1 Lakh Hits in just 6 months

1 Lakh Hits in just 6 months, …… Thank You Readers…

सहा महिन्यात १ लाख हिट , “ज्योतिष जगत “च्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!

छह महिनेमे १ लाख हिट, “ज्योतिष जगत” के सभी पाठकोंका मन: पूर्वक आभार !

 

  • ज्योतिष जगत

CARD FOR THE WEEK 26 Feb 2018

26TH FEBRUARY TO 4TH MARCH

The Hanged Man

Hello readers,

        We have THE HANGED MAN card for this week.

This card too comes with one different but valuable message.

Many times in our journey of life, while we are moving towards our goal, we find ourselves stuck up somewhere. We find the things are not getting done in time. We don’t come to know the reason why the things are delayed. We feel that something is pulling our leg.

Our card for this week makes the thing clear.

In life we decide our goal and start our plans accordingly and step forward. But sometimes is really necessary to stop for a while. Your goal can be of any type, career, money, spiritual growth, etc.

        It’s always better to take a pause for a while and analyse our self.

The situation demand few sacrifices from you. This can be in time regard, your patience, may ask you to postpone your decisions or can also be just a break time.

        Don’t feel that this is restriction. This waiting period plays very important role in your journey. Use this to re-analyse your decisions, study your journey so far. Compare all types of investments to the expected outcome.

This period may also throw light on new possibilities with different outcomes.

This sacrifice is not for the sake of others. Here it’s for your own benefit.

        You are left with the choice now, either give up sacrifice or give up your goals.

  õõõõõ

STOP, THINK AND PROCEED.


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N.

Tarot reader

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 25 फेब्रुवारी ते 03 मार्च 2018

[रविवार २५  फेब्रुवारी ते शनिवार ०३ मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध ०३ मार्च रोजी कुंभ राशीतून मिन राशीत जात आहे., याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ]

 

मेष – अनामिक दडपण जाणवेल. सर्व कृतींवर योग्य नियंत्रण ठेवावे. पोटाचे विकार त्रास देतील. वाहने सांभाळून चालवावीत. मेंदूचे विकार असणा-यांनी काळजी घ्यावी. सरकारी कामात अनुकूलता. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये चांगल्या घटना घडतील. संततीविषयक संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. शुभ ता. 25/26/03.

 

वृषभ – व्यवसायात आर्थिक नियोजनात बिघाड होईल. नोकरीमध्ये समाधानकारक घटना. संततीच्या वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग. सरकारी कामात अनुकूलता राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 27/28.

 

मिथुन – व्यावसायिक फारसे चढ-उतार होणार नाहीत. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना आततायीपणा नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधा-यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. 25/26/01/02.

 

कर्क – उद्योग-व्यवसायात आर्थिक गोष्टींमुळे तणाव राहतील. नोकरीमध्ये तणाव जाणवेल. सतंतीच्या बाबतीत समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीमुळे लाभदायक घटना घडतील. प्रवासात अनपेक्षित समस्या येतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. 27/28.

 

सिंह –  व्यवसायात आर्थिक समस्या त्रास देतील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी येईल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून लाभ मिळतील. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. 25/26/01/02.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति फारशी चांगली राहणार नाही. नोकरीमध्ये सहका-यांची साथ लाभेल. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अनुकूलता राहील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 25/26/27/28/03.

 

तुला – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. 27/28/01/02.

 

वृश्चिक –  महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. रागाच्या भरात कृती करणे टाळावे. स्थावराच्या संधी चालून येतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील. जवळच्या नातलगांपासून त्रास होतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 1/2/3.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. नोकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग. शुभ ता. 25/26/3.

 

मकर –  संततीच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात संमिश्रता राहील. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. पण वाद टाळावेत. शुभ ता. 25/26/27/28.

 

कुंभ – नोकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. संततीच्या विचित्र वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून व्यत्यय येण्याची शक्यता आहे. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. पचनाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. शुभ ता. 27/28/1/2.

 

मीन – संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहील. व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. जोडीदाराच्या वागण्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासामधून आर्थिक कामात अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 1/2/3.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

स्वप्न फलाध्याय – (हिंदी) –

                स्वप्न में हमारी कई अतृप्त इच्छाएँ भी चरितार्थ होती है। जैसे हमारे मन में कहीं भ्रमण करने की इच्छा होने पर स्वप्न में यह देखना कोई आश्चर्य की बात नाही है कि हम कहीं भ्रमण कर रहे हैं । सम्भव है कि जिस इच्छा ने हमें भ्रमण का स्वप्न दिखाया है वही कालान्तर में हमें भ्रमण कराये । इसलिए स्वप्न में भावी घटनाओं का आभास मिलना साधारण बात है । कुछ विद्वानों ने इस थ्योअरी का नाम सम्भाव्य गणित रख्खा है । इस सिद्धान्त के अनुसार स्वप्न में देखी गई कुछ अतृप्त इच्छाएँ सत्य रूप में चरितार्थ होती है; क्योंकि बहुत समय से कई इच्छाएँ अज्ञात होने के कारण स्वप्न में प्रकाशित रहती हैं और ये ही इच्छाएँ किसी कारण से मन में उदित होकर हमारे तदनुरुप कार्य करा सकती हैं । मानव अपनी इच्छाओं के बल से ही सांसारिक क्षेत्र में उन्नति या अवनति करता है, उसके इच्छाओं में कुछ इच्छाएँ अप्रस्फुटित अवस्था में ही विलीन हो जाती हैं, लेकिन कुछ इच्छाएँ परिपक्व अवस्था तक चलती रहती हैं । इन इच्छाओं में इतनी विशेषता होती है कि ये बिना तृप्त हूए मुक्त नहीं हो सकती । सम्भाव्य गणित के सिद्धान्ता नुसार जब स्वप्न में परिपक्व अवस्था वाली अतृप्त इच्छाएँ प्रतीकाधार को लिये हुए देखी जाती हैं, उस समय स्वप्न का भावी फल सत्य निकलता है । अबाधभावानुसंग से हमारे मन के अनेक गुप्त भाव प्रतीकों से प्रकट हो जाते हैं, मन की स्वाभाविक धारा स्वप्न में प्रवाहित होती है, जिससे स्वप्न में मन की अनेक चिन्ताएँ गुँथी हुई प्रतीत होती हैं । स्वप्न के साथ संश्लिष्ट मन की जिन चिन्ताओं और गुप्त भावों का प्रतीकों से आभास मिलता है, वही स्वप्न का अव्यक्त अंश भावीं फल के रुप में प्रकट होता है ।

 

स्वप्न और उसके प्रकार –

 

स्वप्नशास्त्र में प्रधानतया निम्नलिखित सात प्रकार के स्वप्न बताये गये हैं:

दृष्टजो कुछ जागृत अवस्था में देखा हो उसी को स्वप्नावस्था में देखना ।

श्रुतसोने के पहले कभी किसी से सुना हो उसी को स्वप्नावस्था में देखना ।

अनुभूतजो जागृत अवस्था में किसी भाँति अनुभव किया हो, उसी को स्वप्न में देखना ।

प्रार्थित- जिस की जागृतावस्था में प्रार्थना-इच्छा की हो उसी को स्वप्न में देखना ।

कल्पितजिसकी जागृतावस्था में कभी भी कल्पना की गयी हो उसी को स्वप्न में देखना ।

भाविकजो कभी न तो देखा गया हो और न सुना गया हो, पर जो भविष्य में घटित होने वाला हो उसे स्वप्न में देखना ।

दोषजवात, पित्त और कफ के विकृत हो जाने से जो स्वप्न देखा जाय, बिमारि के कारण देखे स्वप्न ।

        इन सात प्रकार के स्वप्नों में से पहले पाँच प्रकार के स्वप्न प्राय: निष्फल होते हैं, वस्तुत: भाविक स्वप्न का फल ही सत्य होता है ।

 

रात्रि के प्रहर के अनुसार स्वप्न का फल –

 

रात्रि के पहले प्रहर में देखे गये स्वप्न एक वर्ष में,

दूसरे प्रहर में देखे गये स्वप्न आठ महोने में (चन्द्रसेने मुनि के सात से ७ महिने में),

तिसरे प्रहर में देखे गये स्वप्न तीन महीने में,

चौथे प्रहर में देखे गये स्वप्न एक महीने में (वराहमिहिर के मत से १६ दिन में),

ब्राह्म मुहूर्त (उष:काल) में देखे गये स्वप्न गये दस दिन में,

प्रात:काल सूर्योदय से कुछ पूर्व देखे गये फल अतिशिघ्र  प्राप्त होता है ।

 

  तिथियों की अनुसार स्वप्न का फल-

 

शुक्लपक्ष कि प्रतिपदा – इस तिथी में स्वप्न देखने पर विलंब से फल मिलत है ।

शुक्लपक्ष कि द्वितीया- इस तिथी में स्वप्न देखने पर विपरीत फल होता है । अपने लिए देखने से दुसरों को और दुसरों के लिए देखने से अपने को फल मिलता है ।

शुक्लपक्ष की तृतीया – इस तिथि में भी स्वप्न देखने से विपरीत फल मिलता है । पर फल की प्राप्ति विलम्ब से होती है ।

शुक्ल पक्ष की चतुर्थी और पंचमी – इन तिथियों में स्वप्न देखने से दो महिने से लेकर दो वर्ष तक के भीतर फल मिलता है ।

शुक्लपक्ष की षष्ठी, सप्तमी अष्टमी, नवमी और दशमी- इन तिथियों में स्वप्न देखने से शीघ्र फल की प्राप्ति होती है तथा स्वप्न सत्य निकलता है ।

शुक्लपक्ष की एकादशी और द्वादशी- इन तिथियों में स्वप्न देखने से विलम्ब से फल होता है ।

 शुक्लपक्ष की त्रयोदशी और चतुर्दशी – इन तिथियों में स्वप्न देखने से स्वप्न का फल नहीं मिलता है तथा स्वप्न मिथ्या होते हैं ।

पूर्णिमा – इस तिथी के स्वप्न का फल अवश्य मिलता है ।

कृष्ण्पक्ष कि प्रतिपदा – इस तित्जी के स्वप्न का फल नही होता है ।

कृष्णपक्ष की द्वितीया-  इस तिथि के स्वप्न का फल विलम्ब से मिलता है । मतान्तर से, इसका स्वप्न सार्थक होता है ।

 कृष्णपक्ष की तृतीया और चतुर्थी- इस तिथियों के स्वप्न मिथ्या होते हैं ।

कृष्ण्पक्ष की पंचमी और षष्ठी – इन तिथियों के स्वप्न दो महीने बाद और तीन वर्ष भीतर फल देने वाले होते हैं ।

कृष्णपक्ष की अष्टमी और नवमी – इन तिथियों के स्वप्न विपरीत फल देने वाले होते हैं ।

कृष्णपक्ष की दशमी, एकादशी, द्वादशी और त्रयोदशी- इन तिथियों के स्वप्न विपरीत फल देने वाले होते हैं

कृष्णपक्ष की चतुर्दशी- इस तिथि का स्वप्न सत्य होता है तथा शीघ्र ही फल देता है ।

अमावस्या- इस तिथि का स्वप्न मिथ्या होता है ।

स्वप्न का फल देखते समय इन सभी नियमों को ध्यान में जरूर रखे।


– संदर्भ – भद्रबाहु संहिता

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

यह लेख भी पढ़े ………….

फलादेश के कतिपय नियम (हिंदी)

होरारत्नम (हिंदी) – बलभद्र विरचित – Book Review

स्त्री जातक – कुछ शुभ योग (हिंदी)

ग्रह बल निरूपण (हिंदी)

स्वरशास्त्र (हिंदी)

कुंडलीसे शारीरिक स्थितिका ज्ञान (हिंदी)

राजयोग भंग (हिंदी)

नक्षत्र और आराध्य वृक्ष (हिंदी)

अष्टकूट मिलान – सुखी विवाह के लिए आवश्यक  (हिंदी)

पंचांग परिचय (हिंदी)

CARD FOR THE WEEK 19 Feb. 2018

19TH FEBRUARY TO 25TH FEBRUARY

Four Of Swords

Hello readers,

                This week’s card is Four of Swords. Swords mean it brings battle, conflicts, fight, war, etc in picture

        Our life itself is one battle field. Daily we face new challenges regarding different aspects like job, domestic responsibilities, relationships, financial issues, etc. Unknowingly our life is always under stress and we always fight a battle in one or the other way.

        But now it’s time to have a break. Each day we spend lot of physical and mental energy. Now it’s time to refresh and regain our spent energy.

        Our card suggests the best way for this is go in solitude. Give up all your worries and spend some time only for yourself.

Meditation is the one, which works faster than any other remedy. So make meditation as a part of your daily routine. Prayers and chanting too works well. Keep your mind cool. Relax yourself. Sometimes to keep yourself cool and calm in all your surroundings is also one challenge for you. Go ahead. The time which you spend in meditation will open the new doors for you.

Reflect to your past memories. Have a review of your experiences. Check what works well for you. Compare it with your present requirements. Make the desired changes. Plan well. Plans made with cool and calm mind always works well.

Not only for this particular week, but in the journey of life whenever you find yourself failing to face the challenges just enter in any of the spiritual practices. Go for self healing.

        Have a great week ahead.

 

****

Spiritual practices always increase your inner strength


BACK TO HOME

BACK TO TAROT INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N.

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

vrushalivs@gmail.com

 

साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 फेब्रुवारी 2018

[रविवार १८  फेब्रुवारी ते शनिवार २४ फेब्रुवारी २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ]

 

मेष – व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग संभवतात. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. जोडीदाराच्या बाबतीत गोंधळात्मक स्थिति निर्माण होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. प्रवास लाभदायी ठरतील. मित्रांच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. 21/22.

 

वृषभ – व्यवसायात आर्थिक नियोजन बिघडेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरवर्गावर लक्ष ठेवावे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रवासात तब्येतीची काळजी घ्यावी. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. 18/19/23/24.

 

मिथुन – संततीच्या सर्व गोष्टींवर नीट लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांनी इत्तरांचे ऐकून कृती करु नये. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. वडिलधा-यांचा सल्ला हितावह ठरेल. झटपट पैसे मिळवण्याच्या मार्गाचा अवलंब करु नये. सरकारी कामात दिरंगाई होईल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. शुभ ता. 18/19/20/21/22.

 

कर्क – नोकरदारांना मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागेल. व्यावसायिक आर्थिक गणिते चुकतील. संततीच्या निर्णयांमुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. 21/22/23/24.

 

सिंह –  उद्योग-व्यवसायात आर्थिक घोटाळे संभवतात. नोकरीच्या ठिकाणी बेफिकीर राहू नये. संततीला प्रवासात नुकसानीचे योग. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावरासंबंधी संधी चालून येतील. आर्थिक गोष्टींवरुन जोडीदाराशी वाद. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. 23/24.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति चांगली राहणार नाही. नोकरवर्गावर आर्थिक भरवसा ठेवू नये. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 18/19/20.

 

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. नोकरीमध्ये पारदर्शी राहणे फायद्याचे ठरेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. 18/19/20/21/22.

 

वृश्चिक –  सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीमुळे आर्थिक नियोजन बिघडेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा वाढेल. नोकरीमध्ये सामंजस्याची भूमिका ठेवावी. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. जोडीदाराच्या बाबतीत अनपेक्षित गोंधळ निर्माण होतील. प्रवास संमिश्र राहतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 21/22/23/24.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता मिळेल. संततीला आर्थिक संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत काही चिंता निर्माण होतील. प्रवासामधून मौल्यवान गोष्टींची काळजी घ्यावी. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. 23/24.

 

मकर –  संततीच्या आर्थिक बाबी नीट तपासून घ्याव्यात. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामांत संमिश्रता राहील. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून आनंद मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. 18/19/20.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई होईल. स्वतः कुणावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. कुटुंबात गोंधळात्मक स्थिति राहील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. 21/22.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये प्रलोभनांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत आर्थिक फायदे मिळतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. काही जणांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. 18/19/23/24.


सौजन्य – दाते पंचांग

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

शिवजयंती – तारीख कि तिथी ?

शिवजयंतीच्या तारखेविषयी अनेक वाद व गोंधळ घातले गेले आहेत, मागील शतकभर हा वाद सुरु होता अखेर महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापून १९ फेब्रुवारी १६३० ही इंग्रजी तारिख निश्चित केली. पण यात एक मुलभुत त्रुटि राहीली. ही तारीख ज्युलिअन कॅलेंडरप्रमाणे होती. आणि सध्या आपण जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगेरिअन कॅलेंडर आहे.

shivabharat-shivaji-birth jyotish jagat

shivabharat-shivaji-birth jyotish jagat

   

  “शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित” असता छत्रपती शिवाजी माहाराजांचा जन्म झाल्याचे “शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे. याच जन्म विवरणची एक जन्म पत्रिकाही उपलब्ध आहे. जन्म वेळ ३० घटी (संध्या. ७.००) आहेत.

shivaji-maharaj-KUndali Jyotish jagat

shivaji-maharaj-KUndali Jyotish jagat

         त्यानुसार सिंह लग्न व कन्या रास येते व चंद्राधियोग हा राजयोग झाला आहे. तृतियात (पराक्रम स्थान) उच्च शनि, पंचमात केतू, सप्तमात रवि-गुरु, अष्टमात बुध, नवमात शुक्र व लाभात मंगळ-राहु आहेत. आता हि सर्व ग्रहस्थिती १९ फेब्रुवारी १६३० या तारखेशी मेळ खात नाही. फाल्गुन वद्य तृतिया हि तिथी तर निश्चित आहे, पण भारतीय पंचांगानुसार १९ फेब्रुवारीला फाल्गुन वद्य तृतिया येऊ शकत नाही. मग या फरकाचे कारण काय? तर याचे कारण म्हाणजे ज्युलियन व ग्रेगेरिअन कालगणनेतील फरक. १९ फेब्रुवारी ही ज्युलिअन कालगणनेनुसारची तारीख आहे जी कालगणना आता वापरात नाही, सध्या जगभरात ग्रेगेरिअन कालगणना वापरली जाते त्यानुसार फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ यादिवशी १ मार्च १६३० हा दिवस येतो. ज्युलियन कालगणना व ग्रेगेरिअन कालगणना यांच्यात इ.स. १७०० पर्यंत १० दिवस अधिक केले गेले तर इ.स. १७०० नंतर ११ दिवस अधिक केले गेले, हा फरक ब्रिटीशांनी इ.स. १७५२ पासून अंमलात आणण्यास सुरवात केली व भारतातही तेंव्हापासूनच लागू झाला. म्हणून शिवाजी महाराजांची जन्म तारीख ग्रेगेरिअन कालगणनेनुसार (आताच्या चालू कालगणनेनुसार) १ मार्च येईल, १९ फेब्रुवारी नव्हे.

sept-1762-calendar jyotish jagat

sept-1762-calendar jyotish jagat

महापुरुषांचे जन्मोत्सव तिथि प्रमाणे साजरे करावे की तारखे प्रमाणे हा अनेक वर्षापासूनचा वाद आहे. आता तारखेतही असे घोळ असतील व तिथि निश्चित असेल तर तिथिप्रमाणेच साजरे करण्यास काय हरकत आहे?. तसेही कॅलेंडर भारतात प्रचलित होण्यापुर्वीच्या घटना तिथि प्रमाणेच साजऱ्या करणे हेच योग्य वाटते. आता श्रेय लाटण्यासारखे तुच्छ राजकारण बाजूला ठेवल्यास बरे होईल.

हे सर्व लिहिण्याचे कारण जुन्या कडिला ऊत आणण्याचे नसून ज्या शिवरायानी स्वराज्य स्थापन केले, जे शिवराज आज साडेतिनशे वर्षानंतरही आम्हास प्रेरणा देतात त्या शिवराजांची अचूक जन्म तारीख जाणून घेणे इतकेच आहे.

एका ज्योतिषीय सोफ़्ट्वेअर मध्ये पत्रिका बनविली आहे ती शिवभारत मध्ये दिलेल्या पत्रिकेशी तंतोतन्त जुळते आहे. जन्म तारीख ०१ मार्च १६३०, जन्मवेळ- संध्याकाळी ७.०० वाजता (३० घटी), जन्म स्थळ शिवनेरी पुणे. (अक्षांश -१९अं २१ मि. उत्तर, रेखांश – ७३ अं ५३ मि. पूर्व) येथे रामण अयनांश वापरले आहेत.

Shivaji Maharaj Kundali New jyotish jagat

Shivaji Maharaj Kundali New jyotish jagat

या विषयी काही मंडळींचे असे मत आहे की भारतीय कालगणना केवळ भारतातच प्रचलीत आहे व इंग्रजी कॅलेंडर जगभर म्हणून शिवाजी महाराजांना “ग्लोबलाइज” करण्यासाठी इंग्रजी तारखेप्रमाणेच साजरी करावी. मग उद्या आखाती देशात शिवाजी महाराज पोहचावे म्हणून “हिजरी” सनाप्रमाणे शिवजयंती साजरी करणार का?

आता इतके स्पष्ट करूनही बरेच लोक तारखेचाच अट्टाहास धरतील व इतरांनीही तारखे प्रमाणेच शिवजयंती साजरी करावी असे म्हणतील, त्यांना मी इतकेच म्हणेन कि, ज्या लोकांनां शिवाजी महाराज हे देवतुल्य वाटतात त्यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी व ज्यांना ते सामान्य मनुष्य वाटतात त्यांनी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी बस्स. कारण देवादिकांच्या सर्वच जयंत्या तसेच आपले सण आपण तिथीप्रमाणेच साजरे करतो ना .आज ऑस्ट्रेलिया, युरोप – अमेरिकेत आमचे गणपती, दिवाळी सारखे सॅन साजरे होतातच ना ? ते हि तिथीप्रमाणेच. मग शिवजयंती का होणार नाही ?

अर्थात हे माझे मत आहे.


BACK TO HOME

BACK TO INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Shri Uttam Gawade

श्री उत्तम रमेश गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद

9901287974

 

कसा आहे तुमचा वेलेन्टाइन ?

प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असते!

अन तुमचे नि आमचे अगदी सेम असते!

पण खरोखरच सगळ्यांच प्रेम हे सेम असते काय? व्यवहारात तरी तसे अढळून मात्र येत नाही.

 

काही जण नजरेला नजर भिडताच प्रेमात पडतात, तर काही जण अनेक वर्षे एकत्र राहूनही त्यांच्यात प्रेम होऊ शकत नाही, काही जण अनेक प्रेमाचा आस्वाद घेत असतात, तर काही जण प्रतिसादाविनाही एकानिष्ठेने एकाच व्यक्तीवर प्रेम करत असतात. काही जण प्रेम भंगाचे दु:ख पचवितात, तर कही जण प्रेम भंगाच्या सूडाने पेठून ऊठतात. प्रत्येकाच्या प्रेमाचे हे विविध रंग राशींच्या माध्यमातून समजून घेता येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या वेगवेगळ्या राशीमधून त्यांचे वर्गिकरण करता येण्यासारख आहे.

       पुढील गोष्ठीवरुन व्यक्तिंचे स्वभाव व त्याच्या जोडीदारांकडून असलेल्या अपेक्षा, त्यांची प्रेम करण्याची पद्धत यांचा अंदाज घेता येऊ शकतो. तर मग जाणुण घ्या ’कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन’.

(पुढे देण्यात आलेले राशी गुणधर्म जसेच्या तसेच अनुभवास येतीलच असे नाही. याचे कारण म्हणजे प्रेम जीवानाचा विचार करताना राशीबरोबरच मंगळ व शुक्र ग्रह यांचाही विचार करावयाचा असतो, मंगळ व शुक्र बलवान असून ज्या राशीत असतात त्याप्रमाणे व्यक्तीचा स्वभाव असू शकतो, तसेच जन्म कुंडलीत अनेक ग्रह एकाच राशीत असतील तर ती राशी उत्तेजीत होऊन त्या राशीचे गुणधर्म त्या व्यक्तित दिसुन येतात. पण या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहित असतीलच असे नाही म्हणून येथे राशींचे माध्यम वापरलेले आहे.)

 

मेषराशीचे प्रेम-

 

                  राशीचक्रातील ही पहिली रास आहे. अग्नि तत्वाची चर रास असून या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. हे लोक शरिराने व मनाने उत्साही असून यांना आव्हानांची आवड असते. हे स्वतंत्र प्रवृत्तीचे असून, दुसऱ्याच्या आधिन राहणे यांना आवडत नाही. हे स्वत:च्या निर्णयानुसारच कार्य करतात. पण यांच्यात सारासार विचार करण्याची शक्ति कमी असते. प्रेमात अतिशय आक्रामक व उत्साही असतात. बुद्धिपेक्षा भावनेच्या आहारी जाणारे लोक असतात. एकदम वीज कोसळावी तशी प्रेमात पडतात व तेवढ्याच वेगाने त्यातून बाहेर ही पडतात. यांच्या बाबतीत  love at first sight  प्रथम दर्शनी प्रेमाची शक्यता जास्त असते. लपवाछपवीचा प्रकार यांना आवडत नाही. हे लोक प्रेमात हळवे नसतात तर उतावळे असतात. त्याचप्रमाने कुणाच्याही प्रेमात झुरत बसणे, प्रेम व्यक्त न करता मनात दाबून ठेवणे यांना जमत नाही. मुळातच साहसप्रिय असल्याने प्रेमात पडल्यास सतत पाठलाग करुन स्पष्ठ व स्वच्छ शब्दात उघडपणे प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकांताचीच गरज पाहिजे असे नाही. चारचौघात अगर लोकांसमोरही ते तितक्याच आत्मविश्वासाने व स्पष्टपणे व्यक्त करतात. नीतिनियमांची फारशी पर्वा करीत नाहीत. प्रेम मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. यांना भडक शृंगाराची आवड असते. प्रेमात जोडीदारकडून सहज प्रतिसाद मिळाल्यास यांचा प्रेमातील रस कमी होतो. याना निर्णयही जलद हवा असतो फार काळ वाट पहात बसणे जमत नाही.

 

वृषभ राशीच प्रेम-

 

                   दुसरी रास वुषभ, पृथ्वी तत्वाची स्थिर रास असून आर्थिक उत्कर्ष घडवून आणणारी ही रास शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. हे लोक व्यवहारी, रसिक, कलावंत, हौशी व चैनी असतात, तसेच स्वभावाने प्रेमळ पण हटटी असतात. या लोकांना ऐहिक सुखाची फार आवड असते, गाडी-सुंदर बंगला व ऐशाआरामाच्या साधनांची फार हौस असते. सुख व आराम मिळवीण्यासाठी सतत धडपड चालू असते. व्यक्तीमत्व आकर्षक असेले तरी ते अधिक आकर्षक बनवीण्याचाच यांचा सतत प्रयतन असतो. स्वत:ला सुंदर व आकर्षक बनविण्यावर हे लोक बराच खर्च करत असतात. लोभस बोलणे व आकर्षक व्यकतीमत्व हे यांचे खास वैशिष्ट्य आहे यामुळेच हे लोक विरुद्ध लिंगी लोकांत विशेष प्रिय असतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक चोखंदळ असतात. प्रेम करताना सुरक्षिततेचा विचार सर्व प्रथम करतात. प्रियकराकडून जीवनभराच्या साथीची, स्थिर व दृढ प्रेमाची अपेक्षा असते. प्रेमात एकदम एकनिष्ठ असतात व प्रियकराकडूनही निस्वार्थी व एकनिष्ठ प्रेमाची अपेक्षा ठेवतात. प्रियकाराच्या मनाचा अंदाज घेत मंद गतिने प्रेमाची प्रगती चालु असते. मेष राशीप्रमाणे एकदम व अचानक नसते. प्रियकराचे मन आकर्षित करुन त्याला जिंकण्यात चतुर असतात. आपल्या प्रियकराला खुष ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. प्रियकरासाठी सहजपणे स्वार्थ त्याग करतात. यांना लैंगिक सुखाची आवड असते. या राशीचे लोक हे अतिशय Romantic  असतात. याना लैंगिक जीवनाची विलक्षण आवड असते.

 

मिथुन राशीचे प्रेम-

 

                     मिथुन ही बुधाची, वायुतत्वाची द्विस्वभावी रास आहे. ही बौद्धिक रास आहे. विनोद बुद्धि व हजरजबाबीपणा हे यांचे खास गुण. इतरांवर टिका करण्याची सवय असते, पण एखाद्या विषयात पारंगत होणे कठीण असते. कारण एखाद्दा विषयात निर्माण झालेली आवड तशीच कायम टिकेल याची शाश्वती नसते. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय बोलका असल्याने लोकांशी पटकन मैत्री जमते. कामाच्या ठिकाणी तर हे लोक विशेष लोकप्रिय असतात. यांना पुष्कळ मित्र-मैत्रिणी असतात. आपल्या विनोदी व चतुर संभाषणाने संभोवातलच्या व्यक्तीना आपल्याकडे आकार्षित करत असतात. प्रेमात विविध भेट वस्तु देऊन व प्रियकराची स्तुती करुन प्रियकराला खुष ठेवण्यात चतुर असतात. हे लोक अप्रामाणिक अगर फसवे नसतात पण या राशिंच्या बऱ्याच लोकाम्ना फर्ल्ट करण्याची सवय असते त्यामुळे ते प्रेमात किती गंभीर आहेत हे साम्गणे कठिण असते. या राशीचे बरेच लोक ’आज पुजा कल कोई दुजा’ हे तंत्र वापरताना दिसतात. एका प्रेम प्रकरणातील अपयश विसरुन लगेच पुढच्या प्रकरणाला सुरुवात करतात. स्वभावाने थोडेसे घाबरट असल्याने आपले प्रेम बिनधास्तपणे व्यक्त करण्याऐवजी इशाऱ्यांच्या, मध्यस्थांच्या अथवा प्रेम पत्रांच्या सहाय्याने लपुन छपून प्रेम करत असतात. पण प्रकरण अंगाशी आल्यास त्यातून सही सलामत बाहेर पडण्यातसुद्धा पटाईत असतात.

 

कर्क राशीचे प्रेम-

 

                  कर्क ही जल तत्वाची चर रास असून या राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. या राशीचे लोक स्वभावाने प्रेमळ, दयाळू व भावानाप्रधान असतात. मनाने चंचल व लहरी असून कल्पनाशक्ती उत्कॄष्ट असते, तसेच हे क्षमाशील व चिंतनशील असतात. यांचे मूड क्षणाक्षणाला बदलताना दिसतात. या राशीमध्ये सहनशीलता खूप असते. आई व कुटुंबाविषयी प्रेम असते. पैशांपेक्षा प्रेम, स्नेह व आस्था या गोष्टी यांच्यासाठी महत्वाच्या असतात. जोडीदाराविषयीच्या कलपना खूपच आदर्शवादी असतात. यांचे प्रेम अत्यंत उत्कट असते. प्रियकरासाठी सहज स्वार्थत्याग करु शकतात. उदर अंत:करणाचा व प्रेमळ अशा जोडीदाराची याना अपेक्षा असते. प्रेम करताना विवाहाचा विचार करुनच प्रेम करतात. Long Term  प्रेमाची अपेक्षा असते. प्रेमात आलेले अपयश हे या लोकांच्या मनाला लागते. प्रेमातले अपयश हे लोक सहसा विसरु शकत नाहीत. कोणीही यांचा भावनांशी खेळलेले यांना बिलकुल सहन होत नाही. प्रेम व्यक्त करतानाही बराच विचार करतात,बराच वेळ घालवतात. मनातल्या सर्व शंकांच समाधान झाल्याशिवाय अंतिम निर्णय घेत नाहीत.

 

 

सिंह राशीचे प्रेम-

 

                   तेजस्वी रवि या ग्रहाच्या अधिपत्याखालील सिंह ही अग्नि तत्वाची स्थिर रास आहे. ही राज राशी आहे. या राशीच्या लोकांचे व्यक्तीमत्व अकर्षक व प्रभावी असते. बोलणे प्रभावी असून इतरांवर छाप सोडणारे असते. वरच्या दर्जाच्या व प्रतिष्ठित लोकांशी संबंध ठेवतात, हलक्या दर्जाच्या लोकांत राहणे यांना आवडत नाही. शिस्त व मान या गोष्टी यांच्या दृष्टने महत्वाच्या असतील, बेशिस्त पणा व स्वत:चा अपमान कधीही सहन होत नाही. यांच्या मानापमानाच्या कल्पना अफाट असतात, थोडेसे रागीष्ट स्वभावाचे असतात. हे अतिशय स्वाभिमानी असून कोणी याम्चा स्वाभिमान दुखावला तर ते यांना सहन होत नाही. आपल्या जोडीदाराची निवड स्वत: पुढाकार घेऊन  करतात. गुणांपेक्षा राहणीमानला अधिक महत्व देतात. खेळकर, प्रेमळ व प्रतिष्ठित जोडिदाराची अपेक्षा असते. जोडिदाराने आपल्यावर हुकुमत गाजविणे यांना कधीच सहन होत नाही. या राशीचे लोक प्रेमात मात्र कधीही माघार घेत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत जोडीदाराला सांभाळतात, त्याला पाठबळ देतात. प्रेमाचे प्रदर्शन करण्याची हौस असते.

कन्या राशीचे प्रेम-

 

                    कन्या ही बुधाची, पृथ्वी तत्वाची द्विस्वभावी रास आहे. या राशीचे लोक हे वयाने नेहमी लहान दिसतात. या राशीचे लोक सभ्य, लाजाळू व नम्र असतात. हे चिकित्सक, व्यवहारी व हजरजबाबी असतात. केवळ निरीक्षणाने ज्ञान मिळऊ शकतात. स्वार्थीपणा हा एक दुर्गुण असू शकतो. ही द्विस्वभावी रास असल्याने यांचा निर्णयात ठामपणा नसून चंचलता असते. हे संशयी व सावध असतात. स्वच्छता व टापटिपीपणाला अधिक महत्व देतात. स्वभाव विनोदी असतो. विनयशीलता. हा यांचा मुख्य गुण, स्वभाव मनमिळावू बोलणे मधुर, लोभस व प्रिय असते, कशाही लोकांशी जुळवुन घेण्याची क्षमता असते, स्वाभावने शांत व आनंदी असले तरी जरा सुस्त व आळशी असतात. हे लोक जरासे लाजाळू असल्याने विरुध्द लिंगी लोकांत मिसळताना संकोच करतात, विशेष परिचयाशिवाय मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे घमेंडखोर वाटतात. हे भावनाप्रधान नसतात त्यामुळे यांना प्रेमात विषेश रस नसतो. जोडीदाराबद्यलच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. राहणीमान व सौंदर्यापेक्षा गुणांना अधिक महत्व देतात. ’चारित्र्य’ ही यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट या बाबतीत यांना तडजोड मान्य नसते. एखाद्यी बुद्धिमान, चतुर, गुणवान व चारित्र्य संपन्न व्यक्तीच यांना प्रेमात पाडू शकते. प्रेम हे मनापासून व निष्ठेने केलेले असल्याने त्यातून माघार घेणे यंना कठीण जाते. बहुतांशी कन्या राशीच्या लोकांचे पहिले प्रेम हेच त्यांचे शेवटचे प्रेम ठरते. प्रेम ही अतिशय खाजगी गोष्ट मानतात, त्यामुळे त्याची चर्चा चारचौघात करत नाहीत. यांच्यात लफडी करण्याइतके धाडस नसते. बऱ्याच वेळा प्रेमही व्यक्त करण्याचे धाडस हे लोक दाखवत नाहीत.

 

तूळ राशीचे प्रेम –

 

           तूळ ही शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखालील वायुतत्वाची चर रास आहे. ही रास शुद्ध प्रेमाचे प्रतिक मानली जाते. या राशीचे लोक प्रेमळ, मायाळू व भावनाप्रधान असतात. हे स्वत: मोहक व सुंदर असतात. यामुळे समोरील व्यक्तीला प्रभावित करण्यात नेहमीच यशस्वी होतात. हे लोक शांतताप्रिय असतात. सौंदर्याची, कलेची व ऐश्वर्याची नैसर्गिक आवड असते. यांना विरुद्ध लिंगी व्यक्तीचे विशेष आकर्षण असते. अशा लोकांत हे अधिक उत्साही असतात.. यांना पुष्कळ मित्र-मैत्रिणी असतात, असे असूनही हे लोक व्यभिचारी मात्र नसतात, हे सुसंस्कृत असतात. यांच्या प्रेमात सौंदर्य असते, संयम असतो व सावधपणाही असतो. हे लोक सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात. हे लोक सहवास प्रिय असतात. लैंगिकतेपेक्षा जोडीदाराबरोबय बोलणे, फिरणे, जोडीदाराच्या सहवासात राहणे यंना जास्त आवडते. समतोलपणा हा यांचा महत्वाचा गुण. कोणत्याही बाबतीत दुसऱ्याच्या मनाचा विचार करतात. इतरांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळाजी घेतात. बऱ्याच वेळा जोडीदार निवडतांना मात्र सौंदर्य व मोहकतेला बळी पडतात. सुंदर व मोहक व्यक्ती ही यांची कमजोरी बनते. प्रणयातील अनेक खेळ करून जोडीदाराला सहज खूष करत असतात.  जोडीदाराला नेमके काय हवे हे यांना चांगलेच ठाऊक असते. यांना सतत जोडीदाराचा सहवास लागतो, एकटे राहण्याचा यांना फारच कंटाळा येतो.  हे लोक आपल्या जोडीदाराला कधीही असंतुष्ट अगर दु:खी ठेवत नाहीत.

 

वृश्चिक राशीचे प्रेम –

 

      वृश्चिक ही मंगळ या ग्रहाच्या अधिपत्याखालील जलतत्वाची स्थिर रास आहे. या राशीचे लोक हे निश्चयी, कर्तबगार, मुत्सद्दी व धोरणी असतात. यांना    अधिकाराची आवड असते. यांच्या व्यक्तिमत्वात एक गूढ मादकता असते, एक प्रकारची आकर्षण शक्ती असते ज्यामुळे लोक यांच्याकडे आकर्षित होतात. पण मत्सर, पाताळयंत्रीपणा व कमालीची गुप्तता पाळाणे हे या राशीचे काही अवगुण आहेत. यांच्या अंतर्मनाचा थांगपत्ता लावणे सर्वात कठीण काम असते. या राशीचे बरेच लोक हे आडमुठेपणा व कारस्थानीपणा करण्यात  पुढेच असतात. आपल्याला जे हवे ते मिळालेच पाहीजे असे यांना वाटत असते. या राशींच्या लोकांचे प्रेमही असेच असते, प्रेमात यांच्या भावना अत्यंत तीव्र असतात. आपल्या भावनांवर ताबा ठेवणे यांना जरा कठीणाच जाते. समोरच्याच्या मनाचा विचार हे लोक क्वचितच करतात. हे प्रेमाच्या इतके आहारी जातात की स्पष्टपणाने विचार करणे कठीण होऊन जाते. प्रेम करतांना पुर्ण विचारांतीच जोडीदाराची निवड करतात, व त्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. या राशीचे प्रेम हे बेधुंद करणारे असते. आपल्या जोडीदाराने केवळ आपल्यावरच प्रेम करावे अशी यांची भावना असते. यांच्या मर्जीतून उतरलेल्या लोकांकडे मात्र हे ढुंकुनही पहात नाहीत. प्रेमभंग पचविणे हे या लोकांसाठी जगातील सर्वात कठीण गोष्ट असते. प्रेमभंगाचे दु:ख हे यांच्यासाठी मरणापेक्षा भयंकर असते. एकतर्फी प्रेमाची उदाहरणे या राशीच्या लोकांत जास्त दिसून येतात. प्रेमाच्या बाबतीत हे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात.

 

 

धनू राशिचे प्रेम –

 

            धनू ही गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येणारी अग्नि तत्वाची द्विस्वभावी रास आहे. या राशीच्या लोकांत महानता, प्रेमळपणा, महत्वकांक्षा व परोपकारीपणा हे गुरुचे गुण दिसून येतात. हे न्यायी व दिलदार असतात व यांना प्रवासाची विलक्षण आवड असते. हे लोक आशावादी व आनंदी असतात. यांना स्वातंत्र्याची व स्वायक्ततेची आवड असते, कुणाच्याही बंधनात अगर मर्यादेत राहणे आवडत नाही. हिच गोष्ट प्रेमाच्या बाबतीतही लागू होते, त्यामुळे प्रेम संबंध टिकाऊ होण्यात अडचणी निर्माण होतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक आवेगी, उत्साही व भावनाशील असतात. सहज मिळणारे प्रेम यांचा उत्साह कमी करते. अपयशाला यशात बदलण्याचा सतत प्रयत्न करत असतात. समोरच्या व्यक्तीचा कमकुवतपणा अचूक टिपतात. हे मोकळ्या मनाचे असून यांना सहवास प्रिय मैत्री हवी असते. प्रेमाने भारलेले व आनंदाने बहरलेले हे लोक प्रेमात अगदी निर्धास्त होतात. या राशीच्या प्रेमात गरिब-श्रीमंत अगर उच्च-निच्च असा भेदभाव नसतो. प्रेम भंगाचे दु:ख मात्र हे लोक उदारपणे पचवितात व त्यावर मौन पाळातात. प्रेम-प्रणय हा यांच्यासाठी एक खेळ असतो. या राशिचे बरेच लोक विवाह पाशात न अडकण्याच्या सतत प्रयत्नात असतात. पण विवाहानंतर मात्र पत्नीशी अत्यंत प्रामाणिक वर्तन करताना दिसतात. संस्कृती व कुटुंब यांच्याबद्यल यांना नितांत आदर असतो. जोडीदाराने आपल्याबरोबर मित्राप्रमाणे वर्तन करावे अशी यांची अपेक्षा असते.

 

 

मकर राशीचे प्रेम –

 

           मकर ही पृथ्वी तत्वाची चर रास असून या राशीचा स्वामी शनी आहे. व्यक्तिगत व सामाजिक प्रतिष्ठा, नांवलौकिक यांना मकर राशिच्या जीवनात अतिशय महत्व आहे. सर्व काही मिळविण्याची यांची ईच्छा असते, वर-वर जाण्याची महत्वकांक्षा असते. त्यामुळे हे लोक नेहमी शिस्तबद्ध, सावध व काटकसरीने वागताना दिसतात व जीवनातील लहान सहान आंदाचा उपभोग घेण्यास असमर्थ ठरतात. हे लोक थोडे स्वार्थीही असतात, आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा करुन घेण्याची चालाखीही यांच्यात यांच्यात असते. हे लोक त्यांची स्तुती व प्रशंशेचे आतुर असतात. हे लोक शृंगार व प्रणय प्रिय असले तरी तसे उघड न दाखविता आपण पुराणमतवादी असल्याचे भासवितात. या राशीचे लोक स्वभावाने जरासे संकोची असल्याने सहजासहजी प्रेमात पडत नाहीत, व प्रेमात पडल्यास स्वत:हुन कधीच पुढाकार घेत नाहीत. समोरच्या व्यक्तिकडून प्रतिसाद मिळण्याची वाट पहात बसतात. जर समोरुन काहीच प्रतिसाद न आल्यास मनातल्या मनात प्रेम करत आयुष्यभर झुरत बसतात. पण एकदा का प्रेम झाले तर मात्र ते मनापासून करतात. प्रेमाची सतत पाठ राखण करतात. मकर ही वास्तववादी रास आहे स्वप्नाळू नाही. त्यामुळे त्यांचे प्रेम हे भारावलेले किंवा भावनेने ओथंबलेले नसते. वास्तववादी असल्याने हे लोक प्रेमात विषेश करुन फसत नाहीत. पण प्रेमभंग झालाच तर त्याचे दु:ख हे यांच्यासाठी खूपच त्रासदायक असते, यांच्या विश्वासाला तडाच जातो, त्यातून सावरणे कठीण असते व त्यानंतर दुसऱ्यावर विश्वास ठेवणे तर त्याहुन कठीण असते.

 

 

कुंभ राशीचे प्रेम –

 

           कुंभ ही मकरेप्रमाणेच शनीची रास आहे. पण कुंभ ही वायुतत्वाची स्थिर रास आहे. पाश्चिमात्य ज्योतिष्यांच्या मते या राशिवर हर्षल या चमत्कारीक ग्रहाचा अंमल आहे. त्यामुळे या राशिच्या लोकांचे आकलन होणे जरा कठीणच असते. यांचा स्वभाव जरा चमत्कारीक व लहरी असतो. प्रत्येक बाबतीत वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न असतो.  ही बौद्धिक रास आहे. या राशीचे लोक कुशाग्र बुद्धीचे, वैचारीक व विद्वान असतात. हे लोक नेहमी क्रियाशिल व महत्वकांक्षी पण स्वभावाने नम्र असतात. थोडेसे अंतर्मुख व एकांतप्रिय असतात. हे विश्वासू व ध्येयवेडे असतात. यांचा स्वभाव निस्वार्थी असतो. यांच्यात ज्ञानाची परिपक्वता असते, नियोजनपुर्वक व चिकाटिने कार्य करण्याची कुवत असते. हे लोक अभ्यासू असून यांच्यात संशोधक वृत्ती असते. या राशीचे लोक आपल्या भावना कधीही उघडपणे व्यक्त करत नाहीत. व्यक्तीगत प्रेमापेक्षा मानवतावादी प्रेमाकडेच यांचा अधिक कल असतो. हे लोक वैयक्तिक प्रेमापासून जरा अलिप्त राहणेच पसंद करतात. नाते संबंधात अडकून पडणे यांना नको असते. यांच्या प्रेमातसुद्धा एक वेगळेपणा पहायला मिळतो. यांचे प्रेम विचार जगावेगळे व जरा विचित्र असेच असतात. यांना प्रेमळ व विश्वासू जोडीदार हवा असतो. प्रेम जीवनात हे सुद्धा एकनिष्ठच असतात. त्यामुळे प्रेमभंग झाला तर हे लोक पुन्हा त्यावाटेला कधीच जात नाहीत. यांना शृंगार व प्रणयाची विशेष अशी आवड नसते.

 

 

मीन राशीचे प्रेम –

 

           मीन ही राशिचक्रातील शेवटची रास आहे. ही जल तत्वाची द्विस्वभावी रास असून या राशिचा स्वामी गुरु ग्रह आहे. यांचे व्यक्तीमत्व आकर्षक व मोहक असते. यांच्यात कलाप्रेम व अभिनय कौशल्य असते. ही अत्यंत संवेदनशील रास आहे.  यांच्या दृष्टीने मनाच्या भावना व अंत:स्फुर्ती या गोष्टी अत्यंत महत्वाच्या, वास्तवतेला काहीच किंमत नाही. ही अत्यंत दुर्बल रास मानण्यात येते, या राशीचे बरेच लोक संघर्ष व स्पर्धा यांचा ताण  झेलू शकत नाहीत. या राशीचे लोक स्वप्नाळू व अत्यंत भावूक असतात. यांना कशाचीही फारशी चिंता नसते. यांची निर्णय क्षमता कमी असून  यांच्यात चंचलता व अस्थिरता अधिक असते, मात्र कोणत्याही परिस्थितीशि जूळवून घेण्याची क्षमता असते. सकारात्मक कार्य कराण्याऐवजी स्वप्नात वापरत असतात. त्यामुळे अनेकदा हातची संधी गमावून बसतात. शृंगार व प्रणयाची विशेष आवड असते. सौंदर्याचे भोक्ते असतात. प्रेमी म्हणून यशस्वी ठरतात, पण समोरुन सतत प्रोत्साहनाची गरज भासते. स्वभाव जरा भित्रा असल्याने सतत प्रोत्साहनाची गरज लागते. जोडीदाराबद्यल प्रेम, आपुलकी व अभिमान असतो. संभाषण चातुर्य ही यांची जमेची बाजू असते. यांच्या कामवासना अतिशय तीव्र असतात, पण यांचे प्रेम उग्र नसते त्यात शितलता असते. प्रेम हे यांच्यासाठी श्रद्धा असते. यांनी जोडीदारा विषयीच्या कल्पना अगोदरच रंगवलेल्या असतात, व त्याचा ते शोध घेत असतात. बऱ्याचदा यांचं प्रेम आंधळ असतं. कोणीही आपली दर्दभरी कहाणी सांगून यांना आपल्या प्रेमात पाडू शकते. कुणीही यांना जरासा आधार दिला तरी हे त्यांच्या प्रेमात पडू शकतात. जोडीदाराचा थोडासा दुरावाही यांना असह्य ओतो तेथे प्रेमभंगाच्या दु:खाची केवळ कल्पनाच केलेली बरी.


BACK TO HOME

BACK TO INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Shri Uttam Gawade

श्री उत्तम रमेश गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद

9901287974

uttam239@gmail.com

 

Jyotish Jagat E-Magazine – Feb 2018

नमस्कार ,

ज्योतिष जगत हमारी इ-पत्रिका है। आज फेब्रुवारी २०१८ का (दुसरा अंक) पाठको के लिए उपलब्ध कर दिया है | जो पाठकोंके लिए मुफ्त (Free) है। कोई भी इसे हमारी वेबसाइट के Download section से Download कर सकता है। यह पत्रिका ज्योतिष (सभी शाखाए), वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, डाऊजिंग, रमल, टॅरोट, रेकी, अध्यात्म, धर्म, संस्कृती, आयुर्वेद इ. विषयोंपे आधारीत रहेगी।

यह हमारा पहला प्रयास है तो, मासिक पत्रिका को और बेहतर बनाया जा सके इस के लिए अगर आपके पास कोई विचार या योजना है, या आपका कोई सुझाव है तो भी आप का स्वागत है। या फिर अगर कोई त्रुटि रह गयी है तो बता दे। पर प्रतिक्रया अवश्य दे।

www.jyotishjagat.com पे जा कर download करे।

धन्यवाद

ज्योतिष जगत

नमस्कार,

आम्ही ज्योतिष जगत नावाची मासिकाची सुरुवात केली आहे. आज फेब्रुवारी २०१८ चा (दुसरा अंक) वाचकांच्या पुढे ठेवत आहोत.  अंक सर्वांसाठी मोफत असेल. ज्यांना हवे असेल त्यांनी आमच्या वेबसाईट च्या मधून मोफत करून घेऊ शकता . हे  मासिक ज्योतिष, सामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, डाऊजिंग, टॅरोट, रेकी, रमल अध्यात्म, धर्म, संस्कृति, आयुर्वेद  . यासारख्या विषयांवर आधारीत आहे.

हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने वाचकांच्या पाठींब्याची प्रोत्साहनाची गरज लागेलच. हे मासिक अजून चांगले, वाचनीय बनविण्यासाठी जर आपल्याकडेही काही कल्पना असतील अगर काही सुधारणा सुचवायच्या असतील तर आपले स्वागत आहे. जर मासिकात काही त्रुटी राहिल्या असतील तरीही कळवा. प्रतिक्रिया जरूर द्या.

www.jyotishjagat.com वर जाऊन download करून घेऊ शकता.

धन्यवाद

ज्योतिष जगत

DOWNLOAD E-MAGAZINE

BACK TO HOME

पुण्य पर्व महाशिवरात्रि

महाशिवरात्रि का पुण्य पर्व सम्पूर्ण भारत वर्ष में बड़ी श्रद्धा एवं आस्था के साथ मनाया जाता है। शिवजी का एक नाम आशुतोष भी है। आशु-अर्थात शीघ्र, तोष- अर्थात संतुष्ट यानी शीघ्र प्रसन्न होने वाले देव है। भगवान शिव शीघ्र प्रसन्न होते हैं। जरासा जल एवं बिल्वपत्र भक्ति पूर्वक चढ़ा देने मात्र से शीघ्र संतुष्ट होकर भक्तों को मन चाहा वर दे देते हैं। शिव से वरदान लेने वालों को सावधानी भी रखनी चाहिए। शिव से वरदान लेकर अशिव कार्य करने से भस्मासुर के समान स्वयं की ही हानि होती है। शिव सभी प्राणियों पर अपनी कृपा दृष्टि रखते है। शिव की उपासना मनुष्य के लिए कल्पवृक्ष की प्राप्ति के समान है।भगवान शिव से जिसने जो चाहा उसे प्राप्त हुआ।देवता, दानव और मनुष्य ही नहीं समस्त चरा-चर का कोई ईश्वर है तो वह है सदाशिव, भगवान शिव अपने पास कुछ नहीं रखते बल्कि सब कुछ अपने भक्तों को दे देते हैं। भगवान शिव सृष्टि के सभी प्राणियों पर समान भाव रखते हैं। साधारणत: सामान्य लोग जिन प्राणियों से घृणा एवं वैर करते हैं। उनको भगवान शंकर ने अपनी शरण दे दी है। भूत-प्रेत गण, सर्प बिच्छू आदि से उनका प्रेम भाव उनकी समदृष्टि ही दर्शाता है। गले में सर्प को धारण करने का तात्पर्य काल पर विजय प्राप्ति से है। जिससे इनका एक नाम महामृत्युंजय भी है। वृष की सवारी का तात्पर्य काम पर विजय एवं धर्म की रक्षा है। इनका दरिद्र एवं अमंगल वेश होने पर भी ये सभी प्राणी मात्र के लिए मंगलकर्ता एवं दरिद्रहर्ता है। इनकी पूजा करने वाला व्यक्ति कभी दरिद्र नहीं होता है। वे भक्त की इच्छा अनुसार भोग एवं मोक्ष देने वाले हैं। शिव का शाब्दिक अर्थ कल्याणकारी होता है। इस दृष्टि से महाशिव रात्रि का अर्थ हुआ कल्याणकारी रात्रि। चतुर्दशी तिथि के स्वामी शिव हैं। यह तिथि उनकी प्रिय तिथि है। जैसा कि निम्न श्लोक में वर्णित है।

चतुर्दश्यां तु कृष्णायां फाल्गुने शिवपूजनम्।

तामुपोष्य प्रयत्नेन विषयान् परिवर्जयेत।।

शिवरात्रि व्रतं नाम सर्वपापप्रणाशनम्।

                                                                        -शिवरहस्य

महाशिवरात्रि का व्रत फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथि को किया जाता है। वैसे तो प्रत्येक मास की कृष्ण चतुर्दशी को शिव भक्त मास शिवरात्रि के रूप में व्रत करते हैं, लेकिन इस शिवरात्रि का शास्त्रों के अनुसार बहुत बड़ा माहात्म्य है। ईशान संहिता के अनुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी को अर्द्धरात्रि के समय भगवान शिव परम ज्योतिर्मय लिंग स्वरूप हो गए थे इसलिए इसे महाशिवरात्रि मानते हैं।

शास्त्रों के अनुसार शिवरात्रि के व्रत के बारे में भिन्न-भिन्न मत हैं, परंतु सर्वसाधारण मान्यता के अनुसार जब प्रदोष काल रात्रि का आंरभ एवं निशीथ काल (अर्द्धरात्रि) के समय चतुर्दशी तिथि रहे उसी दिन शिव रात्रि का व्रत होता है। समर्थजनों को यह व्रत प्रातः काल से चतुर्दशी तिथि रहते रात्रि पर्यंत तक करना चाहिए। रात्रि के चारों प्रहरों में भगवान शंकर की पूजा अर्चना करनी चाहिए। इस विधि से किए गए व्रत से जागरण, पूजा, उपवास तीनों पुण्य कर्मों का एक साथ पालन हो जाता है और भगवान शिव की विशेष अनुकंपा प्राप्त होती है। व्यक्ति जन्मांतर के पापों से मुक्त होता है। इस लोक में सुख भोगकर व्यक्ति अंत में शिव सायुज्य को प्राप्त करता है। जो लोग इस विधि से व्रत करने में असमर्थ हों वे रात्रि के आरंभ में तथा अर्द्धरात्रि में भगवान शिव का पूजन करके व्रत पूर्ण कर सकते हैं। यदि इस विधि से भी व्रत करने में असमर्थ हों तो पूरे दिन व्रत करके सायंकाल में भगवान शंकर की यथाशक्ति पूजा अर्चना करके व्रत पूर्ण कर सकते हैं। इस विधि से व्रत करने से भी भगवान शिव की कृपा से जीवन में सुख, ऐश्वर्य की प्राप्ति होती है। शिवरात्रि में संपूर्ण रात्रि जागरण करने से महापुण्य फल की प्राप्ति होती है।

महाशिवरात्रि का पौराणिक महत्व –

शिवरात्रि के साथ कई पौराणिक कथाएं जुड़ी हुई हैं। शिवरात्रि के महत्व को जानने के लिए हमें इन पौराणिक कथाओं को जानना होगा।

समुद्र मंथन पौराणिक कथा –

सभी पौराणिक कथाओं में नीलकंठ की कहानी सबसे ज्यादा चर्चित है। ऐसी मान्यता है कि महाशिवरात्रि के दिन ही समुद्र मंथन के दौरान कालकेतु विष निकला था। भगवान शिव ने संपूर्ण ब्राह्मांड की रक्षा के लिए स्वंय ही सारा विष पी लिया था। इससे उनका गला नीला पड़ गया और उन्हें नीलकंठ के नाम से जाना गया।

भगवान शिव का प्रिय दिन –

एक मान्यता यह भी है कि फाल्गुन माह का 14वां दिन भगवान शिव का प्रिय दिन है। इसलिए महाशिवरात्रि को इसी दिन मनाया जाता है।

शिव और पार्वती का विवाह –

पुराणों के अनुसार महाशिवरात्रि ही वह दिन है, जब भगवान शिव ने पार्वती से विवाह रचाया था।

 

     महाशिवरात्रि की रात्रि महा सिद्धि दायिनी होती है। इस समय में किए गए दान पुण्य, शिवलिंग की पूजा, स्थापना का विशेष फल प्राप्त होता है। इस सिद्ध मुहूर्त में पारद अथवा स्फटिक शिवलिंग को अपने घर में अथवा व्यवसाय स्थल या कार्यालय में स्थापित करने से घर-परिवार, व्यवसाय और नौकरी में भगवान शिव की कृपा से विशेष उन्नति एवं लाभ की प्राप्ति होती है। परमदयालु भगवान शंकर प्रसन्न होकर मनोवांछित फल प्रदान करते हैं।

महिलाओं के लिए शिवरात्रि का विशेष महत्व है। अविवाहित महिलाएं भगवान शिव से प्रार्थना कर सकती  हैं कि उन्हें उनके जैसा ही पति मिले। वहीं विवाहित महिलाएं अपने पति और परिवार के लिए मंगल कामना कर सकती हैं।

महाशिवरात्रि के दिन अथवा नागपंचमी के दिन किसी सिद्ध शिव स्थल पर कालसर्प योग की शांति करा लेने का अति विशिष्ट महत्व माना जाता है। निरंतर महामृत्युंजय मंत्र के जप से, शिवोपासना से, हनुमान जी की आराधना से एवं भैरवोपासना से यह योग शिथिल पड़ जाता है।


BACK TO HOME

BACK TO INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)