CARD FOR THE WEEK 29 Oct 2018

29TH OCTOBER TO 4TH NOVEMBER

 

THE HIGH PRIESTESS

Hello readers, our today’s card has come with the quite interesting and important aspect of our life which remains unnoticed most often.

 This is nothing but out “Inner Voice”.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

Sometimes we feel as if we are stuck up in difficult situations. We feel it’s quite difficult to get through. At such times we try to gather all our knowledge and seek the guidance of highly intellectual people.

 

But sometimes rather than becoming panic, it’s better to go in silence and meditate for few minutes. There’s o need to hunt for the solution.

Just listen to your inner voice. Nothing can be true and more convincing than our inner voice. No one can be the better guide than our own intuitions.

 

Once you start meditating, you will find many miracles happening within and around you. You will find that the doors are open for you towards your goal.

 

Solutions for your problems will themselves find their way towards you.

 

It’s said silence is more powerful than words.

“Meditation” is the best solution among all the solutions.

********************** 

 

Read this article too

 

Tarot – A Fascinating Journey

What The Tarot Cards Say

How About The Cards

Who Can Be A Tarot Reader

 


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2018

[रविवार २८ ऑक्टोबर  ते शनिवार ०३ नोव्हेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात शुक्राचा २९ ऑक्टोबर रोजी उदय होत आहे . याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  *शुक्र-  हर्षल – नेपच्युन वक्री आहेत.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत चांगल्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. पोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. जोडीदारामुळे खर्च वाढेल. प्रवास फायदा देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २९, ३०.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्याबाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. खाण्या-पिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामांत तांत्रिक अडचणी येतील. मित्र-मंडळींचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ ता. २८, ३१, १.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीचे विवाह जुळुन येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. हाडांच्या दुखण्यापासून काळजी घ्यावी. वाहन जपून चालवावे. प्रवासामधून कामे होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २९, ३०, २, ३.

 

कर्क –  नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली परंतु भागीदारी व्यवसायात कटकटी. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीची अडलेली कामे मार्गी लागतील. परंतु संततीला शारीरिक त्रास. विद्यार्थ्यांना अस्थिरता जाणवेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून समाधानकारक साथ लाभेल. शुभ ता. २८, ३१, १.

 

सिंह – व्यावसायिक निर्णयातून लाभ मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. नौकरदारांना ईच्छित कार्यात सफलता मिळेल. संततीला आर्थिक संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. रेंगाळलेली कामे यशस्वी होतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून आनंद. मित्रांची साथ. शुभ ता. २८, २९, ३०, २, ३.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारीत वाढ. संततीच्या वर्तणुकीमुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना गाफीलपणामुळे नुकसान होईल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधाऱ्यांच्या सल्ला फायदा देईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मित्रांची साथ मिळेल. प्रवास संमिश्रता दर्शवितात. शुभ ता. २९, ३०, ३१, १.

 

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली. व्यावसायिक निर्णयातून लाभ मिळतील. नौकरदारांना फारसे तणाव जाणवणार नाहीत. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबात तणाव वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. सरकारी कामात यश मिळेल. मित्रांमुळे फायदा. प्रवास लाभ देतील. शुभ ता. ३१,१, २, ३.

 

वृश्चिक – वैयक्तिक रेंगाळलेल्या कामातून सफलता. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात अडचणी येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. प्रवासातून सफलता. मित्र-मंडळींची साथ मिळेल. शुभ ता. २८, २, ३.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्तीत चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील. संततीच्या नौकरी विषयक कामात यश. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. कुटुंबात अकारण वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ अपेक्षित लाभेल. शुभ ता. २८, २९, ३०.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. आर्थिक नियोजनात बाधा येतील. नौकरी मध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वडिलांमुळे फायदेशीर घटना घडतील. मित्रांची साथ मिळेल. प्रवास लाभ देतील. विचार करुन कृती करावी. शुभ ता. २९, ३०, ३१, १.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या समस्येमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. ३१, १, २, ३.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २८, २, ३.


सौजन्यदाते पंचांग

हा लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 


 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 22 Oct. 2018

22ND OCTOBER TO 28TH OCTOBER

THREE OF PENTACLES

Hello readers, here we are with the card explaining one of the important aspects of life.

 

Each one of us has our dream to full fill or can say an aim, a dream project.  We are very clear with our aim, a perfect plan required to implement is ready and also we have all the necessary skills and knowledge required to work on our project.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

But it’s said, as a single, we can’t even build a wall and here we are to build a castle. Our aim is big, our project is big. So, obviously we require a team of experts to assist us to make our project come true.

 

Every team has its team leader and with the experts to assist him. But this doesn’t mean that only team leader is capable to complete the project and even the other members are aware of the skills and knowledge of the team leader.

When we work as a team, each one comes forward with his own ideas on the table. Each one has one or the other unique skills required to fulfil the project.

Unity among the team always leads to bigger achievements rather than working as a single.

 

If you are already working on any project, respect your team members, appreciate their skills. Never forget that without the contribution of team members it would be difficult to work on your project. You are almost near the completion of your dream, but still a small distance to be covered. But this too is done if you remember the message of our card on your way.

 

Alone we may be able to build a wall, but together we can build a beautiful castle.

 

********************* 

हा लेख हि वाचा ………

आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमा

धनत्रयोदशीधनतेरस

त्रिपुरी पौर्णिमाकार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धनत्रयोदशीधनतेरस


 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

साप्ताहिक राशिभविष्य 21 ते 27 ऑक्टोबर 2018

[रविवार २१ ऑक्टोबर  ते शनिवार २७ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध २६ ऑक्टोबर रोजी तूळ राशीतून वृश्चिक   राशीत प्रवेश करेल. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * शुक्र अस्त आहे.  तसेच  *शुक्र-  हर्षल – नेपच्युन वक्री आहेत.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यवसायात आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडणार नाहीत. संततीच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. २१, २४, २५, २६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ लाभेल. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांशी वादाचे प्रसंग संभवतात. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २१, २२, २३, २७.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये तणावाचे प्रसंग येतील. संततीच्या विवाह कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २२, २३, २४, २५, २६.

 

कर्क –  नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र फळे मिळतील. कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. प्रवासामधून अपेक्षित कामे होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २१, २७.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. संतती जिद्दी पणाने वागेल. विद्यार्थ्यांना अति उतावळे पणा नुकसानकारक ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीला नव्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. अंगीकृत कार्यात अपेक्षित सफलता लाभेल. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रांच्या वागण्यामुळे त्रास होईल. शुभ ता. २२, २३, २४, २५, २६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीत वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत आकस्मिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. प्रवासामधून कामे होतील. भावंडांची साथ मिळेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. शुभ ता. २४, २५, २६, २७.

 

धनु –  व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीबरोबर वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २७.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे त्रास होईल. संततीच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २२, २३.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजनात व्यत्यय निर्माण होतील. संततीच्या समस्येतून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात संमिश्रता राहील. प्रवासात अडचणी येतील. वडिलधाऱ्यांशी वाद. शुभ ता. २१, २४, २५, २६.

 

मीन – नौकरदारांनी आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. संततीच्या बाबतीत वाहन खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. सासुरवाडीमुळे लाभ होतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी निर्माण होतील. प्रवासातून संमिश्र यश मिळेल. तब्येत सांभाळावी. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. २२, २३, २७.


सौजन्य – दाते पंचांग

 

हा लेख हि वाचा ………

आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमा

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

TAROT – THE CARD FOR THE WEEK

 

Monday – the day to post “Card for the Week”

This week instead of drawing a specific card, I would like to throw a light on the journey so far. (Reason will be revealed at the end of the article)

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

If you have a look at our website “jyotishjagat.com”, you will find that we have posted the information about more than 43 cards.

Those who are following it regularly might have noticed one thing among our Tarot cards. The card for the week is not just concerned only with that particular week. Our each card throws light on specific aspects of our life.

 

What are these cards? What is its significance?

This is already explained in our different articles related to Tarot and posted on our website.

 

“Tarot cards” is set of 78 cards. A journey of these 78 cards is the journey of all the aspects connected to our life.

Each card comes with the deep hidden meaning. Some of the cards like The Sun, The Magician are the cards of full hope and a promise of completion of our dreams.

Some cards like The Devil, 8 of Swords seem to be negative at first sight. But if we think deeper these cards shows some negative aspects in life but along with the way of it.

Some of the cards have almost similar meaning, but still there is difference in their meaning in vast.

 

There are timely personal queries regarding Tarot and astrology on the number mentioned on our website.

Some of the common queries are……

How a single card commonly applies to all?

Will it really happen so?

 

Please check our articles related to cards. We mention on the top….”Card For The Week”. Further we explain what the cards mean to say.

As I say, each card holds a very deep meaning. Our life too is deep and vast.

Life consists of so many weeks. I wish our readers to carry the essence of each card with them. When you all start following this, you will realise that how cards reveals the secrets of our life. Throws the light on some dark corners, smoothens some sharp edges, polishes few ideas covered with dust, lifts you up when feel low, gives you a courage to fight when you decide to give up.

 

 

I kindly request all our readers to once again go through all our previous articles.

This is the reason when we didn’t post “Card For The Week”

On the occasion of this Dusshera festival kill the demon within yourself with your own weapon and let the king dwelling in your heart celebrates the victory.

 

Our Tarot cards and horoscope are always there to guide you.

*********************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 14 ते 20 ऑक्टोबर 2018

[रविवार १४ ऑक्टोबर  ते शनिवार २० ऑक्टोबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात रवी १७  ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ  राशीत प्रवेश करेल. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * १८ ऑक्टोबर रोजी शुक्र अस्त होत आहे.  तसेच  *शुक्र-  हर्षल – नेपच्युन वक्री आहेत.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

 मेष –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. परंतु खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नौकरदारांना उत्तरार्धात तणाव जाणवतील. संततीविषयक अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात पूर्वार्धात सफलता मिळेल. जोडीदाराला नव्या संधी येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९, २०

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना चांगल्या संधी चालून येतील. सरकारी कामास उत्तरार्ध चांगला राहील. मधुमेह असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १४, २०.

 

मिथुन – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरदारांना नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वाहने चालविताना काळजी घ्यावी. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींपासून लाभ मिळतील. शुभ ता. १४, १५, १६.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये उत्तरार्धात त्रासाचे प्रसंग येतील. स्थावरासंबंधी संधी चालून येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. सरकारी कामात विलंब लागेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १५, १६, १७, १८.

 

सिंह – संततीला आर्थिक संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश प्राप्ती राहील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. नौकरवर्गामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी उत्तरार्ध जास्त चांगला राहील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. प्रवासामधून आनंद घेता येईल. मित्र-मंडळींकडून मनासारखी साथ मिळेल. शुभ ता. १७, १८, १९, २०.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीत उत्तरार्ध जबाबदारीचा राहील. संततीच्या विचित्र वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. मोठ्या भावंडांमुळे त्रासाचे प्रसंग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र स्वरुपाची साथ मिळेल. शुभ ता. १४, २०.

 

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक फायदे मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. जागेविषयीची कामे यशस्वी होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक फायदे मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. जागेविषयीची कामे यशस्वी होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. गुंतवणुकीच्या संधी येतील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. कौटुंबिक अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे पूर्णत्वास जातील. वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १५, १६, २०.

 

मकर – संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना कष्टाने यश प्राप्ती राहील. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीने रहावे. अविचारी निर्णय घेणे टाळावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. सरकारी कामास उत्तरार्ध चांगला. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. १४, १७, १८, १९.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. नेत्रविकारांपासून काळजी घ्यावी. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. सरकारी कामात अडचणी वाढतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १४, १५, १६, २०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक तणाव सतत जाणवतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. अतिविश्वास विद्यार्थ्याचे नुकसान करेल. सरकारी कामात अडचणी येतील. पोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १५, १६, १७, १८, १९.

 

ज्योतिष जगतच्या समस्त वाचकांना नवरात्री व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

नवरात्री विशेष लेख इथे वाचा …….

भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

भाग २- नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय 

भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

कुमारी पूजन

दसरा आणि आपट्याची पाने

 

 


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

कुमारीपुजन

    नवरात्रीचा काळ हा देवी उपासनेसाठी प्रशस्त मानला जातो. या कालावधी देवी उपासना अधिक लवकर फलद्रुप होते असे मानले जाते. या कालावधीत अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते. त्यातील एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे कुमारी पूजन. देवी भागवत तसेच भविष्य पुराणात  कुमारी पूजनाशिवाय नवरात्रीचे व्रत पूर्ण होत नाही असे सांगितले आहे. २ ते १०  वर्षाच्या कुमारी मुलींची देवीच्या स्वरूपात पूजा केली जाते. यात नऊ दिवसात रोज नऊ, अष्टमी अथवा नवमी च्या दिवशी नऊ अथवा रोज एक अथवा अष्टमी अथवा नवमी कोणत्याही एक दिवशी किमान एक कुमारीची पूजा केली जाते. हा एक प्रकारे स्त्रियांना सन्मान देण्याचाच प्रकार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. मातेला तर देवासमानच  मानले आहे.   इतर कोणत्याही धर्मात अगर संस्कृतीत “स्त्री देवता” हि संकल्पनाच नाही आहे ती केवळ आपल्या हिंदू धर्मातच आढळते यातच सर्व काही आले. मग स्त्रियांना दुय्यम दर्जा वगैरे गोष्टी कुठून आल्या ? देवी हि देवाची शक्ती मानली आहे व प्रत्येक देव हा त्याच्या शक्तीशिवाय अपूर्ण मानला आहे. स्त्रियांप्रती व्यवहार कसा असावा हे सांगणारा हा श्लोक सर्व काही सांगून जातो. 

 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवत: ।

यतैतस्तु न पूज्यते सर्वास्तत्राऽफला: क्रिया: ॥ मनुस्मृती:-३/५६

ज्या कुळात (घरात) स्त्रियांची पूजा (मान/सन्मान, आदर/सत्कार) होते देवता त्या घरात वास करतात. आणि ज्या घरात स्त्रियांचा आदर होत नाही, जिथे स्त्रिया दु:खी असतात त्या घरात केलेले सर्व धर्म-कर्म व्यर्थ (निष्फळ) होते.


   एक वर्षाची कन्या पूजेला वर्ज्य करावी. दोन वर्षाच्या कन्येपासून दहा वर्षाच्या कन्येंपर्यंत कुमारीपूजन करावें. दोन वर्षाची कुमारी ती कुमारिका, तीन, वर्षाची त्रिमूर्ती, चार वर्षाची कल्याणी, पांच वर्षाची रोहिणी, सहा वर्षाची काली, सात वर्षाची चंडिका, आठ वर्षाची शांभवी, नऊ वर्षाची दुर्गा व दहा वर्षाची भद्रा-याप्रमाणे, कुमारींची नांवे जाणावीं.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

कुमारी पूजनाचा विधि

कुमारी मुलींना भोजन आणि पूजनासाठी आदल्या दिवशी सन्मानपूर्वक आमंत्रण द्यावे. अचानक पूजेच्या वेळी आसपासच्या मुलींना जमा करू नये. 

कुमारी मुली गृह प्रवेश करताना संपूर्ण परिवार सोबत फुलांच्या वर्षावाने त्याचे स्वागत करावे. तसेच देवीच्या नामाचा जयघोष करावा.

 सर्व कुमारींना आसनावर बसवून दुधाने भरलेल्या ताटात पाय धुवावे व त्याचा आशीर्वाद घ्यावा. 

त्यानंतर प्रत्येक कुमारीची  फुल, अक्षत व कुंकुम इ ने पूजा करावी.

त्यानंतर देवीचे ध्यान करून मंगल कामना करावी.

 व शेवटी सर्व कुमारींना भोजन व उपहार भेट देऊन आशीर्वाद घ्यावा. 

 

वयानुसार प्रत्येक कुमारीचे रूप व पूजनाचे फळ – 

 

१-   दोन वर्षाच्या कुमारिकेच्या पूजनाने दु:ख आणि दरिद्रता दार होते.  

२-   तीन वर्षाच्या त्रिमूर्तीच्या पूजनाने धनधान्य प्राप्ती व परिवारात सुख समृद्धी नांदते.

३-  चार वर्षाच्या कल्याणीच्या पूजनाने परिवाराचे कल्याण होते.

४- पाच वर्षाच्या रोहिणीच्या पूजनाने रोगमुक्ती होते.

५- सहा वर्षाच्या कालीच्या पूजनाने विद्या, विजय व राजयोगाची प्राप्ती होते.

६- सात वर्षाच्या चंडिकेच्या पूजनाने ऐश्वर्य प्राप्ती होते.

७- आठ शाम्भवीच्या कुमारिकेच्या पूजनाने वादविवादात, कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळते.

८ – नऊ वर्षाच्या दुर्गाच्या पूजनाने शत्रूंचा नाश व असाध्य कार्यात यश मिळते.

९- दहा वर्षाच्या भद्राच्या पूजनाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.

 

नवरात्रात प्रतिदिन एक किंवा अष्टमी अथवा नवमीला नऊ अशा कुमारी पुजाव्या.

 

रोज एक कुमारिका पूजन — सुख व ऐश्वर्य प्राप्ती.

रोज दोन कुमारिका पूजन — मोक्ष प्राप्ती.

रोज तीन कुमारिका पूजन — धर्म, अर्थ, काम प्राप्ती.

रोज चार कुमारिका पूजन — राज्यपद प्राप्ती .

रोज पाच कुमारिका पुजन — विद्या लाभ.

रोज सहा कुमारिका पूजन — सर्व सिद्धि प्राप्ती.

रोज सात कुमारिका पूजन — राज्य प्राप्ती.

रोज आठ कुमारिका पूजन — धन आणि संपत्ती प्राप्ती .

रोज नऊ कुमारिका पूजन — विजय प्राप्ती.


अशा प्रकारे  दररोज एकेक अधिक अथवा रोज एक याप्रमाणें कुमारीची पूजा करावी.

 

’मन्त्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रुपधारिणीम्‌ । नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्यायावाहयाम्यहम्‌ ॥

जगत्पूज्ये जगद्वंद्ये सर्वशक्तिस्वरुपिणि । पूजां गृहाण कौमारी जगन्मातर्नमोस्तुते ते ॥’

 

या मंत्राने पादप्रक्षालनपूर्वक वस्त्र, कुंकुम, गंध, धूप, दीप, भोजन, यांनी पूजा करावी, असा संक्षेप विधी आहे.

 

नवरात्रीसंदर्भातील इतर लेख इथे वाचा ……

भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

दसरा आणि आपट्याची पाने


Shri Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद

बेळगांव- कर्नाटक

9901287974

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवरात्रातील आचार पालन – भाग -३

 नवरात्रातील आचारपालन –

 

             धर्मशास्त्रदृष्ट्या आदर्श आचारसंहितेमध्ये पैशुन्य (चहाड्या करणे), चौर्यकर्म, असत्यभाषण, कलह, करणे ह्या सर्वकालीन निषिद्ध गोष्टी सर्वथा वर्ज्य असतात. धार्मिक कार्यप्रसंगी मनाची संवेदनशीलता तीव्र असल्यामुले कोणत्याही कटुगोड प्रसंगाचे पडसाद मनावर कोरले जातात. ह्यास्तव उपरोक्त निषिद्ध गोष्टि निदान धार्मिक कार्यप्रसंगी तरी घडणार नाहीत ह्या बाबतीत दक्ष असावे. त्याचप्रमाणे निषिद्धाहार, सामिषाहार व मद्यप्राशन ह्या गोष्टीही कटाक्षाने टाळाव्यात.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

            नवरात्रव्रताच्या बाबतीत संकल्पोक्त कामना अत्यंत उच्च कोटीतील असल्यामुळे त्यास पोषक अशा आचारपालनास अनन्यसाधारण महत्त्व असते. ह्या आचारपालनामध्ये उपरोक्त आचारसंहितेबरोबरच अन्य काही व्रताचारात्मक नियमांचा अंतर्भाव असतो. ही व्रताचारात्मक नियमावली कर्त्याबरोबरच घरातील सर्व कुटुंबीयांना लागू असते. तथापि सध्याच्या धकाधकीच्या गतिमान जीवनात, जागेच्या व वेळेच्या अभावामुळे आणि लौकिकात अप्रस्तुत ठरत असल्यामुळे त्यातील सर्वच गोष्टींचे काटेकोर पालन करणे काही वेळा व्यावहारिकदृष्ट्या गैरसोयीचे व कष्टप्रद ठरते. अशा वेळी अनिवार्य आचारपालन व कृताकृत (परिस्थितीनुसार करावयाचे) आचारपालन असे वर्गीकरण करणे क्रमप्राप्त ठरते. अनिवार्य आचारपालनामध्ये घरातील सर्वांनी निषिद्धान्न (कांदा, लसूण, शिळे अन्न इत्यादी) टाळणे व मस्तकावरील केशकर्तन न करणे तसेच विवाहितांनी एकशय्या वर्ज्य करणे ह्यांचा समावेश होतो. ह्याखेरीज कर्त्याने (उभयता पतिपत्नींनी) कारावयाच्या अनिवार्य आचारपालनात परानाभक्षण न करणे, पलंगावर व गादीवर न झोपणे, दिवसा निद्रा न घेणे आणि यशाशक्ति उपवास करणे ह्यांचा समावेश होतो. कर्त्यासह सर्व कुटूंबीयांनी करावयाच्या कृताकृत आचारपालनामध्ये श्मश्रू (फक्त दाढी – मिश्या कापणे) व प्रस्थान (वेस उल्लंघणे) न करणे आणि पादत्राण न वापरणे ह्यांचा समावेश होत असून सद्य:काली ह्या बाबतीत परिस्थितीनुसार निर्णय घेणे इष्ट ठरते. कर्त्या पतिपत्नींचा उपवास असला तरी देवांस नेहमीप्रमाणे अन्नचा नैवेद्य दाखवावा. अशा वेळी तो प्रसाद कुटूंबीयातील अन्य व्यक्तींना घेता येतो.

                    

                      उपरोक्त नियमावलीमधील पादत्राण न वापरणे, गादीवर न झोपणे अशा नियमांचे पालन म्हणजे एक प्रकारची तपस्याच असून ह्या तपाचरणामध्ये परंपरागत अन्य काही नियमांचा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार अंतर्भाव करता येतो. ह्या तपाचरणामुळे नवरात्राचे भरघोस फळ तर मिळतेच, पण व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही होते.


                     नवरात्र हा कुलधर्म त्यामध्ये खंड न पाडता निरलसपणे त्याचे पालन केल्यास त्या कुटूंबावर कुलदेवतेचे कृपाछत्र राहत असल्यामुळे त्या घरावर सहसा आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक संकटे येत नाहीतच, पण जरी आली तरी ती सुसह्य होऊन त्यांचे सहजतया निवारण होते. अनेक वर्षांच्या दीर्घ खंडानंतर नवरात्र नव्याने चालू करावयाचे झाल्यास कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन सांगणे (प्रार्थना) करुन त्या वर्षीपासून नवरात्रमहोत्सवास प्रारंभ करावा. खंडदोषपरिहारार्थ त्या देवतेचा यशाशक्ति जप करुन सप्तशतीपाठ, पवमान / विष्णुसहस्रनाम, रुद्रपठन अशा प्रकारची पुरश्चरणात्मक उपासना करावी. तसेच शक्य झाल्यास चंडी, पवमान, रुद्र, अशा प्रकारचे स्वाहाकार करावेत. विभक्त कुटूंबात अन्य कुलाचारांप्रमाणे नवरात्रमहोत्सवदेखील स्वतंत्रपणे होणे आवश्यक असते.

 

 साभार – शास्त्र असे सांगते !

 

यापूर्वीचे  भाग इथे वाचा …

 

 नवरात्र – शास्त्रीय मीमांसा – भाग – १

 

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

 

कुमारीपुजन

दसरा आणि आपट्याची पाने


 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

नवरात्राचे विधिविधान –

               नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवघर व देव्हाऱ्याची साफसफाई करून देवमुर्तींचे उद्वार्जन (स्वच्छता) करून घ्यावे. ह्यानंतर संकल्प करून घटस्थापन (वरुणस्थापन), वेदिकास्थापन व त्यानंतर दीपस्थापन झाल्यानंतर मुख्य देवतेचे अभिषेकासहित षोडशोपचारपूजन करावे. ताम्हणात तांदूळ व विड्याच्या पानांनी तयार केलेल्या पीठावर देवतेच्या प्रतिमेची स्थापना करुन नंतर मालाबंधन करावे. मध्याह्नी महानैवेद्य दाखवून आरती करावी व प्रथेनुसार दांपत्य, कुमारी इत्यादिकांना अन्नसंतर्पण करावे. महोत्सव कालामध्ये दरदोज जलप्रोक्षण करुन (फुलाने पाणी शिंपडून ) पूजा व मालाबंधन करुन यशाशक्ति देवीआराधना करावी.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

              नवरात्रोत्थापनाच्या  दिवशी (म्हणजेच दहाव्या दिवशी – दशमीला) जलप्रोक्षणाने पूजा, मालाबंधन व नेहमीची देवीउपसना झाल्यावर ’मात: क्षमस्व’ किंवा ’देव क्षमस्व’ अशी प्रार्थना करावी. नंतर त्या देवतेचा घोष करुन (उदाहरणार्थ; ’दुर्गायै नम:, व्यंकटेशाय नम:, मल्लारिमार्तंडाय नम:) देवतेच्या ईशान्य दिशेस एक फूल वाहून देवप्रतिमा त्या दिशेकडे किंचित हालवावी व्यंकटेशाचे व जोतिबावे देवीच्या शारदीय नवरात्रकाळातच येत असल्यामुळे दोन्ही नवरात्रे दशमीस उठवण्याची प्रथा आहे. नवरात्र उठवाल्यानंतर घट, शेतातील अंकुर, माळा ह्यांच्यावर अक्षता वाहून त्याचें विसर्जन झाल्यावर घटातील जलाने घरातील सर्वांवर सिंचन करावे. ह्यानंतर दांपत्य-कुमारी भोजन घालून वेळेच्या उपलब्धीनुसार त्याच दिवशी अन्यथा दुसऱ्या दिवशी देवतांचे उद्वार्जनपूर्वक षोडशोपचारपूजन करावे.


 नवरात्रकाळातील अशौचप्राप्ती –

नवरात्र व अशौच (सोहेर व सूतक) ह्यांच्या संदर्भात तीन पर्यात संभवतात.

१) अशौच चालू असताना नवरात्र आले असता उपवासादी व्रताचार सुरु करुन अशौचसमाप्ती होताच घटस्थापना करुन नवरात्रप्रारंभ करावा, अशा वेळी नवरात्र महोत्सवाचा कालावधी जरी घटत असला, तरी नवरात्राचे पालन होणे क्रमप्राप्त ठरते.

 

२) नवरात्र चालू असताना अशौच आले असरा घरातील ब्रह्मचारी मुलगा, कुलोपाध्याय किंवा आप्त (स्नेही) ह्यांचेकडून नवरात्रातील पूजा, मालाबंधन इत्यादी नित्यविधी तसेच नवरात्रोत्थापन करवून घ्यावे, अशा वेळी आपल्या घरातील वा दुसऱ्याच्या घरातील (परान्न) शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य चालत नसल्यामुळे दुधसाखरेचा नैवेद्य दाखवाव. स्वत:च्या उपवासादी व्रताचारामध्ये खंड पडू देऊ नये. नवरात्रापूर्वी अशौचसमाप्ती होत असेल तर उर्वरित दिवशी नेहमीप्रमाणे  स्वत: उपरोक्त विधी करावेत.

 

३) नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होण्यापुर्वी घरामध्ये निधनघटना घडून अशौच आले व ते नवरात्र समाप्ती पर्यंत रहात असेल तर सपंडीकरण होईपर्यंत कोणतेही देवकार्य करण्यास शास्त्रसंमती नसल्याकारणाने नवरात्रमहोत्सव करता येत नाही. तथापि उपवासात्मक व्रताचाराचे पालन करावे. अशौचसमाप्तीनंतर नवरात्र खंडित झाल्याबद्दल महाभिषेकपूर्वक पूजा व समाराधन करावी.

 

  नवरात्रकाळातील श्राद्ध – शार्दीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामहश्राद्ध असते. सुवासिनी स्त्रीस आपल्या दिवंगत पित्यास श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी ह्या दिवशी दौहित्रश्राद्धरुपाने मिळत असते. नवरात्रकाळात प्रथम वर्षश्राद्ध अथवा प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आल्यास ते नवरात्राकाळातच करावे, पुढे ढकलू नये.


साभार – शास्त्र असे सांगते !

पुढील भागात पाहू नवरात्र काळातील आचार पालन…..

इथे वाचा …..

(मागील) भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

पुढील भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

                    कुमारीपुजन

दसरा आणि आपट्याची पाने

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवरात्र – शास्त्रीय मीमांसा- भाग – १

 ‘अनाचारेण मालिन्यं अत्याचारेण मूर्खता । विचाराचारयोर्योग : सदाचार: स उच्यते ॥’ अर्थात, आचारहीनतेमुळे जीवनास मालिन्य तर आचाराधिक्यामुळे मुर्खता येते. विचार व आचार ह्यांचा चपखल मेळ म्हणजेच सदाचार होय. ज्या – ज्या काळात दैत्यदानवांनी अनचार व अत्याचाराच्या रुपाने भूमीवर थैमान घातले, त्या- त्या वेळी आदिशक्तीने दुर्गारुपातील विविध अवतार घेतले आणि सत्प्रवृत जनांची त्या आपत्प्रसंगातून मुक्तता करुन सद्धर्म व सदाचार ह्यांची तिने संस्थापना केली. शक्तिदेवीच्या महत्कृत्त्यांची स्मरणगथा म्हणून साजरा केला जाणारा दुर्गामहोत्सव भारतभर कोणत्या ना कोणत्यातरी स्वरुपात प्रचलित आहे. वर्षभर विविध ऋतुकालांत संपन्न होणाऱ्या दुर्गापूजेमध्ये  शरद ऋतूमधील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत केला जाणारा नवरात्र महोत्सव विशेष लक्षणीय आहे. कारण श्रीदुर्गासप्तशती ग्रंथातील ‘शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी ॥’ (अ १२.१२) ह्या मंत्रानुसार देवीनेच ह्या शारदीय महोत्सवाचे (महापुजेचे) महत्त्व निर्धारित केलेले आहे. शारदीय महोत्सव संपूर्ण भारतातील बहुतेक कुटुंबांत कुळधर्म स्वरूपात संपन्न होतो. हा महोत्सव नऊ दिवसांचा असल्यामुळे  त्यास ‘नवरात्र’ असे संबोधले जाते. ह्या कालामध्ये संपन्न होणारी दुर्गापूजा आपापल्या कुलस्वामिनीच्या (उदाहरणार्थ: तुळजाभवानी, सप्तशृंगनिवासिनी, करवीरनिवासिनी, एकवीरा, कामाक्षी, रेणुका इत्यादी)  स्वरुपांत केली जाते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

   नवरात्रात नंदादीप, घट, पुष्पमाला व बीजारोपण (शेत) ह्या चार महत्त्वाच्या गोष्टी असून त्या कोणत्या ना कोणत्यातरी तत्त्वाचे द्योतक होत. त्या अनुषंगाने नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे, घट हे आपल्या नाशवंत देहाचे, घटातील जल हे त्यातील चैतन्याचे, पुष्पमाला हे सत्कार्याने सुगंधित झालेल्या मानवी जीवनसूत्राचे, तर बीजारोपण हे नवनिर्मितीचे प्रतिक आहे. ह्या सर्वांच्या समन्वयाने गूढार्थाच्या दृष्टिकोनातून समालोचन केल्यास त्यामध्ये एक उदात्त संकल्पना दिसून येते.

 

                               शारदीय नवरात्रामागील कथानकानुसार देवीने नऊ दिवस युद्ध करुन महिषासुराचा वध केला. हा महिषासुर सद्य: कालीदेखील सर्वसामान्य मानवाच्या अंतर्मनात ह्या ना त्या विकाररुपाने कमीजास्त प्रमाणात थैमान घालत असून तोच मानवाच्या अधोगतीस कारणीभूत होत असतो. नवरात्राचे औचित्य साधून आपणांस त्या विकाररुपी महिषासुराचा निरास करावयाचा असतो. ज्याप्रमाणे नऊ दिवसांच्या युद्धानंतर देवीकडून महिषासुराचे पारिपत्य झाले, त्याप्रमाणे आपल्यातील षड्‌विकाररुपी असुरांच्या नाशाची जिद्द मनी बाळगून नवरात्रातील नऊ देवीच्या सांनिध्यात यथामति आराधना केली असता ते उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होते. ह्यास्तव नवरात्रातील घटस्थापनेमध्ये आपल्या विकारवश व नाशवंत देहाचे प्रतीक म्हणून एक मातीचा घट घेऊन त्यामध्ये जलाच्या माध्यमातून वरुणरुपी चैतन्याची स्थापना केली जाते. हाच घट देवीसांनिध्यात म्हणजेच देवीस्वरुप नंदादीपाजवळ ठेवला जातो. त्या समीप एका पत्रावळीवर मृत्तिकेच्या वेदीवर नबनिर्मितीचे प्रतीक म्हणून बीजारोपण केले जाते. तेथे मानवी देहाचे मृत्तिकेमध्ये विलीनीकरण व परत मृत्तिकेतून पुनर्निर्माण ही सृष्टिचक्रातील वास्तवता सूचित होते. त्या नऊ दिवसांत इकडे षड्‌विकाररुपी असुरांची शकले उडत असतात, तर तिकडे बीजारोपण झालेल्या धान्यातून नवांकुरांसारखे जीवात्म्यांचे उन्नयन होत असते. (गव्हांकुररसामध्ये अत्यंत पोषक अशा जीवनसत्त्वांचा अनमोल साठा असून त्याच्या नित्य सेवनाने वार्धक्यप्रक्रिया मंदावते.) ह्या नऊ दिवसांत दररोज मालाबंधन करण्यात येते. ह्या सुत्ररुपी मालेच्या साहाय्यानेच साधकाचा जीवात्मा हा आपल्या देहरुपी घटाशी जुडलेला असतो हे ध्वनित होते. ज्याप्रमाणे गर्भस्थित भ्रूण नऊ महिन्यांच्या खडतर तपश्चर्येनंतर यशस्वीरीत्या जन्मास येतो, त्याप्रमाणे नऊ दिवसांच्या ह्या समरप्रसंगानंतर साधकातील कामक्रोधरुपी असुरांचा नि:पात होऊन साधकाचा जणू नव्याने जन्म झालेला असतो. आपल्यातील आसुरी वृत्तीवर मिळवलेला विजय हा नवरात्रानंतर येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो.


                        हिंदुधर्मातील सर्व वर्णीयांत प्राचीन कालापासून चालत आलेला नवरात्रमहोत्सव त्यांच्या – त्यांच्या प्रथेनुसार साजरा केला जात असे . क्षात्रवर्णीय लोक धर्मावर संकट आणणाऱ्या आसुरी वृत्तींच्या शत्रुंचा पाडाव करण्यासाठी सीमोल्लंघनानंतर युद्धावर जात असत. ह्या कार्यास प्रेरणा मिळावी म्हणून नवरात्रामध्ये बलीची प्रथा समाविष्ट केली असावी. तथापि सद्य:कालीन बदललेली समाजरचना पाहता सर्व वर्णीयांसाठी प्रत्यक्ष पशुबली नव्हे तर आपल्यातील विकाररुपी असुरांचे दमन अपेक्षित असल्याकारणाने हिंसेचा निषेध सर्व स्तरांवर करणे हेच खरे धर्माचरण ठरते. ‘धृत्ति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह: । धीर्विद्या सत्म्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम ॥’ (मनुस्मृती – ६. १२) अर्थात; धैर्य, क्षमा, मनोदमन, प्ररोपकार, शुचित्व, इंद्रियनिग्रह, विद्या, सत्य आणि शांती ही धर्माची दहा आहेत. जे धर्माचरण उपरोक्त कसोटीस उतरत नाही, ते शास्त्रबाह्य ठरवून त्यामध्ये योग्य दिशेने बदल केला पाहिजे.

 

                             शारदीय नवरात्राच्या धर्तीवरच राम, नृसिंह कृष्ण, व्यंकटेश, ज्योतिर्लिंग, सिद्धनाथ, विठल, मल्लारी, दत्तप्रभृती देवांच्या त्याचप्रमाणे शांकभरीप्रभृती देवींच्या अन्य कालावधीतील प्रचलित झालेल्या महोत्सवांनाही ‘नवरात्र’ असे संबोधले जाऊ लागले. ’ नवरात्र’ ह्या शब्दातील ’नव’ हे पद जरी संख्यावाचक असले तरी ह्या नवरात्रांतील व्रताचरण नऊ दिवसांचे असेलच असे नाही. सर्वसाधारणपणे हा कालावधी सहा दिवसांपासून बारा दिवसांपर्यंत असतो. कारण ह्या विविध देवतेवताचे अवतारकार्य हे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेले होते. त्यामध्ये मुख्यत : दैत्यांपासून भक्तजनांचे रक्षण होण्यासाठी किंवा भक्तजनांवर कोसळलेल्या आपत्तींच्या निवारणासाठी ह्या देवतेने अवतार घेतलेला होता. ह्या अवतारकार्याच्या पूर्तसाठी जेवढा कालावधी लागला त्यानुसार त्या – त्या देवतेचे नवरात्र संपन्न होते.

 

                       उपरोक्त मूळ संकल्पना मनी वाळगून नवरात्रमहोत्सव साजरा केल्यास मानवातील विकारवशता क्षीण होऊन होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती तर होईल, पण त्याचबरोबर समाजसंस्थही अधिकाधिक निकोप व एकसंध होण्यास साहाय्य होईल. 

क्रमश:

पुढचा भाग इथे वाचा …

नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय – भाग २

भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

                                        कुमारीपुजन

दसरा आणि आपट्याची पाने


साभार – शास्त्र असे सांगते !

आमच्या सर्व वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)