साप्ताहिक राशिभविष्य 1 ते 7 जुलै 2018

[रविवार १ जुलै  ते शनिवार ७ जुलै २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ४ जुलै रोजी  शुक्र  कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर  कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.   *गुरु-शनी- मंगळ – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अविचारी निर्णय घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्य फायद्याचे ठरेल. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. भावंडांना अनपेक्षित समस्या येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवास फायदा देतील. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. १, २, ३, ४, ७.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. संततीला आर्थिक संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. भावंडांच्या जोडीदाराशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात सफलता लाभेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून संमिश्र स्वरुपाची साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. विनाकारण तणाव जाणवेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी वाढतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. प्रवास लाभ देतील. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ५, ६, ७.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. परंतु जोखीम घेऊ नये. नौकरीच्या ठिकाणी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. जोडीदारांमुळे मानसिक त्रास होतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १, ७.

 

सिंह – नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. संतती बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासात व्यत्यय येतील. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १, २, ३, ४.

 

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. संततीच्या वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना अति उत्साहीपणा त्रासदायक ठरेल. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. सरकारी कामात सफलता मिळेल. पचनाचे विकार त्रास देतील. प्रवास फलदायी राहतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसणार नाही. नौकरीमध्ये पारदर्शी राहिलेले चांगले. संततीविषयक आर्थिक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराचे निर्णय घाईने घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ५, ६, ७.

 

वृश्चिक – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीत वरिष्ठांमुळे त्रास होतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेमधून सफलता मिळेल. कलेशी निगडीत लोकांना लाभ मिळतील. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीच्या तक्रारी राहतील. प्रवासात वाद होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १, ७.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी येईल. संततीच्या बाबतीत कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळेल. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. शुभ ता. २, ३, ४.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ लाभेल. अनपेक्षित आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. संततीला पत्रव्यवहारातून लाभ. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. जोडीदाराशी आर्थिक कारणांवरुन वाद. सरकारी कामात यश. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींकडून सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ५, ६.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी इतरांवर विसंबून राहू नये. आर्थिक नियोजनात व्यत्यय येतील. संततीच्यचा बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. खाण्या-पिण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक. सरकारी कामात संमिश्र यश लाभेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २, ३, ४, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना अतिविश्वास घातक ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आईच्या किरकोळ दुखापतीतून त्रास संभवतो. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. १, ५, ६.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

वटपौर्णिमा

उद्या वट पौर्णिमा, आता WhatsApp व Facebook वर यासंबंधित अनेक जोक फिरु लागतील. मला या गोष्टिचा जास्त खेद वाटतो कि, जगातले इतर धर्मीय लोक आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपापल्या धर्मातील चांगल्या गोष्टी जगापुढे मांडत असतात व वाईट गोष्टींवर चुप्पी साधून असतात. इतर धर्मातसुध्दा वाईट गोष्टी, कुप्रथा आहेतच की, पण त्यांच्यांकडुन याबद्यल कधी ऐकलेत का? पण आपल्या हिन्दू लोकांचे अगदि यापेक्षा उलट आहे. आपण आपल्याच धर्माच्या वाईट गोष्टींवर बोलतो, कुप्रथांवर चर्चा करतो पण चांगल्या गोष्टींचा कधी उल्लेखही करत नाही. याचे कारण आपल्या लोकांना आपल्याच धर्म, संस्कृती व परंपरांविषयीचे असलेले अज्ञान. त्यांना आपल्या संस्कृती व परंपरा किती वैज्ञानिक व विचारपूर्वक बनवल्या गेल्या आहेत याची जाणिवच नाही. आपल्या धर्माविषयीचे ज्ञान हाच यावर उपाय आहे. तर जाणून घ्या आपल्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी आपल्या परंपरांविषयी.

पुराणांमधील गोष्टी या दंतकथेच्या माध्यमांतून सांगण्याची प्रथा आहे. पण नवीन पिढीला त्या पटतील, समजतील अशा शब्दात त्या सांगणे गरजेचे आहे. तरच पुढची पिढी या गोष्टींना मानतील.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

सावित्रीची गोष्ट अशी असू शकते – सत्यवान हा लाकूडतोड्या जंगलात लाकडे तोडताना बेशुध्द होऊन पडतो तेंव्हा त्याची पत्नी सावित्री त्याला उचलून वडाच्या झाडाखाली झोपवते, तिथे तो शुध्दीवर येतो. सावित्री ही बुध्दिमान व हुषार असल्याने तीने समयोचितपणा दाखवत आपल्या पतिचे प्राण वाचविले अशी ही कहाणी आहे. आता वडाचेच झाड का तर, वडाचे झाड हे तेवढ्याच मोठ्या कोणत्याही झाडाच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन एकावेळेला बाहेर सोडते. म्हणजे हे त्यावेळेतले ऑक्सिजन सिलेंडरचेच काम करत होते असे समजल्यास गैर होणार नाही. (याचा अर्थ असा की वडाला फेऱ्या मारल्याने तुमच्या पतिचे आयुष्य नाही वाढणार तर तुमचेच आरोग्य चांगले राहून तुमचेच आयुष्य वाढणार आहे.) यासाठी प्रत्येक गावात एक तरी मोठा वटवृक्ष असतो, पंचायतीच्या सभाही त्याखालीच होत असत. याशिवाय आयुर्वेदात वडाचे अनेक औषधी गुण सांगितले आहेत. पण वडाच्या झाडाचा सर्वात महत्वाचा उपयोग होतो तो म्हणजे वातावरणातील ओझोनचा थर राखण्यात, सध्या या थराला मोठी छिद्रे पडल्याने ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या उभ्या रहात आहेत. गेल्या काही वर्षात या वृक्षाची प्रचंड प्रमाणात तोड झाली आहे. आणि गेल्या काही वर्षापासून उन्हाळा अति तीव्र होत आहे याविषयीही विचार झाला पाहीजे. आपल्या संस्कृतीमध्ये वड , पिंपळ, औदुंबर, शमी, हे पवित्र वृक्ष म्हणून सांगितले आहेत.   ज्या  वृक्षांना देवत्व बहाल करण्यात आले आहे, ती सर्वच वृक्षे वातावरणाचा व पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून यांची तोड रोखण्यासाठी त्या वृक्षांना देवता व सणांशी जोडण्यात आले आहे.  यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो, झाड लावणे जितके महत्वाचं आहे तितकंच त्याची जोपासना करणे महत्वाचे आहे, झाड लावण्याचे महत्व आपल्या पुराण ग्रंथात खूप सुंदर सांगितलं आहे .

व्रताविषयीचे गैर समज-

सावित्रीच्या गळ्यात सत्यवान बांधला नव्हता उलट सत्यवान हा दरिद्री व अल्पायुषी आहे , असे नारदानि तिच्या लग्नापूर्वी सांगितले होते . म्हणून कुटुंबातील सर्वांची इच्छा तिने सत्यवानाशी लग्न करू नये ,अशीच होती. शिवाय सत्यवान काही राजा किंवा धनवान हि नव्हता. उलट सावित्री हि अश्वपती राजाची मुलगी म्हणजे राजकन्या होती, असे असूनही ” मनाने मी सत्यवानाला वरले आहे व मी त्याच्याशीच विवाह करणार” असे तिने स्पष्ट सांगितले. (यावरून पूर्वीच्या काळी स्त्रियांना पतीची निवड करण्याचे स्वातंत्र्य होते असे दिसते.) स्वेच्छेनीच तिने सत्यवानाशी विवाह करण्याचे ठरवले होते.
 वट सावित्रीचे व्रत जन्मोजन्मी (७ जन्म ) हाच पती मिळावा म्हणून केले जात नाही , तर आपल्या पतीला चांगले आरोग्य, दीर्घायुष्य,(अखंड सौभाग्य) संपत्ती , पुत्र पौत्र व सन्मान लाभावा म्हणुन केले जाते. (* ७ जन्म हाच पती मिळावा, अशा चुकीच्या समजुती चित्रपट व टी. व्ही. मालिकातून पसरविण्यात आल्या आहेत व लोकांनाही धर्मशास्त्राचे ज्ञान नसल्याने त्या गोष्टी खर्या मानल्या गेल्या आहेत. ) या व्रताचा संकल्प असा आहे. -” मम इहजन्मनि अखंड सौभाग्य पुत्र पौत्र धनधान्य ऐश्वर्य अभिवृध्द्र्थम वटमुले ब्रम्ह सावित्रीदेवाता प्रित्यर्थ ।” * यात कुठेही ७ जन्म हाच पती मिळावा असा शब्दही नाहि आहे. आज सुशिक्षित (?) लोकच जास्त चुकीच्या समजुती पसरवितात.

वट सावित्रीच्या व्रताचा बोध-

महान पतीव्रतेत सावित्रीची गणना आहे, ती प्रातःस्मरनिय आहे , तिला यमजेत्री असे म्हणले आहे. असे असताना हे व्रत गुलामीचे निदर्शक कसे होते? सत्यवानाशी विवाह केल्याने जी सुख दुःखे पदरी येतील ती सोसण्याची तिचीतयारी आहे , सावित्री हि एखादी विलासलोलुप , ब्रमर वृत्तीची युवती नव्हती. ती तेजस्वी आणि निश्चयी होती . प्रसंगी ठामपणे व योग्य निर्णय घेण्याचा गुण आपल्या अंगी यावा , हा बोध यातून घेतला पाहिजे.

गुलामी नव्हे समर्पण –

जीवनातील खऱ्या यशासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा तेजस्वी आदर्श सावित्री आपल्यापुढे ठेवते. स्वेच्छेनीच जाणीवपूर्वक निवडलेल्या पतीच्या सुख दुःखात भागीदारी होणे , त्याला संकटातून वाचविण्यासाठी काळालाहि आव्हान देण्याची तयारी ठेवणे, त्याची साथ न सोडणे आणि उभयतांनी जीवने श्रेयोन्मुख करणे हे स्त्रीचे फार मोठे सद्गुण आहेत, यात स्त्रीची लाचारी नाही. वट सावित्रीचा नुसता उपहास करण्यापेक्षा श्रद्धेने व निष्ठेने ते व्रत आचरण करून काय आत्मिक समाधान लाभते ते पहावे,

सर्व वृक्षात वट वृक्षाचे आयुष्य जास्त आहे , परंब्यांनी त्याचा विस्तार हि खूप होतो. वटवृक्ष हा एक स्थिर आणि दीर्घकाळ जगणारा वृक्ष असल्याने दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. स्त्रियांचे मासिकधर्मसंबंधित विकार, पुरुषांमधील शुक्रधातूसंबंधित विकार, स्त्री-पुरुष यांमधील वंध्यत्व, अत्याधिक रक्तस्राव यांसारख्या अनेक समस्यांवर वडाचे विविध भाग उपयुक्त आहेत.कोणताही वृक्ष औषधनिर्मितीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणास्तव तोडणे अयोग्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सणांच्या माध्यमातून त्याची जोपासना करण्याची उक्ती आपल्या पूर्वजांनी योजली होती .
तर मग चला वडाचे झाड लाऊन त्याचि जोपासना करून साजरी करुया यावर्षीची वट पौर्णिमा.
* आपला धर्म, आपली संस्कृती, आपले सण व आपली परंपरा नीट जाणून समजून घ्या . त्यांचा अभिमान बाळगा.

 

यावर्षीच्या वटपौर्णिमे विषयीचा खुलासा –

यावर्षी (शके-१९४१, इ.स. २०१९) ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी दुपारी ०२. ०१ पर्यंत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र शु. १४ रविवारी दिलेली आहे. सुर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक (२ तास २४ मि.) व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे असे वचन आहे. दि. १५ जून रोजी रविवारी ज्येष्ठ शु. १४ दुपारी ०२. ०१ मि पौर्णिमा सुरु होत असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायान्हकाळी ६ घटीपेक्षा (२ तास २४ मि.) अधिक आहे म्हणून दि. १५ जून रोजी वटपौर्णिमा दिलेली आहे. वटपौर्णिमा दिलेल्या दिवशी सकाळी जरी चतुर्दशी तिथी असली तरीही सुर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी सुमारे १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. तेंव्हा शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शु. १४ रविवारी दि. १५ जून रोजी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे.

 

– दाते पंचांग

  • संदर्भ – व्रतराज 
    धर्मशास्त्रीय निर्णय 

इति शुभं भवतु !

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Uttam Gawade

Shri Uttam Gawade

Astrologer And Vastu Consultant

uttam239@gmail.com

9901287974

 

CARD FOR THE WEEK 25 June 2018

25TH JUNE TO 1ST JULY

Seven of Pentacles

In most of my articles I talk about the dreams, our efforts and returns or obstacles. Today’s card gives much better vision of this aspect.

Many times we do one common mistake, we think only of the returns of our little efforts. I mean we expect quick results.

Our today’s card want to say that let’s expand our view. Let’s focus on long-term goals.

Know the value of your skills and time. So let’s invest this in some bigger projects. Go for a long term goal with a perfect palnning.

This can be your bank deposits, or any other dream project which is still on paper. It’s the time to verify it again. Instead of facing frustration in short term goals, dream big.

If you are already working on your goal, have faith that your hard work will be definitely paid.

Trust the divine. You always get what you deserve. Sincere prayers are always answered

Similarly, the selfless efforts are always rewarded.

*****************

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE) 

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 24 ते 30 जून 2018

[रविवार २४ जून ते शनिवार ३० जून  २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात २५ जून रोजी  बुध मिथुन राशीतून  कर्क राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर  कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. तसेच २६ जून रोजी मंगळ वक्री होत आहे.   *गुरु-शनी- नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. परंतु जोखीम विचारपूर्वक घ्यावी. नौकरदारांना ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून सफलता मिळेल. सरकारी कामातून सफलता लाभेल. वैयक्तिक रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पोटाचे विकारांपासून त्रास. प्रवासात लाभ. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २४, ३०.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नवीन जबाबदारीचे योग. संततीच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता लाभेल. सरकारी कामात अनुकुलता राहील. कुटुंबात ताण-तणावाचे वातावरण राहील. आई-वडिलांशी वादाचे प्रसंग. प्रवासामधून कामे दिरंगाईने होतील. कायदेशीर त्रास. मित्रांची संमिश्र साथ. शुभ ता. २४, २५, २६.

 

मिथुन – नौकरीमध्ये मानासह जबाबदारी येईल, पण तणाव जाणवेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी जाणवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वाहन जपून चालवावे. उष्णतेच्या विकारांपासून त्रास होईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

कर्क –  संततीच्या कामात सफलता मिळेल. कुटुंबात वाद-विवादाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. व्यवसायात फारसे चढ-उतार होणार नाहीत. तब्येतीच्या तक्रारी राहतील. प्रवासामध्ये अनामिक दडपण राहील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

सिंह – व्यावसायिक आर्थिक आवक चांगली राहील. जुन्या वसुलीमधून सफलता मिळेल. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. प्रवास संमिश्रता दर्शवितात. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २४, ३०.

 

कन्या –  संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अतिउतावळेपणा नुकसानकारक ठरेल. कुठलेही निर्णय तडकाफडकी घेऊ नयेत. नौकरीत वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. वयस्कर लोकांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २५, २६.

 

तुला – व्यवसायात सतत आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या आर्थिक गोष्टींकडे नीट लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. अनपेक्षित कौटुंबिक समस्या उद्भवतील. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग. शुभ ता. २४, २७, २८, २९.

 

वृश्चिक – व्यवसायात अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. नौकरदारांनी कायद्याचे उल्लंघन करु नये. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. वैयक्तिक कामातून सफलता मिळेल. कुटुंबात ताण-तणाव निर्माण होतील. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. प्रवासात त्रास. मित्रांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. शुभ ता. २५, २६, ३०.

 

धनु –  संततीच्या कामात तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी खटके उडतील. सरकारी कामात विलंब लागेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तब्येतीची काळजी घ्यावी. जोडीदाराशी वादाचे प्रसंग. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २४, २७, २८, २९.

 

मकर – सतत अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. अधून-मधून निराशा जाणवेल. व्यवसायात आर्थिक अडचणी जाणवतील. नौकरदारांना सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. शारिरिक त्रास. प्रवास टाळावेत. मित्रांशी वाद टाळावेत. शुभ ता. २४, २५, २६, ३०.

 

कुंभ – व्यावसायिक आवक कमी व खर्च जास्त राहील. नौकरीमध्ये मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित सुखद बातम्या येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मोठ्या भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींबरोबर आवश्यक तेवढे संबंध ठेवावेत. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

मीन – उद्योग-व्यवसायात अडचणी जाणवतील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात संमिश्र सफलता मिळेल. कौटुंबिक बाबतीत अकारण ताण-तणाव राहतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २७. २८, २९, ३०.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 18 June 2018

18TH JUNE TO 24TH JUNE

ACE OF SWORDS

 

In our life we plan many goals and start our journey towards it. But many times we are not clear what exactly we want to achieve and in which direction are we moving our steps. There’s no clarity in our vision of our goal.

          Our card for this week conveys that all the fog on the plans and vision will be cleared.

          Spend few minutes in an isolated space. Meditate on your own thoughts. Think, what exactly you wish, what can you do to achieve, do you have all that is required to reach your goal, etc.

          You will come across the great self realization. You will reveal the great power hidden within you of which you were unaware so far. Your power itself will help you to move forward with clarity. Use your intellect to make perfect plans.

Things are not going to be easy. You may come across few challenges which will seem to be difficult to face. But as mentioned earlier, use your mental force and powerful intellect and move ahead. Your intellect and faith itself is the most powerful weapon which you have to use to clear off all the challenges coming on the way. You may also come across some new ideas while facing these challenges.

          Move ahead with the strong belief that you have full potential to reach your goals.

          Divine power is always with you.

 *************************************************** 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 17 ते 23 जून 2018

[रविवार १७ जून ते शनिवार २३ जून  २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  *गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

          

मेष –  व्यावसायिक स्थिति फारशी चांगली राहणार नाही. नौकरीत ईच्छित कार्यात यश मिळेल. जोडीदाराबरोबर समज गैरसमजातून वाद होतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. २०, २१, २२, २३.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली. नौकरी करणाऱ्यांनी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. प्रवासात नुकसान. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १७, २३.

 

मिथुन – नौकरीमध्ये जबाबदारीमुळे वाढता ताण राहील. व्यावसायिक स्थिति ठीक राहील. कुटुंबातील वातावरण तणावाचे राहील. चोरीपासून नुकसानीचे भय. संततीच्या कामात फसवणुकीचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. प्रवासामधून कार्यपूर्ती होईल. मित्रांच्या ओळखीतून लाभ मिळतील. शुभ ता. १८, १९.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी गाफील राहू नये. अनोळखी लोकांच्या बरोबर व्यवहार टाळावेत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींपासून शक्यतो अलिप्त रहावे. शुभ ता. १७, २०, २१, २२.

 

सिंह – नौकरदारांना शुभ बातम्या समजतील. व्यवसायामुळे अनावश्यक खर्च टाळावेत. नौकरवर्गामुळे आर्थिक नुकसान होईल. संततीच्या आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुसंगती पासून लांब रहावे. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १८, १९, २३.

  

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील, परंतु आर्थिक गुंतवणुक टाळावी. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण राहणार नाही. प्रवासामधून सफलता मिळेल. मित्र-मंडळींबरोबर आर्थिक कारणावरुन वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १७, २०, २१, २२.

 

तुला – व्यावसायिक प्राप्तीत चढ-उतार राहतील. आर्थिक जोखीम पत्करु नये. नौकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. आर्थिक समस्या उद्भवतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९, २३.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना कष्टदायक. भावंडांच्या वैवाहिक जीवनात अडचणी. सरकारी कामात कष्टाने यश. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

  

 

धनु –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक खर्च वाढतील. सासुरवाडीबरोबर आर्थिक कारणांवरुन वाद होतील. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. प्रवासामधून कामे सफल होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २०, २१, २२, २३.

 

मकर – उद्योग-व्यवसायात अंदाज चुकीचे ठरतील. नौकरदरांनी नियमबाह्य वर्तणुक टाळावी. संततीच्या बाबतीत फसवणुकीचे योग. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळणार नाही. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात अनुकुलता लाभेल. प्रवासामधून संमिश्र सफलता मिळेल. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १७, २३.

 

कुंभ – व्यावसायिक चढ-उतार राहतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. व्यसनांवर नियंत्रण ठेवावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १७, १८, १९.

 

मीन – कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. व्यावसायिक फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये रोजचे कामकाज सुरळीत चालेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. प्रवासात चोरीचे भय राहील. मित्रांवर अवलंबून राहून महत्वाची कामे टाळावीत. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 11 June 2018

11TH JUNE TO 17TH JUNE

FOUR OF PENTACLES

Our life is a journey. We land at different station, meet different

In life we expect too many things. We also struggle a lot to achieve our goals. Most of these expectations are materialistic.

 

          At a certain stage we achieve too many things from our wish list. But by the time we achieve our goals, the experiences of our journey makes us quite possessive and greedy too to some extent.

 

          A strong attachment is developed towards our wealth. We become too rigid. We start valuing things much more than its actual worth. We are not even ready to adjust with the changes expected by the circumstances.

 

Changes are meant for good. But we are not ready to accept it. We prefer the same old traditional ways to move ahead. Instead of trying new gambling methods which can yield more gains we prefer old traditional but safe methods of investments.

 

          The long journey creates a different attitude in you. Now at this stage we are not ready to change. Instead we expect the things to go ad per your own ways. This is not possible. This may lead to isolation.

 

**************

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 10 ते 16 जून 2018

[रविवार १० जून ते शनिवार १६ जून  २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १० जून रोजी  बुध तर १५ जून रोजी रवी वृषभ राशीतून  मिथुन  राशीत प्रवेश करेल, याशिवाय इतर  कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  *बुध- १४ जून रोज उदय, *गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

मेष –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील, परंतु आर्थिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी नियमबाह्य वर्तन टाळावे. कुटुंबातील वयस्कर लोकांशी वादाचे प्रसंग येतील. संततीला नौकरीच्या कामातून सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १४, १५.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीत अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता लाभेल. भावंडांना अनपेक्षित अडचणी येतील. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामात तांत्रिक अडचणी निर्माण होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १२, १३, १६.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. संततीला वाहनांपासून त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १४, १५.

 

कर्क –  नौकरदारांना अडचणी येतील. व्यावसायिक बाबतीत प्रलोभनाला बळी पडून निर्णय घेऊ नयेत. आर्थिक आवक मंद होईल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. संततीला पत्रव्यवहारातून अडचणी येतील. विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न करावे लागतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. १०, ११, १२, १३, १६.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. नौकरवर्गामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. संततीविषयक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास लाभ देतील. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १२, १३, १४, १५.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. मोठ्या भावंडांबरोबर गैरसमजातून वाद होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५, १६.

 

तुला – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. परंतु अनावश्यक खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. कुटुंबात वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या ओळखीतून लाभ होतील. शुभ ता. १०, ११, १६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायामधून प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत संमिश्र सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामात कष्टाने यश मिळेल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १२, १३.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १२, १३, १४, १५.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न घ्यावे लागतील. सरकारी कामात सफलता मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५, १६.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामातून प्रयत्नाने यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १६.

 

मीन – उद्योग-व्यवसायात फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे सफल होतील. मित्र-मंडळींवर अवलंबून राहू नये. शुभ ता. १२, १३.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH 

DOWNLOAD OUR E-MAGAZINE

CARD FOR THE WEEK 04 June 2018

4TH JUNE TO 10TH JUNE

SIX OF SWORDS

Our life is a journey. We land at different station, meet different people and again move towards our destination.

          Journey is sometimes pleasing and sometimes very sorrowful.

Our card for this week conveys the message hidden in our sad experiences in our journey. We are never willing to welcome the unpleasing experience. We are never in favour of going for the decisions which hurts us.

          Sometimes we emotionally get attached to one or the other situations in life. Our heart is not ready to move ahead. We forget that this is not our final destination.

          We are compelled to move ahead. We have to take few painful decisions. This task seems quite challenging for us. We feel as if we are losing too many important things of our life. Compromises make us very upset.

          But this is all for to bring out your hidden potential. These difficult situations will make you strong enough to deal with ups and downs of your life.

          The tears will wash away the clouds of the wrong beliefs about you. The clarity of your mind will give you the clear vision and will make you aware of what awaits you in far future.

          So tell your heart that you are not giving up. Instead you are just moving ahead.

          Above all the most important message here is, if anything is holding you back just release it. Forgive all including you and move ahead. Storm in the ocean will soon calm down and you will land on the safe shore where you can explore yourself.

 

************

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 03 ते 09 जून 2018

[रविवार ०३ जून ते शनिवार ०९ जून  २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ०८ जून रोजी  शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल, याशिवाय इतर  कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  *बुध- अस्त, गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक स्थितित चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये कामाचे दडपणात वाढ होईल. संततीच्या नौकरीविषयक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वैचारिक गोंधळ निर्माण होईल. पोटाचे आजार त्रास देतील. वडिलांविषयी स्थिति गोंधळाची निर्माण होईल. प्रवासात गाफील राहू नये. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील, परंतु निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये अनपेक्षित अडचणी येतील. कौटुंबिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. संततीच्या कामात कागदपत्रांचा घोळ होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासात व्यत्यय येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ५, ६, ७, ८, ९.

 

मिथुन – नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. व्यवसायात चुकीच्या निर्णयामुळे नुकसानीची शक्यता. प्रलोभनात्मक बाबीपासून लांब रहावे. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यावे. सरकारी कामात अनपेक्षित अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ८, ९.

 

कर्क –  व्यवसायात मनासारखी स्थिति राहणार नाही. नौकरीमध्ये चांगल्या घटना घडतील. संततीविषयक कामे मार्गी लावता येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात सफलता मिळेल. कुटुंबात अनपेक्षित गोंधळात्मक स्थिति निर्माण होईल. प्रवासामधून महत्वाच्या वस्तू सांभाळाव्यात. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. ३, ४.

 

सिंह – व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरीत वरिष्ठांमुळे त्रासाचे प्रसंग येतील. वडिलांच्या वागण्यामुळे त्रास होईल. सरकारी कामात सहज सफलता मिळेल. संततीच्या कामात यश प्राप्ती राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. उष्णतेचे विकार त्रास देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती कमी राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ५, ६, ७, ८, ९.

 

तुला – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये कामाचा ताण वाढता राहील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. मोठ्या भावंडांच्या बाबतीत गोंधळात्मक स्थिति निर्माण होईल. अनोळखी लोकांशी सलगी प्रवासात टाळावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. वैचारिक बाबतीत शांत राहणे आवश्यक. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. स्थावराची कागदपत्रे नीट हाताळावीत. संततीच्या बाबतीत संमिश्रता. विद्यार्थ्यांना कष्ट. शुभ ता. ३, ४.

 

धनु –  कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. बोलण्यातून वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सरकारी कामात सफलता मिळेल. व्यावसायिक आर्थिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये गुप्त शत्रूंमुळे त्रास होतील. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ५, ६, ७.

 

मकर – व्यावासायिक स्थित बेताची राहील. नौकरीमध्ये कामामुळे मानसिक ताण जाणवेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांची स्थिति गोंधळात्मक राहील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्वतःच्या रागांवर नियंत्रण आवश्यक. पूर्वग्रहदूषित वर्तणूक टाळावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३, ४.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कुटुंबातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. पोटाचे विकार त्रास देतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. ५, ६, ७.

 

मीन – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून मौल्यवान कागदपत्रांची काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ३, ४, ८, ९.


सौजन्यदाते पंचांग