ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्र – भाग १ – आयुर्दाय

               सर्व प्रथम पत्रिका हातात आल्यावर ज्योतिषांनी काय पाहावे ? (सांगावे नव्हे). फलदीपिकेत मंत्रेश्वरानी म्हटले आहे कि, “सर्वप्रथम जातकाच्या आयुष्याचा विचार करावा, त्यानंतर पत्रिकेतील इतर योगांच्या फळांचा विचार करावा.” बऱ्याच जुन्या  ज्योतिषांचेही  हेच मत आहे कि सर्वप्रथम पत्रिका हातात आल्यावर जातकाचे आयुष्यमान पाहावे आणि त्यानंतरच इतर भविष्य  कथानकडे वळावे. बरेच ज्योतिषी जातकाच्या पत्रिकेतील मोठ- मोठे राजयोग पाहून बऱ्याच लांब पल्ल्याची भविष्यवाणी करतात पण तो जातक खरच त्या दशेपर्यंत हयात राहील का ? हे पाहताच नाहीत.  ज्योतिष शास्त्रात सुद्धा जातकाच्या आयुर्दायासंबंधात विशेष किचकट गणित न करता जातकाच्या आयुर्दायाविषयी एक अंदाज बांधता येतो अशी काही सूत्रे आहे. यासाठी लग्न व नवमांश कुंडलीची गरज असते, काही ठिकाणी द्रेष्काण कुंडलीचा विचार केला जातो. बऱ्याच वेळी केवळ लग्न कुंडलीवरूनच चांगला अंदाज बांधता येतो.

           तसे पाहता जातकाचे आयुष्य किती आहे हे पाहण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, जसे पिंडायू , अंशायु , अष्टकवर्ग इ. पण या सर्व पद्धती अतिशय किचकट गणित करून पाहाव्या लागतात, असेच वेळखाऊ हि आहेत. एक अभ्यास म्हणून या विद्यार्थ्यांनी जरूर आत्मसात कराव्यात, पण जातक समोर असताताना सहज व झटपट काही सूत्रे माहित असतील तर त्याचा ज्योतिषांना नक्कीच फायदा होऊ शकतो. खालील पैकी कोणतेही एक सूत्र वापरून आपण विशेष गणित न करता जातकाच्या आयुर्दायासंबंधात एक निश्चित अंदाज बांधू  शकतो.

मनुष्याच्या आयुर्दायासंबंधात आपल्या ज्योतिष शास्त्रात ४ प्रकारात वर्गवारी केली आहे.

पहिली ८ वर्षे बलारिष्ट .

८-३२ वर्षापर्यंत अल्पायु.

३३-६५ वर्षापर्यंत मध्यायु .

६५ वर्षापेक्षा अधिक दीर्घायु .

इथे आपण बलारिष्टचा विचार करणार नाही आहोत, इथे केवळ अल्पायु, मध्यायु व दीर्घायु या बद्दलच विचार केला आहे.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

सूत्र – १   –

 फलदीपिका  या ग्रंथात फारसे गणित न करता जातकाचा आयुर्दाय ठरविण्यासाठी काही सूत्रे  दिलेली आहेत.

 हा नियम पाहताना, लग्न व नवमांश कुंडलीचा विचार करावा लागतो. खालील  पैकी कोण आपल्या अष्टमेशापेक्षा बलवान आहे ते पाहावे, व निर्णय करावा

१) लग्नाचा स्वामी २) लग्न नवमांशाचा स्वामी ३) चंद्र राशीचा स्वामी ४) चंद्र नवमांशाचा स्वामी – जर हे चारही आपापल्या अष्टमेश पेक्षा बलवान असतील तर दीर्घायु व बलहीन असतील तर अल्पायु समाजावे.

लग्नाचा स्वामी अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

नवमांश लग्नस्वामी नवमांश अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

जन्म राशी स्वामी जन्मराशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

चंद्र नवमांश राशी स्वामी चंद्र नवमांश राशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

तर व्यक्ती दीर्घायु असेल आणि उलट असेल तर अल्पायु.  इतर वेळी म्हणजे काही मध्ये लग्न स्वामी बलवान व काही मध्ये अष्टमेश बलवान तर तारतम्याने विचार करावा.

  • फलदीपिका – अ.- १३ श्लो. १६

 

सूत्र – २   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी लग्न कुंडली, नवमांश कुंडली व द्वादशांश कुंडलीची गरज लागते. या तीनही कुंडलींचा साकल्याने विचार करून आयुर्दाय ठरवता येतो.

  • लग्न द्रेष्काण राशी आणि चंद्र द्रेष्काण राशी पहा,

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

 

  • लग्नेशाची नवमांश राशी आणि चंद्रशाची नवमांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* (चंद्रशाची नवमांश राशी म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्याचा स्वामी ज्या नवमांशात आहे ती राशी.)

 

  • लग्नेशाची द्वादशांश राशी आणि अष्टमेशाची द्वादशांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* वरील तीनही मतांचा विचार करून बहुमतांनी जो निर्णय येईल त्याप्रमाणे आयुर्दाय ठरवावा.

– फलदीपिका अ. १३ श्लो. १४

सूत्र – ३   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी केवळ लग्न कुंडली विचारात घेतली जाते.

जर लग्नाचा स्वामी आणि सर्व शुभ ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर दीर्घायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर अल्पायु असेल. 

जर अष्टमेश आणि सर्व क्रूर ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर  अल्पायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर दीर्घायु असेल. 

 

सूत्र – ४   –

 कुंडलीत खालील ग्रह परस्पर मित्र आहेत कि शत्रू ते पहा.

१) चंद्र राशीचा स्वामी व चंद्र राशीच्या अष्टमाचा स्वामी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

२) लग्नेश आणि अष्टमेश एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

३) लग्नेश आणि रवी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

जर वरील ग्रह परस्परांचे मित्र असतील तर दीर्घायु , सॅम असतील तर मध्यायु आणि शत्रू असतील तर अल्पायु असेल.

  • फलदीपिका अ. १३ श्लो. १५

 

सूत्र – ५  –

       जैमिनी पद्धतीमध्येही असेच एक सूत्र सांगितले आहे आणि ते जास्त प्रचलितही आहे. यासाठी लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेशचा विचार केला जातो. लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेश पहा.

१) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

२) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

३) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

सूत्र – ६ –

       कृष्णमूर्ती पद्धतीतही असेच एक सूत्र सांगितले आहे कि, ज्यावरून जातक अल्पायु आहे, मध्यायु आहे कि दीर्घायु आहे हे फारसे गणित न करता सांगता येते.

* पण कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम जन्म कुंडलीला लागू करावे का ? खास करून अशा महत्वाच्या बाबतीत हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. जेथे दिड – दोन मिनिटाच्या फरकाने उपनक्षत्र स्वामी बदलतात अशा ठिकाणी असे नियम वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. (रुलिंग प्लॅनेटच्या साहाय्याने केलेले बर्थ टाइम रेक्टिफिक्शन हे मला तरी पटत नाही.) असो, इथे सूत्र काय आहे ते पाहू.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार १, ५, ९, १० व ११ हि आयुष्यवर्धक स्थाने आहेत.  (*९ स्थान हे स्थिर लग्नाला व ११ स्थान हे चर लग्नाला बाधक असल्याने स्थिर लग्नाच्या बाबतीत ९ व चर लग्नाच्या बाबतीत ११ हे स्थान वगळावे.)

६, ८ व १२ व मारक (२, ७), बाधक (चर लग्न – ११, स्थिर लग्न – ९, द्विस्वभाव लग्न – ७) हि स्थाने आयुष्य विघातक मनाली जातात.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आयुर्दाय ठरविताना नियम असा आहे कि,

१) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्यवर्धक स्थानाचाच कारक असेल व आयुष्याविघातक स्थानाचा कारक नसेल तर जातक दीर्घायु असेल. 

२) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्याविघातक  स्थानाचाच कारक असेल व आयुष्यवर्धक स्थानाचा कारक नसेल तर जातक अल्पायु असेल.

३)  जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा आयुष्यवर्धक व  आयुष्याविघातक  अशा दोनही स्थानाचा कारक असेल  तर जातक मध्यायु  असेल.

हा नियम पाहताना बरेच ज्योतिषी वरील प्रमाणेच ३ व ८ स्थानाचा उपनक्षत्र स्वामीही तपासून  पाहतात. तसेच कारक म्हणून शनी ग्रहही वरील पैकी कोणत्या स्थानाचा कारक आहे तेही पाहतात. सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची अवस्था हि “कृष्णमूर्ती आपली आपली” अशीच झाली आहे. असो.  

पुढच्या लेखात दुसऱ्या एखाद्या विषयावर अशीच काही ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्रे पाहू.

 सूचना – प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

 धन्यवाद !

 


 

हे हि लेख वाचा

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध

संतान दीपिका अर्थानं संतती योग

सहदेव भाडळी

क्रकच योग

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Uttam Gawade

 

श्री उत्तम गावडे
ज्योतिष विशारद, वास्तु विशारद
9901287974

 

साप्ताहिक राशिभविष्य 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर 2018

[रविवार २५ नोव्हेंबर  ते शनिवार ०१ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.* बुध ०१ डिसेंबर रोजी उदय होत आहे . नेपच्यून २५ नोव्हेंबर रोजी मार्गी होत आहे * गुरु अस्त आहे.  * हर्षल वक्री आहे.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. परंतु आर्थिक चोरीचे प्रसंग येतील. नौकरीमध्ये बेफिकीर राहू नये. जोडीदाराबरोबर आर्थिक कारणांवरुन मतभेद होतील. संततीच्या कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई. तब्येतीची काळजी घ्यावी. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. २५, २६, १.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीमध्ये जबाबदारी वाढेल. सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर रहावे लागेल. संततीच्या कामात सहज सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. अनोळखी ठिकाणी खाणे-पिणे टाळावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २७, २८.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या आर्थिक बाबींवर व वर्तणुकीवर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. अडलेल्या कामांना गती देता येईल. कौटुंबिक खर्च वाढेल. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींच्या ओळखीतून लाभ मिळतील. शुभ ता. २५, २६, २९, ३०.

 

कर्क –  नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. कुटुंबात समज-गैरसमजातून कटुता येईल. जोडीदाराच्या बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग काढता येतील. सरकारी कामात विलंब होईल. वाहनांमध्ये अनपेक्षित बिघाड होतील. मित्रांपासून लांब रहावे. शुभ ता. २७, २८, १.

 

सिंह – व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण धोरण ठेवावे. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात विलंब लागेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २५, २६, २९, ३०.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरी करणाऱ्यांनी बेसावध राहू नये. कुटुंबात समज-गैरसमजातून वाद होतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कफाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे होतील. मित्रांना सहकार्य करण्याचे प्रसंग येतील. शुभ ता. २५, २६, २७, २८, १.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – आर्थिक निर्णय घेताना कुणावर विश्वास ठेऊन घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या धाडसी निर्णयातून लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना अतिउतावळेपणा नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग येतील. संततीला अनपेक्षित खर्चाचे योग. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात परिश्रम घ्यावे लागतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ. शुभ ता. २९, ३०, १.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. सरकारी कामात सफलता मिळणार नाही. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २५, २६, १.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. आर्थिक जोखीम घेऊ नये. नौकरीमध्ये पारदर्शी राहावे. संततीच्या कामात अडथळे येतील. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. खर्चाचा मेळ बसणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्त्री वर्गापासून अलिप्त रहावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. वडिलांचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध कामाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मध्यस्थीतून मनस्तापाचे प्रसंग. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासात चोरीचे भय. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २९, ३०, १.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

 

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 नोव्हेंबर 2018

[रविवार १८ नोव्हेंबर  ते शनिवार २४ नोव्हेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.* बुद्ध २२ नोव्हेंबर रोजी अस्त होत आहे तर * गुरु अस्त आहे.  * हर्षल – नेपच्युन वक्री आहेत.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थितित सुधारणा होईल. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. संततीच्या बाबतीत संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. मोठ्या भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरेल. शुभ ता. १८, १९, २०, २३, २४.

 

मिथुन – व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीत मनाला आनंद देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या कामात अनुकुलता राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २१, २२.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३, २४.

 

सिंह – नौकरदारांना कामाचा सतत ताण जाणवेल. भागीदारी व्यवसायात वादाचे प्रसंग येतील. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीला आर्थिक संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत आर्थिक प्रश्न उद्भवतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. प्रवासामधून चर्चा यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १८, १९, २०.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – वैयक्तिक दृष्टिने चांगल्या संधी येतील. व्यावसायिक आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अनपेक्षित जबाबदारी येईल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. पण संतती हट्टीपणाने वागेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २१, २२.

 

वृश्चिक – व्यावसायिक खर्चाचे प्रमाणात वाढ होईल. नौकरीमध्ये अनामिक दडपण जाणवेल. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. २१, २२, २३, २४.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीमध्ये तडजोडीने रहावे लागेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. रेंगाळलेल्या कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. २३, २४.

 

मकर – व्यावसायिक प्राप्ती अपेक्षेपेक्षा कमी राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ लाभेल. संततीच्या नौकरीविषयक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येणार नाहीत याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामास अनुकूलता राहील. मित्र-मंडळींची साथ चांगली लाभेल. शुभ ता. १८, १९, २०.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सहकार्याची भूमिका ठेवावी. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांनी हलगर्जीपणा टाळावा. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. राग सांभाळावा. शुभ ता. २१, २२.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी नियोजनात बाधा निर्माण होतील. संततीच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधाऱ्यांशी भांडणाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २३, २४.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 12 Nov 2018

12TH NOVEMBER TO 18TH NOVEMBER

DEATH

Hello readers,

Our card for this week is “Death”.

The name of the card may raise fear in your mind and you may think it’s one of the negative cards. But you would be surprised to find that this is one of the positive cards conveying most important message for our survival.

 Death means end. But it’s not just end. At the same time it promises rise of something new.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

In our life we carry luggage of our past memories which serves you nowhere. They only add burden of pains in your life.

The card shows the possibilities of new beginnings. It comes with new opportunities which can totally transform your life into a new one.

But you find it difficult to cut off the bindings of your past. Though it’s not serving you in any way, your emotional nature prevents from letting it go off.

 

Sometimes you have to remove the old clothes from your cupboard to make a space for new one. You have to let them go though you are liked them too much once.

Similarly in life too, change and transformation is must. And for this you have to cut off all the unhealthy attachments which are of no use and move ahead towards the new opportunities.

Detachment proves quite beneficial in many aspects.

 

Ultimately, trust the Divine Power.

It never fails in its plan.                 

So, move ahead with the faith in heart and face the new sunrise of your life.

 

******************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N

 

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

      आजच्या या भौतिक जगात प्रत्येक व्यक्तीला एक सुखवस्तू जीवन जगण्याची इच्छा नेहमीच होत असते. आजच्या जगात “पैसा” हे जीवन नसले तरी यापेक्षा कमीही नाही. त्यामुळे अधिकधिक धन कमावणारी व्यक्तीच अधिकाधिक सुखवस्तू जीवन जगू शकते. (किमान आज प्रत्येकाची धारणा तरी अशीच आहे.) त्यामुळे आज प्रत्येक जण अधिकाधिक पैसे कमावण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या प्रयत्नाना जर दैवी उपायांची सोबत मिळाली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

आज आम्ही या दिवाळीच्या मुहूर्तावर असे ११ उपाय सांगणार आहोत ज्यामार्फत आपण आपले आर्थिक संकट दूर करून, अपार धन समृद्धी मिळवून धनवान बनू शकता.

 

टीप – केवळ हे उपायच धन मिळवून देऊ शकत नाहीत तर त्यासाठी आपण आपल्या  निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिक मेहनत करीत असणे हि तितकेच गरजेचे आहे.  व्यावहारिक प्रयत्न सोडून उपायांच्या मागे लागून काहीच होणार नाही. आपल्या व्यावहारिक प्रयत्नांबरोबर या उपायांचा वापर करावा हेच योग्य होईल. हे उपाय केवळ दैवी संकटावर मात करण्यात मदत करतील.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

१) अपार धनाची ईच्छा असणाऱ्या व्यक्तींनी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात अथवा कार्यालयात श्रीयंत्राची स्थापना करून नियमित श्रीसुक्तानी त्याची पूजा करावी. शास्त्रानुसार ज्याच्या घरी श्रीसुक्तानी श्रीयंत्राची नियमित पूजा होते तेथे नेहमी धन व समृद्धीची वृद्धी होत राहते. श्री लक्ष्मी पूजनातील हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

२) दिवाळीच्या वेळी लक्ष्मी मंत्राचा कमळाच्या बीजाच्या माळेवर (कमलगट्टा) जप करून श्री लक्ष्मीमातेला कमळाचे फुल अर्पण केल्यास नेहमी लक्ष्मीची कृपा राहते.

३) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी ११ पिवळ्या कवड्या श्री लक्ष्मीला अर्पण कराव्यात व दुसरे दिवशी त्या एका लाल कपड्यात बांधून , आपल्या तिजोरी, गल्ला अथवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

४) दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली सात दिवे लावून पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्यास कोणत्याही व कितीही मोठ्या आर्थिक संकटातून मुक्तता होते. प्रदक्षिणा घालताना श्री लक्ष्मी-नारायणाच्या मंत्राचा जप करावा.

 

५) दिवाळीच्या दिवशी श्री लक्ष्मी देवीला तुळशीच्या पानांचा हार अर्पण केल्यास, श्री लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावल्यास व पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास दारिद्य दूर होते.

 

६) लक्ष्मी पूजनाच्या वेळी कुबेराच्या पूजनाचेही अतिशय महत्व आहे. कुबेर यंत्र अथवा कुबेराची प्रतिमा पुजून, कुबेर मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप केल्यास धनवृद्धी होते. 

७) (व्यापाऱ्यांसाठी)  – दिवाळीच्या पूजनानंतर सायंकाळी उजव्या हातात एक अखंड सुपारी व एक चलनी नाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन, नमस्कार करून मागे न बघता यावे, दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन त्याच पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून आणावे व ते पान आपल्या गल्ल्यात अगर तिजोरीत ठेवावे. ग्राहकांची वाढ होईल व आर्थिक आवक वाढेल.  

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

८) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी वापरलेल्या अक्षता एका नव्या पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास वर्षभर पैशाची तंगी जाणवणार नाही, हा उपाय दरवर्षी करावा, आदल्या वर्षीच्या अक्षता कपड्यासकट वाहत्या पाण्यात सोडाव्यात. 

 

९) दिवाळीत लक्ष्मी पूजनानंतर मध्यरात्री  “ॐ श्रीं ऐश्वर्य लक्ष्मै ह्रीं नम:” हा मंत्र अष्टगंधाने डाळिंबाच्या लेखणीने पांढऱ्या कागदावर लिहावा. नंतर याच मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप करावा. कागदाची घडी करून तो चांदीच्या ताईत मध्ये घालून उजव्या दण्डावर अथवा गळ्यात घालावा. किंवा चांदीच्या डबीत घालून तिजोरीत ठेवावा. यामुळे धनप्राप्तीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती सुधारेल.

 

१०) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ११ काळ्या गुंजा पूजेत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी शुचिर्भूत होऊन त्या गुंजा एका पांढऱ्या पिशवीत घालून तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास श्री लक्ष्मीचा वरदहस्त निरंतर राहील.

११) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी आंब्याच्या झाडावरील बांधा (बांडगुळ) जर पूजन करून  तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास अशा घरात  श्री लक्ष्मीचा निरंतर वास राहतो.

 

वरील प्रयोग करताना श्रद्धा व सबुरी अत्यंत आवश्यक असेल. वरील उपाय पूर्ण श्रद्धेने करून फलप्राप्तीसाठी थोडा धीर धरावा. काहींचा अनुभव तात्काळ तर काहींचा थोड्या कालांतराने येतो.  आपल्याला आलेले अनुभव आम्हाला जरूर कळवावेत.

आमच्या समस्त वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्यावर व आपल्या परिवारावर आई लक्ष्मीची कृपादृष्टी निरंतर राहो हीच सदिच्छा !


हे लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 05 Nov 2018

5th NOVEMBER TO 11TH NOVEMBER

ACE OF CUPS

Hello readers, Wish you all a very Happy Diwali.

Diwali – Festival of lights

A light which destroys darkness

A light,which illuminates everything.

 

Our card for this week focuses on the light. But this light is not anywhere out in the world, but it’s within us. It’s the light of spiritual awareness or in simple words can also say its light of LOVE.

 

We can say, on this earth within each creation is spiritual being or can also say each creation is spiritual. The visible proof of this is love. Within each one of us is the abundant flow of Love. Many times we fail to realise this beautiful fact.

But now it’s time to realise this.  Each one of us has full potential to make our life happy. Each one of us can go as per our intuition.

 

What exactly is this LOVE within us?

It’s our inner happiness. It’s the smile of soul forming a curve on our lips. The paths can be different to reach this curve.

Now, we have to realise this and go ahead to grab the opportunity. This can be through nay way.

 

Things can be as simple as joining any dance class, learning new art. This is not going to make any difference in the intensity of the curve on your lips.

Open your heart. Let the love within you flow. Divine is at the door step of your heart with its open invitation.

 

This can be the proposal of new project which will allow you to use your creativity.

It can be also a beginning of new friendship, a good relationship which will help you to enhance your smile.

It can be the proposal of one loving heart waiting for the soul mate.

Let the opportunity be in any form, don’t restrict yourself. Let your emotions flow.

It’s the time to give.

The more you give, the more you will receive in your life.

Spread smiles. Ad you will find that you life is full of smiles.

 

Let this Diwali illuminate your life with abundant love.

Once again WISH YOU ALL A VERY HAPPY DIWALI.

************************************************************************

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

साप्ताहिक राशिभविष्य 04 ते 10 नोव्हेंबर 2018

[रविवार ०४ नोव्हेंबर  ते शनिवार १० नोव्हेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात मंगळ मकर राशीतून कुंभ राशीत जात आहे . याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  *शुक्र-  हर्षल – नेपच्युन वक्री आहेत.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक प्राप्ती मनासारखी राहणार नाही. नौकरीमध्ये नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराला चांगल्या संधी चालून येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. पोटाचे विकार त्रास देतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांमुळे फायदे होतील. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

वृषभ –  व्यवसायात धाडसी निर्णय घेतले जातील. नौकरदारांना सर्वांचे सहकार्य चांगले मिळेल. नौकरवर्गामुळे फायदा होईल. अंगीकृत कार्यात सफलता मिळेल. संततीविषयक पत्रव्यवहार यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८, ९, १०.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश लाभेल. कफाचे विकार त्रासदायक ठरतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. ९, १०.

 

कर्क –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक फायद्यासह जबाबदारी वाढेल. संततीच्या बाबतीत समाधानकारक घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वाहनांच्या वेगांवर योग्य नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५.

 

सिंह – उद्योग-व्यवसायातून आर्थिक लाभ मिळतील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्या अडलेल्या कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. वातविकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ संमिश्र मिळेल. शुभ ता. ४, ५, ९, १०.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. अचूक अंदाजामुळे लाभ मिळतील. नौकरीत समाधानकारक घटना घडतील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांनी अति गडबड टाळावी. सरकारी कामात यश मिळेल. वैयक्तिक कामात यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

वृश्चिक – नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायात आवक कमी व खर्च जास्त होईल. संततीला अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. स्थावराच्या चांगल्या संधी चालून येतील. सरकारी कामात व्यत्यय येतील. प्रवास संमिश्र फळे देतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ९, १०.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीत बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. कलेशी निगडीत लोकांना फायदा. सरकारी कामातून अपेक्षित कार्यपूर्ती लाभेल. अडलेली कामे मार्गी लागतील. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची साथ मिळेल. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

मकर – उद्योग-व्यवसायात फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीत वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या नौकरीविषयक अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामामधून सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवास फायदा देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७, ८, ९, १०.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अविचारी निर्णय घेऊ नयेत. नौकरदारांना सामंजस्याची भूमिका फायद्याची ठरेल. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. रागांवर नियंत्रण ठेवावे. वडिलधाऱ्यांशी जमवून घ्यावे लागेल. सरकारी कामात संमिश्र यश. प्रवास लाभ देतील. धार्मिक कार्यातून आनंद. शुभ ता. ८, ९, १०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचे सतत दडपण जाणवेल. संततीला शारिरीक कटकटी दर्शवितात. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. सरकारी कामात बाधा येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५.


सौजन्यदाते पंचांग

ज्योतिष जगत च्या समस्त वाचकांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा !


हे लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)