के लिए इस दिन तर्पण किया था। उनका तर्पण स्वीकार करने के बाद इस दिन गंगा समुद्र में जाकर मिल गई थीं। इसलिए मकर संक्रांति पर गंगा सागर में मेला लगता है।
  • यशोदा जी ने जब कृष्ण जन्म के लिए व्रत किया था तब सूर्य देवता उत्तरायण काल में पदार्पण कर रहे थे और उस दिन मकर संक्रांति थी। कहा जाता है तभी से मकर संक्रांति व्रत का प्रचलन हुआ।
  • इस दिन भगवान विष्णु ने असुरों का अंत कर युद्ध समाप्ति की घोषणा की थी व सभी असुरों के सिरों को मंदार पर्वत में दबा दिया था। इस प्रकार यह दिन बुराइयों और नकारात्मकता को खत्म करने का दिन भी माना जाता है।
  • महाभारत काल के महान योद्धा भीष्म पितामह ने भी अपनी देह त्यागने के लिए मकर संक्रांति का ही चयन किया था।

 

मकर संक्राति के दिन करे सूर्य उपासना

ज्योतिष के अनुसार मकर संक्रांति के दिन सूर्य की पूजा उपासना करना परम पुण्यदायक माना जाता है। ग्रहों में सूर्य को राजा का पद प्राप्त है इसलिए सूर्य की उपासना करना महत्वपूर्ण माना जाता है। सूर्य कृपा प्राप्त करने के लिए मकर संक्रांति पर किये जाने वाले प्रयोग कुछ …..

१) मकर संक्रांति के दिन सूर्य भगवान को अर्ध्य देकर आदित्य हृदय स्तोत्र के 108 पाठ किये जायें तो वर्ष भर शांति रहती है। 

 २) मकर संक्रांति के दिन प्रातःकाल जल्दी उठकर नहा धोकर पवित्र होकर एक कलश में स्वच्छ जल भरकर उसमें थोड़ा सा गुड़, रोली लाल चंदन, अक्षत, लाल फूल डालकर दोनों हाथों को ऊंचा कर सूर्य भगवान को प्रणाम कर सूर्य मंत्र बोलते हुए अर्ध्य प्रदान करें। इसके पश्चात् लाल रंग की वस्तुओं का दान, तिल और गुड़ का दान करें तो आपको सूर्य देव की कृपा प्राप्त होने लगती है।

३) मकर संक्रांति के दिन प्रातःकाल नहा धोकर पवित्र होकर लाल वस्त्र धारण कर लाल आसन पर बैठकर भगवान सूर्य की पूजा करे।  सूर्य देव की तस्वीर या यन्त्र  को  पंचामृत स्नान, धूप, दीप जलाकर लाल रंग के पुष्प फल अर्पित कर लाल रंग की मिठाई अथवा गुड़ का भोग लगायें। सूर्य मंत्र का ७००० जप करें। इससे आपको सूर्य देव की कृपा साल भर तक प्राप्त होती रहेगी।

आप भी मकर संक्रांति के दिन सूर्योपासना का लाभ अवश्य उठायें। 

मकर संक्रांति के पावन पर्व पर पूजा, दान, व्रत द्वारा आप सिर्फ पुण्य ही नहीं कमायेंगे बल्कि आप अपनी कुंडली के कमजोर ग्रहों के अशुभ प्रभाव को भी दूर कर सकते हैं। इसके लिए विषेष रूप से कुण्डली के अशुभ एवं कमजोर ग्रहों से संबंधित दान अवश्य करें। मकर संक्रांति के पावन पर्व पर ग्रहों के अनुसार दान कर आप अपने जीवन को उज्ज्वल बना सकते हैं तथा सफलता प्राप्त कर सकते हैं।

सूर्य ग्रह से संबंधित माणिक्य, गेहूं, स्वर्ण, तांबा, बर्तन, गुड़, गाय, लाल वस्त्र, लाल फूल, लाल चंदन, कमल का फूल  आदि वस्तुओं का दान अपनी सामर्थ्यानुसार कर सकते हैं। यह दान किसी पुजारी या ब्राह्मण या गरीब व्यक्ति को ही देना चाहिए।

चंद्र ग्रह से संबंधित चांदी की वस्तुएं, मोती, चावल, दूध, बांस की टोकरी, शंख, कपूर, सफेद कपड़ा, जल, दूध, घी, चावल की खीर आदि वस्तुएं सामर्थ्यानुसार किसी महिला को दान कर सकते हैं ।

मंगल ग्रह से संबंधित मसूर की दाल, लाल कपड़ा, गेंहू, सोना, तांबा की वस्तुएं, लाल चंदन, मूंगा, गुड़, लाल बैल, भूमि, मीठी रोटी सामर्थ्यानुसार  किसी ब्राह्मण या गरीब व्यक्ति को दान किया जा सकता है।

बुध ग्रह से संबंधित वस्तुएं साबूत मुंग , स्वर्ण, हरा वस्त्र, पन्ना, कस्तूरी, हरी घास, हरी सब्जियां आदि का दान किसी ब्राह्मण या गरीब व्यक्ति को कर सकते हैं। हरे रंग की चूड़ी और वस्त्र का दान किन्नरों को देना भी शुभ होता है ।

बृहस्पति ग्रह से संबंधित वस्तुएं पीली मिठाइयां, चीनी, केला, हल्दी, पीला धान्य, पीला कपड़ा, पुखराज, नमक, स्वर्ण, चने की दाल, घोड़ा, शहद, केसर, चांदी, शक्कर आदि किसी ब्राह्मण, पुरोहित या गुरू को दिया जा सकता है ।

शुक्र ग्रह से संबंधित वस्तुएं सफेद रेषमी कपड़ा, चावल, दही, घी, सफेद घोड़ा, गाय-बछड़ा, हीरा, इत्र, कपूर, शक्कर, मिश्री, श्रृंगार का सामान, चांदी, जरकिन स्टोन आदि अपनी सामर्थ्य के अनुसार स्त्री को दान कर सकते हैं ।

शनि ग्रह से संबंधित काली उड़द, तेल, काले वस्त्र, लोहे की वस्तुएं तथा बर्तन, काला तिल, कंबल, जूता, नीलम, चांदी आदि वस्तुएं किसी गरीब वृद्ध व्यक्ति को दान करें ।

राहु ग्रह से संबंधित वस्तुएं काले-नीले फूल, कोयला, गेहूं, नीला वस्त्र, कम्बल, गोमेद, उड़द, तेल, लोहा, अभ्रक, मदिरा आदि सायंकाल किसी गरीब व्यक्ति को दान दें।

केतु ग्रह से संबंधित काला फूल, चाकू, लोहा, छतरी, सीसा, लहसुनिया, तिल, दुरंगा कंबल, कपिला गाय, बकरा, नारियल, कस्तूरी आदि वस्तुएं दान की जा सकती हैं।

* दान देते समय जिस व्यक्ति को दान दिया जा रहा है उसका भी ध्यान रखें क्योंकि दान का फल तभी उत्तम होता है जबकि यह शुभ समय में किसी सुपात्र को दिया जाता है।

|| ज्योतिष जगत परिवार की ओर से हमारे सभी पाठकों को मकर संक्रांति की शुभकामनाएं ||

BACK TO HOME

BACK TO INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE

1 Jyotish Jagat E-Magazine Jan. 2018

नमस्कार,

आम्ही ज्योतिष जगत नावाची इ- मासिकाची सुरुवात केली आहे. जे सर्वांसाठी मोफत असेल. ज्यांना हवे असेल त्यांनी आमच्या वेबसाईट च्या मधून मोफत करून घेऊ शकता . हे  मासिक ज्योतिष, सामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, डाऊजिंग, टॅरोट, रेकी, रमल अध्यात्म, धर्म, संस्कृति, आयुर्वेद  इ. व यासारख्या विषयांवर आधारीत आहे.

हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने वाचकांच्या पाठींब्याची व प्रोत्साहनाची गरज लागेलच. हे मासिक अजून चांगले, वाचनीय बनविण्यासाठी जर आपल्याकडेही काही कल्पना असतील अगर काही सुधारणा सुचवायच्या असतील तर आपले स्वागत आहे. जर मासिकात काही त्रुटी राहिल्या असतील तरीही कळवा. प्रतिक्रिया जरूर द्या.

www.jyotishjagat.com वर जाऊन download करून घेऊ शकता.

धन्यवाद

ज्योतिष जगत

नमस्कार ,

ज्योतिष जगत हमारी इ-पत्रिका है।  जो पाठकोंकेलिए मुफ्त (Free) है। कोई भी इसे हमारी वेबसाइट के Download section से Download कर सकता है। यह पत्रिका ज्योतिष (सभी शाखाए), वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, डाऊजिंग, रमल, टॅरोट, रेकी, अध्यात्म, धर्म, संस्कृती, आयुर्वेद इ. विषयोंपे आधारीत रहेगी।

यह हमारा पहला प्रयास है तो, मासिक पत्रिका को और बेहतर बनाया जा सके इस के लिए अगर आपके पास कोई विचार या योजना है, या आपका कोई सुझाव है तो भी आप का स्वागत है। या फिर अगर कोई त्रुटि रह गयी है तो बता दे। पर प्रतिक्रया अवश्य दे।

www.jyotishjagat.com पे जा कर download करे।

धन्यवाद

ज्योतिष जगत

 

BACK TO HOME