कर्पूरहोम – एक प्रभावी उपाय

कर्पूरहोम म्हणजे काय?

कर्पूरहोम केंव्हा केंव्हा करतात ?

कर्पूरहोम कोणकोणत्या उद्यीष्टपूर्तीसाठी केला जातो ?

कर्पूरहोम करताना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ?

कर्पूरहोम करताना कोणता मंत्र अगर स्तोत्र म्हणावे ?

 

‘कर्पूरहोम’ हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्व, अतिप्रभावशाली व अत्यंत उपयुक्त, पण आजपर्यंत फारच कमी लोकांना माहीत असलेला असा हा विधी आहे.

  कर्पूरहोमाची संकल्पना-

   कर्पूरहोमामध्ये, शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर कापराची वडी प्रज्वलित करतात. हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसून आपण यज्ञ करत आहोत अशी कल्पना ह्या वेळी केली जाते. कारण नारळातील पाणी बाह्य वातावरणाशी संपर्करहित असल्यामुळे ते हरिद्वार येथील ब्रह्मकुंडातील गंगेप्रमाणेच पूर्णतया प्रदूषणरहित, स्फटिकासारखे शुद्ध व पवित्र असते. त्याचप्रमाणे नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडाचा गंगाकाठ मानला जातो. ज्याप्रमणे ब्रह्मकुंडावर यज्ञयाग केल्यास त्याचे फळ कोटिपट मिळते अशी श्रद्धा आहे, त्याप्रमाणे कर्पूरहोमाचे फळही असेच भरघोस असते. कारण मन:पूर्वक कर्पूरहोम करताना वरील दोन्ही अत्यंत पवित्र गोष्टींबरोबरच परमपावन अशा अग्नीचा संयोग झाल्यास त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढून इच्छाशक्ती तीव्र होते व त्या कठोर इच्छाशक्तीमुळे मन:कामाना पूर्ण होण्यास साहाय्य होते. त्याबरोबर मनात विचारांचे काहूर उठले असेल तर त्यांचे शमन होऊन मनास अनामिक शांती लाभते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

  कर्पूरहोम केंव्हा करावा?

   कर्पूरहोम कोणत्याही वेळी करता येतो. तथापि दररोज ठरावीक वेळ ठेवल्यास आपण आवाहित असलेली देवता नेमकी त्या वेळी उपस्थित असल्याचे जाणवते. कर्पूरहोमामुळे घरात शांती नांदते.  एखाद्या महत्वाचा कार्याला निघण्यापूर्वी कर्पूरहोम अवश्य करावा. त्यामुळे त्या कार्याचा सिद्धीसाठी आवश्यक ते मन:स्थैर्य व विवेकबुद्धी ह्या गोष्टी जागृत राहतात आणि कार्यात यश असेल तरच त्या ठिकाणी जावे असे वाटते, ह्याउलट कार्यहानी होणार असेल तर तेथे न जाण्याची मनास प्रेरणा होते. ह्याखेरीज ज्या वेळी पर्याय शोधताना बुद्धीला शीण होतो व नक्की निर्णय घेता येत नाही, अशा वेळी कर्पूरहोम अवश्य करावा. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीस घर खरेदी करावयाचे आहे तिला त्यास एकदम दोन-तीन चांगली घरे दृष्टिपथात येतात किंवा एखाद्या उपवर मुलीस एकदम दोन- तीन चांगल्या स्थळांकडून होकार येतो, तसेच एकाच वेळी दोन मनपसंत नोकऱ्यांची नेमणूकपत्रे येतात; अशा वेळी ’हे करु की ते करु’ अशी मनाची दोलायमान अवस्था होते. एखाद्याचा सल्ला घ्याला जावे तर देणारी व्यक्ती निरपेक्षपणे सल्ला देईल ह्याची खात्री नसते. प्रत्येक जण देताना स्वत:कडे जोखीम न घेता दुय्यम मत (सेकंड ओपिनियन) देतो. कारण चुकल्यास त्याचा वाईटपणा स्वत:कडे घेण्यास तयार नसतो. काळाची पावले अचूक ओळखणाऱ्या एखाद्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तर अशी व्यक्ती अभावानेच आढळते. ह्या सर्व पेचप्रसंगी कर्पूरहोमासारखा उत्कृष्ट पर्याय नाही. कर्पूरहोम करुन थोडा वेळ शांत बसल्यावर मनाची स्थिरता होऊन त्यात आपल्याला श्रेयस्कर पर्यायाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे कुणाचाही सल्ला न घेता स्वत:हून पर्यायी मार्ग काढता येतो.

 

  कर्पूरहोम करताना विशेष असा कोणयाही मंत्र अथवा स्तोत्र पठन करणे आवशयक असते असे नाही. तथापि आपली इष्टदेवता वा कुलदेवता ह्यांचे नामस्मरण केल्यास, किंवा आपल्यास माहित असलेल्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठन केल्यास कर्पूरहोमामध्ये अधिक एकाग्रता साधली जाते. ज्या वेळी शोक, दु:ख, अपमान इत्यादी भावना उफाळून मन हताशा होते, त्या वेळी कर्पूरहोम केल्यास नैराश्य दूर पळते आणि मनाला दुप्पट उत्साह व उमेद वाटून पुढील कार्ये सुकर ठरतात. एखादे मोठे धर्मसंकट समोर येताच कर्पूरहोम केल्यास अनाकलनीयरीत्या मार्ग सुचतो. जात, धर्म, लिंग, वय, अवस्था, अशौच इत्यादी कोणत्याही गोष्टींचा अडथळा कर्पूरहोमास येत नाही.

 

  संकटकाळी हातपाय धुऊन केलेली किमान शारीरिक शुचिता कर्पूरहोमास पुरेशी ठरते. कर्पूरहोम शक्यतो देवासमोर करावा. देवाकडून योग्य निर्णय वा पर्याय हवा असेल तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे करावी. आत्मनिवेदन, पश्चात्तापनिवेदन, ध्यानधारणा, त्राटक इत्यादी करताना शेंडी आपल्याकडे करावी. कर्पूरहोम करताना अपेक्षित फलनिष्पत्ती होईपर्यंत एकाच नारळावर दररोज कर्पूरहोम करता येतो. त्या वेळी नारळावर एकाच जागी कापूर लावण्याऐवजी जागा बदलली तरी चालते. त्यामुळे एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत वापरता येतो. तथापि काही दिवसांनी त्यातील पाणी आटल्यावर तसेच अमावस्या, पौर्णिमा ह्या तिथींना वा नारळ भग्र पावल्यास त्या जागी नवीन नारळ घ्यावा. पहिला नारळ प्रसाद म्हणून भक्षण करता येतो. नारळ नासलेला असेल तर त्याचे विसर्जन करावे.

 

  कर्पूरहोमाचा विनियोग;

१) पापमोचन, २) संकटपरिहार, ३) दोषनिरास ह्या उद्दिष्टांसाठीही  केला जातो.

 

१) एखादे वाचिक, मानसिक वा कायिक पाप घडले असेल तेव्हा पापमोचनासाठी कर्पूरहोम करताना, हातात कापराची एक वडी घेऊन आपल्या पापाचा मनोमन उच्चार करुन ते पापकृत्य वडीत समाविष्ट झाल्याची कल्पना करावी व ती वडी नारळावर ठेवून प्रज्वलित करावी. जेव्हा मन पश्चात्तप्त होऊन पापकृत्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी ग्वाही देते, त्या क्षणी पापमोचनार्थ कर्पूरहोम थांबवावा.

२) दुसरे उद्दिष्ट म्हणजे संकटपरिहार होय. ज्या वेळी अनाकलनीय व अत्यंत दुर्धर असे पेचप्रसंगात्मक संकट (किंवा समस्या) समोर येते, त्या वेळी हातात कापराची वडी घेऊन त्या संकटाचा (किंवा समस्येचा) मनोमन उच्चार करून ते संकट (किंवा समस्या) त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर ठेवुन प्रज्वलित करावी. संकटनिराकरणाचा योग्य मार्ग दिसताच संकटपरिहारात्मक कर्पूरहोम थांबवावा.

३) तिसरे उद्दिष्ट म्हणजे दोषनिरास होय. जेव्हा आपल्या अंगी परस्त्रींचींतन, परद्रव्यापहरण, परनिंदा, परानिष्टचिंतन. दुर्व्यसन, कामक्रोधादी विकार इत्यादींचा फैलाव आहे अशी जाणीव होऊ लागते तेव्हा क्रमाक्रमाने एकेक दोष निवडावा व हातात कापराची वडी घेऊन त्या दोषाचा मनोमन उच्चार करुन तो त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर लावावी. तो दोष निरस्त झाल्याची खात्री होईपर्यंत दोषनिरासात्मक कर्पूरहोम करावा. अशा प्रकारे अंगातील सर्व दोष कर्पूरहोमाने नष्ट करता येतात. वरील तीन उद्दिष्टंपैकी संकटपरिहारार्थ कर्पूरहोम करताना नारळाची शेंडी देवाकडे करावी. पापमोचनार्थ व दोषनिरासार्थ कर्पूरहोम करताना नाराळाची शेंडी आपल्याकडे करावी . एकाहून अधिक उद्दिष्टंसाठीही एकाच बैठकीवर, एकाच नारळावर कर्पूरहोम करता येतो.

 

  वरील तीन उद्दिष्टांखेरीज कामनापूर्ती होण्यासाठी कर्पूरहोम करता येतो. हातात कापराची वडी घेऊन आपल्या कामनेचा मनोमन उच्चार करुन त्या कामनापूर्तीतील विविध अडथळे त्या वडीत सामावल्याची भावना करुन नारळावर ती वडी प्रज्वलित करावी. त्या वेळी नाराळाची शेंडी देवाकडे करावी. ह्याप्रमाणे दररोज ठरावीक संख्येने कर्पूरहोम केल्यास काही दिवसांत आपल्या कामनापूर्तीसाठी ते प्रयत्न करण्याविषयीचे मार्गदर्शन मिळते.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

  कर्पूरहोमातील काही समस्यांचे निराकरण –

काही वेळा कर्पूरहोम करताना नारळ एकदम तडकतो किंवा त्याची दोन शकले होतात. अशा वेळी लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूर होम करावा. एखादे स्तोत्र वा ठरावीक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकल्यास ते स्तोत्र वा ती संख्या पूर्ण करावी व नंतर नारळ बदलावा. तडकलेला नारळ खाण्यास योग्य असल्यास त्याचा उपयोग घरात करावा, अन्यथा त्याचे विसर्जन करावे. कधीकधी कर्पूरहोमसाठी नारळ घेतानाच तो तडकतो. अशा वेळी मन:शांती ढळू न देता दुसरा नारळ घ्यावा. जेव्हा संचित-प्रारब्ध-क्रियमाण कर्मांनी उभ्दवलेल्या प्रतिरोधांचा (विरोधांचा) रेटा अधिक प्रमाणात असतो तेव्हा त्याची परिणती नारळ तडकण्यात होते. नारळ तडकणे बंद होणे म्हणजे प्रतिरोध संपणे असे सूचित होते. काही वेळा कर्पूरहोम करताना नारळाच्या एका, दोन्ही किंवा तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहू लागते. एका डोळ्यातून पाणी वाहते तेव्हा सामान्य अडचण, दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा उपाययोजना करता येण्याजोगी समस्या व तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा अत्यंत कठीण पेचप्रसंग सूचित होतो. अशा वेळी नारळ बदलून, नाराळाची शेंडी देवाकडे करुन, मनाचे धौर्य राखून योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूरहोम चालू ठेवावा.

 

  नेहमीच्या यज्ञकर्मास कर्मकांडाचे अधिष्ठान असते, तर कर्पूरहोमास साधनेचे व श्रद्धेचे अधिष्ठान असते. उपरोक्त दोन्हींची अंतिम फलश्रुती ही कामनापूर्ती असली तरी कर्पूरहोम हा यज्ञाचा पूर्णतया पर्याय होऊ शकत नाही. तथापि सर्वसामान्यांना नित्य यज्ञकार्य सहजशक्य नसल्यामुळे त्यांना कर्पूरहोमातून यज्ञ समाधान तर मिळतेच, पण त्याचबरोबर श्रद्धेचे फळही मिळते.


साभार – शास्त्र असे सांगते! (पूर्वार्ध)

हे ही लेख वाचा . . . .

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

लक्ष्मी कुठे राहत नाही ?

महापर्व मकर संक्रांत

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

      आजच्या या भौतिक जगात प्रत्येक व्यक्तीला एक सुखवस्तू जीवन जगण्याची इच्छा नेहमीच होत असते. आजच्या जगात “पैसा” हे जीवन नसले तरी यापेक्षा कमीही नाही. त्यामुळे अधिकधिक धन कमावणारी व्यक्तीच अधिकाधिक सुखवस्तू जीवन जगू शकते. (किमान आज प्रत्येकाची धारणा तरी अशीच आहे.) त्यामुळे आज प्रत्येक जण अधिकाधिक पैसे कमावण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या प्रयत्नाना जर दैवी उपायांची सोबत मिळाली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

आज आम्ही या दिवाळीच्या मुहूर्तावर असे ११ उपाय सांगणार आहोत ज्यामार्फत आपण आपले आर्थिक संकट दूर करून, अपार धन समृद्धी मिळवून धनवान बनू शकता.

 

टीप – केवळ हे उपायच धन मिळवून देऊ शकत नाहीत तर त्यासाठी आपण आपल्या  निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिक मेहनत करीत असणे हि तितकेच गरजेचे आहे.  व्यावहारिक प्रयत्न सोडून उपायांच्या मागे लागून काहीच होणार नाही. आपल्या व्यावहारिक प्रयत्नांबरोबर या उपायांचा वापर करावा हेच योग्य होईल. हे उपाय केवळ दैवी संकटावर मात करण्यात मदत करतील.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

१) अपार धनाची ईच्छा असणाऱ्या व्यक्तींनी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात अथवा कार्यालयात श्रीयंत्राची स्थापना करून नियमित श्रीसुक्तानी त्याची पूजा करावी. शास्त्रानुसार ज्याच्या घरी श्रीसुक्तानी श्रीयंत्राची नियमित पूजा होते तेथे नेहमी धन व समृद्धीची वृद्धी होत राहते. श्री लक्ष्मी पूजनातील हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

 

२) दिवाळीच्या वेळी लक्ष्मी मंत्राचा कमळाच्या बीजाच्या माळेवर (कमलगट्टा) जप करून श्री लक्ष्मीमातेला कमळाचे फुल अर्पण केल्यास नेहमी लक्ष्मीची कृपा राहते.

 

३) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी ११ पिवळ्या कवड्या श्री लक्ष्मीला अर्पण कराव्यात व दुसरे दिवशी त्या एका लाल कपड्यात बांधून , आपल्या तिजोरी, गल्ला अथवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

 

४) दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली सात दिवे लावून पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्यास कोणत्याही व कितीही मोठ्या आर्थिक संकटातून मुक्तता होते. प्रदक्षिणा घालताना श्री लक्ष्मी-नारायणाच्या मंत्राचा जप करावा.

 

५) दिवाळीच्या दिवशी श्री लक्ष्मी देवीला तुळशीच्या पानांचा हार अर्पण केल्यास, श्री लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावल्यास व पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास दारिद्य दूर होते.

 

६) लक्ष्मी पूजनाच्या वेळी कुबेराच्या पूजनाचेही अतिशय महत्व आहे. कुबेर यंत्र अथवा कुबेराची प्रतिमा पुजून, कुबेर मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप केल्यास धनवृद्धी होते. 

 

७) (व्यापाऱ्यांसाठी)  – दिवाळीच्या पूजनानंतर सायंकाळी उजव्या हातात एक अखंड सुपारी व एक चलनी नाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन, नमस्कार करून मागे न बघता यावे, दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन त्याच पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून आणावे व ते पान आपल्या गल्ल्यात अगर तिजोरीत ठेवावे. ग्राहकांची वाढ होईल व आर्थिक आवक वाढेल.  

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

८) दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी वापरलेल्या अक्षता एका नव्या पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास वर्षभर पैशाची तंगी जाणवणार नाही, हा उपाय दरवर्षी करावा, आदल्या वर्षीच्या अक्षता कपड्यासकट वाहत्या पाण्यात सोडाव्यात. 

 

९) दिवाळीत लक्ष्मी पूजनानंतर मध्यरात्री  “ॐ श्रीं ऐश्वर्य लक्ष्मै ह्रीं नम:” हा मंत्र अष्टगंधाने डाळिंबाच्या लेखणीने पांढऱ्या कागदावर लिहावा. नंतर याच मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर १०८ वेळा जप करावा. कागदाची घडी करून तो चांदीच्या ताईत मध्ये घालून उजव्या दण्डावर अथवा गळ्यात घालावा. किंवा चांदीच्या डबीत घालून तिजोरीत ठेवावा. यामुळे धनप्राप्तीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती सुधारेल.

 

१०) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ११ काळ्या गुंजा पूजेत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी शुचिर्भूत होऊन त्या गुंजा एका पांढऱ्या पिशवीत घालून तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास श्री लक्ष्मीचा वरदहस्त निरंतर राहील.

 

११) दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी आंब्याच्या झाडावरील बांधा (बांडगुळ) जर पूजन करून  तिजोरीत, गल्ल्यात  अगर कपाटात ठेवल्यास अशा घरात  श्री लक्ष्मीचा निरंतर वास राहतो.

 

वरील प्रयोग करताना श्रद्धा व सबुरी अत्यंत आवश्यक असेल. वरील उपाय पूर्ण श्रद्धेने करून फलप्राप्तीसाठी थोडा धीर धरावा. काहींचा अनुभव तात्काळ तर काहींचा थोड्या कालांतराने येतो.  आपल्याला आलेले अनुभव आम्हाला जरूर कळवावेत.

आमच्या समस्त वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्यावर व आपल्या परिवारावर आई लक्ष्मीची कृपादृष्टी निरंतर राहो हीच सदिच्छा !


हे लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Jyotish Jagat E-Magazine – Feb 2018

नमस्कार ,

ज्योतिष जगत हमारी इ-पत्रिका है। आज फेब्रुवारी २०१८ का (दुसरा अंक) पाठको के लिए उपलब्ध कर दिया है | जो पाठकोंके लिए मुफ्त (Free) है। कोई भी इसे हमारी वेबसाइट के Download section से Download कर सकता है। यह पत्रिका ज्योतिष (सभी शाखाए), वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, डाऊजिंग, रमल, टॅरोट, रेकी, अध्यात्म, धर्म, संस्कृती, आयुर्वेद इ. विषयोंपे आधारीत रहेगी।

यह हमारा पहला प्रयास है तो, मासिक पत्रिका को और बेहतर बनाया जा सके इस के लिए अगर आपके पास कोई विचार या योजना है, या आपका कोई सुझाव है तो भी आप का स्वागत है। या फिर अगर कोई त्रुटि रह गयी है तो बता दे। पर प्रतिक्रया अवश्य दे।

www.jyotishjagat.com पे जा कर download करे।

धन्यवाद

ज्योतिष जगत

नमस्कार,

आम्ही ज्योतिष जगत नावाची मासिकाची सुरुवात केली आहे. आज फेब्रुवारी २०१८ चा (दुसरा अंक) वाचकांच्या पुढे ठेवत आहोत.  अंक सर्वांसाठी मोफत असेल. ज्यांना हवे असेल त्यांनी आमच्या वेबसाईट च्या मधून मोफत करून घेऊ शकता . हे  मासिक ज्योतिष, सामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, डाऊजिंग, टॅरोट, रेकी, रमल अध्यात्म, धर्म, संस्कृति, आयुर्वेद  . यासारख्या विषयांवर आधारीत आहे.

हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने वाचकांच्या पाठींब्याची प्रोत्साहनाची गरज लागेलच. हे मासिक अजून चांगले, वाचनीय बनविण्यासाठी जर आपल्याकडेही काही कल्पना असतील अगर काही सुधारणा सुचवायच्या असतील तर आपले स्वागत आहे. जर मासिकात काही त्रुटी राहिल्या असतील तरीही कळवा. प्रतिक्रिया जरूर द्या.

www.jyotishjagat.com वर जाऊन download करून घेऊ शकता.

धन्यवाद

ज्योतिष जगत

DOWNLOAD E-MAGAZINE

BACK TO HOME

शिल्पसंहिता – (भाग -२)

मागच्या भागात पाहीले की संहितेत तीन खंड कोणते आहेत आता पाहू दहा शास्त्रे –

१) धातूखंडात तीन शास्त्रे येतात. अ) कृषि  ब) जल   क) खनिज

२) साधनखंडात तीन शास्त्रे येतात. अ) नौका  ब) रथ   क) विमान

३) वास्तुखंडात चार शास्त्रे येतात. अ) वेश्म  ब) प्राकार  क) नगररचना   ड) यंत्र

           शिल्पसंहितेत एकंदर दहा शास्त्रांचा अंतर्भाव होतो. ती दहा शास्त्रे व त्यांतील विषय पुढे दिल्या प्रमाने आहेत.

 

१) कृषिशास्त्र – कृषी म्हणजे शेती असे हल्ली मानण्यात येते, पण शिल्पामध्ये कृषी हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापराला आहे.  वृक्ष(झाडे), पशू (जनावरे) व मनुष्य यांची शरीररचना व गुणधर्म कोणते, त्यास योग्य वळण कसे लावावे व त्याचा उपयोग कसा व कोठे करावा हे याशास्त्रात सांगितले आहे. म्हणजेच वृक्ष, पशू व मनुष्य या तिघांचे प्रसव व पालन ही कामे कशी करावी, हे विषय कृषी शास्त्रात येतात. आजच्या भाषेत कृषीलाच आपण जीवशास्त्र म्हणू शकतो.

 

२) जलशास्त्र   – संसेचन म्हणजे पाणीपुरवठा, पाणी कसे मिळवावे, हव्या असलेल्या ठिकाणि कसे न्यावे, संहरण म्हणजे अधिक झालेले पाणी काढून टाकणे व स्तंभन म्हणजे पाणी अडवून धरणे या गोष्टी जलशास्त्रांतर्गत येतात.

 

३) खनिजशास्त्र – खाणीतून मातीपासून, दगड, धातू इ. पदार्थ असे काढावेत, काढलेले पदार्थ शुद्ध कसे करावेत, त्यांचे गुणधर्म कोणते, हवे असलेले गुण अथवा शुद्ध पदार्थ प्राप्तीसाठी अनेक पदार्थ कसे एकत्र करावेत तसे मिसळलेल्या पदार्थामधून घटक द्रव्ये पुन्हा वेगळी अशी करावीत हे सर्व खनिजशास्त्रांतर्गत येते.

 

४) नौकाशास्त्र  – पाण्याचे गुणधर्म कोणते, त्यावर कसे तरावे व तरण्यासाठी तरफे, नावा व जहाजे कशी तयार करावीत, पाण्यावरून नौका अथवा जहाजाने माल वाहणे इ गोष्टी या शास्त्रांतर्गत येते.

 

५) रथशास्त्र  –  जमिनीवरून माल इकडुन तिकडे कसा न्यावा, त्यासाठी रस्ते, पुल, घाट, बोगदे कसे बांधावेत, रथ, गाड्या वगैरे कशा तयार कराव्यात हे या शास्त्रांतर्गत येते.

 

६) विमान शास्त्र – किल्याला वेढा पडून सभोवार आग लावली तर त्या आगीवरून कसे उडत जावे, विमान कसे बनवावे व कसे चालवावे, वैमानिक कसा असावा, त्याला कोणकोणत्या गोष्टींचे ज्ञान असावे या गोष्टी या शास्त्रांतर्गत येते.

 

७) वेश्मशास्त्र (वास्तुशास्त्र) – वेश्म म्हणजे घर. मनुष्याचे ऊन, वारा, पाऊस वगैरे पासून रक्षण व्हावे म्हणून पानांपासून ते राजमहल किंवा दगडात कोरून केलेल्या लेण्यांपर्यंत निवाऱ्याच्या जागा कशा निर्माण कराव्यात हे वेश्म या शास्त्रांतर्गत येते.

 

८) प्राकार शास्त्र  – हिंस्त्र पशू, रानटी लोक, शत्रू वगैरेंच्या त्रासापासून आपले संरक्षण असे करावे व त्या त्रास देणाऱ्यांचा नाश कसा करावा हे या शास्त्रात सांगितले आहे. दुर्ग, किल्ले इ. गोष्टींचा समावेश सुद्धा या शास्त्रांतर्गत होतो.

 

९) नगररचना शास्त्र   – गावे, शहरे, बंदरे, राजधान्या कशा वसवाव्यात, त्यात कोणकोणत्या सोई असाव्यात व त्यांची व्यवस्था कशी ठेवावी हे या शस्त्रांतर्गत येते. नगरात आठ बाबींचा विचार केलेला असतो. प्रपा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मंडप किंवा धर्मशाला, आपण म्हणजेच बाजारपेठ, राजगृह – सरकारी कार्यालये, लोकवस्ती, देवालय, नगर सुरक्षा व आराम म्हणजेच बागा अथवा वाटीका म्हणजेच करमणुकीची साधने.

 

* एक कुटुंब राहण्याच्या घरास वेश्म म्हणतात, युद्धाच्या वेळी उपयोगी पडणारे ते प्राकार व पुष्कळ घरे एकत्र असतात ते नगर. सध्या या तिन्हीना मिळून वास्तुशास्त्र मानण्यात येते.

 

१०) यंत्रशास्त्र – माणसे किंवा जनावरे यांची शक्ती लावून मोठमोठी अवजड कामे कशी करून घ्यावीत, पाणी वारा वगैरे सृष्टीतील शक्तिंची मदत या कामी कशी घ्यावी हे या शास्त्रांतर्गत येते.

 

        याप्रमाणे शिल्पसंहितेत एकंदर दहा शास्त्रांचा समावेश होतो. आपली संस्कृती खूप प्राचिन व पुर्णत्वास पोहचली होती हे यावरून सहज लक्षात येते. त्याकाळात सुधारलेल्या समाजाचे काम सुयंत्रपणे चालवण्याइतके शास्त्रीय ज्ञान आपल्या पूर्वजांनी मिळवून ग्रंथरूपाने सुरक्षित करून ठेवले होते. दुर्दैवाने आज त्यातील अनेक ग्रंथ काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत पण जे आहेत ते ही आपल्या पुर्वजांच्या ज्ञानाची व्याप्ती दाखवण्यास पुरेसे आहेत.

 

पुढील भागात पाहून ३२ विद्या व त्याअंतर्गत येणाऱ्या ६४ कला…. क्रमश:……….


हे लेखही वाचा ……..

 

वास्तु पुरुष जन्मकथा

वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)

प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र

शिल्पसंहिता – भाग १


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्यो. विशारद, वास्तु विशारद

 9901287974, 8722745745


BACK TO HOME

BACK TO VASTUSHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

शिल्पसंहिता – (भाग -१)

              शिल्प म्हणजे मुर्ती आणि शिल्पशास्त्र म्हणजे मुर्ती इ. घडविण्याची कला अगर शास्त्र असाच बहुतेकांचा समज असतो. पण शिल्पशास्त्र अगर शिल्पसंहिता या शब्दाचा इतका मर्यादीत अर्थ नाही आहे. शिल्प शब्दाचा अर्थ यापेक्षा अधिक व्यापक आहे.

 

              शिल्प याचा अर्थ – “यत्‌ शीलयति समा धाति तत्‌शिल्पें”  ‘जे मनाला समाधान देते ते अथवा जे दु:ख निवारण करते ते शिल्प’ असा आहे.

   

         कश्यपसंहिता ही सर्वप्रथम संहिता मानण्यात येते. त्यानंतर १८ संहिताकारानी संहिता लिहिल्याचा उल्लेख अढळतो. पण यातल्या बहुतेक आता उपलब्ध नाहीत. सद्या केवळ कश्यपसंहिता, भृगुसंहिता व मयसंहिता या तीनच संहिता उपलब्ध असल्याचे अढळते. *(ज्योतिषशास्त्रांतर्गत येणाऱ्या संहिता व शिल्पशास्त्रांतर्गत येणाऱ्या संहिता वेगवेगळ्या आहेत.)

     

          आपल्या प्राचिन ऋषीमुनींनी ज्ञानासंबंधीची जी रितसर मांडणी केली आहे तीचा जरा विचार करू.

          अगदी पहीले ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, असे अनुभव आले म्हणजे त्यांचे हितकर-अहितकर असे भेद पाहून जो त्यांचा आढावा घेतात त्याला “कला” (Art Or Skill) म्हणतात. अशा अनेक कला एकत्रित करून त्यांचे नियम ठरविले तर ती “विद्या” होते. अनेक विद्यांचे संकलित स्वरूप म्हणजे “शास्त्र” व अनेक शास्त्रे एकत्र सूचित झाली म्हणजे त्यास “संहिता” म्हणतात.

      याप्रमाणे शिल्पात संहिता, शास्त्रे, विद्या व कला याचा कसकसा अंतर्भाव होतो तो पाहू.

         

          शिल्पसंहितेच्या अंतर्गत तीन(३) खंड, दहा (१०) शास्त्रे, बत्तीस (३२) विद्या व चौसष्ट (६४) कला यांचा अंतर्भाव होतो यावरून शिल्पशास्त्राच्या व्यापकतेचा अंदाज येऊ शकतो.

 

शिल्पसंहितेच्या अंतर्गत तीन खंड येतात ते असे –

 

धातूनां साधनानां च वास्तूनां शिल्प संज्ञितं ॥ भृगुसंहिता अ.१

 

१) धातूखंड  २) साधनखंड   ३) वास्तुखंड

 

      सृष्टीत कोणती वस्तू कोठे व कशी निर्माण झाली आहे, त्याची उत्पत्ती कशी झाली व ती कशी मिळवावी हे सांगणारे ते धातूखंड. इंग्रजीत याला  Exploration (शोध) म्हणू शकतो. सृष्टीत निर्माण झालेली वस्तू मिळविल्यावर ती आपणास हव्या त्या ठिकाणी कशी घेऊन जावी यासंबंधीची व्यवस्था म्हणजे साधनखंड. इंग्रजीत याला  Conveyance  (वाहन) म्हणू शकतो. प्राप्त वस्तू वापरण्या योग्य बनविणे अगर त्यात निवास करता येण्याजोगी बनविणे म्हणजे वास्तुखंड. इंग्रजीत याला  Habitation  (निवास) म्हणू शकतो.

 

कृषीजलं खनिश्चेति धातुखंड त्रिधामतं ॥ भृगुसंहिता अ.१

   धातूखंडात तीन शास्त्रे येतात. 1) कृषि  2) जल   3) खनिज

 

 नौका-रथाग्नि-यानानां कृति: साधन मुच्यते ॥ भृगुसंहिता अ.१

   साधनखंडात तीन शास्त्रे येतात. 4) नौका  5) रथ   6) विमान

 

वेश्म प्राकार नगररचना वास्तु संज्ञितं ॥ भृगुसंहिता अ.१

   वास्तुखंडात चार शास्त्रे येतात. 7) वेश्म  ब) प्राकार  8) नगररचना   9) यंत्र

 

    यावरुन आपण शिल्पसंहिता (शिल्पशास्त्र) हे इंग्रजीतील  Engineering या शब्दापेक्षा जास्त व्यापक आहे असे म्हणू शकतो.

 

    ज्याला आज आपण वास्तुशास्त्र म्हणतो ते या शिल्पामधील  वास्तुखंडामधील चार शास्त्रामधील एक शास्त्र (भाग) आहे. तर असे हे वास्तुशास्त्र जर शिल्पसंहितेचा केवळ एक छोटासा भाग असेल तर मग शिल्पसंहितेची व्याप्ती किती असेल याचा विचार करा.

    पुढील भागात या दहा शास्त्रांविषयी अधिक माहिती घेऊन त्यात येणाऱ्या ३२ विद्या व ६४ कला कोणत्या आहेत ते पाहु.

क्रमश:……


हे लेखही वाचा ……..

 

वास्तु पुरुष जन्मकथा

वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)

प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र

शिल्पसंहिता – भाग २

 


uttam gawade

श्री उत्तम गावडे

ज्यो. विशारद, वास्तु विशारद

 9901287974, 8722745745


BACK TO HOME

BACK TO VASTUSHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)

ही सृष्टी, या सृष्टीतील प्रत्येक वस्तु ही पंचतत्वांपासून बनलेली आहे. आपले शरीर सुध्दा याच पंचतत्वांपासून बनले आहे. हाच सिध्दांत आपल्या वास्तुलाही लागू होतो. पंचतत्वे म्हणजे अग्नि, पृथ्वी, वायु, जल व आकाश यांनाच पंचमहाभूते असेही म्हणतात. या पंचतत्वांचे प्रमाणबध्द संतुलन म्हणजेच ’वास्तुशास्त्र’. मूळात आयुर्वेद, योग व वास्तुशास्त्र यांचा मूळ उद्देश अनुक्रमे शरीर, मन व वास्तु (राहण्याची जागा) यांना संतुलीत करणे हाच आहे. पंचतत्वांचे हे संतुलनच वास्तुत राहणाऱ्यांना प्रसन्नता, शांती, आरोग्य, धन, समृध्दी व योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रधान करते व याच पंचतत्वांचे असंतुलन वास्तुतील शक्तीना अतिप्रभावी किंवा निष्प्रभावी करुन वास्तुत राहणाऱ्या लोकांसाठी प्रतिकुल परिस्थिती निर्माण करते.

 

ज्यावेळी आपण म्हणतो की, घर वास्तुशास्त्रानुसार आहे म्हणजेच त्या घरात पंचतत्वांचे संतुलन असते व जेंव्हा आपण म्हणतो की, घरात वास्तुदोष आहे तेंव्हा त्याघरात पंचतत्वांचे संतुलन बिघडलेले असते. या पंचत्वांचे एकमेकांशी असलेले संबंध महत्वाचे आहेत. कोणत्या तत्वातून कोणत्या तत्वची निर्मिती (उत्त्पत्ती) होते व कोणते तत्व कोणत्या तत्वाला नियंत्रीत (नाश) करते हे ज्याला समजले त्यालाच वास्तुशास्त्र समजले असे म्हणू शकतो.

 

पंचतत्वांच्या असंतुलनाचे परिणाम –

 

१) अग्नी तत्व – वास्तुमध्ये अग्नी तत्व असंतुलीत झाले असेल तर विनाकारण प्रत्येक कार्यात अपयश येते, स्वताची ओळख निर्माण करण्यात अडचणी येतात, अशा वास्तुत राहणाऱ्या लोकांत असुरक्षितेची भावना असते. अग्नी तत्वाचे असंतुलन हे आत्मविश्वास, जोश, उत्साह यांची कमी निर्माण करते.

 

२) पृथ्वी तत्व – वास्तुमध्ये पृथ्वी तत्व असंतुलीत झाले असेल तर जीवनात स्थिरता येणे कठीण होते, प्रत्येक बाबतीत या व्यक्तींना अस्थिरतेचा सामना करावा लागतो. अशा वास्तुतील व्यक्ती आळशी व स्फुर्तीहीन जीवन जगताना दिसतात. जीवनाचे ध्येय ठरविता येत नाही.

 

३) वायु तत्व – वास्तुमध्ये वायु तत्व असंतुलीत झाले असेल तर अशा वास्तुतील लोक अधिक रागिष्ट, छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणाऱ्या असतात, घरातील सदस्यांमध्ये नेहमी नोकझोक चालू असते. नातेवाईक व शेजाऱ्यांशी संबंध चांगले नसतात. अगदी शुल्लक गोष्टींवर सुद्धा टोकाची प्रतिक्रिया देतात. समाजापासून दूर असतात.

 

४) जल तत्व – वास्तुमध्ये जल तत्व असंतुलीत झाले असेल तर अशा व्यक्तींच्या जीवनात नविन संधी येत नाहीत. धनाची सतत कमतरता जाणवते. प्रगति थांबते. नोकरी व्यवसायात प्रचंड मेहनत करुनही फारशी प्रगती होत नाही. घरच्या सदस्यांमध्ये एकवाक्यता नसते, एकमत कधीच होत नाही. अशा वास्तूतील लोक नेहमी एका दडपणाखाली वावरताना दिसतात.

 

५) आकाश तत्व – वास्तुमध्ये आकाश तत्व असंतुलीत झाले असेल तर व्यक्तींचे मन भ्रमित व अस्थिर असते, नेहमी वैचारीक गोंधळ माजलेला असतो, विचारांची दिशा पक्की नसते. सकारात्मक विचार मनात येत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी व बंधनाची सतत जाणीव होत असते.

प्रतिक, आकार आणि रंग यांच्या माध्यमातून असंतुलित पंचतत्वांना बऱ्याच प्रमाणात संतुलित करता येते.


हे लेखही वाचा ……..

 

वास्तु पुरुष जन्मकथा

प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र

शिल्पसंहिता – भाग १

शिल्पसंहिता – भाग २

 


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्यो. विशारद, वास्तु विशारद

 9901287974, 8722745745


BACK TO HOME

BACK TO VASTUSHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

वास्तु पुरुष जन्मकथा

वास्तु पुरुषाच्या जन्माच्या (उत्पत्तीच्या) अनेक वेगवेगळ्या कथा पुराण व वास्तु ग्रंथातून अढळतात. विश्वकर्मप्रकाश या वास्तुशास्त्राच्या प्रमाण ग्रन्थातही एक कथा अढळते, या कथेनुसार प्राचिन काळी त्रेता युगात ब्रह्मदेवाने एक महाभूत (विशालकाय प्राणी) निर्माण केला. त्याने आपले संपूर्ण शरिर भूमंडलावर पसरवून दिले. त्याला पाहून देवता व दानव दोघेही आश्चर्यचकीत व भयभीत झाले व ब्रह्म देवाच्या शरण गेले. त्यावेळी ब्रह्मदेवानी त्या देवता व दानवाना असा सल्ला दिला की, याला अधोमुख पालथा पाडून त्यावर स्वार व्हा व त्यांनी तसे केले. मग त्या महाकाय पुरुषाने शरणांगती पत्करुन देवाकडे याचना केली त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला आपला मानसपुत्र मानून असा वरदान दिला की,…….

याशिवायही अनेक पुराणांतून व वास्तू ग्रन्थांतून अनेक वेगवेगळ्या कथा अढळतात. पण त्यापैकी सर्वात प्रचलित कथा ही मत्स्य पुराणातील आहे. ती अशी की, एकदा भगवान शिव व अंधकासुराचे द्वन्द (युध्द) होत असते त्यावेळी त्या दोघांच्या घामाचे काही थेंब भूमीवर पडले व त्या घर्मबिंदूतून एक विशालकाय, विराट व अत्यंत बलवान पुरुषाची उत्पत्ती झाली. देव व असुर दोघांनाही त्याला पाहुन आश्चर्य वाटले. मग ते त्याला घेऊन ब्रम्हदेवाकडे गेले ब्रम्हदेवांने त्या विशालकाय पुरुषाला आपला मानसपुत्र माणून वास्तुपुरुषाचे नांव दिले व त्याला एका विशीष्ट प्रकारे (ईशान्येला शिर व नैऋत्येला पाय करुन) जमिनीवर अधोमुख झोपवले. (दुसऱ्या कथेनुसार देव व असुरांनी मिळून त्याला अधोमुख जमिनीवर पाडले) त्याच्या काही भागावर देवानी तर काही भागांवर असुरांनी वास केला. याचबरोबर ब्रम्हदेवाने त्या वास्तु पुरुषाला असा वरदान दिला की,………

 

पुराणातील कथा वर्णन करताना यात दिलेली अनेक पात्रे ही प्रतिकात्मक (symbolic) असतात. त्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. इथे अंधकासूर , (नांवातच सर्व काही आहे) अंधार म्हणजे अज्ञानाचे प्रतिक तर शिव म्हणजे परम ज्ञानाचे प्रतिक आहे. या दोघांचे द्वंद (युद्ध) म्हणजेच संघर्ष, इथे हेच सांगायचे आहे की, मानसाच्या मनातील ज्ञान व अज्ञान यांचा हा संघर्ष आहे. तो ही इतका की, घर्म (घाम) येईल, घाम तेंव्हाच येतो जेंव्हा प्रचंड मेहनत घेतली जाते. शेवटी शिवाचा विजय म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा विजय. त्यात आलेल्या घामाचा थेंब म्हणजेच विचारांच्या संघर्षातून आलेला निष्कर्ष म्हणजेच वास्तु पुरुष. ज्याला ब्रह्माने (ज्ञानाची प्राप्ती झालेला व्यक्ती) आपला मानस पुत्र मानला. आणि असा वरदान दिला की,……..

जो कोणी घर, नगर, तलाव, मंदिर, प्रासाद, दुर्ग (किल्ला), शहर, पत्तन (व्यावसायीक नगर) बस्ती इ. चे निर्माण करते वेळी वास्तुपुरुषाला “ध्यानात” ठेऊन कार्य करेल, देवता त्याला सहाय्य करतील व जो कोणी वास्तु पुरुषाचा विचार न करता कार्य करेल, असूर (अ सूर म्हणजेच सूरात नसलेले, लयबद्ध नसलेले) ते कार्य नष्ट करतील, त्या कार्यात विघ्न आणतील. म्हणून वास्तु बनविताना वास्तु पुरुषाच्या अंगांचा, त्याच्या मर्म स्थानांचा विचार वास्तु तयार करण्यापूर्वीच करावा. तुझा विचार (पुजा) केल्याशिवाय वास्तुसंबंधीत कार्य पुर्ण मानले जाणार नाही. इथे हेच सांगितले आहे की, घर बनवण्यास सुरवात करण्यापूर्वीच त्याचे योग्य नियोजन केले पाहीजे.

 


संदर्भ – श्री मत्स्य पुराण

विश्वकर्मप्रकाश:

हे लेखही वाचा ……..

 

वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)

प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र

शिल्पसंहिता – भाग १

शिल्पसंहिता – भाग २

 

Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद , वास्तू विशारद

9901287974 , 8722745745


BACK TO HOME

BACK TO VASTUSHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र

सौदामिनीतंत्रम्‌ –
भारद्वाज ऋषींनी आपल्या “सौदामिनी तंत्र” या ग्रंथात विजांचे (Electricity) ५  प्रकार सांगितले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

१) रेशीम, कोल्हा, ससा किंवा मांजर या प्राण्यांचे कातडे हवेत झटकले तर उत्पन्न होते ती ‘तडित्‌’ वीज. (पाश्च्यात शस्त्रज्ञ अद्याप हिचा काहीच उपयोग करीत नाहीत.)

२) स्फटिक, रेशीम, लाख वगैरे जिनसा एकमेकांवर घासल्यावर उत्पन्न होते ती ‘सौदामिनी’ वीज.

३) आकाशात ढगात उत्पन्न होते ती ‘चपला’ हिलाच विद्युत, चंचला असेही संबोधतात.

४) विद्युतकुंभ ( Battery ) मध्ये उत्पन्न होणारी वीज ती ’शतकोटी’. * अगस्त्य ऋषी हिला ‘मित्रावरुणौ’ म्हणतात. मित्र म्हणजे धन व वरुण म्हणजे ऋण वीज होय. कार्य करण्यासाठी शंभर कुंभ वापरावे लागतात म्हणून हिला ‘शतकुंभी’ अथवा ‘शतकोटी’ असेही म्हणतात.

५) लोहचुंबकाचे फिरण्याने उत्पन्न होऊन एका भांड्यात साठवली जाणारी ती ‘हादिनी’ वीज. वीज साठवण्याच्या भांड्याला हूद (Storage Battery ) म्हणतात.
वशिष्ठ, अगस्त्य व भारद्वाज यांनी विजेच्या शास्त्रांवर ग्रंथ लिहिले आहेत. विमानशास्त्रांवर नारायण, वाचस्पति, शौनक, गर्ग व भारद्वाज यांचे ग्रंथ आहेत.

वरील माहीती श्री कृष्णाजी विनायक वझे (१८६९ – १९२९) यांच्या लेखातून घेतली आहे. श्री कृष्णाजी विनायक वझे हे इंजीनिअर होते. त्यांनी सिंध मधील सिंधू नदीवर सक्करचे प्रसिध्द धरण बांधले त्याबद्यल इंग्रज सरकारने त्यांना ’रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. पुढे लो. टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी इंग्रज सरकारची पदवी परत केली व स्वत:ला भारतीय शिल्पशास्त्राच्या संशोधनाच्या कार्यात वाहून घेतले. त्यांनी अनेक भारतीय प्राचीन वास्तु शिल्प शास्त्रांच्या ग्रन्थांचा अभ्यास केला. पण दुर्दैवाने त्यांचे बरचसे लिखाण आज काळाच्या उदरात गडप झाले आहे. सध्या त्यांचे केवळ एकच पुस्तक उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या या संशोधन कार्यात ज्या प्राचीन ग्रन्थांचा अभ्यास केला ती यादी केवळ पाहीली तर थक्क व्हायला होते. त्यातीलही बरेचसे ग्रन्थ आज नष्ट झाले आहेत पण जे आहेत त्यांचा अभ्यासही खूप मोठा आहे. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन त्यावेळी आपला समाज किती प्रगत होता याविषयी सांगताना श्री वझे म्हणतात की, “गेल्या ३० वर्षात संस्कृत ग्रंथांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यावर भौतिक शास्त्रमय शिल्पात हिंदुस्तानात किती ज्ञान होते याबद्यलचा एक निबंध मी इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला. मी आपल्या माहीतीसाठी येथे इतकेच सांगतो की, वाफेच्या यंत्राखेरीज बहुतेक अधुनिक शिल्प (मशीन्स) आपल्याकडे एके काळी होती असे मला आढळून आले आहे.”  आजच्या शिक्षण पद्धती विषयी श्री वझे म्हणतात की, “इंग्रजी राज्य हिंदुस्थानात आल्यावर इंग्रजानी केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे इंग्रजी ज्ञान व त्याचा फैलाव हिंदुस्थानात झाला. तशातच सरकारी नोकऱ्यात ज्ञानापेक्षा इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य प्राप्त झाल्याने प्राचीन हिंदू ज्ञानाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम असा झाला की, भारतात विचार करण्यासारखे ग्रंथच नाहीत व सर्व उत्तम ज्ञान काय ते पाश्चिमात्यांकडेच आहे अशी मोठ्या समजल्या जाणाऱ्यांची समजूत झाली. ज्याप्रमाणे वेदांतात हेगेल, कांट, शोपेनहार, प्लेटो, सॉक्रेटिस, मिल, ह्यूम यांच्या वेदांताचे जितके व जसे शिक्षण दिले गेले तसे पतंजली, कणाद, जैमिनी, बादरायण यांच्या वेदांताचे दिले गेले नाही. हिच अवस्था इतर विषयांच्या बाबतीतही झाली.” ज्यांनी मोठमोठी राज्ये चालविली, किल्ले, कालवे, इमारती, पूल वगैरे बांधले, सूक्ष्म विचार करण्यात ज्यांची बुद्धी फार कुशाग्र अशी ज्यांची ख्याती, असे लोक भौतीक शास्त्रांशिवाय राहिले कसे ? अशी सहज येणारी शंकासुद्धा या पंडितांना आली नाही.
श्री कृष्णाजी विनायक वझे यांच्या याच लेखाने मलाही जून्या ग्रन्थांच्या अभ्यासाकडे वळविले आज वास्तु व शिल्प शास्त्रावरील ६० पेक्षा अधिक ग्रंथ मी जमविले आहेत त्यांचा अभ्यास करतो आहे यातून मिळणारी अशीच रंजक व महत्वपुर्ण माहीती मी आपल्या सोबत Share करीत राहीन.

धन्यवाद !


 

हे लेखही वाचा ……..

 

वास्तु पुरुष जन्मकथा

वास्तु आणि पंचतत्वे (पंचमहाभूते)

शिल्पसंहिता – भाग १

शिल्पसंहिता – भाग २


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे
ज्योतिष विशारद, वास्तु विशारद
9901287974, 8722745745


BACK TO HOME

BACK TO VASTUSHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

पद्मकुण्ड : विशिष्ट स्थापत्य विधान

जलस्रोतों में “कुंड” एक विशेष प्रकार की रचना है तो उसमें भी एक निर्माण शैली है पद्मकुंड की। इसे कमल कुंड भी कहा जाता है। इसे कमलखेत के रूप में भी जाना जाता है क्योंकि यह पद्म उत्पन्न करता है।

Jyotish Jagat

Jyotish Jagat

पुष्करिणी, दीर्घिका, पोखरी, पोखरणी वगैरह भी इसके पर्याय हैं। हालांकि अपराजित, राजवल्लभ आदि शिल्प ग्रंथों में अनेक प्रकार के कुंडों का नामवार विवरण मिल जाता है और पुराणों में मत्स्य और सांबपुराण में इनका सुंदर विवरण है। इससे यह तो लगता ही है –

  1. ये कुंड कृत्रिम बनाए जाते थे,
    2. कुंडों की रचना पाषाणों से होती है,
    3. पुष्पादि रूप में उनका संयोजन होता
    4. कोणादि रूपों को भी दिखाया जाता।

भारतीय परंपरा में स्नान और देवालयों में स्नात्र आदि विधानों के लिए बड़े-बड़े कुंड उत्तर से लेकर दक्षिण तक बनाए गए हैं। कई नाम, कई रूप और उनके निर्माण की भी अपनी अपनी कहानियां और इतिहास है।

श्रीलंका तक कुंडों का वैभव देखा जा सकता है। वहां राजधानी के पास ही पोलेण्णरुव्वा के जेतवनराम परिसर में एक सुंदर कुंड है : पद्मपोखरी ( Lotus pond) यह करीब आठ सौ साल पुराना है। राजा पराक्रमबाहू (1153-86 ई.) के शासनकाल में इसका निर्माण हुआ। इसके प्रारंभिक अवशेष जेतवन की खुदाई में मिले।

इसकी रचना पद्म के आकार की है और नज़र ऐसे आता है जैसे भूमिस्थ कमलाकार मंच हो जबकि यह बहुत पवित्र जलस्रोत रहा है। महावंश के उद्योग-निर्देश के मुताबिक इसका निर्माण हुआ। यह जानकर रोचक लगेगा यह पद्मकुंड अष्टकोण की रचना से बना हुआ है।

भूमितल से नीचे तक पांच प्रस्तर की तहें हैं और पुष्प के रूप में कुछ इस तरह गड़े हुए पत्थरों का संयोजन किया गया है वे मुकुलित पंखड़ियों से लेकर आंतरिक रूप तक को दिखाई दे।
इसकी रचना का नियम है :
360 ÷ 8 = 45°
इस तरह पांचों स्तर के पाषाणों को 45-45 डिग्री में सुघड़ बनाकर ऊपर से नीचे तक न्यून करते हुए संयोजित किया गया है। इससे यह वृताकार भी है और उसमें पंखुडी-पंखुड़ी पद्म प्रदर्शित करती है। दरअसल ये सीढ़ियां भी सिद्ध होती है। अंदर ही मोखी रूप में जलभरण और निकास रूप में जल निकालने का उपाय भी प्राचीन स्नानागार की तरह दिखाई देता है।

है न जलस्रोतों का अपना रचना विधान ! आपके आसपास भी तो कुछ ऐसा जल कौतुक होगा, बताइयेगा। आदरणीय Yogendra Pratap Singhh जी का आभार कि चित्र भेजकर इस स्थापत्य को विश्लेषित करने का अवसर सुलभ करवाया।….

© डॉ. श्रीकृष्ण  “जुगनू”