गणेश चतुर्थीला गणपती पूजनासाठी मुहूर्त असतो काय ?

गणेश चतुर्थीला गणपती पूजनासाठी मुहूर्त असतो काय ?

सध्या एखाद्या सण जवळ आला की, सोशल मिडीयावर तथाकथित धर्माशास्त्रींची रेलचेल सुरु होते. ही मंडळी समाज व लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याऐवजी त्यात नवनवीन गोष्टींची भर घालून लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचे काम अधिक करत असतात . त्यात सोशल मिडिया हाती मिळाला तर कहर माजवतात. सध्या गणपती आणणे व स्थापन करण्याविषयी बऱ्याच पोष्ट फिरत आहेत.

 

भाद्रपदशुक्लचतुर्थीवरदचतुर्थी सामध्यान्हव्यापिनीग्राह्या | निर्णयसिन्धु

भाद्रपद शुक्ल चतुर्थी वरदचतुर्थी – ती मध्यान्ह व्यापिनी घ्यावी.

 

धर्मशास्त्राचा निर्णय देताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जिथे एखाद्ये विशिष्ट कार्य एखाद्या विशिष्ट वेळेत सांगितले असते तिथे ती “विशिष्ट वेळ” महत्वाची असते. इतर गोष्टी आपोआपच गौण ठरतात. उदा. गणेश चतुर्थीबाबतीत सांगायचे झाले तर, गणपती पूजन भाद्रपद शु. चतुर्थीला मध्यान्हाकाळी करावे, असे सांगितले आहे. इथे  “भाद्रपद शु. चतुर्थीला मध्यान्हाकाळी” हे महत्वाचे झाले मग इतर गोष्टी आपोआपच गौण ठरतात, मग त्यावेळी विष्टी करण असेल, राहू काळ असेल अथवा पंचांग शुद्धी नसेल या सर्व गोष्टी गौण होतात इथे फक्त “भाद्रपद चतुर्थी मध्यान्ह व्यापिनी” असली कि झालं.

 

गणेशोत्सवा निमित्त दाते पंचांगात दिलेली माहिती खालील प्रमाणे आहे. (पंचांग कर्त्याचा शब्द अधिक महत्वाचा असतो.)

  • भाद्रपदमहिन्यातील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करणेसाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रात:काल पासून मध्यान्हापर्यंत (अंदाजे दु. १.३० पर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना करता येते.
  • उजव्या सोंडेचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत चूकीची आहे.
  • भाद्रपद शु. ४ या दिवशी श्रीगणेश स्थापना/पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये. एखाद्या वर्षी लोप झाल्यास चालतो.
  • गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या दिवशी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील.
  • घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशावेळी मूर्तीचे विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे आहे.
  • श्री गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारीही (कोणत्याही वारी) अथवा कोणत्याही नक्षत्रावर करता येते.
  • गौरी विसर्जन “मूळ” नक्षत्रावर करावयाचे असल्याने मंगळवारी/शुक्रवारी (कोणत्याही वारी) करता येते.

संदर्भ दाते पंचांग पान. ९०. (२०१९-२०)

 

आपले धर्मशास्त्र तसं सोप व सुटसुटीत आहे, पण काही अतिविद्वान मंडळी त्याला क्लिष्ट बनवत आहेत.

—————————————————————————————–

             श्री उत्तम गावडे

                 ज्योतिष – वास्तु सल्लागार

               9901287974

 

Back To Home

BACK TO SHANKA SAMADHAN INDEX